Pune Porsche Accident : पोरं नारळ पाणी पिण्यासाठी जातात का? पुण्यातील नाईट लाईफवर वसंत मोरेंचा गंभीर इशारा

Pune Porsche Accident : पोरं नारळ पाणी पिण्यासाठी जातात का? पुण्यातील नाईट लाईफवर वसंत मोरेंचा गंभीर इशारा


Pune Porsche Accident Update : पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणात आणखी एक अपडेट आली आहे. अल्पवयीन मुलाच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. 50 वर्षीय हा कार चालक आहे. पोलीस त्याची चौकशी करत आहेत. प्रत्यक्ष अपघात (Pune Porsche Accident) घडला त्यावेळी हा चालक गाडीमध्ये होता. तर अप्लवयीन मुलानं 2 जणांना उडवलं होतं, ज्यात त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता देशभरात या मुद्द्यावरून रान पेटलंय. अशातच आता पुण्याचे वंचितचे उमेदवार वसंत मोरे (Vasant More) यांनी या प्रकरणावरून पोलीस यंत्रणा आणि नेत्यांन थेट इशारा दिलाय. 

काय म्हणाले वसंत मोरे?

कोरेगाव पार्कमध्ये जो अपघात झाला तो दुर्दैवीच होता पण त्यामागून जे राजकारण चालू दिसतंय त्यामध्ये आपल्या पुण्याच्या काही नेत्यांची कीव येते. नाईट लाईफ काय फक्त कोरेगाव पार्क मध्येच आहे का? असा सवाल वसंत मोरे यांनी विचारलाय. कोणकोणत्या नेत्याचे कुठे कुठे नाईट लाईफ मध्ये लागेबांधे आहेत, भविष्यात जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर जागेवर जाऊन लाईव्ह केले जातील, असा इशारा वसंत मोरे यांनी दिलाय.

ज्यांनी पुढाकार घेऊन कारवाया लावल्या त्या कोथरूड मधील पुढाऱ्यांनी जरा आपल्या भागातील नाईट लाईफ विषयी लक्ष द्यावं. सोबतच भुगाव, पिरंगुट या भागाकडे म्हणजेच मुळशी कडेही लक्ष द्यावं. तसेच ज्यांनी निवेदन दिली त्यांनी सुद्धा एन आय बी एम कोंढवा भागाकडे सुद्धा लक्ष द्यावं नाहीतर असं म्हणावं लागेल कोरेगाव पार्कमध्ये जाणारी तरुण पिढी दारू पिण्यासाठी जाते, असा टोला वसंत मोरे यांनी लगावला. वरील भागांमध्ये नाईट लाईफसाठी जाणारी तरुण पिढी नारळाचे पाणी पिण्यासाठी जाते का? असा खोचक सवाल देखील वसंत मोरे यांनी विचारला आहे. 

दरम्यान, पोलीस यंत्रणेने फक्त कोरेगाव पार्क टारगेट न करता संपूर्ण पुणे शहर सुद्धा टार्गेट करावं अन्यथा वंचित बहुजन आघाडी म्हणून जर कुठं हिंसक आंदोलन झाली तर त्याला संपूर्णपणे जबाबदार ही भ्रष्ट यंत्रणा असेल, असं गंभीर इशारा वसंत मोरे यांनी दिला आहे.





Source link

शेतकरी महाराष्ट्राचा अनुदान काश्मिरमध्ये; PM किसान योजनेत मोठा घोळ

शेतकरी महाराष्ट्राचा अनुदान काश्मिरमध्ये; PM किसान योजनेत मोठा घोळ



अमरावतीत पीएम किसान योजनेमध्ये मोठा घोळ झाल्याचं उघड झालंय. अमरावतीमधील शेतकऱ्यांचं अनुदान थेट काश्मिरमध्ये जमा होत असल्याचा प्रकार समोर आलाय.



Source link

'लाखात एक होती माझी मुलगी' मृत मुलीच्या आईने फोडला हंबरडा… कोण होती अश्विनी कोष्टा?

'लाखात एक होती माझी मुलगी' मृत मुलीच्या आईने फोडला हंबरडा… कोण होती अश्विनी कोष्टा?


Pune Porsche Accident News : पुण्यातील कल्याणीनगरमधील पॉर्शे कार अपघात प्रकरणात पोलिसांवर अल्पवयीन मुलाला वाचवण्याचा आरोप केला जात आहे. हे प्रकरण गाजल्यानंतर पोलिसांनी मुलाचे वडील विशाल अग्रवालला (Vishal Agrawal) अटक केली. या अपघातात निर्दोष तरुण-तरुणीचा बळी गेला. अपघातातील दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी मृत तरुण-तरुणीच्या पालकांनी केलीय. पोर्शे कार अपघातातील मृत तरुणी ही मध्य प्रदेशमधल्या (Madhya Pradesh) जबलपूरमध्ये राहाणारी होती. मृत मुलीचं नाव अश्विनी कोष्टा (Ashwini Kosta) असं होतं, अश्विनिला प्रेमाने तिच्या घरचे आशी बोलायचे. जबलपूरच्या ग्वारीघाट मुक्तीधाममध्ये अश्विनीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

अश्विनी कोष्टा जबलपूरच्या साकार हिल्स कॉलनीत राहात होती, आणि कामानिमित्ताने ती पुणे मेम जॉनसन कंट्रोल्स कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होती. 

अश्विनीच्या आईने फोडला हंबरडा
अश्विनीच्या मृत्यूची बातमी ऐकताच तिच्या आईने हंबरडा फोडला. मुलीचं लग्न करुन तिची पाठवणी करण्याऐवजी तिचा मृतदेह उचलण्याची वेळ तिच्या आई-वडिलांवर आली. अश्विनीच्या अचानक जाण्याने ती राहात असलेल्या परिसरातही दु:खाचं वातावरण आहे. माझी मुलगी लाखात एक होती, तिची काय चूक होती, असा सवाल अश्विनी विचारतेय.

अश्विनी अभ्यासात हुशार
अश्विनी अभ्यासात हुशार होती आणि तीने खूप स्वप्न पाहिली होती. आयु्ष्यात खूप मोठं व्हायचं ध्येय तीने बाळगलं होतं. पण एका श्रीमंत मुलाच्या चुकीने अश्विनीचं स्वप्न अपूर्णच राहिलं. अश्विनीच्या आई-वडिलांनी दोषींवर कठोर कारावाई करावी अशी मागणी केली आहे.

अश्विनीला न्याय हवा
अश्विनीचा भाऊ आपल्या प्रिय बहिणीच्या मृत्यूने पुरता खचला आहे. अश्विनी फक्त 24 वर्षांची होती आणि जग सोडून जाण्याचं तिचं वय नव्हतं. माझ्या बहिणीला न्याय मिळायला हवां. दोषींना त्यांच्या चुकीची कठोर शिक्षा मिळायलाच हवी, जेणेकरुन भविष्यात इतरांच्या मुला-मुलींबरोबर असं होऊ नये अशी अपेक्षा तिच्या भावाने व्यक्त केली आहे. 

अश्विनीच्या कुटुंबियाने न्यायाची मागणी केली आहे. अल्पवयीन मुलाला कार देणारे त्याचे पालक आणि दारु देणाऱ्या पबवर कारवाई व्हावी अशी मागणीही तिच्या पालकांनी केलीय. वेगाने कार चालवणाऱ्यांवर, दारु पिऊन कार चालवण्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केलीय.

पबवर पालिकेची कारवाई
दरम्यान, या घटनेनंतर  पुणे महापालिकेनं कोरेगाव पार्क परिसरात असलेल्या वॉटर्स आणि ओरिल्ला पब वर कारवाई केलीये. बुलडोजर जेसीपीच्या साह्याने पब चे बांधकाम पाडण्यात आलं. कोरेगाव परिसरात असलेल्या बेकायदेशीर पब बांधकामावर ही कारवाी करण्यात आली





Source link

मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; 'या' तारखेला लागणार पहिली लिस्ट

मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; 'या' तारखेला लागणार पहिली लिस्ट


mumbai university admission 2024 : मुंबई विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभाग, सर्व संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त संस्थेतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात आले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने एकेडॅमिक बँक ऑफ क्रेडिट आणि अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबविण्याच्या दृष्टिकोनातून विद्यापीठामार्फत पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत चारही विद्याशाखेतील विविध विषयांचा समावेश करण्यात आला आहे. 

