by Hansraj Agrawal | Jul 3, 2024 | Trending News
Nawab Malik : नवाब मलिक सांगा कुणाचे? असा प्रश्न सध्या सगळ्यांनाच पडलाय… ईडी कारवाईनंतर जेलमधून बाहेर आलेल्या नवाब मलिकांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाला पाठिंबा दिलाय… हिवाळी अधिवेशनात ते सत्ताधारी बाकावर येऊन बसले होते. मात्र नवाब भाईंमुळं अजितदादांच्या अडचणी वाढल्यात… मलिकांना महायुतीत घेण्यास भाजपनं विरोध केला. आता विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर एकेका आमदाराचं मत महत्त्वाचं आहे. विधानपरिषदेची रणनीती आखण्यासाठी देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीला नवाब मलिकही हजर होते. याबाबत पत्रकारांनी जेव्हा अजित पवारांकडे विचारणा केली असता त्यांनी संतप्त प्रत्युत्तर दिले.
महायुतीत घेण्यास भाजपनं विरोध केलाय. आता विधानपरिषद निवडणुकीत मलिकांचं मत महायुतीसाठी महत्त्वाचं असणाराय.. त्यामुळं असून अडचण नसून खोळंबा अशी अजित पवार गटाची अवस्था आहे… दरम्यान, नवाब मलिकांच्या उपस्थितीबाबत जेव्हा पत्रकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे विचारणा केली, तेव्हा तुला का त्रास होतोय असं प्रत्युत्तर अजित पवारांनी दिलं.
नवाब मलिकांबाबतचा प्रश्न अजित पवारांना आवडला नाही, हे यातून स्पष्ट दिसलं… तर कोर्टानं मला मीडियाशी बोलण्यास मनाई केलंय, असं सांगत मलिकांनी प्रतिक्रिया देणं टाळलं…दरम्यान, मलिकांवरून आता विरोधकांनीही अजितदादांना चिमटे काढायला सुरूवात केलीय…
एकूणच काय तर नवाब मलिक असून अडचण आणि नसून खोळंबा अशी अजित पवारांची अवस्था झालीय.. आताच ही स्थिती असेल तर विधानसभा निवडणुकीत मलिकांचं भवितव्य काय, असा सवालही उपस्थित होतोय.
सत्ताधारी पक्षाच्या बाकावर बसल्याने नवाब मलिक चर्चेत
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नबाव मलिकांनी हिवाळी अधिवेशनात हजेरी लावली होती. मात्र, कामकाज सुरु झाल्यानंतर मलिक थेट सत्ताधारी पक्षाच्या बाकावर सर्वात शेवटी बसले.. आणि त्याचमुळे महायुतीत राजकीय चर्चांना उधाण आलंय. मलिकांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याचीच चर्चा आहे.. जामिनावर सुटल्यानंतर नवाब मलिक कोणत्या गटात जाणार यावर चर्चा सुरु होती. मात्र आज अधिवेशनासाठी दाखल झाल्यावर मलिकांनी आधी अजित पवार गटाच्या कार्यालयात भेट दिली.. त्यानंतर मग शरद पवार गटाचे आमदार अनिल देशमुखांची गळाभेट घेतली होती.
Source link
by Hansraj Agrawal | Jul 3, 2024 | Trending News
पुढील
बातमी
संतापजनक! गर्भवती माता, बालकांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारात आढळला मृत साप
Source link
by Hansraj Agrawal | Jul 2, 2024 | Trending News
Education Minister orders inquiry : झी २४ तासनं दाखवलेल्या शिक्षण क्षेत्रातील बोगस शिक्षक भरती घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिले. या घोटाळ्यात सामील असलेल्या कुणालाही पाठीशी घालणार नाही, अशी ग्वाही त्यांनी झी २४ तासशी बोलताना दिली.
Source link
by Hansraj Agrawal | Jul 1, 2024 | Trending News
Mumbai Graduate Constituency election 2024 : विधान परिषदेच्या निवडणुकीत ठाकरे गटाने बाजी मारली आहे. ठाकरे गटाचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत.
Source link
by Hansraj Agrawal | Jul 1, 2024 | Trending News
नागपुरातील दीक्षाभूमीतील कामाला स्थगिती देण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृहामध्ये जाहीर केलंय….दीक्षाभूमीत सुरू असलेल्या अंडरग्राउंड पार्किंगमुळे वाद निर्माण झाला आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Jun 30, 2024 | Trending News
आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : कागदपत्रे व प्रक्रिया सुरळीत झाल्यास चंद्रपूरच्या 75 वर्षीय गौरीचंद्र मलिक यांना CAA कायद्यांतर्गत विदर्भातील पहिले भारतीय नागरिकत्व प्रमाणपत्र मिळणार आहे. बंगाली भाषा शिक्षक असलेल्या मलिक यांचे 50 वर्षांपासून भारतात वास्तव्य करत आहेत. निर्वासित म्हणून आलेल्या मलिक यांनी 35 वर्षे सरकारी नोकरी केली आहे. मात्र, मूळ बांगलादेशमधील गावी भेट देण्यासाठी पासपोर्ट अर्ज केल्यावर प्रशासकीय यंत्रणेने जन्म पूर्व पाकिस्तानचा असल्याचे दाखवून त्यांचा पासपोर्ट रोखला होता. आता नव्या CAA कायद्यानुसार पुन्हा अर्ज केल्यावर त्यांच्या आशा झाल्यात पल्लवित झाल्या आहेत.
