'दिल्लीतून आदेश येतो तसं राज ठाकरे बोलतात, हिंमत असेल तर…' कोणी दिलं खुलं चॅलेन्ज?

'दिल्लीतून आदेश येतो तसं राज ठाकरे बोलतात, हिंमत असेल तर…' कोणी दिलं खुलं चॅलेन्ज?


अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : (Loksabha election 2024) लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरे यांच्यावर पवार कुटुंबातून टीकेची झोड उठवण्यात आली आहे. (NCP) राष्ट्रवादीशी थेट संबंध असणाऱ्या या नेत्यानं राज ठाकरे यांना खुलं आव्हान दिल्यामुळं आता या टीकेला ठाकरेंकडून नेमकं काय आणि कसं उत्तर मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

सोमवारी माध्यमांशी संवाद साधताना, (Raj Thackeray) ‘राज ठाकरे दिल्लीतून, गुजरातमधून आदेश आले की तसंच वागायला लागतात’, असं म्हणत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी नाराजीचा तीव्र सूर आळवला. प्रत्यक्षात राज ठाकरे हे नाव युवा नेत्यांमध्ये आणि राजकारणाच्या वर्तुळात नव्यानं प्रवेश करणाऱ्या अनेकांमध्येच कमालीचं लोकप्रिय. रोहित पवारही यास अपवाद नाहीत. पण, सध्या मात्र त्यांची भूमिका काहीशी बदललेली दिसत आहे. 

‘मी त्यांचा (राज ठाकरे) फॅन होतो. पण आज महाविकास आघाडीत फूट पाडण्यासाठी त्यांचा वापर होत आहे. अशा पक्षांना सामान्य लोक सुपारीबाज पक्ष आणि सुपारीबाज नेते असं म्हणतात’ अशा शब्दांत त्यांनी राज ठाकरे यांच्या राजकीय भूमिरांवर ताशेरे ओढले. 

आता शेवटी लोक शेवटी भूमिका घेत आहेत, येत्या काळातही घेतील. मतदार योग्य व्यक्तीला निवडून देतील असं म्हणत रोहित पवार यांनी त्यांना खुलं आव्हान दिलं. ‘राज ठाकरेंनी हिंमत असेल तर फडणवीसांविरोधात यांच्या विरोधात बोलावं. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचं काम भाजपनं केलं आहे. द्वेष निर्माण केला जात आहे. याब्बदल राज ठाकरेंनी बोलावं’, असं ते म्हणाले. 

 

पाच वर्षात काय बदलल की तुम्हाला झुकावं लागत आहे? असा सवाल करताना लोक निर्णय घेतील खड्यासारख कुणाला बाजूला करायचं अशा शब्दांत त्यांनी ठाकरेंना आणि पर्यायी महायुतीला सावधगिरीचा इशाराही दिला. दरम्यान, रोहित पवार यांनी एकिकडे राज ठाकरे यांच्या भूमिकेसंदर्भात नाराजीचा सूर आळवलेला असतानाच तत्पूर्वी त्यांच्या एका X पोस्टनं सर्वांचं लक्ष वेधलं होतं. 

सुपारीचा फोटो शेअर करत, ‘#सुपारीबाज पक्षाला #सुपारी खूपच लागलेली दिसतेय… पार घायाळ झालेत… पण महाराष्ट्राची जनता दुधखुळी नाही तर स्वाभिमानी आहे. कुणाच्याही सांगण्याला भुलणारी नाही, म्हणून केवळ मतं खाणाऱ्या इतर पक्षांनीही याचा विचार करावा.’ असं लिहिलं होतं. त्यामुळं त्यांचं हे ट्विट आणि शब्द नेमके कोणासाठी हे आता अधिकच स्पष्ट झालं आहे. 





Source link

कसारा स्टेशनवर मोटारमनच्या दरवाजा उघडून आत शिरला आणि म्हणाला… लोकल ट्रेन तेरा भाई चलाएगा

कसारा स्टेशनवर मोटारमनच्या दरवाजा उघडून आत शिरला आणि म्हणाला… लोकल ट्रेन तेरा भाई चलाएगा



स्थानकात उभ्या असलेल्या लोकल रेल्वेमध्ये रील बनवणं तरुणांना चांगलंच महागात पडलंय. पोलिसांनी ताब्यात घेऊन तरुणांची कानउघाडणी केलीय.



Source link

70 वर्षांत पहिल्यांदाच अशी दुर्घटना; तुंगभद्रा धरणाची साखळी तुटली, 35 हजार क्युसेकने विसर्ग सुरू

70 वर्षांत पहिल्यांदाच अशी दुर्घटना; तुंगभद्रा धरणाची साखळी तुटली, 35 हजार क्युसेकने विसर्ग सुरू



Tungabhadra Dam Brench:  तुंगभद्रा धरणाच्या 19 व्या गेटची साखळी तुटल्याने नदीत अचानक 35,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला.
 
