म्हाडाच्या कलाकार कोट्यात 'या' महत्वाच्या घटकाला स्थान नाही; मनोरंजन विश्वात नाराजीची लाट

म्हाडाच्या कलाकार कोट्यात 'या' महत्वाच्या घटकाला स्थान नाही; मनोरंजन विश्वात नाराजीची लाट


Mhada Lottery 2024 :  मराठी नाटक आणि टीव्ही मालिकांमध्ये लेखक हे महत्त्वाची भूमिका बजावतात. लिहिण्याची एक कला असते म्हणून त्यांनाही कलाकार म्हणतात.. मात्र हे लेखक आता कलाकार आहेत की  नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. म्हाडा लॉटरीत पात्र ठरलेल्या एका लेखकासह विचित्र प्रकार घडला आहे. 

टीव्ही मालिका लिहिणाऱ्या एका लेखकाने म्हाडा सोडतीत कलाकार या कोट्यातून अर्ज भरला होता. त्याला घर देखील लागले. म्हाडाचे घर मिळाल्यानंतर त्याने कलाकार असल्याचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सांस्कृतिक संचालनालयाकडे पाठपुरावा केला. मात्र त्यांना जे उत्तर मिळाले ते एकूण त्यांच्यासह अनेक लेखकांना धक्का लागला आहे. लेखक हे कलाकार नाहीत असे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे आता ज्या लेखकांना घरे मिळाली आहेत आणि ज्यांनी अर्ज दाखल केले आहेत त्यांच्यासाठी ही चिंतेची बाब आहे. याप्रकरणी मानाचि संघटनेचे अध्यक्ष विवेक आपटे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

लेखक सादरीकरण कलेत येत नाही. ज्यांनी फक्त लिखाण केले आहे त्यांना प्रमाणपत्र देऊ शकत नाही. ज्या लेखकांनी अभिनय केला आहे, अशांना कलाकार प्रमाणपत्र दिले जात आहे. मात्र, तरी आम्ही आता या संबंधित शासानासोबत पत्र व्यवहार करणार आहोत. 1988 सालच्या गृहनिर्माण आणि विशेष सहाय्य या विभागाच्या एका पत्रानुसार, तमाशा, नाटक , चित्रपट, शिल्पकार, कवी, कवाल, नकलाकार , शिल्पकार अहिर यांचा त्या पत्रात उल्लेख आहे. मात्र त्या पत्रात लेखकाचा उल्लेख नाही. आणि ज्या लेखकांना म्हाडाकडून घरे मिळाली आहे त्यांना साहित्यिक या कोट्यातून घरे मिळाली आहे.

म्हाडा सोडतीत लेखकांना स्थान नसल्याचे आता मनोरंजनसृष्टीत नाराजीचा सूर आहे. ‘कलाकार’  या कोट्यात लेखकांच्या स्थनाबद्दल सांस्कृतिक विभाग शासानासोबत पत्र व्यवहार करण्यार असल्याचे संबधित अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे आता लेखक हे वंचित राहणार की त्यांना देखील कलाकार कोट्यात स्थान मिळणार हे लहान महत्त्वाचे असेल.

म्हाडाच्या 2 हजार 30 घरांसाठी नोंदणी करता येणार आहे. गोरेगाव, अँटॉप हिल, कोपरी पवई, कन्नमवारनगर, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड या भागात ही घरं असतील. या घरांसाठी  13 सप्टेंबरला लॉटरी काढण्यात येईल. अर्ज प्रक्रियेची लिंक दुपारी 12पासून उपलब्ध होईल. नागरिकांना 4 सप्टेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. या अर्जाची प्रारुप यादी 9 सप्टेंबरला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत प्रसिद्ध होणार आहे. ऑनलाईन दावे, हरकतींसाठी 9 सप्टेंबर दुपारी 12पर्यंतची मुदत देण्यात आलीये. तर अर्जाची अंतमि यादी 11 सप्टेंबरला संध्याकाळी 6 वाजता प्रसिद्ध होईल.





Source link

कोल्हापूरमध्ये धक्कादायक घटना! केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग

कोल्हापूरमध्ये धक्कादायक घटना! केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग


पुढील
बातमी

बापरे! महिलेच्या डोळ्यात चक्क 60 जिवंत अळ्या, डॉक्टरही अचंबित… नेमकं काय घडलं?





Source link

भाजपमध्ये गेलेल्या अशोक चव्हाणांना दोन मोठे धक्के, विधानसभा निवडणुकीआधीच नांदेडमध्ये 'अशी' बदलली समीकरणं

भाजपमध्ये गेलेल्या अशोक चव्हाणांना दोन मोठे धक्के, विधानसभा निवडणुकीआधीच नांदेडमध्ये 'अशी' बदलली समीकरणं



Ashok Chavan Nanded Politics: विधानसभा निवडणुकीआधीच नांदेडमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. यात अशोक चव्हाण यांना लागोपाठ दोन मोठे धक्के बसले आहेत.



Source link

मिठागर, मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्या जागांवर प्रकल्पबाधितांसाठी सदनिका; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

मिठागर, मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्या जागांवर प्रकल्पबाधितांसाठी सदनिका; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय



प्रकल्पबाधितांना सदनिका उपलब्ध करण्याच्या धोरणास मान्यता देण्यात आली आहे. गृहनिर्माण विभागाने हे धोरण मांडले होते. 



