मविआत मोठा वाद! संजय राऊत तडकाफडकी बैठकीतून निघून गेले; नाना पटोले जागेवर ठाम


Maharashtra Assembly Election: नाशिक पश्चिम जागेवरून शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष (Uddhav Thackeray) आणि काँग्रेसमध्ये (Congress) खटके उडल्याची माहिती मिळत आहे. नाशिक पश्चिम जागेवर सुधाकर बडगुजर यांना तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत, तर तर काँग्रेस देखील या जागेवर आग्रही आहे. या जागेवर नाना पटोले (Nana Patole) आणि संजय राऊत (Sanjay Raut) दोघेही अडून बसले आहेत. त्यानंतर संजय राऊत तडकाफडकी निघून गेल्याची माहिती मिळत आहे. 

विदर्भातील मतदारसंघांवरुनही तणाव

विदर्भातील काही मतदारसंघातवरून महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाला आहे. दक्षिण नागपूरमधून गिरीश पांडव काँग्रेसकडून इच्छुक आहेत. तर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षानेही या जागेवर दावा केला आहे. यवतमाळ शहरावर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि काँग्रेस दावा करीत आहेत. अकोला पश्चिम हा मतदारसंघ कायम काँग्रेसकडे राहिला आहे. मात्र, यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष राजेश मिश्रा या जागेवर इच्छुक आहेत. कारंजा आणि जळगाव जामोद या जागा काँग्रेसच्या आहेत. मात्र. यावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने दावा केला आहे. दिग्रससाठी काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे आपल्या मुलासाठी प्रयत्न करीत आहेत. तर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून पवन जैस्वाल यांनी तयारी सुरू केली आहे. या जागांवर काय तोडगा निघणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मातोश्रीवर तातडीची बैठक

उद्धव ठाकरेंनी आज तातडीने बैठक बोलावली. दुपारी साडेबारा वाजता मातोश्रीवर ही बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत जागावाटप आणि उमेदवार निवडीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीला महत्त्वाचे नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय होऊ शकतात, असे संकेत खासदार संजय राऊतांनी दिले आहेत.

जागावाटप आणि उमेदवार निवडीसाठी उद्धव ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावल्याच समजत आहे. या बैठकीला संजय राऊत, विनायक राऊत, अरविंद सावंत,सुभाष देसाई उपस्थित आहेत.. बैठकीत काय निर्णय घेतले जातात याकडे सा-यांचं लक्ष आहे. दरम्यान, काही अंतर्गत आजार आहेत. एक्सरे-एमआरआय काढावे लागतील. ते आज बैठकीत होईल.
आज नक्कीच निर्णायक भूमिका घेतली जाऊ शकते असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. 

“आम्ही अजिबात नाराज नाही, नाराजी कळविण्याचा देखील प्रश्न येत नाही, आमचा स्वतंत्र पक्ष आहे. आम्हाला आमचे निर्णय घेता येतात. आम्ही कोणाला का नाराजी कळवायची. आम्ही महाविकास आघाडीत आहोत. आम्ही महाविकास आघाडीचा धर्म पाळतो चर्चांना उपस्थित राहतो. आम्हाला भाजपच्या बगलबच्चांचा पराभव करायचा आहे,” असं संजय राऊत म्हणाले आहेत. 





Source link

लाडकी बहीण योजना सुरु राहणार की बंद होणार? मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं


पुढील
बातमी

ऐन निवडणुकीच्या तोंडावर नेते साथ सोडून चालले, अजित दादांची भिस्त कोणावर?





