शिंदे, अजित पवारांनाच विचारा ते पक्ष फोडून..; फोडाफोडीच्या राजकारणावर केंद्रीय मंत्र्याची रोखठोक भूमिका

शिंदे, अजित पवारांनाच विचारा ते पक्ष फोडून..; फोडाफोडीच्या राजकारणावर केंद्रीय मंत्र्याची रोखठोक भूमिका


Maharashtra Politics Breaking of Shivsena And NCP: देशाचे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्रातील राजकारणासंदर्भात सूचक विधान केलं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भारतीय जनता पार्टीने फूट पाडलेली नसून त्या पक्षांमधील जे नेते पक्ष सोडून आमच्याकडे आले त्यांनाच विचारायला हवं की त्यांनी असं का केलं? यामध्ये भाजपाचा काहीच दोष नाही, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. त्यांना आमच्याबरोबर यायचं होतं तर आम्ही त्यांना परत जायला का सांगावं? असा प्रतिप्रश्नही सिंह यांनी विचारला आहे. 

महाराष्ट्रातील 2 पक्षांमध्ये फूट

महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे 2 गट पडले आहेत. एक गट विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा असून दुसरा गट उद्धव ठाकरेंचा आहे. तसेच मागील वर्षी मे महिन्याच्या सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही दोन गट पडले. अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला असून शरद पवार गट विरोधकांच्या महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष आहे. शिंदे गटाला पाठिंबा जाहीर करत त्यांचे नेते एकनाथ शिंदेंना भाजपाने थेट मुख्यमंत्रीपदी दिलं. राज्यातील भाजपाचे सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं आणि त्यानंतर अजित पवार यांनाही उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं. याच घडामोडींसंदर्भात आणि महाराष्ट्रातील राजकारणाबद्दल ‘न्यूज 18 हिंदी’ला दिलेल्या मुलाखतीत राजनाथ सिंह यांनी स्पष्टपणे आपली मतं मांडली.

राजनाथ म्हणतात, तुम्ही हे त्यांनाच विचारा ज्यांनी पक्ष फोडले

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी पाहता शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या मदतीशिवाय भाजपाला लोकसभा निवडणुकीमध्ये चांगली कामगिरी करता आली नसती का? असा प्रश्न राजनाथ सिंह यांना विचारला. “शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील ज्या नेत्यांनी पक्ष फोडला त्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे की त्यांनी असं का केलं?” असं उत्तर राजनाथ सिंह यांनी दिलं. “कोणी स्वत:चा पक्ष फोडून आमच्याबरोबर येऊ इच्छित असेल तर आम्ही त्याला असं म्हणून शकत नाही की आम्ही तुम्हाला स्वीकारणार नाही,” असंही राजनाथ सिंह म्हणाले. म्हणजेच फोडाफोडीच्या राजकारणासाठी भाजपाला जबाबदार धरण्याऐवजी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीच त्यांचे पक्ष का फोडले आणि ते भाजपाबरोबर का आले हे सांगावं असं राजनाथ सिंह यांना सूचित करायचं आहे.

नक्की पाहा हे फोटो >> 5 कोटींचं घर, 15 प्लॉट, 1.66 कोटींच्या कार्स, एकूण संपत्ती..; शिंदे-BJP वादात अडकलेल्या मतदारसंघातील ठाकरेंच्या उमेदवाराची चर्चा

तपासाला घाबरुन आल्याच्या दाव्यावरुन विरोधकांना टोला

“केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी हे नेते आमच्याकडे आल्याचा दावा विरोधक करत आहेत. आता विरोधकांचं म्हणणं आहे की ते (भाजपाबरोबर आलेले नेते) दोषी आहेत. मात्र हेच फुटून आलेले गट जेव्हा विरोधकांच्या सरकारचा भाग होते तेव्हा ते निर्दोष असल्याचं विरोधकच सांगत होते. त्यावेळेस ते ईडी आणि सीबीआयची कारवाई चुकीची असल्याचं सांगत होते,” असा टोलाही राजनाथ सिंह यांनी लगावला.

खडसे पुन्हा भाजपात?

शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजपा एकत्र आल्यानंतर आता एकनाथ खडसेंना पुन्हा भाजपामध्ये यायचं असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात विचारण्यात आलं असता राजनाथ सिंह यांनी, “त्यांना कोणी आणलं नाही ते स्वत: आले आहेत. असे अनेक नेते आहेत जे असा विचार करत आहेत की 2047 पर्यंत भारत विकसित देश झाला पाहिजे. या मोहिमेचा भाग होण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठीच ते आमच्या पक्षात आले आहेत,” असं उत्तर दिलं. देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातील नाराजीमुळे खडसेंनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली होती. मात्र आता पुन्हा स्वगृही परतण्यासाठी खडसेंचे प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आहे.

नक्की वाचा >> ‘…तर पवार PM बनणार नाहीत’, राऊतांची काँग्रेसला वॉर्निंग; ‘त्या’ एका जागेवरुन आघाडीत मोठी बिघाडी?

मोदींविरोधात चुकीचे शब्द नको

राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान मोदींविरोधात चुकीचे शब्द वापरण्यावरुनही इशारा दिला आहे. पंतप्रधानांविरुद्ध बोलताना सजग राहायला हवं. पंतप्रधान ही केवळ एक व्यक्ती नसते तर संस्था असते. सुदृढ लोकशाहीमध्ये अशा वागणुकीला कोणतेही स्थान नाही, असं राजनाथ म्हणाले.





Source link

गावाला जायला निघालेल्या कुटुंबाची कल्याण स्थानकात ताटातुट; महिलेचा प्लॅटफॉर्मवरच गोंधळ

गावाला जायला निघालेल्या कुटुंबाची कल्याण स्थानकात ताटातुट; महिलेचा प्लॅटफॉर्मवरच गोंधळ


Kalyan Railway Station: कल्याण रेल्वे स्थानकात एक खळबळ उडवून देणारा प्रकार घडला आहे. डबा शोधण्याच्या नादात एका महिलेची तिच्या कुटुंबीयांसोबत चुकामुक झाली. त्यामुळं कल्याण रेल्वे स्थानकात प्रवासी महिलेचा एकच गोंधळ पाहायला मिळाला. 

कल्याण हे जंक्शन असल्याने लोकलसह लांब पल्ल्याच्या गाड्यादेखील या स्थानकात थांबतात. त्यामुळं दादर, ठाणे या स्थानकाबरोबरच कल्याण स्थानकातही मोठी गर्दी असती. एक्स्प्रेस गाड्यादेखील या स्थानकात थांबतात. कधी कधी गर्दी जास्त असल्याने एक्स्प्रेस पकडण्यात अडथळे यातात. असाच एक प्रकार या महिलेसोबत घडला आहे. 

कल्याण स्थानकात असलेल्या एलटीटी गोरखपूर या एक्सप्रेसमध्ये डबा शोधण्याच्या नादात एका महिलेची तीन वर्षांच्या मुलीची आणि वडिलांची ताटातूट झाली. खूप वेळ शोधल्यानंतरही मुलगी आणि वडिल सापडले नाहीत. महिला रेल्वे स्टेशनवर खूप वेळापासून वडिलांना शोधत फिरत होती. मात्र, खूप शोधूनही दोघे न सापडल्याने घाबरेलल्या महिलेने थेट गाडीची चेनच खेचली. 

महिलेने गाडीची ट्रेन खेचल्यानंतक रेल्वे पोलिसांकडून महिलेला खाली उतरवण्यात आलं. मात्र आपली तीन वर्षांची मुलगी गाडीत राहिली म्हणून महिला आणि तिच्या आईने स्टेशनवर तब्बल अर्धा तास गोंधळ घातला. पोलिसांनी त्या मुलीला आणि तिच्या आजोबाला सामानासकट पुढील स्टेशनवर उतरण्याची व्यवस्था केली. यानंतर पोलिसांनी या महिलांना पोलीस ठाण्यात नेत आपली कारवाई सुरू केली आहे. 