 



Source link

म्हाडाच्या घरांच्या किमती पाहून अर्जदार चक्रावले; अल्प उत्पन्न गटातील घराची किंमत 2 कोटी 62 लाख

म्हाडाच्या घरांच्या किमती पाहून अर्जदार चक्रावले; अल्प उत्पन्न गटातील घराची किंमत 2 कोटी 62 लाख



 Mhada Lottery 2024 : मुंबईत घर घेणं आता सर्वसामान्याच्या आवाक्या बाहेर झालंय.सर्वसामान्यांसाठी स्वस्तात घरे बांधणा-या म्हाडाच्या घरांच्या किंमती पाहून अर्जदारांचे डोळे फिरल्याचं पाहायला मिळतंय.  
 



Source link

राज ठाकरे, बच्चू कडू आणि जलील; भावी मुख्यमंत्र्यांच्या पोस्टर्सची चर्चा

राज ठाकरे, बच्चू कडू आणि जलील; भावी मुख्यमंत्र्यांच्या पोस्टर्सची चर्चा



राज्यात सध्या अनेक भावी मुख्यमंत्र्यांचे पोस्टर्स लागलेत. राज ठाकरे, बच्चू कडू आणि इम्तियाज जलील यांचीही नावं मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आली आहेत.



Source link

म्हाडाच्या कलाकार कोट्यात 'या' महत्वाच्या घटकाला स्थान नाही; मनोरंजन विश्वात नाराजीची लाट

म्हाडाच्या कलाकार कोट्यात 'या' महत्वाच्या घटकाला स्थान नाही; मनोरंजन विश्वात नाराजीची लाट


Mhada Lottery 2024 :  मराठी नाटक आणि टीव्ही मालिकांमध्ये लेखक हे महत्त्वाची भूमिका बजावतात. लिहिण्याची एक कला असते म्हणून त्यांनाही कलाकार म्हणतात.. मात्र हे लेखक आता कलाकार आहेत की  नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. म्हाडा लॉटरीत पात्र ठरलेल्या एका लेखकासह विचित्र प्रकार घडला आहे. 

टीव्ही मालिका लिहिणाऱ्या एका लेखकाने म्हाडा सोडतीत कलाकार या कोट्यातून अर्ज भरला होता. त्याला घर देखील लागले. म्हाडाचे घर मिळाल्यानंतर त्याने कलाकार असल्याचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सांस्कृतिक संचालनालयाकडे पाठपुरावा केला. मात्र त्यांना जे उत्तर मिळाले ते एकूण त्यांच्यासह अनेक लेखकांना धक्का लागला आहे. लेखक हे कलाकार नाहीत असे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे आता ज्या लेखकांना घरे मिळाली आहेत आणि ज्यांनी अर्ज दाखल केले आहेत त्यांच्यासाठी ही चिंतेची बाब आहे. याप्रकरणी मानाचि संघटनेचे अध्यक्ष विवेक आपटे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

लेखक सादरीकरण कलेत येत नाही. ज्यांनी फक्त लिखाण केले आहे त्यांना प्रमाणपत्र देऊ शकत नाही. ज्या लेखकांनी अभिनय केला आहे, अशांना कलाकार प्रमाणपत्र दिले जात आहे. मात्र, तरी आम्ही आता या संबंधित शासानासोबत पत्र व्यवहार करणार आहोत. 1988 सालच्या गृहनिर्माण आणि विशेष सहाय्य या विभागाच्या एका पत्रानुसार, तमाशा, नाटक , चित्रपट, शिल्पकार, कवी, कवाल, नकलाकार , शिल्पकार अहिर यांचा त्या पत्रात उल्लेख आहे. मात्र त्या पत्रात लेखकाचा उल्लेख नाही. आणि ज्या लेखकांना म्हाडाकडून घरे मिळाली आहे त्यांना साहित्यिक या कोट्यातून घरे मिळाली आहे.

म्हाडा सोडतीत लेखकांना स्थान नसल्याचे आता मनोरंजनसृष्टीत नाराजीचा सूर आहे. ‘कलाकार’  या कोट्यात लेखकांच्या स्थनाबद्दल सांस्कृतिक विभाग शासानासोबत पत्र व्यवहार करण्यार असल्याचे संबधित अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे आता लेखक हे वंचित राहणार की त्यांना देखील कलाकार कोट्यात स्थान मिळणार हे लहान महत्त्वाचे असेल.

म्हाडाच्या 2 हजार 30 घरांसाठी नोंदणी करता येणार आहे. गोरेगाव, अँटॉप हिल, कोपरी पवई, कन्नमवारनगर, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड या भागात ही घरं असतील. या घरांसाठी  13 सप्टेंबरला लॉटरी काढण्यात येईल. अर्ज प्रक्रियेची लिंक दुपारी 12पासून उपलब्ध होईल. नागरिकांना 4 सप्टेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. या अर्जाची प्रारुप यादी 9 सप्टेंबरला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत प्रसिद्ध होणार आहे. ऑनलाईन दावे, हरकतींसाठी 9 सप्टेंबर दुपारी 12पर्यंतची मुदत देण्यात आलीये. तर अर्जाची अंतमि यादी 11 सप्टेंबरला संध्याकाळी 6 वाजता प्रसिद्ध होईल.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp