by Hansraj Agrawal | Mar 5, 2024 | Trending News
Khupte Tithe Gupte : अजित पवारांवरती बायोपिक निघालाच, तर कुठल्या अभिनेत्यानं अजित पवारांची भूमिका करावी, असा प्रश्न झी चित्र गौरव पुरस्कारामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांना विचारण्यात आला. यावेळी त्यांनी डॉ. निलेश साबळे यांचे नाव घेतले.
Source link
by Hansraj Agrawal | Mar 5, 2024 | Trending News
Mumbai Goa Highway: तब्बल 13 वर्ष रखडलेला मुंबई गोवा महामार्ग लवकरच प्रवाशांसाठी खुला होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या लोकार्पणाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. गणपतीला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ही बातमी दिलासादायक ठरु शकते.
मुंबईहून कोकण आणि गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास जलद आणि आरामदायी व्हावा यासाठी मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू आहे. मात्र, गेल्या कित्येक वर्षांपासून या महामार्गाचे काम रखडलेले आहे. गौरी-गणपतीला आणि होळीला मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणात जातात. मात्र रखडलेल्या महामार्गामुळं प्रवास करणे कठिण होते. तसंच, वाहतुककोंडीचा सामनाही करावा लागतो. मात्र, यंदा हा त्रास वाचण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर 2024 पर्यंत मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर सिंधुदुर्गाकडे जाणारा दुसरा रस्ता आणि पुढे गोव्याकडे जाणाऱ्या ग्रीनफिल्ड कॉरिडॉरचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. यामुळं कोकणातील प्रवाशांना थेट रस्ता उपलब्ध होणार आहे.
कोकणासाठी महत्त्वाचा मार्ग
ग्रीनफिल्ड कोकण एक्स्प्रेस वे नावाने ओळखला जाणारा हा रस्ता मुंबईला रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील सागरी किनाऱ्यांवरील शहरांशी जोडतो. हा महामार्ग मुंबईला कोकणासह गोवा, कर्नाटक, केरळ या राज्यांशी जोडणाऱ्या NH 66 या मार्गाचा भाग असून पनवेलपासून सुरू होणारा हा रस्ता गोव्याच्या पणजीमधून पुढे कन्याकुमारीपर्यंत जातो.
उच्च न्यायालयाने खडसावले
गेल्या कित्येक वर्षापासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावरुन उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. गेले दशकभर या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम रखडले आहे. हा प्रकल्प कधी पूर्ण होणार? याची अंतिम तारीख न्यायालयाने सरकारला विचारली असता राज्य सरकार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 31 डिसेंबर 2024 पर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होईल, असं आश्वासन दिलं आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरण आणि दुरुस्तीच्या इतर कामांसह इतर सर्व गोष्टीची कामं 31 डिसेंबर 2024च्या आत पूर्ण करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
गणपतीच्या आधी पूर्ण होणार का?
यंदा 7 सप्टेंबर 2024 रोजी गणेश चतुर्थी असून 16 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असणार आहे. त्यामुळं यंदा तरी चाकरमान्यांना मुंबई-गोवा महामार्गाने प्रवास करता येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Mar 4, 2024 | Trending News
भांडुप येथील SBI बँकेत विचित्र प्रकार घडला आहे. बँक मॅनेजरने जुगार खेळण्यासाठी ग्राहकांनी बँकेत गहाण ठेवलेल्या 3 कोटींच्या सोन्यावर डल्ला मारला आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Mar 4, 2024 | Trending News
Mumbai BMC to make underground Water Tunnel : मुंबईकरांचा पाणी प्रश्न लवकरच सुटणार आहे. कारण सध्या 4,200 दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) मागणीच्या तुलनेत मुंबईला 3,950 एमएलडी मिळते. या 250 एमएलडीच्या तुटवड्याव्यतिरिक्त, असमान वितरण आणि अधूनमधून होणारा पुरवठा यामुळे शहराच्या पाण्याचा ताण वाढतो. गेल्या काही वर्षांत मुंबईला पावसाळ्यात उशीर झाल्यामुळे 10-15 टक्क्यांपर्यंत पाणीकपातीचा सामना करावा लागला आहे. याचपार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) मुंबईकरांचा पाणी प्रश्न सुडवण्यासाठी मास्टर प्लान केला आहे. नेमका हा मास्टर प्लान काय आहे? ते जाणून घ्या..
मुंबईला पाणीपुरवठा करणारे जलवाहिनी या ब्रिटिशकालीन आहेत. त्यामुळे या जलवाहिन्या जीर्ण झाल्यामुळे मुंबईकरांना वारंवार पाणी गळतीला सामोरे जावे लागते. याच पाण्याची गळती रोखण्यासाठी मुंबईला शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी येवई जलाशय ते मुलुंड दरम्यान 21 किमी लांबीचा जल बोगदा बांधण्याचा निर्णय मुंबई महापालिका घेतला आहे. हा जलबोगदा भूमिगत असणार आहे.
हा जलबोगदा दोन टप्प्यात बांधला जाणार आहे. या प्रकल्पासाठी 4,500 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. हा बोगदा 7 वर्षात तयार होईल. तसेच नाशिक आणि ठाणे जिल्ह्यातील तलावांमधून मुंबईला दररोज पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा केला जातो. विविध विकासकामांमुळे पाइपलाइन फुटण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. भूमिगत बोगदा बांधल्याने पाइपलाइनमधील गळती आणि चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होईल.
तसेच मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार आणि तुळशी या सात धरणांतून मुंबईला 3950 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. यापैकी दोन हजार दशलक्ष लिटर पाणीपुरवठा उपलब्ध धरणातून होतो. भातसा धरणातून मुंबईद्वारे पुरविण्यात येणाऱ्या दोन हजार दशलक्ष लिटर पाण्यापैकी 1365 दशलक्ष लिटर पाणी पांजरापूर जलशुद्धीकरण प्रकल्पात शुद्ध केले जाते.
त्यानंतर मुंबईत पाण्याचे पाइप उपलब्ध होतो. मात्र मुंबई-नाशिक महामार्गाच्या रुंदीकरणामुळे आणि सुरक्षित पाणीपुरवठ्याच्या दृष्टिकोनातून जमिनीवर राबविण्यात येणाऱ्या मुख्य जलवाहिन्यांसाठी पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक आहे. त्यासाठी कशेळी ते मुलुंड दरम्यान जादा क्षमतेचा जलबोगदा बांधण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर महापालिका पाणी बोगद्य पाणी शुद्धीकरणासाठी वापरण्यास सुरुवात करेल.
असा असेल जलबोगदा
पहिल्या टप्प्यात येवई जलाशय ते कशेळी (भिवंडी) असा 14 किमी लांबीचा बोगदा आणि दुसऱ्या टप्प्यात कशेळी ते मुलुंड असा 7 किमी लांबीचा बोगदा बांधण्याची BMCच्या पाणीपुरवठा योजना विभागाची योजना आहे. त्याच्या बांधकामासाठी निविदाही काढण्यात आल्या आहेत. दोन्ही जलबोगद्याच्या उभारणीसाठी 7 वर्षांचा कालावधी लागणार आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Mar 3, 2024 | Trending News
धुळ्यात एका बिबट्याचे डोकं कळशीक अडकले. बिबट्या पाण्याच्या शोधात येथे आला होता.
Source link
by Hansraj Agrawal | Mar 3, 2024 | Trending News
पुढील
बातमी
‘महाविकास आघाडीच्या बैठकांना जाऊ नका’; प्रकाश आंबेडकरांचे कार्यकर्त्याना आवाहन
Source link