Source link

पुढचा CM कोण? महायुतीचा मोठा निर्णय! शाह शिंदे, फडणवीस, पवारांना म्हणाले, 'कोणत्याही…'


Maharashtra Assembly Election 2024 Mahayuti CM Post: राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीचं रिपोर्ट कार्ड प्रकाशित करताना, ‘आमचे मुख्यमंत्री समोर बसले आहेत. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण हे शरद पवारांनी जाहीर करावं असं मी त्यांना आव्हान देतो,’ असं म्हटलं होतं. यावर महाविकास आघाडीकडून कोणतंही उत्तर आलेलं नसलं तरी महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदावरुन सुरु असलेल्या रस्सीखेच फडणवीसांच्या निशाण्यावर होती हे स्पष्ट आहे. मात्र आता महायुतीमध्येही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निश्चित झालेला नसल्याचं दिल्लीमधील बैठकीनंतर स्पष्ट झालं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या घरी मध्यरात्रीनंतरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये महायुतीच्या मुख्यमंत्रिपदासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

रात्री उशीरापर्यंत चालली बैठक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास अमित शाह यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. त्यापूर्वीच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दिल्लीत पोहोचले होते. रात्री उशीरापर्यंत चाललेल्या बैठकीमध्ये अमित शाह यांच्या उपस्थितीत जागावाटपावर चर्चा झाली.

या बैठकीमध्ये महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला असून त्यावर शिक्कामोर्तबही करण्यात आले. जवळपास सर्वच जागांचा तिढा सुटल्याची माहिती मिळत असून काही जागांचा निर्णय प्रलंबित आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच जोरदार प्रचाराची मोहीम सुरू होणार आहे. मात्र या बैठकीमध्ये मुख्यमंत्रिपदासंदर्भात मोठा निर्णय तिन्ही घटकपक्षांनी घेतल्याचे समजते.

मुख्यमंत्रिपदाबाबात मोठा निर्णय

महायुतीचा मुख्यमंत्री निकालानंतरच ठरणार, असं भाजपा, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने निश्चित केलं आहे. महायुतीत मुख्यमंत्रीपदाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दिल्लीतील बैठकीत मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय झालेला नाही. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असावा यावर अद्याप निर्णय झाला नसून यासंदर्भात, ‘महायुतीकडून कोणत्याही नेत्याचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून समोर केला जाणार नाही याची काळजी घेतली जावी,’ असे निर्देश अमित शहा यांच्याकडून तिन्ही नेत्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

महाविकास आघाडीचं 28 जागांवरुन अडलं

महाविकास आघाडीमध्ये 250 पेक्षा जास्त जागांवर एकमत झालं आहे. तर 28 जागांवरून पेच निर्माण झाला आहे. या जागा मुंबई आणि विदर्भातील आहेत. या जागांवर ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसनेही दावा केला आहे. मुंबईतील तीन जागांचा तिढा आहे. यात वर्सोवा, भायखळा आणि धारावी या मतदारसंघांचा मुद्दा आहे. या मतदारसंघांवर काँग्रेसने दावा केला आहे. वर्सोवा, भायखळा आणि घाटकोपर पश्चिम या मतदारसंघांवर ठाकरेंच्या शिवसेनेने दावा केला आहे. मुंबईतीलच भायखळा, मानखुर्द शिवाजीनगर वर्सोवा आणि अणुशक्ती नगर या जागांवर समाजवादी पक्षाने दावा केला आहे. यात महत्त्वाचा पेच म्हणजे यातील काही जागांवर काँग्रेसने उमेदवारांची नावेही जवळपास निश्चित केली असल्याचे समजते. 

दिल्लीत सुटणार मविआचा पेच?

ठाकरेंच्या शिवसेनेने लोकसभा निवडणुकीत विदर्भातील रामटेक, अमरावतीसह काही जागा काँग्रेससाठी सोडल्या. आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून विदर्भातील काही जागांवर दावा केला जात आहे. दक्षिण नागपूर आणि रामटेक या नागपूर जिल्ह्यातील काही जागांसह विदर्भातील काही जागांवर वाद आहे.  त्या जागा सोडण्यास काँग्रेसचे राज्यातील नेते तयार नसल्याने आता हा मुद्दा दिल्लीतील काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे जाण्याची शक्यता आहे.





Source link

शरद पवारांनी एका दगडात मारले दोन पक्षी! अदिती तटकरेंविरुद्ध उमेदवार सापडला? CM शिंदे, अजित पवारांना धक्का


Maharashtra Assembly Election Big Blow Eknath Shinde Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्याप्रमाणात पक्षांतर सुरु झालं आहे. असं असतानाच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत मोठी इनकमिंग सुरु आहे. शरद पवारांच्या पक्षामध्येही मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश सुरु असतानाच दुसरीकडे भारतीय जनता पार्टी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला गळती लागल्याचं चित्र दिसत आहे. अशातच आता रायगड जिल्ह्यामध्येही मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. येथील एका बड्या नेत्याने पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून आता थेट शरद पवारांच्या पक्षातून हा नेता अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या तसेच राज्याच्या महिला आणि बालकल्याण विकास मंत्री अदिती तटकरेंना आव्हान देणार असल्याचं सांगितलं जात आहे.

थेट अदिती तटकरेंना आव्हान

मुख्यमंत्री शिंदेंच्या पक्षातून ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर करणाऱ्या या नेत्याकडे माणगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद होतं. मात्र हे पद आणि पक्षही त्यांनी सोडला आहे. ते आता तुतारी हाती घेत शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे. ज्या नेत्यामुळे आता शरद पवारांच्या पक्षाला रायगडमध्ये अदिती तटकरेंविरुद्ध लढण्यासाठी दमदार संधी मिळाल्याचं मानलं जातंय त्याचं नाव आहे, ज्ञानदेव पवार! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पक्ष सोडला आहे. खरं तर सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ज्ञानदेव पवार यांनी शिंदेंची शिवसेना सोडली असली तरी आता ते शरद पवारांच्या पक्षाचा झेंडा हाती घेऊन थेट अदिती तटकरेंना आव्हान देणार आहेत. 

शिंदेंबरोबरच अजित पवारांसमोरही मोठी अडचण

सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ज्ञानदेव पवार यांनी आपल्या नगराध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने रायगडच्या स्थानिक राजकारणात भूकंप झाला होता. ज्ञानदेव पवार यांनी कोणतीही पूर्व कल्पना न देता नगराध्यक्षपदाचा राजीनामा  रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला होता. नगराध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर ज्ञानदेव पवार लवकरच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा मागील दोन आठवड्यांहून अधिक काळापासून होती. अखेर यावर आता शिक्कामोर्बत झालं आहे. ज्ञानदेव पवार हे शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष होते आणि ते स्थानिकांमध्येही प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यामुळे ज्ञानेश्वर पवारांनंतर नगराध्यक्ष कोण हा प्रश्न एकनाथ शिंदेंच्या पक्षासमोर असतानाच आता ज्ञानेश्वर पवारांनी थेट शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करत शिंदेंबरोबरच अजित पवारांसमोरही मोठी अडचण निर्माण केली आहे. मुंबई-गोवा महामार्ग लवकरात लवकर व्हावा यासाठी ज्ञानदेव पवार यांनी उपोषण केलं होतं. त्यामुळे ते माणगावमध्ये प्रचंड चर्चेत आलेले.

महायुतीला दिला घरचा आहेर

मुंबई-गोवा महामार्गासाठी उपोषण करुन आंदोलन करणाऱ्या ज्ञानदेव पवार यांनी महामार्गाचं रखडलेलं काम तातडीने करण्याची मागणी केलेली. आपल्या आंदोलनादरम्यान त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबरच यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आलेले सुनील तटकरे, महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्यावर सडकून टीका केली होती. ज्ञानेश्वर पवार यांनी आक्रमक पवित्रा घेत सत्ताधारी महायुतीला आणि त्यांच्या नेत्यांना घरचा आहेर दिला होता. त्यानंतर ज्ञानदेव पवार यांनी थेट नाराजीनाम्याचं रुपांतर राजीनामा करत सर्वांना धक्का दिलेला. 

