बीडमधील खोक्या भाईचे धक्कादायक कारनामे! अटकेसाठी मोर्चा, सुरेश धसांना सहआरोपी करण्याची मागणी


Satish Bhosale Beed: मागील अनेक दिवसांपासून फरार असलेला सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.  खोक्याच्या अटकेसाठी बीडच्या शिरुरमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. तसंच खोक्यांनी केलेल्या गुन्ह्यात सुरेश धसांना सहआरोपी करण्याची मागणी देखील मोर्चातून करण्यात आली आहे. 

सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या अटकेसाठी शिरुर बंदची हाक देण्यात आला होती.  हाक देत पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला होता. मागील अनेक दिवसांपासून खोक्या भाईचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसंच त्याच्यावर विविध कलमाअंतर्गत गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. तरीही आरोपी खोक्याला अजून अटक करण्यात अपयश का आले?  असाही सवाल मोर्चेकरांनी केलाय. तसंच खोक्या हा सुरेश धसांचा कार्यकर्ता असल्यानं सुरेश धसांवरही कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

काय आहेत आंदोलकांच्या मागण्या?

राजकीय वरदहस्तानं खोक्या आणि त्याच्या सहका-यांचा वन्यजीवांच्या तस्करीचा व्यवसाय आहे.  आरोपींवर वन्यजीव कायद्यानुसार गुन्हा दाखलकरा ढाकणे कुटुंबाची पोलिसांनी तक्रार का घेतली नाही याची चौकशी करा. पोलिसांवर कुणी दबाव टाकला याची चौकशी करावी अशी मागणीही करण्यात आली आहे.  आमदार सुरेश धस यांनाही सहआरोपी करावे, सतीश भोसलेचे आणखी कोणते अवैध धंदे आहेत याचा शोध घ्यावा.

सतीश भोसले उर्फ खोक्यानं आतापर्यंत 200 काळवीट तसंच 50 मोरांची हत्या केलीय असा आरोप मोर्चेकरांनी केला आहे. तसंच या वन्य प्राण्यांचं मांस खोक्या काही राजकीय नेत्यांना देत असल्याचा आरोप देखील मोर्चेकऱ्यांकडून करण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून खोक्याचे प्रताप समोर येत आहेत.  कधी  खोक्या टेबलावर पैसे फेकतोय. तर कधी खोक्या डीजेच्या गाडीवर चढून पैशांची उधळपट्टी करतोय. तर कधी कारमध्ये पैशांचा माज करताना दिसतोय. खोक्यानं शिरुरमधील शाळेत जात विद्यार्थ्यांना धमकी दिल्याचा देखील व्हिडीओ व्हायरल झाला होता. यात खोक्या हा विद्यार्थ्यांना हातपाय तोडण्याची धमकी देतांना दिसतोय.

मागील काही दिवसांपासून फरार असलेल्या खोक्याला अटक करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आहेत. तसंच खोक्याला लवकर अटक न केल्यास आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा हा मोर्चेकरांनी दिला आहे.





Source link

औरंगजेबची कबर हटवायची आहे पण… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान



औरंगजेबाची कबर हटवावी हे सरकारचं मत आहे.  पण कबरीला पुरातत्व खात्याचं संरक्षण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं औरंगजेबाच्या कबरीबाबत मोठं विधान केले आहे. 



Source link

खोक्या भाईच्या घरात सापडले मोठे घबाड; वन्य जीवांचे मांस अन् बरंच काही…



Santosh Deshmukh Murder Case: बीड जिल्ह्यातील खोक्या भाईचे अनेक कारनामे समोर येत आहेत. त्यातच त्याला वन्य जीवांच्या मासाची आवड होती असेही समोर आले आहे. 



Source link

लिव्हिंग विल म्हणजे काय? कोण बनवू शकतं? काय असते प्रक्रिया? सविस्तर जाणून घ्या!



Living Will: लिव्हिंग विल करू इच्छिणाऱ्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयानं सरकारद्वारे यंत्रणा उपलब्ध केली.



Source link

10 हजार कोटी घेऊन 'हा' बिल्डर देश सोडून पळाला; राऊतांचा दावा! म्हणाले, 'माजी मुख्यमंत्र्यांसाठी कुठे…'


Sanjay Raut Demands ED Inquiry: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मोठा धक्का दिला आहे. शिंदेंच्या जवळचे मानले जाणारे बिल्डर अजय आशर यांना बाहेरचा रस्ता दाखवत ‘मित्रा’ संस्थेच्या उपाध्यक्षपदी दोन नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील संस्थेचे नवे उपाध्यक्ष असतील. या निर्णयासंदर्भात विचारलं असता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी ‘अजय अशर देश सोडून पळाले असल्याची माहिती आपल्याकडे आहे’, असं म्हटलं आहे.

आमदार फोडताना आशरनेच पैशांची देवाणघेवाण केली…

“देवेंद्रजींच्या निर्णयाचा आम्ही स्वागत करतो,” असं संजय राऊत यांनी या विषयावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता म्हटलं. तसेच राऊतांनी, प्रवीण परदेशी यांची नेमणूक होणं या उद्योजकांच्या समितीवर याचं आम्ही स्वागत करतो, असंही म्हटलं. पुढे बोलताना राऊत यांनी “शिवसेनेमध्ये फूट पडली त्यावेळी आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न झाला तेव्हा अजय आशर याने पैशांची देवाणघेवाण केला,” असा दावा केला आहे.

अजय आशरने देशातून पलायन केलं

“अजय आशर हा एक बिल्डर होता ठाण्यातला, त्याचे उद्योग सर्वांना माहीत आहेत. आधीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संपूर्ण व्यवहार पाहणारा जमिनीचे व्यवहार करणारा आणि त्यांच्या पैशाचं संरक्षक म्हणून त्याची ओळख आहे. तीन वर्षांपूर्वी शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला तेव्हा आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न झाला तेव्हा अजय आशर याने पैशांची देवाणघेवाण केली. हजारो कोटींची संपत्ती त्यांनी बेकायदेशीरपणे गोळा केली. माझ्या माहितीत त्याने देशातून पलायन केलं आहे,” असं संजय राऊत म्हणाले.

नक्की वाचा >> ‘प्रशांत कोरटकरचा वावर देशाच्या गृहमंत्र्यांपासून…’, राऊतांचा हल्लाबोल; म्हणाले, ‘सोलापूरकर RSS च्या…’

आशर आणि त्याच्या आकाची ईडी चौकशी केली पाहिजे

“राणा नावाच्या अतिरेक्याला परत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे आर्थिक गुन्हेगार आहेत यांना कधी परत आणणार? अजय आशर याला अटक करून त्याची झडती घेतली पाहिजे. माजी मुख्यमंत्र्यांसाठी कुठे आणि पैसा गोळा केला याची माहिती घेतली पाहिजे. दहा हजार कोटी घेऊन तो परदेशात स्थायिक झाला आहे. अजय आशर आणि त्याचे राजकीय आका ही ईडीची फिट केस आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करून चौकशी केली पाहिजे,” अशी मागणी राऊतांनी केली.





Source link