ही सर्व ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि पारदर्शक आहे. https://muadmission.samarth.edu.in/ या संकेतस्थवळावर जाऊन विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल. प्रवेश नोंदणी ते अर्ज सादर करण्याची प्रक्रिया समजून घेण्यासाठी संकेतस्थळावर व्हिडिओ लिंक देण्यात आली आहे.

पदवीच्या प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया २५ मे २०२४ पासून

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी पदवीच्या ३ आणि ४ वर्षीय अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीची प्रक्रिया २५ मे २०२४ पासून सुरू करण्यात येणार आहे. या प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक विद्यापीठामार्फत लवकरच जाहीर केले जाणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार ३ वर्षीय पदवी अभ्यासक्रम, ४ वर्षीय ऑनर्स/ ऑनर्स विथ रिसर्च, इंटिग्रेटेड प्रोग्राम्स विथ मल्टीपल एन्ट्री अँड मल्टीपल एक्जिट या अनुषंगाने ही प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे.

असं आहे प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक

ऑनलाईन नाव नोंदणी आणि प्रवेशअर्ज सादर करणे- २२ मे  ते १५ जून २०२४

विभागांमार्फत कागदपत्रांची ऑनलाईन पडताळणी – २० जून २०२४ ( संध्याकाळी ६ वाजेपर्यंत)

तात्पुरती गुणवत्ता यादी- २१ जून २०२४ ( संध्याकाळी ६ वाजता)

विद्यार्थी तक्रार – २५ जून २०२४ (दुपारी १ वाजेपर्यंत)

पहिली गुणवत्ता यादी – २६ जून २०२४ (संध्याकाळी ६ वाजता)

ऑनलाईन शुल्क भरणे – २७ जून ते ०१ जुलै २०२४ ( संध्याकाळी ५ वाजेपर्यंत)

द्वितीय गुणवत्ता यादी- ०२ जुलै २०२४ (संध्याकाळी ६ वाजता)

ऑनलाईन शुल्क भरणे – ०३ जुलै ते ५ जुलै २०२४ (संध्याकाळी ५ वाजेपर्यंत)

कमेंसमेंट ऑफ लेक्चर्स – ०१ जुलै २०२४





Source link

In a first, space start-up flies a SAR on a high altitude platform 

In a first, space start-up flies a SAR on a high altitude platform 


 

IIT-Madras incubated, Bengaluru-based space start-up, Galaxeye Space, has flown a synthetic aperture radar (SAR), developed by it on a High-Altitude Platform (HAP), made by National Aerospace Laboratories, a public-funded research laboratory, based in Pune. 

HAPs are like big drones (pictured), they can be moved, or made to hover over a certain country or a region. They can be homed at about 18 km above earth, broadly where the atmosphere ends and space begins. They are (typically) solar-powered and can carry payloads up to 40 kg. In India, NAL has been developing HAPs. 

The HAP holding Galaxeye’s SAR flew at an altitude of 8 km. This happened on May 7 and 8. 

Suyash Singh, Co-founder, Galaxeye, said that the start-up had developed a SAR, which is a sort of camera. Unlike optical cameras, SARs can see through cloud and vegetation cover, to picture the ground below. India’s space agency, ISRO, has flown SARs earlier. It may be remembered that ISRO, and the US space agency, NASA, have jointly developed a giant SAR, called NISAR (for NASA-ISRO SAR), which will be sent up to space, later this year. 

Singh told businessline on Monday, that Galaxeye is developing SARs for drones, HAPs and satellites. The company, backed by Speciale Invest, a PE fund, is in the business of selling both images and data. It is also getting into ‘edge computing’, where a part of the processing of the data happens right where the data is generated, as opposed to a server elsewhere. Space-based edge computing has advantages. However, Singh said that the 5 kg prototype SAR, that was flown aboard the NAL HAP was not fitted with edge computing capabilities—this being only a prototype. 

“We see a lot of demand for SARs,” Singh said. These are immediately for use in defence, and civil applications such as disaster management and surveillance.  

HAPs are cheaper compared with satellites. They can also be used for telecommunications, and broadband delivery—particularly where building terrestial cable networks, is economically unviable. HAPs are many types – balloons, airships and unmanned aerial vehicles. There are not many HAP companies in the world. Those in business today, include Israel Aviation Industries Ltd, Lindstrand Technologies, ILC Dover LP, Raytheon, Rafael Advanced Defense Systems and Lockheed Martin. 





Source link

उद्धव ठाकरे यांच्या विरोधात भाजप नेते आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार

उद्धव ठाकरे यांच्या विरोधात भाजप नेते आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार


Loksabha Election 2024 :  उद्धव ठाकरेंविरोधात भाजप नेते आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन खोटी आणि दिशाभूल करणारी विधानं केल्याचं तक्रारीत म्हटल आहे. त्याचबरोबर सत्ताधारी भाजपवर चुकीचे आरोप केले आणि निवडणूक आयोगावरही आरोप केलेत…हे आचारसंहिता उल्लंघन असून यावर कारवाई करण्याची मागणी आशिष शेलार यांनी पत्राद्वारे निवडणूक आयोगाकडे केली. 

निवडणूक आयोग पक्षपातीपणा करत असल्याचा उद्धव ठाकरे यांचा आरोप 

मुंबईत मतदानात सुरू असलेल्या दिरंगाईमुळे उद्धव ठाकरे संतापले. निवडणूक आयोग पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी सेना भवनमध्ये संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन केला.. तसंच कितीही उशीर झाला तरी हटू नका मतदान करा, असं आवाहनही त्यांनी मतदारांना केले होते. 

विशेष म्हणजे पत्रकार परिषदेनंतर उद्धव ठाकरे स्वतः माहिम कोळीवाडा या ठिकाणी गेले. तिथे त्यांनी शिवसेना पदाधिका-यांशी चर्चा केली. तसंच त्यानंतर त्यांनी धारावीत जाऊनही आढावा घेतला. तर वडाळा आणि परळलाही त्यांनी भेट दिली. 
भांडुपमध्ये पोलिसांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानं मोठा राडा 

भांडुपमध्ये पोलिसांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानं मोठा राडा झाला. मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनचा डेमो ठेवल्यानं पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांच्या या कारवाईमुळे आमदार सुनील राऊतांनी संताप व्यक्त केला. त्यांनी पोलिसांना तंबी दिली. तर पराभवाच्या भीतीने रडीचा डाव सुरू असून, कायदा हातात घेणा-यांवर कारवाई केली जाईल असा इशारा शिंदेंनी दिला.

महाराष्ट्रातील 13 जागांसाठी आज मतदानाचा पाचवा आणि अखेरचा टप्पा पार पडला.  निवडणूक आयोगानं दिलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात रात्री 7 वाजेपर्यंत सरासरी 52.54 % मतदानाची नोंद झालीय… दिंडोरीत सर्वाधिक 61.96% तर सर्वात कमी मतदान कल्याणमध्ये 45.67% इतकं झालंय… अनेक ठिकाणी संध्याकाळी ६ नंतर देखील मतदार रांगेत उभे होते. त्यामुळं मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान,  केंद्रीय मंत्री पियूष गोयल, डॉ. भारती पवार यांच्यासह अरविंद सावंत, वर्षा गायकवाड, डॉ. श्रीकांत शिंदे, राहुल शेवाळे, उज्ज्वल निकम, हेमंत गोडसे, राजन विचारे अशा दिग्गजांचं भवितव्य ईव्हीएममध्ये सीलबंद झाले.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp