पाच पक्ष सोडून आलेले निष्ठावान कसे? उद्धव ठाकरे गटाच्या लोकसभा उमेदवाराला संजय राठोड यांचा थेट सवाल

पाच पक्ष सोडून आलेले निष्ठावान कसे? उद्धव ठाकरे गटाच्या लोकसभा उमेदवाराला संजय राठोड यांचा थेट सवाल



पाच पक्ष सोडून आलेले निष्ठावान कसे?  मंत्री संजय राठोड यांनी संजय देशमुख यांना सवाल केला आहे. 



Source link

'शिवतारेंनी मला फोन कॉल दाखवले, माघार न घेण्यासाठी…', बारामतीत अजित पवारांचा गौप्यस्फोट

'शिवतारेंनी मला फोन कॉल दाखवले, माघार न घेण्यासाठी…', बारामतीत अजित पवारांचा गौप्यस्फोट


Baramati Lok Sabha Election 2024 : बारामतीत यंदा पवार विरुद्ध पवार असा सामना पहायला मिळणार आहे. महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे (Supriya Sule) मैदानात उतरल्या असताना अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना उमेदवारी दिली आहे. सुनेत्रा पवार यांच्यासाठी आता अजित पवारांनी (Ajit Pawar) चांगलीच फिल्डिंग लावायला सुरूवात केली आहे. अशातच आता बारामतीत दौऱ्यावर (Baramati News) असलेल्या अजित पवारांनी शहरात कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला अन् काकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्यावेळी अजित पवारांनी शिवतारेंचा (Vijay Shivtare) उल्लेख करत मोठा गौप्यस्फोट केला आहे. 

काय म्हणाले अजित पवार?

बारामती ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. महायुती उमेदवार म्हणून सुनेत्रा अजितराव पवार हे नाव पुढं आलंय, ज्यांना घड्याळाच्या चिन्हाच्या समोरील बटन दाबून विजयी करायचं आहे, असं आवाहन अजित पवार यांनी बारामतीकरांना केलं आहे. त्यावेळी अजित पवारांनी शिवतारेंचा उल्लेख करत एक मोठं वक्तव्य केलं. विजय शिवतारेंनी मला फोन कॉल दाखवले. माघार न घेण्यास त्यांना फोन आले होते, असं म्हणत अजित पवार यांनी सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं.

बारामतीकरांनी 1991 ला मला निवडून दिलं, त्यानंतर वडिलांना निवडून दिलं, म्हणजे साहेबांना निवडून दिलं, आता लेकीला निवडून दिलंय आता सुनेला म्हणजेच सुनेत्राला निवडून द्या. म्हणजे मुलगा खूश.. वडील आणि लेक खूश.. आणि सूनही खुश.., असं अजित पवार म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं काम चांगलं असून पुलवामा असेल किंवा देशाच्या सीमेची सुरक्षितता अत्यंत व्यवस्थित ठेवण्याचं काम त्यांनी केलं, असं म्हणत अजित पवार यांनी मोदींचं कौतूक केलं आहे. 

आताच्या खासदार यांनी आपल्या पुस्तकात सर्व कामे मीच केले असे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, बारामती नमो रोजगार मेळावा घेतला यामध्ये दहा हजार युवकांना नोकऱ्या मिळाल्या, असं म्हणत अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली. तर बारामतीत फॉर्म भरल्यानंतर फक्त शेवटची सभा व्हायची आता किती फिरावे लागत आहे, असं म्हणत अजित पवारांनी शरद पवारांना टोला लगावला. बारामतीतील अनेक जण म्हणतात आता या काळात त्यांना कसं सोडायचं? काय करायचं अरे पण विकास करायचा असेल तर असे म्हणून चालणार नाही, असं अजित पवार म्हणाले आहेत.

बारामती गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत. त्यांचा ताबडतोब बंदोबस्त करा. मी पुन्हा पुन्हा सांगतोय अजिबात भावनिक होऊ नका. गावातील लोकांनी गावाचंच पहावं बाहेरच्या गावात जाऊ नये, असंही अजित पवार म्हणाले. अजून देखील मी तोंड उघडले नाही मी तोंड उघडले तर यांना फिरता येणार नाही. फार वळवळ करताय काय? आम्ही कुणाला दमच दिला नाही पाणी देणार नाही हे नाही असे मी म्हणालोच नाही. मी कधी कुणाला दम दिला नाही फार तर आठवण करून दिली असेल. मला अनेक जण म्हणतात पक्ष चोरला.  पक्षाची जबाबदारी घेतली म्हणून काय पक्ष चोरला असा अर्थ होत नाही, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.

