Maharashtra Weather News : धो धो कोसळणारा पाऊस अखेर काहीशी विश्रांती घेणार; पण…

Maharashtra Weather News : धो धो कोसळणारा पाऊस अखेर काहीशी विश्रांती घेणार; पण…


पुढील
बातमी

MHADA चे अंबरनाथमध्ये 2 नवे प्रोजेक्ट्स! कधी बांधून पूर्ण होणार हे ही सांगितलं; पाहा तपशील





Source link

गणपतीत कोकणात जाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; 'या' तारखेपासून सुरु होणार विशेष ट्रेनचे बुकिंग

गणपतीत कोकणात जाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; 'या' तारखेपासून सुरु होणार विशेष ट्रेनचे बुकिंग


Ganpati Special Train 2024 Booking Date : गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. मध्य रेल्वे २० अतिरिक्त गणपती विशेष ट्रेन चालवणार आहे. ७ ऑगस्टपासून याचे आरक्षण सुरू होणार आहे. मध्य रेल्वेने यंदाच्या गणपती उत्सवासाठी आतापर्यंत २२२ गणपती विशेष रेल्वे जाहीर केल्या आहेत.  

मध्य रेल्वे खाली दिलेल्या तपशिलानुसार, आगामी गणपती महोत्सवादरम्यान गणपती भक्तांच्या फायद्यासाठी आतापर्यंत जाहीर केलेल्या २०२ गणपती विशेष गाड्यांव्यतिरिक्त २० गणपती विशेष ट्रेन चालवणार आहे. आतापर्यंत एकूण २२२ गणपती विशेष ट्रेन चालवणार आहे.

सर्व गणपती विशेष ट्रेनचे बुकिंग दि. ०७.०८.२०२४ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर विशेष शुल्कावर उघडणार आहे. या विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा.

असं आहे रेल्वेचं गणपती विशेष वेळपत्रक

१) लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई-रत्नागिरी द्वि-साप्ताहिक विशेष (८ फेऱ्या)
 
01031 विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून दि.०६.०९.२०२४, दि.०७.०९.२०२४, दि.१३.०९.२०२४ आणि दि. १४.०९.२०२४ रोजी २०:०० वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे दुसऱ्या दिवशी ०४:५० वाजता पोहोचेल. (४ फेऱ्या)
 
01032 विशेष गाडी रत्नागिरी येथून दि. ०७.०९.२०२४, दि. ०८.०९.२०२४, दि. १४.०९.२०२४ आणि दि. १५.०९.२०२४ रोजी रात्री ०८:४० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे त्याच दिवशी १७:१५ वाजता पोहोचेल. (४ फेऱ्या)  
 
थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड
 
संरचना: २ वातानुकूलित-द्वितीय, ६ वातानुकूलित-तृतीय, ८ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी यासह १ गार्डची ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार. (२१ डब्बे)

२) पनवेल-रत्नागिरी साप्ताहिक विशेष (४ फेऱ्या)
 

01443 विशेष गाडी पनवेल येथून दि. ०८.०९.२०२४ आणि दि. १५.०९.२०२४ रोजी ०४:४० वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी ११:५० वाजता पोहोचेल. (२ फेऱ्या)
 
01444 विशेष गाडी रत्नागिरी येथून दि. ०७.०९.२०२४ आणि दि. १४.०९.२०२४ रोजी १७:५० वाजता सुटेल आणि पनवेल येथे दुसऱ्या दिवशी ०१:३० वाजता पोहोचेल. (२ फेऱ्या) 
 
थांबे: पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड 
 
संरचना: १ वातानुकूलित-द्वितीय, ४ वातानुकूलित-तृतीय, ११ शयनयान आणि २ गार्ड्स ब्रेक व्हॅनसह ६ सामान्य द्वितीय श्रेणी. (२२ डब्बे)

३) पुणे-रत्नागिरी साप्ताहिक विशेष (४ फेऱ्या) 

01447 विशेष गाडी पुणे येथून दि. ०७.०९.२०२४ आणि दि. १४.०९.२०२४ रोजी ००:२५ वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी ११:५० वाजता पोहोचेल. (२ फेऱ्या)  
 
