पुणे हादरलं! अल्पवयीन मुलींची घरात रंगली दारू पार्टी, त्यानंतर घडलं भयानक… एकीचा मृत्यू
या बोगद्यामुळे बदलापूर ते पनवेल हा दीड तासांचा प्रवास फक्त 15 मिनिटांत होणार आहे. बदलापूर ते पनवेल हे जवळपास 38 किमीचे अंतर आहे.
Source link
Pooja Khedkar : वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरच्या वैद्यकीय तपासणीची (Medical Examination) कागदपत्रं अखेर सापडली आहेत. अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयात ही कागदपत्रं सापडली आहेत. यावर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची बैठक होणारे. त्यावेळी त्यांना ही कागदपत्रं सादर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक संजय घोगरे यांनी दिलीये. पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांनी अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून दिव्यांग आणि मानसिक आजारी असल्याचे प्रमाणपत्र दिलं होतं. जिल्हा शासकीय रुग्णालयातून 2018मध्ये नेत्र दिव्यांग प्रमाणपत्र (Disability Certificate) आणि 2021मध्ये मानसिक आजारी असल्याचं प्रमाणपत्र दिलं होतं.
मेडिकल कॉलेज प्रवेशासाठी खोटी कागदपत्र
वादग्रस्त आयएएस अधिकारी डॉ. पूजा खेडकरने मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठीही नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट सादर केलं होतं अशी माहिती समोर आलीय. पूजा खेडकर यांनी 2007 मध्ये पुण्यातील काशीबाई नवले मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएससाठी ऍडमिशन घेतलं होतं. यावेळी NT – 3 म्हणजेच भटक्या जमातींसाठी आरक्षित असलेल्या कोट्यातून ऍडमिशन घेतलं होतं. कुटुंबाचे वार्षिक आर्थिक उत्पन्न 8 लाखांच्या आत असेल तरच नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट देण्यात येतं. मात्र त्यांनी मेडिकल प्रवेशासाठीही नॉन क्रिमीलेअरचा वापर केल्याचं स्पष्ट होतंय.
दरम्यान मेडिकल प्रवेशावेळी विद्यार्थ्याला फिटनेस सर्टिफिकेट देखील सादर करावं लागतं. काशीबाई नवले मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेताना पूजा खेडकरांनी फिटनेस सर्टिफिकेट सादर केलं होतं. त्यामध्ये त्यांनी कुठल्याच स्वरूपात दिव्यांग नसल्याची नोंद आहे. त्यामुळे कॉलेज प्रवेशाच्या वेळी मात्र त्या पूर्णपणे तंदुरुस्त होत्या अशी माहिती समोर आलीय.
अपंगत्व प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न
दरम्यान, पूजा खेडकरांनी पुण्यातील जिल्हा रुग्णालयातून देखील अपंगत्व प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न केला होता. शारीरिक दृष्ट्या विकलांग म्हणजेच कुठल्यातरी व्यंगाच्या कारणावरून हालचालींवर मर्यादा येत असल्याबाबतचं प्रमाणपत्र मिळावं यासाठी त्यांनी अर्ज केला होता. त्यानुसार त्यांची 23 ऑगस्ट 2022 रोजी वैद्यकीय तपासणी झाली
त्यानंतर 11 ऑक्टोबर 2022 रोजी त्यांची विनंती फेटाळण्यात आल्याचं त्यांना औंध जिल्हा रुग्णालयाकडून लेखी कळवण्यात आलं.