आज 80 टक्के आमदार माझ्याबरोबर आहेत त्यांना मी पैसे दिले म्हणून ते माझ्या बरोबर आहेत का? आम्ही भूमिका घेतली म्हणून ती पटली म्हणून तर ते बरोबर आहेत ना? पार्लमेंट मध्ये फक्त भाषणे देऊन बारामतीचे प्रश्न सुटत नाहीत. मी भाषणे करतो आणि कामं करतो. विकासाला निधी आणतो, असंही अजितदादा म्हणाले. आपण आपली विचारधारा सोडलेली नाही आपण भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत कुठला मायकालाल सविधान बदलू शकत नाही, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.





Source link

'धमक्या देणाऱ्यांना सरळ करा', म्हणणाऱ्या शरद पवारांना अजित पवारांचं उत्तर, म्हणाले 'जर मी धमकी दिली असेल…'

'धमक्या देणाऱ्यांना सरळ करा', म्हणणाऱ्या शरद पवारांना अजित पवारांचं उत्तर, म्हणाले 'जर मी धमकी दिली असेल…'


LokSabha Election: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांकडून (Ajit Pawar) मतदारांना धमक्या दिल्या जात असल्याचा शरद पवारांनी (Sharad Pawar) केला आहे. शरद पवारांनी बारामतीमधील सुपे येथील सभेत धमकीचा मजकूर लिहिलेली चिठ्ठी वाचून दाखवली. यावेली त्यांनी कार्यकर्त्यांना धीर देताना, ‘अशा धमक्यांना घाबरु नका, आता त्यांना सरळ करण्याची वेळ आली आहे’ असं म्हटलं. दरम्यान या आरोपांवर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया

अजित पवारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना धमकीच्या आरोपावर उत्तर दिलं. ते म्हणाले की, “तुम्ही लोक मला किती वर्षं ओळखता. जर कोणी अशा धमकावण्याचे प्रकार केले असते तर मला जनतेचा इतका मोठा पाठिंबा मिळाला नसता. संस्था संस्थेच्या पद्धतीने चालवायची असते आणि राजकारण राजकारणाच्या पद्दतीने करायचं असतं. जर मी कोणाला धमकावलं असेल तर त्याच्याविरोधात पोलीस तक्रार करा. त्यानंतर पोलिसांनी चौकशी करुन पुढील कारवाई करावी”.

शरद पवारांनी काय म्हटलं?

शरद पवार बारामतीच्या जिरायत भागाचा दौरा करण्यासाठी पोहोचले होते. सुपे येथील सभेत त्यांनी धमकीची चिठ्ठी वाचून दाखवली ज्यामध्ये लिहिलं होतं की, “घड्याळाला मतदान केलं नाही, तर पाणी मिळणार नाही. कारखान्याला ऊस जाणार नाही”. मी गेली 20 वर्षं स्थानिक विषयात लक्ष घालत नव्हतो, पण आता लक्ष घालून जबाबदारी पार पाडेन असं आश्वासनही शरद पवारांनी दिलं आहे. 

“अनेकजण माझं 84-85 वय झाल्याचा उल्लेख करत आहेत. तुम्ही माझं वय काढू नका, तुम्ही अजून काय पाहिलं आहे? हा गडी थांबणारा नाही. ज्यांनी साथ दिली त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत जनहिताची कामं करणार,” असा निर्धारच शरद पवारांनी व्यक्त केला आहे.

‘लेकीला निवडून दिलं आता सूनेला निवडून द्या’

अजित पवार यांनी बारामतीमधील सभेत लेकीला निवडून दिलं आता सूनेला निवडून द्या असं आवाहन केलं. “अनेकांसमोर बाकी प्रसंग उभा राहिला आहे. तुम्ही पहिल्यापासून पवारांच्या पाठीमागे उभे राहिला आहात. ज्या ठिकाणी पवारांचं नाव असेल त्याच्या समोरचं बटण दाबायचं आहे. 1991 ला मला निवडून दिलं. त्यानंतर वडिलांना म्हणजे साहेबांना निवडून दिलं. आता लेकीला (सुप्रिया सुळे) निवडून दिलं. आता सुनेला निवडून द्या म्हणजे मुलगा वडील लेक आणि सूनही खुश,” असं मिश्कीलपणे अजित पवार म्हणाले आहेत. 





Source link

40 वर्ष भाजप सोबत असलेले एकनाथ खडसे राष्ट्रवादीमध्ये गेले; आता 40 महिन्यांमध्येच पुन्हा स्वगृही का परतणार?