Source link

मुंबईत म्हाडाची लवकरच 2 हजार घरांसाठी लॉटरी; किती असेल किंमत? वार्षिक उत्पन्न किती असावे? सर्व काही जाणून घ्या

मुंबईत म्हाडाची लवकरच 2 हजार घरांसाठी लॉटरी; किती असेल किंमत? वार्षिक उत्पन्न किती असावे? सर्व काही जाणून घ्या


Mhada Lottery 2024: मुंबईत हक्काचं घरं असाव अशी अनेकांची इच्छा असते. मात्र, या महागाईच्या काळात व घरांच्या वाढलेल्या किंमतीपाहून मुंबईपासून लांब घर खरेदी करण्याचा विचार सर्वसामान्य माणूस करतो. मात्र, आता लवकरच तुमचं हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार आहे. म्हाडा मुंबई मंडळाकडून लवकरच लॉटरीची जाहिरात काढण्यात येणार आहे. म्हाडातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई मंडळासाठी लॉटरीची जाहिरात काढण्यासाठी सर्व प्रक्रिया झाली असून लवकरच तारीख निश्चित करण्यात येणार आहे. त्यामुळं 8 ऑगस्टला 2030 घरांच्या सोडतीची जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. 

म्हाडा विक्रोळी, गोरेगाव, पवई आणि अँटोप हिल येथील घरांसाठी लॉटरी काढणार आहे. एकूण 2,030 घरे असून अचारसंहिता लागण्यापूर्वी लॉटरीची तारीख जाहिर होण्याची शक्यता आहे. तसंच, लॉटरीची तारीख जाहिर झाल्यानंतर लगेचच सप्टेंबरपर्यंत सोडत काढण्यात येणार आहे. म्हाडाच्या या घरांची किंमत किती असेल व कोणत्या गटासाठी कोणाला अर्ज करता येऊ शकेल, याची सर्व माहिती आज जाणून घ्या. यंदा काढण्यात येणाऱ्या लॉटरीसाठी  मध्यम आणि अल्प गटासाठी सर्वाधिक घरे आहेत. तर, अत्यल्प गटासाठी कमी घरे असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, उच्च वर्गासाठीही काही घरे आहेत. गोरेगाव येथे 3 BHK घर असून त्यांचा समावेश 2024च्या लॉटरीत केला जाणार आहे. 

म्हाडा लॉटरीसाठी अर्ज कसा कराल?

म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाडा लॉटरी 2024 मध्ये अर्ज करण्यासाठी अर्जदारांना पूर्णपणे ऑनलाइनच अर्ज भरायचा आहे. संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाइन असणार आहे. त्याचबरोबर म्हाडाच्या संकेतस्थळावर लॉटरीसंदर्भात अपडेट देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर म्हाडाने मोबाइल अॅपदेखील सुरू केलं आहे. त्याद्वारेही तुम्ही रजिस्टर करु शकता. रजिस्टर पूर्ण झाल्यानंतर अर्जदार म्हाडा लॉटरी 2024साठी अर्ज करु शकणार आहेत. लवकरच Mhada Lottery 2024 लाइ्व्ह होणार आहे. 

घरांच्या किंमती किती असतील?

म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, EWS गटातील घरांच्या किंमती साधारण 30 लाखांपासून सुरू होत आहेत. तर, 3 BHK घरं उच्च गटातील असून या घरांची किंमत 1 कोटींच्या आसपास आहे. 3 बीएचके घरांच्या किंमती अद्याप निश्चित करण्यात आलेल्या नाहीत. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 कोटींच्या आसपास या घरांच्या किंमती असू शकतात. 

इन्कम स्लॅब किती असणार?

 -कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 6 लाखांपर्यंत असेल त्यांना EWS (अल्प गटा)साठी अर्ज करता येणार आहे.

– ज्या कुटुंबाचे उत्पन्न 6 लाख ते 9 लाखांपर्यंत आहे त्यांना LIG (अत्यल्प गट)साठी अर्ज करता येणार आहे. 

– कौटुंबिक उत्पन्न 9 लाख ते 12 लाखापर्यंत आहे ते MIG (मध्यम गट)साठी अर्ज करता येणार आहे. 

– कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न 12 लाखांपेक्षा जास्त असेल तर त्यांना HIG (उच्च गट)साठी अर्ज करता येणार आहे. 

पती आणि पत्नी या दोघांचे वार्षिक उत्पन्न मिळून कुटुंबाचे उत्पन्न धरले जाते. व्यक्तींच्या पालकांचे किंवा भावंडांचे उत्पन्न हे कौटुंबिक उत्पन्न मानले जात नाही, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.





Source link

हा तर छोटा कुंभकरण! झोपलेल्या मुलाल उठवायला अग्निशमन दलाला बोलावले

हा तर छोटा कुंभकरण! झोपलेल्या मुलाल उठवायला अग्निशमन दलाला बोलावले


पुढील
बातमी

तब्बल 87 वर्षानंतर ठाण्यात डबल डेकर बस धावणार; प्रवाशांची गर्दीतुन सुटका





Source link

YouTube
Instagram
WhatsApp