भिवंडीत राहणाऱ्या रूपा सिंह या आपल्या कुटुंबासह गोरखपूरला चालल्या होत्या. त्यासाठी त्या कुटुंबासह कल्याण स्थानकात आल्या होत्या. स्थानकात फलाट क्रमांक चारवर त्यांची गाडी आली. त्यांचे एसी 2चे तिकिट होते. मात्र, हे कुटुंब ज्या ठिकाणी उभे होते तिथे त्यांची बोगी आलीच नाही. त्यामुळं ते बोगीत चढण्यासाठी धावले. रुपा या आपल्या मुलासह आणि आईसह डब्यात चढल्या. मात्र, रुपा यांचे वडिल व तीन वर्षांची मुलगी हे गाडीत चढले की नाही याची त्यांना खात्री नव्हती. 

घाबरेलल्या रुपा यांनी ट्रेनची चेन खेचली. चेन खेचल्यानंतर गाडी थांबली. आरपीएफ कर्मचाऱ्यांनी ट्रेन कोणी खेचली याचा शोध घेतला त्यानेळी रुपा यांना खाली उतरवण्यात आले. त्यावेळी त्यांना जे घडलं ते सांगितलं. गाडी सुरू झाल्यानंतर रुपा यांचे वडिल आणि मुलगीदेखील गाडीत चढल्याचे समोर आले. अखेर महिलेने पोलिसांना त्यांना पुढील स्थानकावर उतरवण्याची विनंती केली. 

 





Source link

अकोल्यात लक्षवेधी लढत! भाजप-काँग्रेस-वंचितमध्ये तिरंगी सामना रंगणार

अकोल्यात लक्षवेधी लढत! भाजप-काँग्रेस-वंचितमध्ये तिरंगी सामना रंगणार


जयेश जगड, झी मीडिया, अकोला : अकोला… मोर्णा नदीच्या काठावर वसलेलं शहर. अकोलसिंह नावाच्या राजाच्या नावावरून अकोला (Akola) हे नाव पडलं. इथलं नरनाळा अभयारण्य हे मेळघाटचं प्रवेशद्वार. नरनाळा, अकोला, अकोट आणि बाळापूर असे किल्ले इथं आहेत. कधीकाळी काँग्रेसचा असलेला हा बालेकिल्ला आता भाजपचा गड बनलाय. जिल्ह्यातल्या अनेक समस्या सोडवल्याचा दावा भाजपनं केलाय. मात्र तरीही इथले प्रश्न सुटलेले नाहीत.

अकोला… समस्यांचा वेढा 
अकोल्यात सिंचनाच्या अनेक योजना रखडल्यात, त्यामुळं शेतकऱ्यांचे हाल सुरूच आहेत. खारपाणपट्ट्यात नव्या योजना सुरू केल्यात, मात्र त्याचा परिणाम अजून दिसत नाहीय. औद्योगिक वसाहतींची स्थिती फारशी समाधानकारक नाही. शैक्षणिक मागासलेपण अद्यापही कायम आहे. अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळं नागरिक त्रस्त आहेत. 

अकोल्याचं राजकीय गणित
अकोला हा कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. आता तो भाजपचा (BJP) गड बनलाय. 2004  पासून लागोपाठ चारवेळा इथून भाजपचे संजय धोत्रे (Sanjay Dhotre) खासदार झाले. 2009 मध्ये धोत्रेंनी भारतीय बहुजन महासंघाच्या प्रकाश आंबेडकरांचा (Prakash Ambedkar) 64 हजार मतांनी पराभव केला. 2014 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या (Congress) हिदायतुल्ला पटेल यांना 2 लाख मतांनी हरवलं. 2019 मध्ये त्यांनी चौथ्यांदा खासदार होताना वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना तब्बल पावणे तीन लाख मतांनी पराभूत केलं. विधानसभेचा विचार केला तर भाजपचे 4, काँग्रेसचा 1 आणि शिवसेना ठाकरे गटाचा 1 आमदार आहे.

यंदा प्रकृतीच्या कारणास्तव संजय धोत्रेंनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. आता त्यांचा मुलगा अनुप धोत्रे यांना भाजपनं उमेदवारी दिलीय. साधी ग्रामपंचायतीची निवडणुकही कधी न लढलेल्या अनुप यांना थेट लोकसभेचं तिकीट दिल्यानं भाजपमध्येच नाराजी उफाळून आलीय. भाजपचे बाळापूरचे माजी आमदार नारायण गव्हाणकर यांनी घराणेशाहीला विरोध करत उमेदवारी अर्ज भरल्यानं भाजपची डोकेदुखी वाढलीय.

गेल्यावेळी दुसऱ्या क्रमांकांची मतं घेणारे प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं पुन्हा एकदा अकोल्याच्या रणमैदानात उतरलेत. काँग्रेस त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा देईल, अशी अपेक्षा होती. मात्र त्यांना मविआत घेण्याचे प्रयत्न फोल ठरले आणि डॉ. अभय पाटील यांच्या रुपानं काँग्रेसनं मराठा उमेदवाराला तिकीट दिलं.

अकोला मतदारसंघात मराठा, दलित आणि कुणबी मतदारांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळं यंदाची बहुरंगी लढत फारच चुरशीची होणाराय. अकोल्यात प्रत्येकवेळी तिरंगी निवडणूक झाली. आणि भाजपनं बाजी मारली. काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकरांचं भांडण आणि लाभ भाजपला, अशीच अकोल्याची मॉरल ऑफ द स्टोरी आहे. यावेळीही तीच कथा असणार की नवी स्क्रिप्ट लिहिली जाणार? याचा फैसला 4 जूनला होईल.





Source link

खडकवासला धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट; पालिका आयुक्यांनी दिले महत्त्वाचे आदेश

खडकवासला धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट; पालिका आयुक्यांनी दिले महत्त्वाचे आदेश


Pune Khadakwasla Dam: उन्हाळा सुरू झाला आहे. तापमानात वाढ झाल्याने उन्हाने काहिली झाली आहे. एकीकडे उकाडा वाढत आहे तर, पुण्यातील खडकवासला धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. पाणीसाठ्यात घट झाल्याने पुणे महापालिकेचे  आयुक्त राजेंद्र भोसले यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत उन्हाळ्यातील पाणीवाटपाचं नियोजन करण्यात आले. तशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. त्याचबरोबर, पिण्याच्या पाण्याचा वापर बांधकामासाठी न करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. (Pune Water News)

कोणत्याही परिस्थितीत मेट्रो प्रकल्पासह बांधकामासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करु नये, अशा स्पष्ट सूचना भोसले यांनी दिल्या आहेत. तसंच, या सूचना पाळल्या नाहीत तर बांधकामे ठप्प होतील, असा इशारादेखील दिला आहे. मात्र मैला शुद्धीकरण केंद्रातील पाणी बांधकामासाठी वापरण्यास बांधकाम व्यावसायिकांचा विरोध आहे. मात्र, असं असलं तरी पिण्याच पाणी बांधकामासाठी वापरता येणार नाही. 34 गावाच्या पाण्याच्या नियोजनाची बैठक घेण्यात आली. 

 पिण्याचे पाणी पिण्याव्यतिरिक्त इतर कारणांसाठी वापरण्यास नेहमीच बंदी घालण्यात आली आहे. तथापि, पिण्याच्या पाण्याचा वापर करू नका, त्याऐवजी बोअरवेल किंवा एसटीपी सारख्या पर्यायांचा वापर करा, असे पुन्हा सर्वांना बजावले आहे. शिवाय, येत्या दोन-तीन दिवसांत आम्ही सर्व नियमांचे उल्लंघन करून पिण्याचे पाणी कोण वापरत आहे हे पाहण्यासाठी सर्वेक्षण करणार आहोत. त्यात कोणी दोषी आढळल्यास पालिकेकडून संबंधितांना नोटिस पाठवण्यात येईल आणि दंड ठोठावला जाईल, असं पालिकेने म्हटलं आहे. 