01448 विशेष गाडी रत्नागिरी येथून दि. ०८.०९.२०२४ आणि दि. १५.०९.२०२४ रोजी १७:५० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ०५:०० वाजता पोहोचेल. (२ फेऱ्या)
 
थांबे: चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड
 
संरचना: १ वातानुकूलित-द्वितीय, ४ वातानुकूलित-तृतीय, ११ शयनयान आणि २ गार्ड्स ब्रेक व्हॅनसह ६ सामान्य द्वितीय श्रेणी. (२२ डब्बे)

४) पनवेल-रत्नागिरी साप्ताहिक विशेष (२ फेऱ्या) 

01441 विशेष गाडी दि. ११.०९.२०२४ रोजी ०४:४० वाजता पनवेल येथून सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी ११:५० वाजता पोहोचेल. (१ फेरी) 
 
01442 विशेष गाडी दि. १०.०९.२०२४ रोजी १७:५० वाजता रत्नागिरी येथून सुटेल आणि पनवेल येथे दुसऱ्या दिवशी ०१:३० वाजता पोहोचेल. (१ फेरी)
 
थांबे: पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड
 
संरचना: ३ वातानुकूलित-द्वितीय, १५ वातानुकूलित-तृतीय, १ गार्डची ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार. (२० डब्बे)

५) पुणे-रत्नागिरी साप्ताहिक विशेष (२ फेऱ्या)

01445 विशेष गाडी दि. १०.०९.२०२४ रोजी पुणे येथून ००:२५ वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी ११:५० वाजता पोहोचेल. (१ फेरी) 

01446 विशेष गाडी रत्नागिरी येथून दि. ११.०९.२०२४ रोजी १७:५० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ०५:०० वाजता पोहोचेल. (१ फेरी)
 
थांबे: चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड
 
संरचना: ३ वातानुकूलित-द्वितीय, १५ वातानुकूलित-तृतीय, १ गार्डची ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार. (२० डब्बे)





Source link

'अथक प्रयत्नानंतरही सिध्दांत पाटीलला वाचवू शकलो नाही'; फडणवीसांची पोस्ट! महिन्याभरानंतर सापडला मृतदेह

'अथक प्रयत्नानंतरही सिध्दांत पाटीलला वाचवू शकलो नाही'; फडणवीसांची पोस्ट! महिन्याभरानंतर सापडला मृतदेह


Siddhant Patil Death Devendra Fadnavis Post:  अमेरिकेतील मोंटेना येथील ग्लॅशिअर नॅशनल पार्कमध्ये वाहून गेलेल्या भारतीय तरुणाचा मृतदेह जवळपास महिन्याभरानंतर सापडला आहे. या नॅशनल पार्कमधील कर्मचारी मागील महिन्याभरापासून या भारतीयाचा शोध घेत होते. अखेर रविवारी हा शोध संपला जेव्हा सिद्धांत पाटीलचा मृतदेह कर्मचाऱ्यांना सापडला. सिद्धार्थ हा मुळचा महराष्ट्रातील आहे. 

नेमकं घडलं काय?

सिद्धार्थ कॅलिफॉर्नियामध्ये काम करायचा. तो 6 जुलै रोजी एव्हलान्च लेकजवळ ट्रेकसाठी गेला होता. ॲव्हलांच क्रीक येथे ट्रेकदरम्यान एका मोठ्या दगडावर उभा असताना तो जाऊन तो थेट दरीमधील नदीच्या प्रवाहामध्ये कोसळला. सिद्धार्थच्या मित्रांना तो खाली पडल्यानंतरही दिसत होता. सिद्धार्थ पाण्यात पडल्यानंतर एकदा पाण्यातून वर आला मात्र नदीच्या काठावर पोहचण्याआधीच वेगवान प्रवाहामुळे तो वाहून गेला. सिद्धार्थचे मामा प्रितेश चौधरी यांनी नॅशनल पार्कमधील कर्मचाऱ्यांनी आम्हाला त्याचा मृतदेह सापडल्याची माहिती दिल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे. 