खेडकर कुटुंबाचा शोध
पूजा खेडकरांच्या कुटुंबाचा पुणे ग्रामीण पोलिसांकडून शोध सुरु आहे. पूजा खेडकर यांच्या कुटुंबाशी संपर्क होत नसल्याचं पुणे पोलिसांचं म्हणणं आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या खेडकर कुटुंबातील सात जणांचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथकं तयार केलीत. पौड पोलिसांच्या मदतीने खेडकर कुटुंबाचा शोध घेतला जातोय. या सर्वांचे मोबाईल फोनही स्वीच ऑफ असल्याचं पोलीसांचं म्हणणंय. पुणे पोलिसांनी रविवारी खेडकर कुटुंबाच्या पुण्यातील बाणेर भागातील बंगल्यात जाऊन तपासण्याचा प्रयत्न केला. मात्र बंगल्याचं गेट बंद असल्याचं आढळून आल्यानंतर पोलिसांनी या बंगल्याचं चित्रीकरण केलं.
पुण्यात भीक मांगो आंदोलन
पुण्यातील IASची ट्रेनिंग घेणारी पूजा खेडकर आणि तिच्या कुटुंबियांविरोधात भीकमांगो आंदोलन करण्यात आलंय.पानशेत परिसरातील शेतकरी आणि जागृत पुणेकरांनी हे आंदोलन केलंय. पिस्तुल रोखून हुसकवण्याची भाषा करणाऱ्या खेडकर कुटुंबियांविरोधात पैसे मागून भीकमागो आंदोलन करण्यात आलंय. यावेळी आरोपींविरोधात चौकशी करण्यात यावी, अशी पुणेकरांकडून मागणी देखील करण्यात आलीय.
Bhavali Dam : नाशिक जिल्ह्यातील 35 पर्यटनस्थळांवर बंदी घालण्यात आली आहे. बंदीच्या आदेशाची पायमल्ली होताना दिसत आहे. नाशिकच्या भावली धबध्यावर पर्यटकांची तुफान गर्दी पहायला मिळत आहे. भावली धरण परिसरात पर्यटक आपला जीव धोक्यात घालून धबधब्यावर जाण्यासाठी निसरड्या पायवाटेवर तोबा गर्दी करत आहेत.
पावसाळा सुरू झाल्याने नाशिक जिल्ह्यातील धबधबे आणि मनमोह दृश्यांची जिल्ह्यातील नव्हे तर इतर शहरातील पर्यटकांना सुद्धा भुरळ पडत असते. त्यामुळे पर्यटकांचा ओढ नाशिक जिल्ह्यातील पर्यटन स्थळाकडे असतो. धरण क्षेत्राच्या परिसरात आणि पर्यटनस्थळावर सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी व्हायला लागली आहे.
नाशिक जिल्ह्यातील तब्बल 35 पर्यटनस्थळांसाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले असले तरी धोकादायक ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात जात आहेत. भावली धबधब्या वाहू लागल्याने पर्यटकांची गर्दी झाली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, घोटी वाडीवरे, पेठ, हरसुल, नांदुरी गड, सुरगाणा, हरणबारी, निफाड, मांगीतुंगी या परिसरात पावसाळ्यामुळे बऱ्याच ठिकाणी धबधबे तयार झाले आहेत. विशेषता भावली, मुकणे, वैतरणा, वालदेवी, दारणा,कश्यापी,गंगापूर, नांदूर मध्यमेश्वर,चणकापूर धरण या परिसरात मोठ्या संख्येने नागरिक पर्यटनासाठी येत आहेत.
लोणावळ्यातील दुर्घटनेनंतर पर्यटकांनी काहीही धडा घेतला नसल्याचंच दिसून येतं. मावळमधल्या कुंडमळा धबधब्यावर तरुणाई धोकादायकरित्या पर्यटन करताना दिसून येतायत. कुंडमळा इथं पाण्याचा फ्लो मोठा आहे. तसंच मोठ मोठे खड्डे आहेत. मात्र केवळ सेल्फी, फोटोसाठी असा धोका पत्करताना पर्यटक दिसतायत. याठिकाणी असलेला साकव पूल धोकादायक असल्याचंही सांगण्यात आलंय. मात्र त्यावरूनही प्रवाशांची ये-जा सुरूय.
Vishalgad Illegal Construction Matter: कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरील अतिक्रमणाच्या मुद्द्याला हिंसक वळण मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. विशाळगडावरील अतिक्रमण त्वरित काढण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. असं असतानाच आता विशाळगडावर स्थानिक नागरिकांना मारहाण झाल्याची माहिती समोर येत आहे. तर काही अज्ञातांनी विशाळगडावजळील घरांवर दगडफेक केली आहे. हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विशाळगड परिसरात जमावबंदीचा आदेश आधीच लागू करण्यात आला आहे. विशाळगड परिसरात पोलिसांचा मोठा फौजपाठा तैनात असून या परिसरामध्ये तणाव दिसत आहे.
विशाळगड अतिक्रमण मुक्त करण्यासाठी आज संभाजी राजे छत्रपती यांनी चलो विशाळगड अशी हात दिली असल्याने कोल्हापूरमध्ये सकाळपासूनच जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यातच आता गडावरुन ही बातमी समोर येत असल्याने कोल्हापूरमधील वातावरण चांगलेच तापले आहे. विशाळगडाच्या वाटेवर असलेल्या संभाजी राजे छत्रपतींनी ज्या विशाळगडाने स्वराज्याचं संरक्षण केलं तो आज संकटात आहे, अशी प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांशी बोलताना नोंदवली. विशाळगडाला जाण्यासाठी निघण्यापूर्वी सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलातना “माझ्यावर गुन्हा दाखल होत असेल तर त्याचा मला आनंद आहे,” असं वक्तव्य संभाजी राजे छत्रपती यांनी केलं होतं.
“राज्य सरकार हे स्थानिक आमदाराच्या दबावाखाली विशाळगडला अतिक्रमण मुक्त होवू देत नाहीये,” असा आरोप देखील संभाजी राजे यांनी केला आहे. “विशाळगडावर एकूण 156 जणांनी अतिक्रमण केले आहे, त्यातील फक्त 6 जणांना न्यायालयाने अतिक्रमण काढायला स्थगिती दिली आहे, मग राज्य सरकार उर्वरित अतिक्रमण का काढत नाही,” असा सवाल देखील संभाजी राजे यांनी उपस्थितीत केला आहे.
संभाजी राजे छत्रपती यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर कोल्हापूर जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आलं आहे. प्रशासनाने जिल्ह्यात जमाव बंदी आदेश जारी केले आहेत. त्याचबरोरीने विशाळगड मार्गावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अतिक्रमण मुक्तीसाठी संभाजी राजे यांनी संपर्ण महाराष्ट्रातील शिवभक्तांना चलो विशाळगडचा नारा दिला आहे. त्यामुळे विशाळगडाच्या दिशेने हजारो शिवभक्त येतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक विशाळगड अतिक्रमण मुक्त व्हावा यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलनं केले जात आहे. विशाळगड अतिक्रमणावरून कोर्टात याचिका देखील दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर संभाजीराजे यांनीदेखील हा मुद्दा उपस्थित केला आहे. बकरी ईदला उच्च न्यायालयाने विशाळगडावर कुर्बानीला परवानगी दिल्यानंतर विशाळगडावरील अतिक्रम पुन्हा चर्चेत आलं आहे.
अ अननसाचा… ब बदकाचा… शाळेत हे असंच शिकवलं जातं. मात्र पोषण आहाराचे कंत्राटदार आहेत की या मुलांना काही वेगळेच धडे देत आहेत. पोषण आहाराचे कंत्राटदार म्हणतायत ब बेडकाचा… च चिमणीचा… उ उंदराचा…. स सापाचा… पाठ्यपुस्तकांमधून हे धडे मिळत नाहीएत तर विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या पोषण आहारातून विद्यार्थ्यांना हे धडे मिळतायत.. कारण कधी पोषण आहारात मेलेला उंदीर मिळतो.. कधी याच पोषण आहारात साप मिळतो. तर कधी मेलेली चिमणी.
Source link