दरम्यान, राज्यातील सहा विभागांमध्ये आज 36.71 टक्के पाणीसाठा आहे. 14,862 दलघमी पाणी शिल्लक आहे. नाशिक विभागात 37.54 पाणीसाठा उपलब्ध आहे तर पुणे विभागात 720 धरणांचा पाणीसाठी 35.30 टक्के इतका झाला आहे. नागपुर विभागात 48.24 टक्क्यांवर गेला असून अमरावती विभागात 48.62 टक्के पाणी शिल्लक आहे. मराठवाड्यात औरंगाबाद विभागात 920 धरणांमध्ये केवळ 18.90 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. 





Source link

गडचिरोलीत भाजप करणार विजयाची हॅटट्रीक? वडेट्टीवारांच्या होमपीचवर कसं असेल राजकीय गणित?

गडचिरोलीत भाजप करणार विजयाची हॅटट्रीक? वडेट्टीवारांच्या होमपीचवर कसं असेल राजकीय गणित?


Gadchiroli-Chimur Lok sabha 2024: गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघ… निबिड, घनदाट अरण्याचा प्रदेश… गडचिरोलीतील 3, चंद्रपूरमधील 2 आणि गोंदिया जिल्ह्यातील एका विधानसभा मतदारसंघाचा त्यात समावेश आहे. अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेला हा मतदारसंघ… दुर्गम भौगोलिक परिस्थितीमुळं कायम मागास जिल्ह्यांच्या यादीत समावेश असलेला हा भाग… भौगोलिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असेला हा प्रदेश गेल्या अनेक वर्षात गडचिरोली अन् विकास यांचा संबध तुटला आहे. प्रशासन आणि व्यवस्था यांच्यात गुरफटलेला हा भाग कधी विकासाच्या रुळावर आलाच नाही.

गडचिरोली चिमूर… समस्या भरपूर

इथं फोफावलेला नक्षलवाद विकासाच्या वाटेतला सर्वात मोठा अडसर ठरतोय. उद्योगविहीन असा हा भाग, मात्र सुरजागड लोह खनिज खाण, चुंबक खाणी, स्टील आणि स्पॉन्ज आयर्न उद्योग लवकरच सुरू होतील, अशी अपेक्षा आहे. आदिवासीबहुल भाग, वनसंवर्धन कायद्यामुळे सिंचन सोयी नसल्यात जमा आहेत. वाघ, बिबट आणि रानटी हत्तींमुळं मानव आणि वन्यजीव संघर्ष हा दैनंदिन जगण्याचा भाग झालाय. शासकीय मेडिकल कॉलेज अजून कागदावरच असल्यानं आरोग्य सुविधांची बोंब आहे. वडसा हे एकमेव रेल्वे स्टेशन गडचिरोली चिमूरमध्ये आहे.

गडचिरोलीचं राजकीय गणित

मतदारसंघ पुनर्रचनेनंतर 2008 मध्ये हा गडचिरोली चिमूर हा नवा मतदारसंघ अस्तित्वात आला. राजकीयदृष्ट्या दीर्घकाळ काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत आता भाजपचं कमळ इथं चांगलंच फुललंय. 2009 मध्ये काँग्रेसच्या मारोतराव कोवासे यांनी भाजपच्या अशोक नेतेंचा २८ हजार मतांनी पराभव केला होता. मात्र 2014 मध्ये भाजपच्या अशोक नेते काँग्रेसच्या नामदेव उसेंडींना धूळ चारून खासदार झाले. 2019 मध्ये याच निकालाची पुनरावृत्ती झाली. नेतेंनी दुसऱ्यांदा उसेंडींना पाणी पाजलं. विधानसभा मतदारसंघांचा विचार केला तर भाजपचे 3, काँग्रेसचे 2 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचा 1 आमदार आहे.

मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांनी लोकसभेच्या रणांगणात उतरावं, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानं जोर लावला. मात्र भाजपनं विजयाची हॅटट्रिक साधण्यासाठी विद्यमान खासदार अशोक नेतेंना पुन्हा उमेदवारी दिलीय. तर दुसरीकडं काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचं होमपीच असलेल्या मतदारसंघात त्यांनी नामदेव किरसान यांच्यासाठी तिकीट खेचून आणलं. किरसान यांच्या उमेदवारीमुळं नाराज झालेले काँग्रेस नेते नामदेव उसेंडी यांनी भाजपात प्रवेश करून बंडाचा झेंडा फडकवला. गेल्यावेळी वंचितच्या रमेश गजबेंनी इथून लाखभर मतं घेतली होती. यंदा वंचित बहुजन आघाडीनं हितेश मडावी यांना उमेदवारी दिलीय. तरीही थेट लढत भाजपचे नेते आणि काँग्रेसचे किरसान यांच्यातच होणार आहे.





Source link

'भाजपाने शिंदेंचा बळी घेऊ नये', बच्चू कडूंच्या टीकेला आशिष शेलारांनी दिलं उत्तर, 'जरा स्वत:च्या पक्षाकडे…'

'भाजपाने शिंदेंचा बळी घेऊ नये', बच्चू कडूंच्या टीकेला आशिष शेलारांनी दिलं उत्तर, 'जरा स्वत:च्या पक्षाकडे…'


LokSabha Election: भाजपासह महायुतीत सहभागी असणारे बच्चू कडू सध्या भाजपावर प्रचंड नाराज असून जाहीर टीका करत आहेत. भाजपाने एकनाथ शिंदे यांचा बळी देऊ नये असं ते म्हणाले आहेत. दरम्यान त्यांच्या टीकेला आशिष शेलार यांनी उत्तर दिलं असून, आपल्या पक्षाकडे लक्ष द्या असा सल्ला दिला आहे. भाजपाने अमरावतीत बच्चू कडू यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर बच्चू कडू यांच्या नाराजीला सुरुवात झाली होती. त्यांनी जाहीरपणे आपण नवनीत राणा यांना निवडणुकीत पाडणार असल्याचं जाहीर केलं आहे.

बच्चू कडू काय म्हणाले?

“ही निवडणूक नाही तर जनआंदोलन आहे हे सिद्ध करुन दाखवणार आहे. प्रत्येक पक्षातील कार्यकर्ता स्वाभिमानाने समोर येईल. नेते लाचार झाले आहेत, पण कार्यकर्ता लाचार झालेला नाही. आम्ही एका कार्यकर्त्याला दिनेश बुब यांना निवडून आणल्याशिवाय राहणार नाही,” असं बच्चू कडू म्हणाले आहेत. 

“अमरावती लोकसभेच्या मतदारसंघांमध्ये कोणाची लाट नाही. एक नकार मात्र नक्की आहे. नवनीत राणा नको, अशी लोकांची भावना आहे. भाजपच्या शेवटच्या कार्यकर्त्याला जरी विचारलं तरी तुम्ही सांगेल की ज्यांनी आमचं कार्यालय फोडलं, भाजपाच्या कार्यकत्याला रक्तबंबाळ केलं, पालकमंत्र्यांना ‘बालकमंत्री’ म्हटलं. त्यामुळे हे भाजपचे लोकही फक्त त्यांच्यासोबतआहेत. पण आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत आणि आमचा उमेदवार जिंकणार,” असा निर्धार बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे. 

“भाजपाने एकनाथ शिंदेंचा बळी घेऊ नये. त्यांना कशा पद्धतीने मदत केली पाहिजे, ते पाहिलं गेलं पाहिजे. भावना गवळी त्या ठिकाणी पाच वर्षांपासून खासदार आहेत. त्यामुळे कोणाला तिकीट द्यावं तो त्यांचा प्रश्न आहे. मी फक्त अमरावती पुरताच बोलेन,” असंही ते म्हणाले.

आशिष शेलार यांचं उत्तर

आशिष शेलार यांना बच्चू कडू यांच्या एकनाथ शिंदेंबाबतच्या विधानाबद्दल विचारण्यात आलं असता त्यांनी स्वत:च्या पक्षाकडे लक्ष द्यावं असं उत्तर देण्यात आलं. “बच्चू कडू यांनी त्यांच्या पक्षाकडे लक्ष द्यावं. एकनाथ शिंदे यांना आम्ही सर्व मित्रपक्षांनी मजबुतीने मुख्यमंत्री पदावर बसवलं आहे,” असं आशिष शेलार म्हणाले. 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp