by Hansraj Agrawal | Jun 30, 2024 | Trending News
आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : कागदपत्रे व प्रक्रिया सुरळीत झाल्यास चंद्रपूरच्या 75 वर्षीय गौरीचंद्र मलिक यांना CAA कायद्यांतर्गत विदर्भातील पहिले भारतीय नागरिकत्व प्रमाणपत्र मिळणार आहे. बंगाली भाषा शिक्षक असलेल्या मलिक यांचे 50 वर्षांपासून भारतात वास्तव्य करत आहेत. निर्वासित म्हणून आलेल्या मलिक यांनी 35 वर्षे सरकारी नोकरी केली आहे. मात्र, मूळ बांगलादेशमधील गावी भेट देण्यासाठी पासपोर्ट अर्ज केल्यावर प्रशासकीय यंत्रणेने जन्म पूर्व पाकिस्तानचा असल्याचे दाखवून त्यांचा पासपोर्ट रोखला होता. आता नव्या CAA कायद्यानुसार पुन्हा अर्ज केल्यावर त्यांच्या आशा झाल्यात पल्लवित झाल्या आहेत.
गोंदिया जिल्ह्यात शिक्षकी पेशात हयात गेलेल्या आणि सध्या चंद्रपुरात वास्तव्यास असलेल्या 75 वर्षीय गौरीचंद्र मलिक यांना ते भारतीय नागरिक नसल्याची माहिती 2019 साली झाली. बांगलादेशात आपल्या मूळ गावी भेटीसाठी निघालेल्या मलिक यांना पासपोर्ट देण्यास नकार देण्यात आला. त्यांचा संघर्ष आता नव्या CAA कायद्यानुसार सुखद वळणावर येऊन पोचलाय.
75 वर्षीय गौरीचंद्र मलिक. पूर्व पाकिस्तानात 1949 साली मलिक यांचा जन्म झाला. वयाच्या 21व्या वर्षी तिथल्या धार्मिक दंगलीमुळे त्यांना कोलकाता मार्गे भारतात यावे लागले. निर्वासित धोरणानुसार प्रथम ते चंद्रपूर व नंतर गडचिरोली जिल्ह्यातील बंगाली निर्वासित छावणीत राहिले. बंगाली निर्वासितांच्या छावणीतील बंगाली माध्यमाच्या शाळेत त्यांनी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात काही काळ नोकरी केली. नंतर जिल्हा निवड मंडळाच्या माध्यमातून त्यांना गोंदिया येथील बंगाली माध्यमाच्या शाळेत पूर्णवेळ शिक्षक म्हणून नियुक्ती मिळाली. गोंदिया जिल्हा परिषदेअंतर्गत बाघोली या गावातील बंगाली माध्यमाच्या शाळेतुन ते सेवानिवृत्त देखील झाले. या काळात त्यांना केंद्र सरकारने मालकी हक्काची जमीन देखील दिली आहे.
सेवानिवृत्तीनंतर बांगलादेश मधील आपल्या मूळ गावी खुलना जिल्ह्यातील बयारबंगा येथे भेट देण्याचे त्यांच्या मनात आले. येथूनच खऱ्या संघर्षाची सुरुवात झाली. जन्म पूर्व पाकिस्तानचा असल्याने पासपोर्ट यंत्रणेने त्यांना आधी भारतीय नागरिकत्व घ्या, अशी अट घातली. आणि मलिक यांना धक्काच बसला. 30 वर्षे सरकारी नोकरी. हाती आधार कार्ड. पॅन कार्ड. पेन्शन मिळत असताना व गेली कित्येक वर्ष निवडणूक ओळखपत्रे बाळगणाऱ्या मलिक यांच्यासाठी मोठ्या संकटाची सुरुवात झाली.
2019 साली नव्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या अंमलबजावणी आधी मलिक यांनी केलेला अर्ज फेटाळला गेला होता. मात्र यंदाच्या मार्च महिन्यात नव्या नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थात सीएए चे नियम सूचीबद्ध करण्यात आले. त्यामुळे मलिक यांच्या आशा पल्लवीत झाल्या. त्यांनी ऑनलाइन पद्धतीने नागरिकत्व मिळवण्यासाठी यंत्रणेकडे अर्ज केलाय. त्यांच्याकडे बांगलादेशातील खुलना येथील मूळ कागदपत्रे असल्याने जन्मसंबंधी दाखले मिळवण्यात कुठलीही अडचण गेली नाही.
मात्र, पाच दशकानंतर नागरिकत्व मागण्यात आल्याने गुप्तचर यंत्रणांनी मात्र केले कित्येक महिने त्यांचा विविध मार्गांनी तपास चालविला आहे. नव्या सीएए कायद्यानुसार सर्व सुरळीत होत आपल्याला भारतीय नागरिकत्व मिळेल व आपण भारतीय नागरिक म्हणून बांगलादेशात आपल्या मूळ गावी भेट देऊ शकू अशी मलिक यांना आशा आहे. एकदा असे नागरिकत्व मिळाल्यानंतर ते त्यांची पत्नी भारती हिच्यासाठी देखील असाच अर्ज करणार आहेत.
सर्व कागदपत्रे व प्रक्रिया सुरळीत झाल्यास गौरीचंद्र मलिक यांना CAA कायद्यांतर्गत विदर्भातील पहिले भारतीय नागरिकत्व प्रमाणपत्र मिळणार आहे. विदर्भातील 100 सिंधी बांधवांनी अशीच प्रक्रिया वापरून नागरिकत्व मिळावे असा अर्ज केला आहे. मात्र बांगलादेशमधून प्रक्रिया पूर्ण करणारे गौरीचंद्र मलिक पहिले ठरणार आहेत.
Source link
by Hansraj Agrawal | Jun 30, 2024 | Trending News
पुढील
बातमी
Maharastra Politics : अजितदादांना ‘जोर का झटका’, के पी पाटलांनी घेतली मोठ्या पवारांची भेट
Source link
by Hansraj Agrawal | Jun 29, 2024 | Trending News
K P Patil Meet Sharad Pawar : कोल्हापुरात अजित पवार गटाला धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण माजी आमदार के पी पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर के.पी पाटील तुतारी हाती घेणार का याची चर्चा सुरू झालीय.
Source link
by Hansraj Agrawal | Jun 29, 2024 | Trending News
Malshej Ghat Skywalk: राज्याचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. शुक्रवारी विधानभवनात राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. यावेळी राज्यासाठी अनेक घोषणा करण्यात आल्या. त्याचबरोबर पायाभूत सुविधांसाठीही काही निधी तसंच, प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. पर्यटनाच्या दृष्टीनेही अर्थसंकल्पात काही तरतूदी करण्यात आल्या आहेत. ठाणे जिल्ह्यात असलेल्या माळशेज घाटाबाबतही घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
ठाणे जिल्ह्यातील माळशेज घाटात पावसाळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी होते. याच माळशेज घाटात आता पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी काचेची व्हि्विग गॅलरी अर्थात काचेचा स्काय वॉक प्रकल्प उभारण्यात येणार आहे. शुक्रवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पात या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. माळशेज घाटात हा काचेचा स्काय वॉक उभारण्यासाठी आता चालना मिळणार असून, त्यामुळे मुरबाड तालुका पर्यटकांसाठी पर्वणी ठरणार आहे. भारतातील हा पहिलाच प्रकल्प ठरणार आहे.
माळशेज घाटात चीन देशातील काचेच्या व्हि्विंग गॅलरी प्रमाणेच भव्य गॅलरी उभारण्याचा प्रस्ताव आमदार किसन कथोरे यांनी सादर केला होता. राज्यात पर्यटकांच्या वाढीसाठी तसेच पर्यटनाला चालना देण्यासाठी माळशेज घाटात काचेचा वि्हिंग गॅलरी चा प्रकल्प फायदेशीर ठरणार आहे. भारतातील हा पहिला प्रकल्प असेल. त्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक माळशेज घाटाकडे आकर्षित होतील. त्याचबरोबर, स्थानिकांना रोजगाराच्या संधी प्राप्त होणार आहेत
कसा असेल माळशेज घाटातील स्काय वॉक?
माळशेज घाटात देशातील पहिला पारदर्शक पूल म्हणजेच व्ह्यूविंग गॅलरी बांधण्यात येणार आहे. माळशेज घाटातील 700 मीटर खोल दरीवर हा प्रकल्प बांधण्यात येणार आहे. 18 मीटर लांबीचा यू-शेप वॉक वे बांधण्याची प्रशासनाची योजना आहे. इतकंच नव्हे तर ही व्ह्यूविंग गॅलरी पारदर्शी म्हणजेच काचेची असल्याने पर्यटकांना खोल दरीचा नजारा अनुभवता येणार आहे. तसंच, पर्यटकांना आकर्षित करणारं निसर्गसौंदर्याचा आनंददेखील घेता येणार आहे. माळशेज घाटात ही व्ह्यूविंग गॅलरी तयार झाल्यावर पर्यटकांचा या घाटाकडे पर्यटकांचा ओघ आणखी वाढेल, अशी अपेक्षा आहे.
माळशेज घाटाचे वैशिष्ट्ये काय?
माळशेज घाट हे ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. उंच डोंगर, टेकडी तसेच विविध धबधब्यांनी नटलेला असा हा परिसर पर्यटकांसाठी पर्वणी ठरतो. विशेष म्हणजे पश्चिम घाट म्हणून जागतिक वारसा यादीत हा परिसर आहे. येथे दुर्मिळ पशू-पक्षी आढळून येतात. इथली खासियत म्हणजे ‘रोहित पक्षी’ इंग्रजीत फ्लेमिंगो म्हणून ओळखले जाणारे हे दरवर्षी या जलाशयात येतात.
Source link
by Hansraj Agrawal | Jun 28, 2024 | Trending News
Pankaja Munde : पराभव होऊनही पंकजा मुंडेंना लॉटरी लागणार आहे. पंकजा मुंडे खासदार नाही तर आमदार होणार आहेत. इतकच नही तर त्यांना मंत्रीपदीही मिळणार आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडेंची लवकरच विधानपरिषदेवर वर्णी लागणार आहे. पंकजा मुंडे यांचा मंत्रिमंडळातही समावेश केला जाणार असल्याची चर्चा आहे. काय आहे यामागील राजकीय गणित, पाहूयात हा रिपोर्ट.
विधानसभेपाठोपाठ लोकसभा निवडणुकीतही पंकजा मुंडेंना दारूण पराभव पत्करावा लागला. मात्र, आता पंकजा मुंडे समर्थकांसाठी भाजपच्या गोटातून आनंदाची बातमी लवकरच येणार आहे. पंकजा मुंडेंना विधानपरिषदेवर पाठवून त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्याचा प्लॅन भाजपनं आखल्याची चर्चा आहे. आगामी विधानसभा निवडणुकीआधी ओबीसी मतांची बेगमी करण्यासाठी पंकजा मुंडेंचा मंत्रिमंडळातही समावेश केला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजतेय.
पंकजा मुंडेंचं पुनर्वसन होणार?
देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये पंकजा मुंडे महिला आणि बालविकास मंत्री होत्या. परळी विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडेंनी त्यांना हरवलं. तर, बीड लोकसभा मतदारसंघात बजरंग सोनावणेंनी त्यांचा दारूण पराभव केला. ओबीसी-मराठा वादाचा फटका त्यांना बसल्याचं मानलं जातंय. पंकजा मुंडेंना मानणारा मोठा ओबीसी वर्ग महाराष्ट्रात आहे. पंकजा मुंडेंना मंत्रीपद दिल्यास ओबीसी मतं पक्षाकडं वळतील, असं भाजपला वाटतं.
पंकजा मुंडेंसह महादेव जानकर यांचीही उमेदवारी निश्चित
दरम्यान, विधान परिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 13 जुलैला निवडणूक होणाराय. पंकजा मुंडेंसह महादेव जानकर यांचीही उमेदवारी निश्चित मानली जातेय… विधानपरिषदेसाठी एकूण 10 नावं प्रदेश भाजपनं केंद्रीय नेतृत्वाला पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यामध्ये पंकजा मुंडे आणि जानकरांसह अमित गोरखे, परिणय फुके, सुधाकर कोहळे, योगेश टिळेकर, निलय नाईक, हर्षवर्धन पाटील, रावसाहेब दानवे, चित्रा वाघ आणि माधवी नाईक यांचा समावेश असल्याचं समजतंय.. यापैकी 5 जागा भाजप लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.. आगामी विधानसभा निवडणुका नजरेसमोर ठेवून विधानपरिषदेची रणनीती भाजपनं आखलीय…
Source link
by Hansraj Agrawal | Jun 28, 2024 | Trending News
Kolhapur News : सोशल मीडियावर एक मारहाणीचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये जेलमधून सुटलेल्या गुंडांकडून चौघांना अमानुष मारहाण करताना दिसत आहे.
Source link