by Hansraj Agrawal | Apr 13, 2024 | Trending News
Udayanraje On waiting in Satara : साताऱ्यात मविआकडून शशिकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र महायुतीचा घोळ संपता संपत नाही. सातारचा तिढा कसा सुटतो? ते पहावं लागणार आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Apr 13, 2024 | Trending News
Narayan Rane On Devendra Fadanvis: भाजप नेते नारायण राणे यांनी आपल्या पक्षप्रवेशाबद्दलचा किस्सा सांगितला आहे. यामुळे साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ज्येष्ठ नेते नारायण राणे हे आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. शिवसेना, कॉंग्रेस नंतर भाजपमध्ये प्रवेश केलेल्या राणेंनी आपल्या पक्ष प्रवेशात देवेंद्र फडणवीसांचा कसा सहभाग होता, याबद्दल वक्तव्य केलंय. काय आहे हा किस्सा? जाणून घेऊया.
नारायण राणे भाजपमध्ये आल्यानंतर त्यांना केंद्रीय मंत्री पदाचा दर्जा देण्यात आला. नारायण राणे हे नेहमीच उद्धव ठाकरे यांना आव्हान देत आले आहेत. याचा फायदा वेळोवेळी फडणवीस पर्यायाने भाजपला झाला. नारायण राणेंच्या रुपाने कोकणात ताकद असलेला मराठा चेहरा भाजपला मिळाला. पण नारायण राणेंच्या भाजप प्रवेशावेळी नेमकं काय झालं होतं? याचा उलगडा आता अनेक वर्षांनी झालाय
देवेंद्र फडणवीस मागे लागल्याने भाजप मध्ये गेलो, असे नारायण राणे म्हणाले. ‘भाजप मध्ये या’ असं भर रस्त्यात देवेंद्र फडणवीसांनी मला विचारलं. ‘मी एका पक्षाचा नेता आहे, रस्त्यावर विचारानं योग्य नाही’, असं राणे म्हणाले. यानंतर चर्चा करून मी भाजप मध्ये गेलो, असे नारायण राणेंनी सांगितले.
मी प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करतो. पद मिळवण्यासाठी त्या लायकीचा बनण्याचा प्रयत्न करतो, असेही राणे पुढे म्हणाले.
कोकणातील प्रचार मोहिमेत भाजपाची आघाडी
मुंबई भाजपा अध्यक्ष कोकणात दाखल झाले आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारासाठी कोकणात प्रचार मोहिमेत भाजपाची आघाडी पाहायला मिळत आहे. कोकणातून अजून महायुतीचे उमेदवाराचं नाव जाहीर नाही.मात्र येथे भाजपाच पारडं जड आहे. कोकणात शिवसेनेतून उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत उमेदवार म्हणून इच्छुक होते. पण नारायण राणेंना पक्षाकडून हिरवा कंदील मिळाला. यानंतर स्वत: नारायण राणे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मध्ये प्रचार करत आहेत.
कोकणातील तिढा कायम
उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी नागपूर येथील त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेत. महायुतीमध्ये अजूनही रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटलेला नाहीये. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे नाते नारायण राणे तर शिवसेनेकडून किरण सामंत उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. उद्योग मंत्री उदय सामंत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघा संदर्भातच चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी पोहचले आहेत. आता या चर्चेत काय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Apr 12, 2024 | Trending News
Rohit Pawar open challenge to Ajit Pawar: लोकसभा निवडणूक जशी जवळ येतेय तशी राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी वेग धरु लागल्या आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये 2 गट पडल्याने येथील कलगीतुरा दिवसेंदिवस रंगतदार वळण घेतोय. राष्ट्रवादीत 2 गट पडल्यानंतर आता पवार घराण्यातही 2 गट पडल्याचे दिसून येते. पवार घराण्यातील अनेकजण थोरल्या पवारांचा प्रचार करताना दिसतात. यावर अजित पवारांनी भाष्य केले होते. यावर आता रोहित पवारांनी थेट अजित पवारांनाच चॅलेंज केलंय.
मागील दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांनी बारामतीमधील सभेमध्ये आक्रमक भूमिकेत दिसत आहेत. आपल्या भावंडांबद्दल त्यांनी विधान केले. माझी भावंडे कधीच माझ्यासाठी प्रचाराला उतरली नाहीत.मात्र सध्या पायात भिंगरी बांधल्यावाणी ते बारामती लोकसभा मतदारसंघात फिरत आहेत, असे ते म्हणाले होते. पावसाळ्यात छत्री उगवल्यावाणी हे सर्व लोक उगवले आहेत. मात्र मी जर यांच्या बद्दल तोंड उघडले तर तोंड उघडायला जागा राहणार नाही असा इशारा अजित पवारांनी दिला होता.
अजित पवार यांच्या टीकेवरुन पवार कुटुंबात नाराजीचा सूर उमटलेला दिसतोय. यावर आता आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. इंदापूर मधील आज झालेल्या सभेत रोहित पवारांनी अजित पवारांना ओपन चॅलेंज दिले आहे.
दादांनी काय बोलायचे ते एकदाच बोलून टाकावे.तुम्ही तुमच्या भावंडाबद्दल माणसात येऊन सांगा. मग तुमची भावंड तुमच्याबद्दल बरेच काही गोष्टी सांगतील, असे ओपन चॅलेंज रोहित पवार यांनी अजित पवार यांना दिले आहे.
आता हे आव्हान-प्रतिआव्हान भविष्यात कोणते वळण घेते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Apr 12, 2024 | Trending News
Loksabha Election 2024 Baramati : महायुतीला बिनशर्त पाठिंबा दर्शविलानंतर आज बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांच्या प्रचार बॅनरवर राज ठाकरेंचा फोटो झळकला आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Apr 11, 2024 | Trending News
वंचित बहुजन आघाडीकडून 10 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने रायगड, उस्मानाबाद, जळगाव, पालघर, भिवंडी आणि मुंबईतील तीन मतदारसंघांचा समावेश आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Apr 11, 2024 | Trending News
Loksabha Election 2024 : श्रीराम पाटील यांना उमेदवारी नेमकी कशी मिळाली. शरद पवार गटात येण्यामागचा त्यांचा मुख्य हेतू नेमका कोणता? पाहा सविस्तर वृत्त..
Source link