Maharastra Politics : कोकणात महायुतीत जोरदार 'बॅनर वॉर', राणे विरुद्ध सामंत राजकीय शिमगा?

Maharastra Politics : कोकणात महायुतीत जोरदार 'बॅनर वॉर', राणे विरुद्ध सामंत राजकीय शिमगा?



Uday Samant vs Narayan Rane : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोकणात महायुतीतच जोरदार राजकीय धूमशान सुरू झालंय. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये अक्षरशः बॅनर वॉर सुरू झालंय.



Source link

एसटी महामंडळाची आजर्पंतची सर्वात जबरदस्त योजना; महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

एसटी महामंडळाची आजर्पंतची सर्वात जबरदस्त योजना; महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा



राज्य एसटी महामंडळाने विद्यार्थांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणाऱ्या योजनेची घोषणा केली आहे. यामुळे लाखो विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय दूर होणार आहे.  



Source link

Maharstra Politics : विश्वजीत कदम यांचा नेमका रोख कुणावर? सांगलीच्या आखाड्याचा 'वस्ताद' कोण?

Maharstra Politics : विश्वजीत कदम यांचा नेमका रोख कुणावर? सांगलीच्या आखाड्याचा 'वस्ताद' कोण?



Vishwajeet Kadam on Sangli : सांगली लोकसभा निवडणुकीत खडे टाकण्याचे काम केलं, त्यांना लोकांनी खड्यासारखं बाजूला केलं, असं विश्वजित कदमांनी म्हटलंय. त्यामुळे विश्वजीत कदम यांचा नेमका रोख कुणावर आहे? याचीच चर्चा सुरू आहे.



Source link

ठाणे पालिकेतील सफाई कर्मचारी महिलेचा मुलगा बनला अधिकारी, UPSC साठी 'अशी' केली तयारी

ठाणे पालिकेतील सफाई कर्मचारी महिलेचा मुलगा बनला अधिकारी, UPSC साठी 'अशी' केली तयारी


UPSC Success Story: आपल्या मुलाने चांगल शिक्षण घेऊन मोठा अधिकारी व्हावं असं प्रत्येक आईला वाटत असतं. यासाठी ती खूप मेहनत घेत असते, आपल्या मुलांवर चांगले संस्कार करत असते. स्वत:चे अश्रू लपवून मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवत असते. अशा आईचं स्वप्न पूर्ण होतं तेव्हा तिला कसं वाटत असेल? हो. ठाणे शहरातील रस्त्यावर सफाई करणाऱ्या एका महिलेच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. जेव्हा तिला कळाले की आपल्या मुलाने यूपीएससी उत्तीर्ण केली आहे. या महिलेचा 32 वर्षांचा मुलगा प्रशांत सुरेश भोजने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी झाला. त्याला यूपीएससी परीक्षेत 894 वा क्रमांक मिळाला. केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा उत्तीर्ण होण्याचे प्रशांतचे नेहमीच स्वप्न होते.

9व्या प्रयत्नात UPSC उत्तीर्ण

प्रशांत भोजनेंना मिळालेल्या यशाच्यामागे मोठ्या संघर्षाची कहामी आहे. एकदा यूपीएससी उत्तीर्ण होण्याआधी ते आधीच्या 8 परीक्षा अनुत्तीर्ण झाले होते. संघर्ष त्यांच्या पाचवीला पूजला होता. 2015 मध्ये  प्रशांत यांनी पहिल्यांदा यूपीएससी दिली. यात त्यांना यश मिळाले नाही. दुसरा, तिसरा प्रयत्न केला पण यश दूरच चालले होते. सातव्या, आठव्या प्रयत्नानंतरही त्यांच्या पदरी निराशाच येत होती. घरची जबाबदारी वाढत होती. आर्थिक परिस्थिती तोंड वासून पाहत होती. अशावेळी काहीही करुन यूपीएससी तर उत्तीर्ण करायचीच हा ठाम निश्चय त्यांनी केला. नवव्यांदा परीक्षा दिली.  अखेर नवव्या प्रयत्नात ते यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करण्यात यशस्वी झाले. 

त्यांच्या या कामगिरीनंतर खार्तन रोड सफाई कामगार कॉलनीतील रहिवासी आणि कुटुंबीयांनी मिळून जल्लोष केला. यानंतर लोकांनी रात्री प्रशांतची मिरवणूक काढली होती. त्यात काही स्थानिक राजकारणीही सहभागी झाले होते.

आई ठाणे पालिकेत सफाई कामगार 

प्रशांत भोजने यांची आई ठाणे महानगरपालिकेत (TMC) सफाई कामगार म्हणून काम करते. तर त्यांचे वडील नागरी संस्थेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत. प्रशांत यांनी इंजिनीअरिंगची पदवी घेतली प त्या क्षेत्रात काम करण्यात त्यांना अजिबात रस नव्हता. कारण आयएएस अधिकारी बनण्याचे स्वप्न त्यांना खुणावत होते. 

प्रशांत सातत्याने यूपीएससी परीक्षा देत होते. 2020 मध्ये दिल्लीतील स्पर्धात्मक परीक्षा कोचिंग सेंटरमध्ये काम करण्यास सुरुवात केली.  येथे त्यांना विद्यार्थ्यांच्या मॉक परीक्षेचे पेपर तपासण्याचे काम देण्यात आले. हे काम करुन मी माझ्या अभ्यासासोबतच माझा उदरनिर्वाह चालवायचो असे प्रशांत सांगतात.

‘माझा स्वतःवर विश्वास होता’

परीक्षेला बसणे थांबव आणि घरी परत असे पालकांनी अनेकदा सांगितले होते. पण मला माझ्यावर विश्वास होता. माझा निश्चय दृढ होता. एकना एक दिवस मी माझे ध्येय साध्य करेल, असे मला वाटायचे असे प्रशांत यांनी सांगितले. 

जेव्हा मी UPSC परीक्षेला बसत होतो, तेव्हा माझे आई-वडील काहीही न बोलता सर्वकाही सहन करत होते. पण आता माझा निकाल लागला आहे. आपला मुलगा यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचे पाहून खूप आनंद होत असल्याची प्रतिक्रिया सुरेश भोजने यांनी दिली. माझ्या मुलाने नोकरी करावी असे मला आधी वाटायचे पण आता आम्हाला वाटते की त्याने घेतलेला निर्णय अगदी योग्य होता, असेही ते म्हणाले.





Source link

'आता केंद्रात मंत्रपीद…', राज्यसभेसाठी बिनविरोध निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया, 'बारामतीत पराभव…'

'आता केंद्रात मंत्रपीद…', राज्यसभेसाठी बिनविरोध निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया, 'बारामतीत पराभव…'



राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड कऱण्यात आली आहे. यानंतर पुण्यात त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी केंद्रात मंत्रीपद मिळालं तर संधीचं सोनं करेन असं म्हटलं आहे. 
 



Source link

फडणवीसांच्या 'ठाकरेंना मराठी मतं मिळाली नाही'वरुन राऊतांचा टोला; म्हणाले, 'मुंबईत श्रीलंका, इराण..'

फडणवीसांच्या 'ठाकरेंना मराठी मतं मिळाली नाही'वरुन राऊतांचा टोला; म्हणाले, 'मुंबईत श्रीलंका, इराण..'


Sanjay Raut Slams Fadnavis: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी एका कार्यक्रमामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे गटाला मराठी मतं मिळालेली नाहीत, असं विधान केलं. तसेच हिंदू मतदार ठाकरेंपासून दूर गेल्याचंही फडणवीस म्हणाले. फडणवीस यांनी केलेल्या या दाव्यावरुन आता उद्धव ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार तसेच प्रवक्ते संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं आहे. मराठी मतं आम्हाला नाही मिळाली तर मुंबई परदेशी नागरिकांनी मतदान केलं का? असा सवाल राऊत यांनी फडणवीसांना विचारला आहे.

…मग मुंबईत कोणी मतदान केलं?

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मराठी लोकांची मतं मिळाली नाहीत, असं देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं आहे, असा संदर्भ देत मुंबईमधील पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना राऊत यांनी, ‘मग कोणाची मतं मिळाली आहेत?’ असा प्रतिप्रश्न केला. “ही मतं तुम्हाला मिळाली का?” असा सवालही राऊत यांनी फडणवीस यांना केला आहे. “आम्हाला लाखो मतं मिळाली आहेत की कोणाची मतं आहेत? इथे दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, इराण आणि इराकमधील लोकांनी येऊन मतदान केलं का?” असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.

नक्की वाचा >> ‘शिवसेना-भाजपा युती तुटू नये अशी RSS ची भूमिका होती, पण मोदी-शाहांचा..’; खळबळजनक दावा

तुमचा विजय चोरीचा

“धारावीत बघा, गिरगावात बघा, भांडूपमध्ये मतदान बघा. जिथे जिथे आमचे लोक जिंकले आहेत किंवा थोडक्या फरकाने पडले आहेत तिथे मराठीच लोक राहतात. ज्यांना मतदानाचा अधिकार आहे त्यांनी आम्हाला मतदान केलं आहे. तुमचा विजय हा सरळ मिळालेला विजय नाही. तुम्ही अमोल किर्तीकरची जागा चोरली. आमचा विजय निर्मळ आणि निर्णायक आहे. या राज्यातील सर्व जाती-धर्माच्या लोकांनी आम्हाला मतदान केलं आहे. मराठी, मुस्लीम, ख्रिश्चन, पारसी असो किंवा गुजराती असो सर्वांनी आम्हाला मतदान केलं आहे,” असं संजय राऊत म्हणाले. 

नक्की वाचा >> ‘अहंकारामुळे रामाने 241 वरच रोखलं’, जाहीर कार्यक्रमात RSS चा BJP ला घरचा आहेर

संघाच्या टीकेवरुन टोला

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला असता राऊत यांनी मागील 10 वर्षांपासून देशात अहंकारच पाहायला मिळाल्याचा टोला राऊत यांनी लगावला. तसेच देश टिकून रहावा असं वाटत असेल तर संघाने पडद्यामागे राहणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. संजय राऊत यांनी फडणवीसांवर निशाणा साधताना फडणवीस हे मराष्ट्रतील राजकारणातील खलनायक आहेत, असंही राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच वायनाडमधून राहुल गांधींनी मतदासंघ सोडल्यास तिथून प्रियंका गांधी लढणार असतील तर आमचा त्यांना पाठींबा असेल असंही राऊत म्हणाले.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp