by Hansraj Agrawal | Jun 4, 2024 | Trending News
Sangli LokSabha Result 2024 : काँग्रेससाठी सांगलीची लढत अस्तित्वाची होती अन् काँग्रेस नेत्यांनी ही निवडणूक लढलीही तशीच… विशाल पाटील (Vishal Patil) यांच्या विजयाची स्टोरी नेमकी कशी होती? वाचा
Source link
by Hansraj Agrawal | Jun 4, 2024 | Trending News
पुढील
बातमी
Maharashtra Lok Sabha Nikal 2024: महाराष्ट्राचे पहिले दोन कल हाती, सुप्रिया सुळे आघाडीवर
Source link
by Hansraj Agrawal | Jun 3, 2024 | Trending News
पुढील
बातमी
‘काही ठिकाणी उमेदवार बदलले असते तर…’, निकालाच्या 1 दिवस आधी असं का म्हणाले गिरीश महाजन?
Source link
by Hansraj Agrawal | Jun 3, 2024 | Trending News
पुढील
बातमी
महाराष्ट्रात महायुतीला फटका बसण्याची शक्यता; झी मीडियाच्या AI एक्झीट पोलचा अंदाज
Source link
by Hansraj Agrawal | Jun 2, 2024 | Trending News
Nationalist Congress Party Ajit Pawar Faction : एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष काहीसा पिछाडीवर पडल्याचे चित्र पहायला मिळत आहे. मात्र, महाराष्ट्राबाहेर म्हणजेच अरुणाचल प्रदेश विधानसभेत राष्ट्रवादीने दणक्यात एन्ट्री केली आहे. अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने तीन जागांवर विजय मिळवला आहे. अरुणाचल प्रदेश विधानसभेतील यशानंतर अजित पवारांचा आत्मविश्वास वाढला आहे. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळावी यासाठी दावा करणार आहेत.
अरुणाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पक्षाचे 3 आमदार विजयी झाले आहेत. अजित पवार पक्षाचे टोको तातूंग, लिखा सोनी आणि निख कमिन या तीन उमेदवारांच्या गळ्यात विजयाची माळ पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) राष्ट्रीय पक्षाच्या मान्यतेसाठी दावा करणार आहेत. लवकरच अजित पवार निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी दावा करणार आहेत. मागच्या वर्षी NCP चा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेला होता. मात्र, आता अरुणाचल प्रदेशमधील विजयानंतर राष्ट्रवादी पक्ष पुन्हा मान्यतेसाठी दावा करणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.
अजित पवार यांच्या बंडखोरीमुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप आला होता. 2 जुलै 2023 रोजी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली. राष्ट्रवादी काँग्रेस आमचीच, पक्ष आणि चिन्ह असं म्हणत अजिच पवार पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा केला होता. यानंतर निवडणुक आयोगाने अजित पवार गटाला राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळ चिन्ह दिले आहे.
वर्षभरापूर्वी रद्द झाली होती राष्ट्रवादीची राष्ट्रीय पक्षाची मान्यता
राजकीय पक्षांना राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळविण्यासाठी अनेक निकष पूर्ण करावे लागतात. या निकषांची पूर्तता न केल्यामुळे निवडणुक आयोगाने राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता रद्द केल्याचे समजते. 10 जानेवारी 2000 रोजी राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला होता. राष्ट्रवादीला 2014 नंतरच्या कामगिरीमुळे तो धोक्यात आला होता. 2019 नंतर 21 पैकी 12 राज्यात राष्ट्रवादीने निवडणुक लढवली होती. या निकालातील राष्ट्रावादीची कमजोरी विचारात घेऊन एप्रिल 2023 मध्ये राष्ट्रावदीची मान्यता रद्द करण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने परिपत्रकाद्वारे जाहीर केले होते.
काय आहेत निवडणुक आयोगाचे निकष
विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत त्या पक्षाला चार किंवा जास्त राज्यांमध्ये वैध मतांपैकी कमीत कमी 6% मते मिळाली पाहिजेत
लोकसभा निवडणुकीत कमीत कमी 4 जागा मिळाल्या पाहिजेत.
लोकसभा निवडणुकीत त्या पक्षाला एकूण जागांपैकी कमीत कमी 2% जागा मिळाल्या पाहिजेत
या जागा कमीत कमी 3 राज्यांमधून निवडून आल्या पाहिजेत
संबधीत पक्षाला कमीत कमी 4 राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळाला पाहिजे. (पश्चिम बंगाल,त्रिपुरा,मणिपूर आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळाल्यामुळे तृणमूल काँग्रेसला नुकताच 7 व्या राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला गेला आहे.)
राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळाल्याचे फायदे
राखीव निवडणूक चिन्ह
सरकारतर्फे पक्षाच्या कार्यालयासाठी subsidized दरांमध्ये जमीन
दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओ वर मोफत प्रक्षेपण
निवडणूक आयोगाकडून निवडणूक याद्यांचं मोफत वितरण
Source link
by Hansraj Agrawal | Jun 1, 2024 | Trending News
Maharashtra Exit Poll Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी लागणार आहे. त्याआधी विविध संस्थाचे एक्झिट पोल समोर आले आहेत. एनडीए की ‘इंडिया’? कोण पंतप्रधान होणार? या प्रश्नांची उत्तरे आपल्याला 4 तारखेला मिळतीलच. दरम्यान महाराष्ट्रातील निकालाकडे देशाचे लक्ष लागले आहे.
देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या जास्त लोकसभा जागा असलेला महाराष्ट्र निर्णायक ठरणार आहे. येथे शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीमध्ये उभी फूट पडली. दोन्हीकडचा एक गट भाजपसोबत जाऊन सत्तेत बसला. दरम्यान असली शिवसेना आणि नकली शिवसेना तसेच असली राष्ट्रवादी आणि नकली राष्ट्रवादी हा मुद्दा रंगला. पण मतदारांनी कोणाच्या बाजुने कौल दिलाय हे महत्वाचे आहे. एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार कोणाचे पारडे जड आहे हे पाहुया.
रिपब्लिक मॅट्रीजच्या सर्व्हेनुसार महाराष्ट्रात ठाकरे गटाला 9 जागा तर शिंदे गटाला 4 जागा मिळतील. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाला 7 तर अजित पवार गटाला 1 जागा मिळेल.
इंडिया टीव्हीच्या सर्व्हेनुसार महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला ठाकरे गटाला 11 जागा तर शिंदे गटाला 6 जागा मिळतील. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाला 5 तर अजित पवार गटाला 1 जागा मिळेल.
एबीच्या सर्व्हेनुसार ठाकरे गटाला 9 जागा तर शिंदे गटाला 6 जागा मिळतील. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाला तर अजित पवार गटाला
टीव्ही 9 पोलस्ट्रेट सर्व्हेनुसार ठाकरे गटाला 14 जागा तर शिंदे गटाला 4 जागा मिळतील. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाला 6 तर अजित पवार गटाला शुन्य जागा मिळेल.
न्यूज 18 च्या सर्व्हेनुसार ठाकरे गटाला 7 जागा तर शिंदे गटाला 7 जागा मिळतील. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाला 4 तर अजित पवार गटाला 2 जागा मिळतील.
एकूण एक्झिट पोल पाहिले असता महाराष्ट्रात शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरद पवार गट आघाडीवर दिसत आहेत. तर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अजित पवार गट पिछाडीवर दिसत आहेत.
Source link