40 वर्ष भाजप सोबत असलेले एकनाथ खडसे राष्ट्रवादीमध्ये गेले; आता 40 महिन्यांमध्येच पुन्हा स्वगृही का परतणार?


Eknath Khadse Rejoin BJP :  एकनाथ खडसे.. एकेकाळचं भाजपमधलं मोठं नाव… भाजपला गावपातळीवर, तळागाळापर्यंत पोहोचला, त्यात खडसेंचा मोठा वाटा असल्याचं बोललं जातं…  राज्यातल्या नेतृत्त्वासोबत खटके उडाले.. तेव्हा खडसेंनी भाजपला सोडून शरद पवारांची साथ धरली.. मात्र फक्त 40 महिन्यांमध्येच खडसेंची भाजपमध्ये घरवापसी होणार आहे… भाजपला आणि खडसेंचाही या घरवापसीत काय फायदा होणार आहे. 

भाजपमधले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पुन्हा स्वगृही परतणार आहेत. खडसेंसाठी भाजपने पुन्हा दरवाजे उघडले आहेत. तब्बल 40 वर्ष खडसे भाजपात होते.. मात्र राज्यातल्या नेतृत्त्वासोबत खडसेंचे खटके उडाले. पक्षातून साईडलाईन करत असल्याच्या घटना, खडसेंवर झालेले आरोप यामुळे कंटाळून खडसेंनी भाजप सोडत 23 ऑक्टोबर 2020 रोजी राष्ट्रवादीची वाट धरली. त्यानंतर राज्यातल्या भाजप नेतृत्त्वावर टीका करण्याची एकही संधी खडसेंनी सोडली नाही..

 खडसेंची घरवापसी होत असली तरी काही नेते मात्र त्यांच्यावर खुष नाहीत.. तर भाजप अधिकृतरित्या जेव्हा खडसेंच्या पक्षप्रवेशाबाबत कळवेल तेव्हा आम्ही त्यांचं स्वागत करु अशी भूमिका फडणवीसांनी घेतलीय.

खडसेंची घरवापसी आताच का?

खडसेंनी 40 वर्ष भाजपमध्ये काम केलं.. तिथून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले खडसे 40 महिन्यांमध्येच पुन्हा स्वगृही परतत आहेत.. राज्यातल्या काही नेत्यांवरच आरोप करत खडसेंनी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. मात्र खडसेंनी कधीही मोदी, शाहा किंवा केंद्रातल्या भाजप नेत्यांवर टीका केली नव्हती.

पक्षातल्या जेष्ठ आणि जुन्या जाणत्या नेत्यांना पुन्हा चुचकारण्याचे प्रयत्न भाजपकडून करण्यात येतायत. पंकजा मुंडेंना बीडमधून लोकसभेचं तिकीट देण्यात आलंय. तसंच खडसेंनाही पुन्हा भाजपात घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत.. तसंच जळगाव लोकसभेसाठीही भाजपला खडसेंची गरज आहे…

जळगाव हा उत्तर महाराष्ट्रातला महत्त्वाचा असा मतदारसंघ राहिलाय.. जळगाव आणि रावेरमध्ये शिवसेना-भाजप युतीचंच प्राबल्य राहिलंय. जळगाव जिल्ह्याच्या या दोन्ही जागा खडसेंच्या मदतीशिवाय जिंकणं भाजपला थोडं जिकीरीचं होतं.. कारण खडसेंच्या पाठीशी लेवा मराठा समाज आहे.. जळगावमध्ये लेवा मराठा समाजाचं मतदान निर्णायक मानलं जातं.. त्यामुळे खडसेंच्या पाठीशी असलेल्या या व्होटबँकेचा फायदा भाजपकडून घेतला जाऊ शकतो.. जळगाव, रावेर, धुळे, नंदूरबार यासह राज्यातील काही मतदारसंघात खडसेंचा थोडाफार प्रभाव आहे.. त्यासोबतच सुनेला म्हणजेच रक्षा खडसेंना रावेर लोकसभा मतदारसंघात विजयी करण्यासाठी भाजपने पुन्हा खडसेंसाठी दरवाजे उघडले आहेत अशी चर्चा आहे… तेव्हा भाजपमध्ये प्रवेश करत जळगावच्या राजकारणावरची आपली पकड नाथाभाऊ कायम ठेवणार का याचा निर्णय काहीच दिवसांत होणार आहे..