गोंदिया जिल्ह्यात शिक्षकी पेशात हयात गेलेल्या आणि सध्या चंद्रपुरात वास्तव्यास असलेल्या 75 वर्षीय गौरीचंद्र मलिक यांना ते भारतीय नागरिक नसल्याची माहिती 2019 साली झाली. बांगलादेशात आपल्या मूळ गावी भेटीसाठी निघालेल्या मलिक यांना पासपोर्ट देण्यास नकार देण्यात आला. त्यांचा संघर्ष आता नव्या CAA कायद्यानुसार सुखद वळणावर येऊन पोचलाय.
75 वर्षीय गौरीचंद्र मलिक. पूर्व पाकिस्तानात 1949 साली मलिक यांचा जन्म झाला. वयाच्या 21व्या वर्षी तिथल्या धार्मिक दंगलीमुळे त्यांना कोलकाता मार्गे भारतात यावे लागले. निर्वासित धोरणानुसार प्रथम ते चंद्रपूर व नंतर गडचिरोली जिल्ह्यातील बंगाली निर्वासित छावणीत राहिले. बंगाली निर्वासितांच्या छावणीतील बंगाली माध्यमाच्या शाळेत त्यांनी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात काही काळ नोकरी केली. नंतर जिल्हा निवड मंडळाच्या माध्यमातून त्यांना गोंदिया येथील बंगाली माध्यमाच्या शाळेत पूर्णवेळ शिक्षक म्हणून नियुक्ती मिळाली. गोंदिया जिल्हा परिषदेअंतर्गत बाघोली या गावातील बंगाली माध्यमाच्या शाळेतुन ते सेवानिवृत्त देखील झाले. या काळात त्यांना केंद्र सरकारने मालकी हक्काची जमीन देखील दिली आहे.
सेवानिवृत्तीनंतर बांगलादेश मधील आपल्या मूळ गावी खुलना जिल्ह्यातील बयारबंगा येथे भेट देण्याचे त्यांच्या मनात आले. येथूनच खऱ्या संघर्षाची सुरुवात झाली. जन्म पूर्व पाकिस्तानचा असल्याने पासपोर्ट यंत्रणेने त्यांना आधी भारतीय नागरिकत्व घ्या, अशी अट घातली. आणि मलिक यांना धक्काच बसला. 30 वर्षे सरकारी नोकरी. हाती आधार कार्ड. पॅन कार्ड. पेन्शन मिळत असताना व गेली कित्येक वर्ष निवडणूक ओळखपत्रे बाळगणाऱ्या मलिक यांच्यासाठी मोठ्या संकटाची सुरुवात झाली.
2019 साली नव्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या अंमलबजावणी आधी मलिक यांनी केलेला अर्ज फेटाळला गेला होता. मात्र यंदाच्या मार्च महिन्यात नव्या नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थात सीएए चे नियम सूचीबद्ध करण्यात आले. त्यामुळे मलिक यांच्या आशा पल्लवीत झाल्या. त्यांनी ऑनलाइन पद्धतीने नागरिकत्व मिळवण्यासाठी यंत्रणेकडे अर्ज केलाय. त्यांच्याकडे बांगलादेशातील खुलना येथील मूळ कागदपत्रे असल्याने जन्मसंबंधी दाखले मिळवण्यात कुठलीही अडचण गेली नाही.
मात्र, पाच दशकानंतर नागरिकत्व मागण्यात आल्याने गुप्तचर यंत्रणांनी मात्र केले कित्येक महिने त्यांचा विविध मार्गांनी तपास चालविला आहे. नव्या सीएए कायद्यानुसार सर्व सुरळीत होत आपल्याला भारतीय नागरिकत्व मिळेल व आपण भारतीय नागरिक म्हणून बांगलादेशात आपल्या मूळ गावी भेट देऊ शकू अशी मलिक यांना आशा आहे. एकदा असे नागरिकत्व मिळाल्यानंतर ते त्यांची पत्नी भारती हिच्यासाठी देखील असाच अर्ज करणार आहेत.
सर्व कागदपत्रे व प्रक्रिया सुरळीत झाल्यास गौरीचंद्र मलिक यांना CAA कायद्यांतर्गत विदर्भातील पहिले भारतीय नागरिकत्व प्रमाणपत्र मिळणार आहे. विदर्भातील 100 सिंधी बांधवांनी अशीच प्रक्रिया वापरून नागरिकत्व मिळावे असा अर्ज केला आहे. मात्र बांगलादेशमधून प्रक्रिया पूर्ण करणारे गौरीचंद्र मलिक पहिले ठरणार आहेत.
Source link