ग्लॅशिअर नॅशनल पार्कने जारी केलं पत्रक

“अनेक आठवड्यांपासून सुरु असलेल्या शोध मोहिमेमध्ये ग्लॅशिअर नॅशनल पार्कमधील कर्मचाऱ्यांच्या दाव्यानुसार त्यांना सिद्धांत नावाच्या 26 वर्षीय भारतीय तरुणाचा मृतदेह सापडला आहे. सिद्धार्थ 6 जुलै 2024 रोजी ॲव्हलांच क्रीक येथे उंचावरुन नदी प्रवाहात पडून वाहून गेला होता,” असं ग्लॅशिअर नॅशनल पार्कने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

कसा सापडला मृतदेह?

“सिद्धांतने ज्याप्रकारचे कपडे आणि ट्रेकिंग गेअर परिधान केलं होतं त्या साऱ्या गोष्टी सापडल्या आहेत. शनिवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी साडेदहा वाजता काही पर्यटकांना नदीमध्ये मृतदेह दिसून आला. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी तातडीने तिथे धाव घेत हा मृतदेह ताब्यात घेतल्या. डीएनए चाचण्या आणि दातांच्या रचनेच्या आधारे आता हा मृतदेह सिद्धांतचाच आहे की नाही हे पुन्हा एकदा तपासलं जाणार आहे,” असं ग्लॅशिअर नॅशनल पार्कने पत्रकात म्हटल्याचं एएनआयने सांगितलं आहे.

फडणवीसांनी व्यक्त केला शोक

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सिद्धांतच्या मृत्यूसंदर्भात शोक व्यक्त केला आहे. “माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या सिध्दांत विठ्ठल पाटील या तरुणाच्या दुःखद निधनाबद्दल ऐकून फार वाईट वाटले. कॅलिफोर्नियातील ॲव्हलांच क्रीक येथे हायकिंग करताना सिद्धांत बेपत्ता झाला. परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही अथक प्रयत्न केल्यानंतरही त्याला वाचवू शकलो नाही. त्यांच्या कुटुंबियांना आणि मित्रांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. देव त्यांना अशा कठीण काळात शक्ती देवो.”, असं फडणवीस यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन म्हटलं आहे. 

राज्यपालांनाही केलेली मागणी

महाराष्ट्राच्या राज्यपालांना सिद्धांत बेपत्ता झाल्यानंतर केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी मध्यस्थी करुन अमेरिकी अधिकाऱ्यांना सिद्धांतचा मृतदेह शोधण्यासाठी गळ घालण्याची मागणी केली होती. 





Source link

सोसायटीतील मीटिंग मधील वाद; अध्यक्षाने सभासदाच्या हाताचा अंगठा चावून तोडला

सोसायटीतील मीटिंग मधील वाद; अध्यक्षाने सभासदाच्या हाताचा अंगठा चावून तोडला



मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. सोसायटीच्या अध्यक्षाने सदस्याच्या बोटाचा चावा घेतला. 



Source link

लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट; अर्ज भरलेल्या लाखो लाडक्या बहिणींना मिळाला दिलासा

लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट; अर्ज भरलेल्या लाखो लाडक्या बहिणींना मिळाला दिलासा


Mazi Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांचे मराठी भाषेतील अर्ज ग्राह्य धरले जाणार आहेत. मराठीतील अर्ज नामंजूर होणार नसून, कुणीही गैरसमज करून घेऊ नये अशी माहिती  महिला आणि बाल विकासमंत्री आदिती तटकरेंनी दिली. त्यामुळे योजनेसाठी अर्ज भरलेल्या लाखो लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला आहे.