 





Source link

चक्क सरन्यायाधीशांचे बनावट आधारकार्ड बनवले, सामाजिक कार्यकर्त्याने समोर आणला मोठा घोटाळा

चक्क सरन्यायाधीशांचे बनावट आधारकार्ड बनवले, सामाजिक कार्यकर्त्याने समोर आणला मोठा घोटाळा


Aadhar Card Misuse:  लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी महत्त्वाचा पुरावा असलेले आधारकार्ड पैसे देऊन बनावट बनवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही गोष्ट प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्याने चक्का देशाचे सरन्यायाीश धनंजय चंद्रचूड यांच्या नावानेच स्वतःचे आधारकार्ड बनवून घेतलं आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नाव आणी पत्ता दुसऱ्याचा मात्र फोटो स्वतःचा अशाप्रकारे सेतूचालक बनावट आधारकार्ड बनवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते सुनिल मुथ्था यांनी स्वतःचा फोटो असलेले मात्र सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे नाव आणि पत्ता असलेले एक आधारकार्ड बनवून घेतले आहे. केवळ प्रशासनाच्या हि गोष्ट लक्षात यावी यासाठी त्यांनी हे आधारकार्ड बनवले आहे. लोकसभेला आधारकार्ड दाखवल्यानंतर मतदान करता येणार आहे त्यामुळे कुणाच्याही नावे अशाप्रकारे कार्ड बनवून मतदान केलं जावू शकतं. त्यामुळं आधारकार्डचा गैरवापर टाळण्यासाठी प्रशासनाने या गोष्टीकडे गंभीरपणे बघावं आणि निवडणूक आयोगाने मतदानकेंद्रात आधारकार्ड खरे कि खोटे हे तपासण्याची यंत्रणा निर्माण करावी अशी मागणी सुनील मुथ्था यांनी केली आहे.

आधारकार्ड हा ओळखपत्राचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो. त्यामुळं आधारकार्डचा गैरवापर करण्यात येतो. अशाप्रकारे बोगस आधारकार्ड दाखवून मतदान करणारे असतील तर निवडणुकीत कितीतरी बोगस मतदान होईल. त्यामुळं पारदर्शी निवडणुका या संकल्पनेलाच धक्का बसेल. हा गैरप्रकार उघडकीस आणण्यासाठी मी एका एजंटतर्फे स्वतःच्याच नावाने एक बोगस आधारकार्ड तयार केले. जेणेकरुन हे प्रशासनाच्या समोर येईल, असं सुनील मुथ्था यांनी म्हटलं आहे. 

मी एका एंजटला हाताशी घेऊन सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या नावाचं कार्ड बनवले. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ते मला बनवून मिळाले. याचाच अर्थ ते कोणाच्याही नावाने आधार कार्ड बनवून देऊ शकतात आणि याच्या आधारे मतदान होऊ शकते. आता हेच कार्ड मी दाखवले तर मतदान केंद्रावर गेल्यावर याची पडताळणी करण्यासाठी काहीच साधने उपलब्ध नाहीयेत.याचाच अर्थ मी मतदान करुन निघून जाऊ शकतो. म्हणजेच निवडणुकीत बोगस मतदान होऊ शकते आणि काही विशिष्ट्य वर्गाची लोक याचा फायदा घेऊ शकतात. त्यामुळं मतदानाचा टक्कादेखील वाढणार आहे, अशी भिती सुनील मुथ्था यांनी व्यक्त केली आहे.

जे सेतू केंद्रवाले असे आधार कार्ड बनवून देत आहेत. त्यांच्यावर नियंत्रणच नाहीये. कारण ते खासगी कंपन्यांकडे देण्यात आलेले आहे. हा सगळा भोंगळ कारभार चालला आहे. हे सगळे प्रकार होऊ नये, पारदर्शी निवडणुका होणार नाहीत. काही लोक याचा गैरफायदा घेण्याची शक्यता आहे. म्हणून मी ठरवले की हा प्रकार उघडकीस आणायचा. अशा प्रकारे जे आधार कार्ड बनवत आहेत. तसंच, बोगस आधारकार्डच्या सहाय्याने कोणी मतदान करत असेल तर मतदानकेंद्रावरती आधार कार्डच्या पडताळणीची यंत्रणा असावी, अशी मागणी सामाजित कार्यकर्ते सुनील मुथ्था यांनी केली आहे. 





Source link

Ramtek LokSabha : रामटेकचा झांगडगुत्ता… काँग्रेस पुन्हा बालेकिल्ला मिळणार? पाहा राजकीय समीकरण

Ramtek LokSabha : रामटेकचा झांगडगुत्ता… काँग्रेस पुन्हा बालेकिल्ला मिळणार? पाहा राजकीय समीकरण


Ramtek LokSabha Constituency :  रामटेक… प्रभू श्रीरामच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेली भूमी… इथल्या उंच डोंगरावर प्रभू श्रीरामांचं 600 वर्षं प्राचीन मंदिर आहे. कवीकुलगुरू कालिदास यांनी मेघदूत हे संस्कृत अभिजात काव्य इथंच लिहिल्याचं सांगितलं जातं. लीळाचरित्राची रचना करणाऱ्या चक्रधरस्वामींचं मंदिरही याच परिसरात आहे. तोतलाडोह धरण, नगरधनचा किल्ला ही रामटेकची वैशिष्ट्यं. इथं मनसर परिसरात बौद्ध संस्कृतीचे अवशेषही आहेत. उपराजधानी नागपूरपासून अवघ्या 50 किमी अंतरावर असलेला हा प्रदेश, मात्र समस्या रामटेकला घट्ट विळखा मारून बसल्यात.

रामटेक ‘रामभरोसे’ 

वनसंपदेनं नटलेलं रामटेक… मात्र इथं पर्यटनाच्या दृष्टीनं काहीच चालना नाही. संत्रा उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. तरुणांना रोजगाराच्या संधी नाहीत, त्यामुळे अनेक तरुणांना पुणे किंवा मुंबईकडे रवाना व्हावं लागतं. पर्यटनाच्या उपाय योजनांबाबत आश्वानस दिली गेली. मात्र, रामटेक रामभरोसेच राहिलं.

रामटेकचं राजकीय गणित

एकेकाळी रामटेक हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव १९८४ आणि १९८९ मध्ये दोनवेळा रामटेकमधून खासदार म्हणून विजयी झाले. मात्र रामटेक हा शिवसेनेचा गड बनलाय. 2009 मध्ये काँग्रेसच्या मुकुल वासनिकांनी शिवसेनेच्या कृपाल तुमानेंचा 16 हजार मतांनी पराभव केला. 2014 मध्ये शिवसेनेच्या कृपाल तुमानेंनी या पराभवाचा वचपा काढताना वासनिकांना पावणे दोन लाख मतांनी हरवलं. 2019 मध्ये तुमाने यांनी दुसऱ्यांदा खासदार बनताना काँग्रेसच्या किशोर गजभियेंचा सव्वा लाख मतांनी पाडाव केला. विधानसभेचा विचार केला तर इथं भाजपचे 2, काँग्रेसचे 2, राष्ट्रवादीचा 1 आणि शिवसेना समर्थक 1 अपक्ष आमदार आहे.

शिवसेनेतल्या फुटीनंतर रामटेकचे विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांनी शिंदे गटात प्रवेश केला. मात्र त्यांच्या विरोधात नाराजी असल्यानं त्यांचं तिकीट कापण्यात आलं. त्यांच्याऐवजी ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून उमरेडचे आमदार राजू पारवेंना आयात करण्यात आलं. त्यांच्या हाती शिवसेनेचा धनुष्यबाण देऊन निवडणुकीच्या रणांगणात उतरवण्यात आलं. काँग्रेसमधून आपल्या मुलाला तिकीट मिळावं, यासाठी नितीन राऊतांनी फिल्डिंग लावली. मात्र, हायकमांडनं सुनील केदार यांच्या मर्जीतल्या रश्मी बर्वेंना उमेदवारी दिली. त्यांचं दुर्दैव असं की, जात पडताळणी समितीनं त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द केलं. परिणामी त्यांचा उमेदवारी अर्जच बाद करण्यात आला. त्यांच्या जागी आता पती श्यामकुमार बर्वे काँग्रेसकडून लढत आहेत.

गेल्यावेळी काँग्रेसमधून निवडणूक लढवणाऱ्या किशोर गजभियेंनी उमेदवारी न मिळाल्यानं बंडखोरी केली. वंचित बहुजन आघाडीनंही त्यांना पाठिंबा दिल्यानं अपक्ष किशोर गजभियेंचं बळ वाढलंय आणि काँग्रेसची डोकेदुखी वाढली. रामटेकमध्ये काँग्रेसवाल्यांमध्येच तिरंगी लढत रंगणार आहे. काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे विरुद्ध काँग्रेसमधून आयात केलेले शिवसेनेचे राजू पारवे विरुद्ध वंचितच्या पाठिंब्यावर नशीब आजमावणारे काँग्रेस बंडखोर किशोर गजभिये असा हा सामना आहे. ओबीसी आणि दलित मतदार नेमकं कुणाच्या पारड्यात वजन टाकणार, यावर हार-जीतचं गणित अवलंबून असणार आहे.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp