by Hansraj Agrawal | Jun 10, 2024 | Trending News
Supriya Sule Reaction On Murlidhar Mohol : नरेंद्र मोदी यांनी काल संध्याकाळी 7.15 वाजता तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. त्यांच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील पाच खासदारांना संधी देण्यात आली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले खासदार मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात मोहोळ यांना स्थान मिळाले आहे. आता यावर खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांना टोला लगावला आहे. पुण्याला मंत्रिपद मिळालंय याचा मला आनंद आहे. पण त्याचा फायदा कॅान्ट्रॅक्टरला न होता पुणेकरांना व्हावा ही अपेक्षा, असा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला आहे.
“पुण्यात प्रशासन नाही. आज मी कोयता गँगने तोडफोड केल्याची बातमी पाहिली. पुण्यात पाणी तुंबतय. ससूनची बदनामी सुरु आहे. ड्रग्ज सुरु आहे. पुण्यासाठी पक्ष विरहीत फोरम स्थापन करा. पुण्यातील उद्योग बाहेर जात आहेत. ही चिंतेची बाब आहे. पुण्याला मंत्रीपद मिळालंय, त्याचा मला आनंद आहे. पण त्याचा फायदा कॉन्ट्रॅक्टरला न होता पुणेकरांना व्हावा ही अपेक्षा”, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सरसकट कर्जमाफीचा निर्णय घ्यावा
“यापुढे देश संविधानानेच चालेल, हे देशातील जनतेने दाखवून दिले आहे. पन्नास खोके इज नॅाट ओके हे जनतेने सांगितले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाने जबाबदारी वाढली. युगेंद्र पवार हे कुस्तीचे काम चांगले करत होते. त्यांना हटवने दुर्दैंवी आहे. त्यांना काढता येते का नाही हा देखील प्रश्न आहे. गेल्या 25 वर्षात आमचा पक्ष स्वत:च्या कर्तृत्वाने सत्तेत राहिला आहे. पहिल्या कॅबिनेटमध्ये सरसकट कर्जमाफीचा निर्णय घ्यावा”, अशी अपेक्षाही सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली आहे.
यावेळी सुप्रिया सुळेंना अजित पवार गटाला मंत्रिपद न मिळाल्याबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर सुप्रिया सुळेंनी मी दुसऱ्याच्या घरात डोकावून बघणार नाही, असे म्हटले. भाजप सहयोगी पक्षांना कसं वागवते हे आम्ही जवळून पाहिले आहे.
पुण्यामध्ये पावसामुळे लोकांचे हाल
पुण्यामध्ये पावसामुळे लोकांचे हाल झाले. सलग तीन वेळा पाणी साचलं. या सगळ्याला राज्य सरकार जबाबदार आहे. महापालिकेच्या निवडणुका घ्या म्हणून आम्ही मागे लागलोय. पण निवडणूक घेत नाहीत. महाविकासआघाडीमध्ये किंवा काँग्रेसचे केंद्रात सरकार असताना आम्ही मान, सन्मान, टॅलेंट वर आम्ही मंत्रीपदं दिली होती. गेली सात वर्षे सगळीकडे त्यांची सत्ता होती. त्यामुळे करांच्या प्रश्नांना तेच जबाबदार आहेत, असे सुप्रिया सुळेंनी म्हटले.
Source link
by Hansraj Agrawal | Jun 9, 2024 | Trending News
Modi Government 3rd Term Ajit Pawar NCP Group : सलग तिस-यांदा पंतप्रधान म्हणून नरेंद मोदींनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. सोबत 30 कॅबिनेट मंत्री, 5 स्वतंत्र प्रभाराचे राज्यमंत्री आणि 36 राज्यमंत्री अशी एकूण 72 खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. महाराष्ट्राच्या वाट्याला दोन कॅबिनेट तर चार राज्यमंत्रिपदं मिळाली आहेत. सात खासदार असूनही शिंदे गटाला कॅबिनेट मंत्रिपद मिळालेले नाहीच. तर एकही खासदार नसताना आठवलेंना पुन्हा राज्यमंत्रीपद मिळाले आहे. मात्र, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या खासदाराला मात्र, मोदींच्या मंत्रीमंडळात स्थान मिळालेले नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतलीय. मोदी 3.0 कॅबिनेटमध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली… तर काही विद्यमान मंत्र्यांचे पत्ते कट करण्यात आले. महाराष्ट्रातून मोदी सरकारमध्ये 6 मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र, चर्चा होतीय ती अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 1 जागा जिंकता आली. राष्ट्रवादीला 1 मंत्रीपद मिळेल, अशी आशा होती. मात्र मंत्रीमंडळात त्यांना स्थानच मिळालेलं नाही.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार अशी ऑफर देण्यात आली होती. मात्र, प्रफुल्ल पटेलांनी ती नाकारली आणि पुढील वेळेस मंत्रीपद दिलं तरी चालेलं असं सांगण्यात आलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिलीये.
कॅबिनेट मंत्री राहिल्यानं राज्यमंत्रीपद स्वीकारणं योग्य वाटलं नाही असं स्पष्टीकरण स्वत: प्रफुल्ल पटेलांनी दिलंय…त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आपल्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं प्रफुल्ल पटेल म्हणालेत…राष्ट्रवादीत सर्व आलबेल असल्याचंही पटेलांनी स्पष्ट केलं…तर केंद्रीय मंत्रीपदावर ठाम असल्याचं अजित पवारांनी सांगितलंय…
या कारणामुळे मिळाले नाही राष्ट्रवादीला मंत्रीपद
एक खासदार निवडून आलेल्या राष्ट्रवादीला कॅबिनेट देणे अशक्य असल्याने मंत्रिमंडळातील सहभाग खोळंबला. एकिकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 7 खासदार असून देखील त्यांना केवळ 1 राज्यमंत्रीपद मिळत असल्याने दुसरीकडे केवळ 1 खासदार असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कॅबिनेट मंत्रीपद कस द्यायचा हा प्रश्न होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही इच्छुक नेते हे वरिष्ठ असल्याने राज्यमंत्रीपद देण्यात देखील महायुतीला अडचणी आल्या. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मंत्रिमंडळात सहभाग नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला संधी मिळाल्यास घटक पक्ष नाराज होण्याची शक्यता कारण देशात 1 सदस्य निवडून आलेले 7 पक्ष आहेत.
रोहित पवारांचा अजित पवारांवर हल्लाबोल
रोहित पवारांनी अजित पवारांवर हल्लाबोल केलाय…अजित पवार गटाला मंत्रिपद मिळालं नसलं तरी ईडीच्या कारवाईतून त्यांना मुक्ती मिळालीय…त्यामुळे अजित पवार गटाला व्यक्तिगत गिफ्ट मिळालंय…अजित पवार गट आणि शिंदेंना राज्याशी काही देणंघेणं नाही…स्वत:च्या स्वार्थासाठी मंत्रिपदाची मागणी करत असून, अजित पवारांचा पक्ष येत्या काळात राहणार नाही…निवडणूक लढविण्यासाठी अजित पवार गटाकडे कमळ हाच पर्याय आहे…असं म्हणत रोहित पवारांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय…दरम्यान रोहित पवार सारख्या गल्लीतल्या नेत्यांनी प्रसिद्धीसाठी दिल्लीतल्या घडामोडी वर भाष्य करू नये असा फलटवार राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सुरज चव्हाण यांनी म्हटलंय…
Source link
by Hansraj Agrawal | Jun 9, 2024 | Trending News
Heavy Rain Orange Alert: मुंबईसह कोकण पट्ट्यातील नागरिक गेले अनेक दिवस उकाड्याने कंटाळले होते. सर्वजण पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. दरम्यान पावसाने आज दमदार एन्ट्री केली असून तो मुसळधार कोसळण्याची शक्यता आहे. पावसाची सुरुवात होताच मुंबईसह कोकण विभागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. मुंबईसह उपनगरात रात्री उशिरा जोरदार पाऊस झाल्याने मुंबईकरांना पावसामुळे दिलासा मिळालाय. पूर्व उपनगरात कुर्ला, घाटकोपर, ठाणे, कल्याण-डोंबिवलीत पावसानं हजेरी लावली तर पश्चिम उपनगरातही पाऊस कोसळला. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगावमध्ये रात्री पाऊस झाला. हवामान विभागानं पुढील 2 दिवस मुंबईत पावसाचा इशारा दिलाय. त्यामुळे आवश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आलंय.
राज्यातील अनेक भागात मुसळधार
आजपासून मंगळवारपर्यंत राज्यातील अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय.. या कालावधीमध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे याठिकाणी अतिमुसळधार पाऊस होईल अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आलीये. आजपासून कोकणासह मुंबईतत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, आणि साता-या जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. रायगडमध्ये पहाटे ढगांच्या गडगडाटात आणि विजांच्या लखलखाटासह जोरदार पाऊस
झालाय…रायगडमध्ये सकाळपासून आता ढगाळ वातावरण आहे…पुढील 3 ते 4 तासात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय..
पहिल्याच पावसात मुंबईची लाईफलाईन कोलमडली
पहिल्याच पावसात मुंबईची लाईफलाईन कोलमडलीये..तांत्रिक कारणामुळे मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिरानं धावत आहे.. मध्य रेल्वेच्या कल्याणहून सीएसएमटीकडे जाणा-या लोकल सेवेला याचा विशेष फटका बसतोय.. लांब पल्ल्यांच्या गाड्याही यामुळे रखडल्यात.. मध्य रेल्वे प्रमाणेच पश्चिम रेल्वेची वाहतूकही उशीरानं सुरु आहे.. एकीकडे रेल्वे सेवा कोलमडली असताना मुंबई सकाळपासून सुरु असलेल्या पावासामुळे उपनगरांत पाणी साचण्यास सुरुवात झालीये.. मुंबईतील दहिसर भागात पाणी साचल्यानं रस्ते वाहतूक मंदावल्याचं चित्र पहायला मिळालं..
सोलापूरमध्ये पावसाची दमदार हजेरी
सोलापूर जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी पावसाने दमदार हजेरी लावली. मोहोळ तालुक्यातील तुफान पाऊस बरसला. तालुक्यातील पापरी गावात अक्षरशः पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली. तीन महिन्यांपासून कडक उन्हामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीला आला होता मात्र आता पावसामुळे सर्वांनाच चांगला दिलासा मिळालाय.
पुण्यात पाणी सुचलं
पुण्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय.. या पावसामुळे पुणे शहरातील अनेक भागात पाणी साचलं.. लोहगाव, कलवड वस्ती येथून पाण्यात अडकलेल्या 3 व्यक्तींची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरुप सुटका केली.. शहरातील विविध भागात अजूनही पाणी साचलं असून अग्निशमन दालाकडून रेस्क्यू ऑपरेशन वेगानं सुरु आहे.. दर्यान काल पुण्यात अंगावर झाड कोसळून एका व्यक्तीच्या मृत्यू झाला… अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे शहराच्या विविध झाडं तसंच भिंत कोसळण्याच्या 79 घटना घडल्यात..
भंडाऱ्यात वाऱ्यासह पाऊस
भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. वा-यासह आलेल्या मुसळधार पावसामुळे एका कापड दुकानावरील टिनपत्रे हवेत उडाले रस्त्यावर वर्दळ नसल्याने कोणतीच हानी झाली नाही. बाजार समितीतील टिन पत्रेही उडाले. वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्याने बाजार समितीच्या आवारात ठेवलेली धानाची पोती भिजली. तर काही धानाच्या पोत्यावर दोन मोठी झाडं पडल्याने मोठं नुकसान झालं.
Source link
by Hansraj Agrawal | Jun 8, 2024 | Trending News
मुंबई गोवा महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. अशातच आता मुंबई गोवा महामार्ग खचण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Jun 8, 2024 | Trending News
Maharashtra Weather updates : अनेकांच्याच आवडीचा ऋतू अखेर आलाच….आठवडी सुट्टीचे बेत आखा. सुट्टीच्या दिवशी जवळच कुठेतरी फिरायला जाण्याचा बेत आखताय? आताच पाहा काय आहे हवामानाचा अंदाज…
Source link
by Hansraj Agrawal | Jun 7, 2024 | Trending News
Manoj Jarange patil Fast Strike : मनोज जरांगे पुन्हा एकदा 8 तारखेपासून उपोषणाला बसणार आहेत. गेल्या आंदोलनात सरकारने सगे सोयरे कायदा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते पूर्ण न झाल्याने पुन्हा एकदा जरांगे आता सरकारविरोधात शड्डू ठोकत आहेत. आता जीव गेला तरी माघार नाही, असा पावित्रा मनोज जरांगे यांनी घेतला आहे.
जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाची राळ उठणार आहे. मराठा आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत. आता गोळ्या घाला किंवा जेलमध्ये टाका माघार नाही, अशा पद्धतीचा निर्वाणीचा इशाराच मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिला आहे. सगे सोयरेंबाबत कायदा करा, अन्यथा मराठ्यांचा रोष पत्करा, असे सांगत जरांगे यांनी थेट सरकारविरोधात दंड थोपटले आहेत. मात्र यावेळी जरांगे पाटलांच्या पुढे अडचणींचा डोंगर आहे. या उपोषणाला आजूबाजूच्या 3 गावांनी विरोध केला आहे. पोलिसांना पत्र लिहून आंदोलनामुळे जातीय सलोखा बिघडतो असा थेट आरोप त्यात करण्यात आला आहे. मात्र हा सरकारचा डाव आहे. आंदोलन करणारच यावर जरांगे ठाम आहे.
अंतरवली आंदोलनाचा प्रवास
2023 पासून अंतरवलीतील हे आंदोलन पेटलंय. 29 ऑगस्ट 2023 ला आंदोलन सुरु झालं. 1 सप्टेंबरला पोलिसांनी लाठीचार्ज केला, त्यानंतर संपूर्ण राज्यात याचे थेट पडसाद उमटले. 14 सप्टेंबरला मुख्यमंत्री आले आणि उपोषण सोडवलं. त्यावेळी आरक्षणासाठी 45 दिवसाची मुदत सरकारला दिली होती. सरकारने दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी 14 ऑक्टोबरला मोठी सभा घेतली. सरकारने आश्वासन न पूर्ण केल्यानं 25 ऑक्टोबरला अंतरवाली येथे दुसऱ्यांदा उपोषण 8 दिवसांचं करण्यात आले. हे उपोषण 2 नोव्हेंबर रोजी सुटलं. धनंजय मुंडे, संदीपान भुमरे, अतुल सावे, उदय सामंत यांच्या उपस्थितीत हे उपोषण अश्वासनावर सुटलं.
20 जानेवारी रोजी मुंबईला आंदोलनासाठी निघाले. मात्र सरकारने पुन्हा आश्वासन दिले. नवी मुंबईत गुलाल उधळत जरांगे माघारी आले. पुन्हा सरकारने फसवल्याचा आरोप करीत 10 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी पर्यत अंतरवाली सराटी येथे तिसऱ्यांदा उपोषण केलं. फडणवीस यांच्यावर राग दाखवत थेट मुंबईकडे निघाले. मात्र पोलिसांनी संचारबंदी लावल्याने जरांगे याना अंतरवाली येथे माघारी फिरावं लागलं.
मेलो तरी माघार नाही, जरांगेंचा पावित्रा
आता उद्या 8 जूनपासून जरांगे यांनी पुन्हा चौथ्यांदा अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. आता मेलो तरी माघार नाही असा पवित्रा जरांगे यांचा आहे. यावेळी सरकारने मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत 288 उमेदवार रिंगणात उतरवणार असल्याचा इशारा जरांगे यांनी राज्य सरकारला दिला आहे. खरंतर लोकसभा निवडणुकीतच जरांगे फॅक्टरमुळे राज्य सरकारचं खास करुन भाजपचं मोठं नुकसान झालं आहे. अनेक दिग्गज यामुळे पराभूत झाले आहेत. त्यामुळे जरांगे पाटलांना सहज घेणं सरकारला परवडणारं नाही. याच जरांगे नावाच्या या कोंडीतून सरकार कसा मार्ग काढणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे
Source link