लाडकी बहीण योजनेसाठी नारी शक्ती दूत App इन्स्टॉल करायचं आहे, त्यानंतर आपला Login Id तयार करायचा आहे. त्यानंतर लाभार्थ्याला Form भरता येईल. App वरील सूचनांप्रमाणे Form भरायचा आहे.  आता अर्जासोबत जोडायच्या कागदपत्रांबाबत जाणून घेऊया. आधार कार्डची दोन्ही बाजूची प्रत जोडायची आहे.  अधिवास प्रमाणपत्राची प्रत जोडायची आहे, मात्र ते नसल्यास त्याऐवजी महिलेचं 15 वर्षांपूर्वीचं रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र आणि जन्म दाखला, या पैकी कोणतंही 1 जोडायचं आहे. परराज्यात जन्मलेल्या महिलेनं महाराष्ट्रातील अधिवास असणा-या पुरुषाबरोबर विवाह केला असेल, तर तिच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र यापैकी कोणतंही एक सादर करायचं आहे. वार्षिक कमाल उत्पन्न अडीच लाखांपर्यंत असल्याचं प्रमाणपत्र अनिवार्य आहे. मात्र पिवळं आणि केशरी रेशनकार्ड धारकांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट आहे. त्यासाठी रेशनकार्डच्या पहिल्या आणि शेवटच्या पानाची एका पानावर प्रत घेऊन ती अपलोड करावी. तसंच बँक पासबुकची पहिल्या पानाची प्रत अनिवार्य नाही. मात्र ती असल्यास अपलोड करावी.  हे सर्व झाल्यावर अर्जदारानं नमुन्याप्रमाणे हमीपत्र भरायचं आहे. त्यानंतर Form भरल्याचा Message मोबाईलवर येईल तो जपून ठेवायचा आहे. 

आमदारानं परवानगी न घेता लावलं पोस्टर; लाडक्या बहिणी’वर घटस्फोटाची वेळ

या आहेत नम्रता कावळे आणि भागीरथीबाई कुरणे. लाडकी बहीण योजनेच्या पोस्टर गर्ल. भाजपचे शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी मतदारसंघात नाक्यानाक्यावर त्यांची पोस्टर्स लावली. धक्कादायक बाब म्हणजे नम्रता कावळेंच्या नव-यानं ती पोस्टर्स पाहिली. तो एवढा संतापला की, बायकोला थेट घटस्फोट द्यायला निघाला. बिच्चा-या दोघीजणी. त्यांनी तत्काळ गावावरून पुण्याला धाव घेतली. आमदारांनी आमची बदनामी केली, असं सांगत त्यांनी आमदार शिरोळे यांच्या विरोधात पुण्याच्या पोलीस आयुक्तांकडे रीतसर तक्रार केलीय. धक्कादायक बाब म्हणजे या दोन्ही महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी साधा अर्जही केलेला नाही. भीम आर्मीचे पदाधिकारी सीताराम गंगावणे यांनी या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी पोस्टरवरचा दोघा महिलांचा फोटो कापून काढला. आमदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.

दरम्यान, योजनेच्या प्रसिद्धीसाठी आपण पोस्टर लावलं होतं. यामुळं कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, असं आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी स्पष्ट केलंय. पोस्टर बॉय आणि पोस्टर गर्ल सिनेमात जे घडलं, तेच पुण्यातही पाहायला मिळालं. सध्या गाजत असलेली लाडकी बहीण योजना तळागाळात पोहोचावी, यासाठी सत्ताधारी महायुतीकडून खटाटोप सुरूय. मात्र त्यात चुकीच्या महिलांचे फोटो लावले जात असतील तर, केशवसूतांची माफी मागून आम्ही नसू लाडक्या असंच म्हणण्याची वेळ माता-बहिणींवर येईल.

 





Source link

फडणवीसांनंतर शाहांवर बरसले ठाकरे, म्हणाले, 'ते अहमद शाह अब्दालीचे वंशज..'

फडणवीसांनंतर शाहांवर बरसले ठाकरे, म्हणाले, 'ते अहमद शाह अब्दालीचे वंशज..'


Pune Uddhav Thackeray: एकतर तू नाही तर मी, असं विधान मी केलं होतं. अनेकांना वाटलं मी त्यांना बोललो. पण मी ढेकणाला आव्हान देत नाही. माझ्या नादाला लागण्याच्या कुवतीचा तू नाहीयस, अशा टिका उद्धव ठाकरेंनी नाव घेता देवेंद्र फडणवीसांवर केली. शिवसंकल्प मेळाव्यात बोलताना सुरुवातीलाच त्यांनी फडणवीसांचा समाचार घेतला. अहमद शाह अफदालीचा वंशज म्हणून त्यांनी यावेळी अमित शाह यांचा उल्लेख केला. प्रत्येकवेळी गद्दरानी आपला घात केल्याचे ते म्हणाले. मेहबूबा मुफ्ती, नितीश कुमार,चंद्राबाबू नायडू हे काय हिंदुत्ववादी आहेत ?तुम्ही त्यांच्यासोबत गेलं तर चालते, अशी टीका त्यांनी केली. भाजपचा सत्ताजिहाद सुरु असून सत्तेसाठी वाट्टेल ते सुरु असल्याचे ते म्हणाले. 

