हंडाभर पाण्यासाठी जीवघेणी कसरत, वाशिममध्ये ग्रामस्थांची तहान भागवण्यासाठी दिवस रात्र भटकंती
वाशिम जिल्ह्यात पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी दिवस रात्र भटकंती करावी लागत आहे.
Source link
वाशिम जिल्ह्यात पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी दिवस रात्र भटकंती करावी लागत आहे.
Source link
Chhagan Bhujbal On Jitendra Awhad : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भूजबळ (Chhagan Bhujbal) यांची मागल्या काही दिवसांमधली ही वक्तव्य चर्चेत आहेत. या वक्तव्यांवरून भुजबळांच्या मनात नेमकं काय सुरू आहे याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू आहे. भुजबळांची मागील काही दिवसांमधली बरीचशी विधानं ही महायुतीच्या विरोधातली आहे. विधानसभेसाठी 90 जागांची मागणी, मनुस्मृतीवरून झालेला वादात आव्हाडांची (Jitendra Awhad) केलेली पाठराखण यासारख्या अनेक विषयांवर भुजबळांनी केलेली विधानं महायुतीच्या भूमिकेशी विसंगत आहेत.
भुजबळ काय म्हणाले ?
काय समज द्या, समज द्या, असं लावलंय. मी माझ्या पक्षात बोलणारच. मी जागावाटपाचा मुद्दा माझ्या पक्षाच्या अंतर्गत बैठकीत मांडला होता. मी आता मीडियासमोर बोलणार नाही. मात्र मला जे काही सांगायचं असतं, ते मी पक्षाला सांगेन. आम्ही महायुतीमध्ये येताना भाजप नेते काय बोलले होते, त्याची आठवण फक्त मी त्यांना करुन दिली, असं म्हणत भुजबळांनी आपली भूमिका मांडली होती.
मनुस्मृती प्रकरणावरुन बाबासाहेबांचा फोटो फाडल्यापकरणी आव्हाड यांच्याकडून अनवधानाने चुक झाली. त्याची त्यांनी माफीही मागितली. त्यामुळे त्यावरुन विनाकरण राजकारण करु नये, असं म्हणत आव्हाडांची पाठराखण केली होती.
अमित शहांनी लोकसभेला नाव सुचवूनही उमेदवारी मिळाली नाही आपली अवहेलना झाल्याचं म्हणत भुजबळ यांनी झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीत नाराजी व्यक्त केली. तर उद्धव आणि पवारांबद्दल जनतेमध्ये सहानुभूती असल्याचं म्हणत भूजबळ यांनी महायुतीमध्ये बॉम्ब टाकला होता. तर राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला उत्तर देताना भुजबळ यांनी थेट मुख्यमंत्री शिंदे आणि राज ठाकरे यांनाही टोला लगावला होता. त्यामुळे अनेकांचा भूवया उंचावल्या होत्या. तर होर्डिंग प्रकरणात त्यांनी उद्धव ठाकरेंची बाजू घेतली होती.
दरम्यान, छगन भुजबळांची ही वक्तव्य विचार करायला लावणारी आहेत. भुजबळ जरी आपण नाराज नसल्याचं सांगत असले तरी त्यांच्या मनात काय चाललंय हे सांगायला राजकीत पंडितांची गरज नाहीय. समझने वालों को इशारा काफी है, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
Pune News Today: पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. पुण्याच्या राजगड कोंढवळे गावात जमिनीच्या वादातून 22 वर्षीय तरुणीला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींविरोधात 307 कलमअंतर्गंत गुन्हा दाखल केला आहे. संभाजी खोपडे, तानाजी खोपडे, बाळू भोरकर, उमेश जयस्वाल या चार जणांवर जीवे मारण्याचा प्रयत्न, शिवीगाळ धमकावणे यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोंढवळे गावात जमिनीच्या वादातून 22 वर्षीय तरुणीला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप संबंधीत तरुणीने आणि तिच्या आईने केला होता. ट्रॅक्टर आणि जेसीबी घेऊन दावा न्यायप्रविष्ट असलेल्या जमिनीचा बेकायदेशीर पध्दतीने ताबा घेण्यासाठी आलेल्या 25 ते 30 जणांनी जेसीबीच्या सहाय्याने अंगावर माती टाकून तरुणीला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तिनी आणि तिच्या घरच्यांनी केला आहे.
तरुणीने केलेल्या आरोपानुसार, नागरिक पोलिसांसह जमिनीचा ताबा घेण्यासाठी आले असताना तरुणी आणि त्या नागरिकांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. व्हिडिओत तरुणी कंबरेपर्यंत मातीमध्ये गाडली गेली असल्याचं दिसतंय. तरुणीने घडलेल्या घटनेबाबत वेल्हा पोलीस स्टेशनंमध्ये रीतसर लेखी तक्रार केली आहे. त्यानंतर राजगड पोलिस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला होता. तसंच, या प्रकरणात 10 ते 12 जणांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
2006 मधल्या प्रकरणात तत्कालीन कलेक्टर साहेबांनी एक जागा भूसंपादन केले. मात्र, त्या जागेचा मोबदला या पीडित तरुणीच्या कुटुंबीयांना मिळाला नाहीये. त्यामुळं त्यांनी जागेवरील ताबा सोडण्यास नाकार दिला. तसंच, ज्यांनी ही जागा घेतली आहे त्या जागेच्या मालकाने बळजबरीने ताबा घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी 22 वर्षीय तरुणीच्या गाडल्याचा प्रकार केला. तसंच, तरुणीच्या अंगावर ट्रॅक्टर आणि जेसीबीच्या सहाय्याने माती टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या प्रकरणी पीडित तरुणीच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे, जमिनीचा ताबा घेण्यासाठी मुंबईवरुन गुंड मागवल्याचाही प्रकार समोर आला आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात वापरण्यात आलेल्या ट्रॅक्टर आणि जेसीबीदेखील जप्त करण्यात आले आहेत.
Rohit Pawar On Ambulance Scam : राज्याच्या आरोग्य विभागात साडेसहा हजार कोटींचा अँब्युलन्स घोटाळा झाल्याचा आरोप रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला होता. आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी रुग्णवाहिका पुरवठा करणाऱ्या दोन कंपन्यांना नियमबाह्य पद्धतीने निविदा देऊन गैरव्यवहार केल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला होता. राज्यातील अत्यावश्यक सेवांसाठी दावोसमध्ये एका स्पॅनिश कंपनीबरोबर करार करण्यात आला. पिंपरी-चिंचवड येथील सुमित या कंपनीने त्यांना निविदा करून दिली होती, असा आरोप देखील काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी केला होता. अशातच आता पुन्हा रोहित पवार यांनी याच मुद्द्यावरून (Ambulance Scam) सरकारला धारेवर धरलंय.
काय म्हणाले रोहित पवार?
राज्याच्या आरोग्य विभागातला सर्वात मोठा घोटाळा असलेल्या अँब्युलन्स घोटाळ्यात ज्या कंपनीला टेंडर मिळाले, त्या कंपनीची स्थापनाच मुळी चक्क टेंडर मिळाल्यानंतर झालीय. म्हणजे आधी पेपर पास झाले आणि नंतर परीक्षेचा फॉर्म भरला असा हा सगळा सावळा गोंधळ आहे, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.
मर्जीतल्या लोकांना काम मिळावं म्हणून सर्व कायदे आणि नियम ‘कात्रज’च्या धाब्यावर बसवणं, हे बाजारातून खेकडा विकत घेण्याइतकं सोपं नाही! तरीही पोखरलेल्या व्यवस्थेने ते करून दाखवलं. पण न्यायालयाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतल्याने आज नाही तरी उद्या मात्र या प्रकरणाचा भांडाफोड झाल्याशिवाय राहणार नाही, असं खुलं आव्हान रोहित पवार यांनी दिलं आहे.
राज्याच्या आरोग्य विभागातला सर्वात मोठा घोटाळा असलेल्या अँब्युलन्स घोटाळ्यात ज्या कंपनीला टेंडर मिळाले, त्या कंपनीची स्थापनाच मुळी चक्क टेंडर मिळाल्यानंतर झालीय. म्हणजे आधी पेपर पास झाले आणि नंतर परीक्षेचा फॉर्म भरला असा हा सगळा सावळा गोंधळ आहे. मर्जीतल्या लोकांना काम मिळावं… pic.twitter.com/U8LQTaD1yb
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 30, 2024
दरम्यान, राज्य सरकारमधील अनेकांचा विरोध डावलून आणि प्रशासनावर दबाव आणून विशिष्ट आणि ब्लॅकलिस्टेड ठेकेदारांना डोळ्यांसमोर ठेवून ही टेंडर प्रक्रिया राबविण्यात आल्याचा आरोप होता.
Who’s Blood Was Sent By Taware From Sassoon Hospital: पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील फॉरेन्सीक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर या दोघांना अटक करण्यात आली आहे. या मुलाच्या रक्ताऐवजी नेमकं कोणाचं रक्त घेण्यात आलं होतं याची माहिती समोर आली आहे. तावरेंच्या आदेशानंतर हळनोरने एका महिलेच्या रक्ताचा नमुना घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच या प्रकरणामध्ये स्थापन करण्यात आलेल्या समितीनेही काही शिफारशी केल्या आहेत.
कल्याणी नगरमधील पोर्शे कारच्या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये ससून रुग्णालयातील फॉरेन्सीक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर या दोघांनी फेरफार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने दोन्ही डॉक्टरांना रविवारी रात्री (26 मे 2024 रोजी) उशीरा अटक केली. तसेच सोमवारी पोलिसांनी ससून रुग्णालयातील शवविच्छेदन विभागातील शिपाई अतुल घटकांबळेला अटक केली. या तिघांच्या अटकेनंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नेमका घटनाक्रम सांगितला होता. तावरेच्या सांगण्यावरुन हळनोरने या मुलाच्या रक्ताचे नमुने घेतले खरे पण ते नंतर कचऱ्यात फेकून दिले. मात्र त्याऐवजी नेमके कोणाचे रक्त पाठवण्यात आलं होतं यासंदर्भात खुलासा करण्यात आलेला नव्हता. यासंदर्भातील खुलासा आता झाला असून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वयस्कर व्यक्तींच्या रक्ताचे नमुने हळनोरने घेतले होते. तसेच अन्य एका महिलेच्या रक्ताचे नमुनेही या अल्पवयीन मुलाच्या रक्ताऐवजी घेतले होते. याच महिलेचं रक्त या मुलाच्या रक्ताचे नमुने म्हणून तपासणीसाठी पाठवण्यात आलं होतं.
मेडिको लीगल केस (एमएलसी) प्रकरण हाताळणीसंदर्भात प्रचलित हॉस्पीटल अॅडमिनिस्ट्रेशन मॅन्यूअल अॅण्ड सिव्हीक मेडिकल कोड (Hospital Administration Manual & Civil Medical code) तसेच महाराष्ट्र नागरी सेवा नियम मधील तरतुदींचा एकत्रित विचार करुन समितीने आपला अभिप्राय व शिफारशी कळवल्या आहेत. या शिफारशी काय आहेत पाहूयात…
1) ससून रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्याल परीसरात माध्यम प्रतिनिधी यांच्या वावराबाबत अधिष्ठाता यांनी दक्षता घेतली नाही. (महाराष्ट्र नागरी सेवा हॉस्पीटल अॅडमिनीस्ट्रेशन मॅन्युअल)
2) डॉ. श्रीहरी हळनोर यांनी दिनांक 19 मे 2024 रोजी एमएलसी तपासणी व रक्त नमुने घेताना नियमाचे पालन केलेले दिसत नाही. (चेन ऑफ कस्टडी ऑफ एव्हिडन्स)
3) डॉ. श्रीहरी हरनोल यांनी रक्ताचे नमुन्यांमध्ये बदल करण्याच्या उद्देशाने महिला व दोन वयस्कर व्यक्तींचे रक्ताचे नमुने घेतले.
नक्की वाचा >> Pune Porsche Accident: अपघातानंतर पोलीस स्टेशनला गेलेल्या आमदाराचं अटकेतील डॉक्टरशी कनेक्शन; 6 महिन्यांपूर्वीचं पत्र चर्चेत
4) ऑन ड्युटी आरएमओ व वैद्यकीय अधिक्षक यांनी नियमाप्रमाणे अभिप्रेत असताना एमएलसी कामाची देखरेख केलेली दिसत नाही. (हॉस्पीटल अॅडमिनीस्ट्रेशन मॅन्युअल)
5) प्राध्यापक व न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख असलेल्या डॉ. अजय तावरे यांनी उपभोगलेल्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत तफावत दिसून येते, न्यायवैद्यक विभागाला 25 एप्रिल रोजी पाठवण्यात आलेल्या पत्र क्रमांक 322/2024 नुसार डॉ. अजय तावरे विहित केलेल्या दिर्घ सुट्टीच्या कालावधीत कर्तव्यावर हजर राहणार होते. न्यायवैद्यकशास्र विभागाच्या पत्र क्रमांक 350/2024 मध्ये डॉ. तावरे हे 2 मे 2024 ते 21 मे 2024 दरम्यान दिर्घ सुट्टीवर असतील असं म्हटलं होतं. या दिर्घ सुट्टीच्या दुसऱ्या सत्रात 22 मे पासून ते कार्यरत होतील असं सांगण्यात आलेलं. मात्र 21 मे रोजी तावरे कामावर हजर होते असं बायोमेट्रीकच्या नोंदीवरुन स्पष्ट झालं आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नियमानुसार उन्हाळी दिर्घ सुट्टीचा कालावधी केवळ प्रथम अथवा द्वितीय सत्रात उपभोगता येतो तसेच सदरचा कालावधी आपल्या सोयीनुसार विभागून उपभोगण्याकरीता अधिष्ठातांची पूर्व परवानगी आवश्यक असते.
6) अधिष्ठातांनी या प्रकरणाचे शासकीय व सामाजिक गांभीर्य ओळखून यापुर्वीच वेळेत (26 मे 2024 पूर्वी) चौकशी करुन सदरची माहिती शासनास उपलब्ध केली असती तर ससून रुग्णालय प्रशासनाकडून स्वतःहून पोलीस तपासात अधिकचे सहकार्य झाले असते. तसेच ससून रुग्णालयाची व एकंदरीत शासनाची प्रतिमा राखली गेली असती. (महाराष्ट्र नागरी सेवा नियम)
1) अपघात विभाग वैद्यकीय अधिकारी यांनी एमएलसी तपासणी, रक्ताचे नमुने घेणे, लेबल लावणे, सिलबंद करणे व पोलीसांच्या ताब्यात देणे हे व्यक्तीशः व स्वत: च्या देखरेखील करणे अभिप्रेत आहे.
2) अपघात विभागातील इनडोअर एमएलसी आणि ओपीडी एमसली अशी दोन वेगवेगळे रजीस्टर हे एकत्र ठेवणे अभिप्रेत आहे.
3) अंमली पदार्थ सेवनाची शक्यता असलेल्या एमएलसी प्रकरणात रक्ताच्या नमुन्यासह लघवी तपासणी करणे अभिप्रेत आहे. तरी त्याबाबतीत न्याय सहाय्यक प्रयोगशाळा यांच्याशी सल्लामसलत करुन विहित नमुने घेण्यात यावेत.
4) मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याची डयुटी करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे न्यायवैद्यक प्रकरण हाताळणी विषयी पिरिऑडिक रिफ्रेशर ट्रेनिंग (Periodic Refresher Training) करणे अपेक्षीत आहे. (सिव्हिल मेडिकल कोड हॉस्पीटल अॅडमिनिस्ट्रेशन मॅन्यूअल ) (Civil Medical Code Hospital Administration Manual)
5) अधिष्ठातांनी ससून रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात माध्यम प्रतिनिधींना नियमाप्रमाणे माहिती देण्यासाठी डॉक्टर अथवा कर्मचारी यांची नियुक्ती करुन सुसुत्रता ठेवावी.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात पुण्यात तसेच महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.. महाडमध्ये मनुस्मृती दहन कार्यक्रमादरम्यान आव्हाडांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं छायाचित्र फाडलं.
Source link