या स्थानिक नेत्याचा प्रभाव राहणार कारण…

ज्ञानदेव पवार हे कुणबी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. श्रीवर्धन मतदारसंघात 60% मतदार हा कुणबी समाजाचा आहे. आता ज्ञानेश्वर पवारांना महाविकास आघाडीकडून शरद पवारांनी उमेदवारी दिल्याने येथील स्थानिक राजकारणात अटीतटीची लढाई होईल असं मानलं जात आहे. 





Source link

Baba Siddiqui Murder: वडिलांच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'गरीब, निष्पाप…'


Baba Siddiqui Murder: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी (Baba Siddiqui) यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. दरम्यान या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिष्णोई (Lawrence Bishnoi) गँगने घेतली आहे. लॉरेन्स बिष्णोई सध्या गुजरातच्या साबरमती जेलमध्ये बंद आहे. सलमान खान आणि दाऊदला मदत करणाऱ्या प्रत्येकाचा हिशोब केला जाईल अशी धमकीच लॉरेन्स बिष्णोईने दिली आहे. सलमान खानचे निकटवर्तीय असल्याने बाबा सिद्दिकींची हत्या झाली असावी असा पोलिसांना संशय आहे. दरम्यान वडिलांच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकी (Zeeshan Siddique ) यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी त्यांनी आपल्या वडिलांच्या मृत्यूचं राजकारण होऊ नये अशी आशा व्यक्त केली आहे. तसंच न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. 

झिशान सिद्दिकी यांनी एक्स पोस्टमध्ये काय म्हटलं आहे?

“माझ्या वडिलांनी गरीब, निष्पाप लोकांचे जीवन आणि घरांचे संरक्षण, बचाव करताना आपला जीव गमावला. आज माझे कुटुंब तुटलं आहे, परंतु त्यांच्या मृत्यूचे राजकारण केले जाऊ नये. त्यांचा मृत्यू नक्कीच व्यर्थ जाऊ नये. मला आणि माझ्या कुटुंबाला न्याय मिळावा,” असं झिशान सिद्दिकी यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

सलमानच्या घरी नेमकी काय स्थिती?

‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत अरबाज खानने कुटुंब सध्या चिंतेत असल्याचं सांगितलं आहे. तसंच सलमान खान आपले चित्रपट पूर्ण करण्यास कटिबद्ध असल्याचंही सांगितलं. तो म्हणाला की “आम्ही सध्या ठीक आहोत. मी असं म्हणणार नाही की आम्ही एकदम बरे आहोत, कारण कुटुंबात बरंच काही घडत आहे. नक्कीच प्रत्येकजण चिंतेत आहे. मी माझा चित्रपट बंदा सिंग चौधरीचं प्रमोशन करण्यास कटिबद्ध आहे. 25 ऑक्टोबरला माझा हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट वेळेत रिलीज होईल याची मी काळजी घेत आहे. अनेक गोष्टी घडत असताना मला जे करणं भाग आहे ते करावं लागेल”.

‘यार तेरा गँगस्टर…’, बाबा सिद्दिकी यांच्या मारेकऱ्याने ठेवली होती Instagram पोस्ट, म्हणतो , ‘सभ्य बाप…’

 

सलमान खानच्या सुरक्षेबाबात बोलताना  त्याने संपूर्ण कुटुंब त्याच्या सुरक्षेसाठी मेहनत घेत असल्याची माहिती दिली. “आम्ही अतिशय व्यवस्थित आहोत असं मी म्हणणार नाही. पण जे सर्वोत्तम आहे ते करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही खात्री करुन घेत आहोत की, सरकार आणि पोलिसांसह प्रत्येकजण गोष्टी ज्याप्रकारे ठरल्या आहेत तशाच व्हाव्यात आणि सलमानची सुरक्षा व्हावी. प्रत्येकजण आपलं सर्वोत्तम देत आहे. आम्ही गोष्टी अशाच प्रकारे राहतीत हे पाहत आहोत,” अशी माहिती अरबाज खानने दिली आहे.





Source link