संसद भवन ज्यानं बांधलय तोच कॉन्ट्रॅक्टर नदी बुजवतोय

पुण्यात पूर आला. त्यात शेकडो संसार वाहून गेले. याला जबाबदार असणाऱ्यांना आपल्याला फासावर नाही पण उलटं लटकावयचे आहे.पुण्यात नदी सुधारच्या नावाखाली नदीवर भराव टाकण्यात आला. मला पुणे वाचवायचे आहे. आम्ही त्याला स्थगिती दिली होती. पण यांनी पुन्हा काम सुरू केल्याचे ते म्हणाले.  नवीन संसद भवनही गळतंय. संसद भवन ज्यानं बांधलय तोच कॉन्ट्रॅक्टर नदी बुजवण्याचे काम करतोय. कॉन्ट्रॅक्टर माझा लाडका, अशी योजना सुरु आहे. 3 महिने थांबल्यावर यांचा हिशोबही चुकता करणार आहे. मोदीजी कॉंग्रेसकडे 60 वर्षाचा हिशोब मागतात. 12 महिन्यात तुमचं सगळंच बांधलेलं गळतंय. संसद गळतंय, राम मंदिर गळतंय, पेपर गळतायत म्हणजे लिक होतायत. असे रस्ते बनवेन की 200 वर्षे खड्डेच पडणार नाहीत, असे गडकरी म्हणतात. पण मुंबई-गोवा हायवेवर खड्डेच खड्डे आहेत. एका खड्डा पुरुष म्हणून त्यांना पुरस्कार द्या.

भाजपच्या अब्दालीला संघाचे विचार मान्य नाहीत का ?

गेल्या आठवड्यात पुण्यात आले होते. लोकसभेला कुठे कुठे फटके पडलेत ते बघायला.अहमदशा अब्दालीचा वंशज अमित शाह पुण्यात आला होता.आम्ही हिंदुत्व सोडलं म्हणाल्याची टीका ठाकरेंनी केली. भाषणावेळी देवरसांच्या पत्राचा दाखला उद्ध व ठाकरेंनी दिला. बाळासाहेब देवरस यांनी तत्कालीन इंदिरा गांधींना पत्र लिहिले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुस्लिमांचा द्वेष करत नाही असं त्यांनी म्हटलं होतं.भाजपच्या अब्दालीला संघाचे विचार मान्य नाहीत का ? असा प्रश्न त्यांनी विचारला. खुर्चीचा मोह कसा असतो हे देवरस यांनी त्यावेळी लिहून ठेवलंय, हिंदू हा विश्वासघात करणारा नाही, इतरांची घर जाळायला आम्हाला छत्रपतींनी शिकवलं नाही, असे ते म्हणाले. 

जनतेकडून मला न्याय मिळेल

येत्या 50 वर्षात निकाल नक्की लागेल हा न्यायदेवतेवर अंधविश्वास आहे.  कोर्टाकडून न्यायाला उशीर होतोय. पण जनतेकडून मला न्याय मिळेल. जनता न्यायालयात सुनावणी आजपासून सुरु झालीय. जनतेच्या न्यायालयात मला न्याय मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. मी मशाल निशाणी जाणिवपूर्वक निवडलीय. यावेळी लाडकी बहीण योजनेवरुनदेखील त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. 

वाघनखांवरुन मुनगंटीवारांवर टीका

नखांच्या मागे शिवाजी राजा म्हणून वाघ होता म्हणून त्याला अर्थ आहे. पण नखांच्या मागे मुनगंटीवार असेल? नख आणि मुनगंटीवार शोभतंय का? शिवाजी महाराजांची वाघनख म्हणजे महाराष्ट्राची जनता असल्याचे ते म्हणाले.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp