भोकरदनमध्ये रावसाहेब दानवेंची प्रतिष्ठा पणाला, भोकरदनचा गड कोण राखणार?

भोकरदनमध्ये रावसाहेब दानवेंची प्रतिष्ठा पणाला, भोकरदनचा गड कोण राखणार?


Raosaheb Danve : जालना जिल्ह्यातील भोकरदन नगरपरिषदेच्या निवडणुकीत काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. लोकसभेतील पराभवानंतर रावसाहेब दानवे यांनी होमग्राऊंड असलेल्या भोकरदन नगरपरिषदेची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. एका वेळेचा अपवाद वगळता कधीही हाती न आलेल्या नगरपरिषदेसाठी दानवे यांनी जोरदार तयारी केली आहे. तर काँग्रेसकडून आपला गड कायम ठेवण्यासाठी धडपड सुरू आहे. नेमकं काय सुरू आहे भोकरदनमध्ये पाहूयात सविस्तर 

Add Zee News as a Preferred Source

जालना जिल्ह्यात 3 नगरपरिषदांच्या निवडणूक होत आहेत. यामध्ये सर्वात लक्षवेधी लढत ठरत आहे ती भोकरदनची. कारण भोकरदन हा भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचं होमग्राऊंड आहे.  लोकसभेतील पराभवामुळे पक्षात काहीसे साईडलाईन झालेल्या दानवे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून ‘अभी तो मै जिंदा हूँ’ हा संदेश देण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचं दिसत आहे. 

भोकरदनमध्ये रावसाहेब दानवेंची प्रतिष्ठा पणाला 

इथे भाजपने शिवसेना-रिपाइंसोबत युती करत प्रचारात जोरदार आघाडी घेतलीय. भाजपने ज्येष्ठ कार्यकर्त्या आशा माळी यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देत मैदानात उतरवलंय. तसेच जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपचा झेंडा फडकावणार असल्याचा विश्वासही दानवे यांनी व्यक्त केला आहे. 

भोकरदन नगरपरिषद ही 2001 ते 2005 अपवाद वळगता कधीही भाजपच्या ताब्यात नव्हती. त्यामुळे 20 वर्षानंतर पुन्हा दानवे यांनी ही नगरपरिषद ताब्यात घेण्यासाठी ताकद पणाला लावली आहे. रावसाहेब दानवे यांचा मुलगा आमदार संतोष दानवे यांनी आपण केलेल्या विकासकामांचा दाखला देत मतदारांना साद घातली आहे. 

‘अभी तो मै जिंदा हूँ” चा संदेश प्रयत्न

भाजपने इथं कितीही जोर लावला असला तरी काँग्रेसचं पारडं जड मानलं जातं आहे. काँग्रेसने यावेळी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या सूनबाईलाच नगराध्यक्षपदाची उमेदवारी देत रिंगणात उतरवलं आहे. जनता कायम आपल्या पाठीशी असल्याचं सांगत काँग्रेसने पुन्हा आपलीच सत्ता येणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. 

लोकसभेतील पराभवानंतर रावसाहेब दानवे यांनी भोकरदनची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. तसेच राजकारणात ”अभी तो मै जिंदा हूँ”चा संदेश देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होतो आहे. नगरपरिषदेच्या निमित्ताने पुन्हा एकदा कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करण्याचं काम दानवे यांच्याकडून होतं आहे. असं असले तरी दानवे यांच्या प्रयत्नाला किती यश मिळत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 





Source link

हिंजवडीत हृदय हेलावणारी घटना, 20 चिमुकल्यांना अंगणवाडीत कोंडून ठेवलं; आक्रोश कॅमेऱ्यात कैद!

हिंजवडीत हृदय हेलावणारी घटना, 20 चिमुकल्यांना अंगणवाडीत कोंडून ठेवलं; आक्रोश कॅमेऱ्यात कैद!


Pune News: पुण्यातील हिंजवडीच्या IT हबमधील एका अंगणवाडीत घडलेल्या प्रकाराने पालक आणि स्थानिक नागरिक चांगलेच हादरले. शिकवायचं, खेळवायचं आणि सांभाळायचं अंगणवाडी केंद्र मात्र काही काळासाठी ‘बंदिस्त खोली’ बनलं. अंगणवाडीतील 20 चिमुकल्यांना आत कुलूप लावून सेविका आणि मदतनीस बैठक अटेंड करण्यासाठी निघून गेल्या. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पालकांचा संताप आणि चिंता दोन्ही तीव्रतेने उफाळून आले आहेत.

Add Zee News as a Preferred Source

नक्की कुठे घडला हा प्रकार?

हा प्रकार हिंजवडीमधील अंगणवाडी नंबर 3 मध्ये घडला. दुपारी 11 ते 12 या तासाभराच्या कालावधीत मुलं आत बंद होती आणि व्हिडीओमध्ये त्यांचा रडण्याचा आवाज, घाबरलेले चेहरे आणि एकटेपणाचा आक्रोश स्पष्ट जाणवतो. IT हबसारख्या गजबजलेल्या भागात मुलांना अशा अवस्थेत टाकून जाणं ही बेदरकार कृती असली तरी, तिचे परिणाम मात्र गावाच्या चौकापासून ते सोशल मीडियाच्या स्क्रीनपर्यंत सर्वत्र पोहोचले.

बैठक महत्त्वाची की मुलांचे जीव?

सविता शिंदे (सेविका) आणि शिल्पा साखरे (मदतनीस) यांनी ग्रामपंचायतीतील एका बैठकीसाठी बोलावलं गेल्याचा दाखला दिला. आम्हाला ‘यात मान होता, उपस्थिती महत्त्वाची होती,’ असं सांगत त्यांनी स्पष्टीकरण दिलं, मात्र मुलांना आत ठेवून कुलूप लावून जाणं ही ‘क्षुल्लक गोष्ट’ नव्हती, हे आता जगजाहीर झालं आहे. बैठकीला बोलावणारे ग्रामपंचायतीत एका माजी सरपंच असल्याचे कारण समोर आले, पण ‘मुलांना सांभाळण्याची जबाबदारी’ बैठक बोलावणाऱ्यांपेक्षा मोठी असते, हेच त्या विसरल्या.  

 

अधिकाऱ्यांचे तातडीचे पाऊल, पण… 

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मुळशी पंचायत समितीला कळवलं. बालविकास विभागाचे अधिकारी धनराज गिराम यांनी कोणताही विलंब न करता, सेविका आणि मदतनीसांना बैठक सोडून तात्काळ कुलूप उघडण्याचे आदेश दिले. मात्र, या घटनेनंतर जबाबदारांवर काय कारवाई होणार, पालकांच्या तक्रारीचं पुढे काय रूप घेणार आणि बाल विकास विभाग याला ‘अधिकृत दखल’ कशी देणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.





Source link

शिंदेच्या शिवसेनेला डावललं जातंय का ? गुलाबराव पाटील यांचं 'ते' विधान चर्चेत

शिंदेच्या शिवसेनेला डावललं जातंय का ? गुलाबराव पाटील यांचं 'ते' विधान चर्चेत


Dakshata Thasale

दक्षता ठसाळे-घोसाळकर या ‘झी 24 तास डिजिटल’मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. ‘प्रहार’ आणि ‘लोकमत’ या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि ‘टीव्ही 9’ आणि ‘न्यूज एक्सप्रेस मराठी’ या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. ‘India.com मराठी’ या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर ‘महाराष्ट्र टाईम्स’ च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर ‘झी 24 तास डिजीटल’मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे. 

…Read More





Source link

महाराष्ट्रात खळबळ! काँग्रेस नेत्याचं दिवसाढवळ्या अपहरण, CCTV त लाईव्ह कैद झालं किडनॅपिंग

महाराष्ट्रात खळबळ! काँग्रेस नेत्याचं दिवसाढवळ्या अपहरण, CCTV त लाईव्ह कैद झालं किडनॅपिंग



Congress Leader Kidnapped: मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या काँग्रेस नेत्याचं अपहरण करण्यात आल्यानंतर लातूरमध्ये एकच खळबळ उडाली. सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली आहे. 
 



Source link

Miss You वाल्मिक म्हणणाऱ्या धनंजय मुंडेंना घरचा आहेर, 'एवढीच आठवण येत असेल तर… '

Miss You वाल्मिक म्हणणाऱ्या धनंजय मुंडेंना घरचा आहेर, 'एवढीच आठवण येत असेल तर… '


NCP MLA Prakash Solanke Remark : सोमवारी परळीत नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारसभेत माजीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात धनंजय मुंडे यांनी नाव न घेता वाल्मिक कराडची आठवण काढली. ही आठवण जाहीरपणे असल्यामुळे धनंजय मुंडेंचा रोख कुणाकडे आहे ते सगळ्यांना कळलं. या प्रकरणावर धनंजय मुंडे यांना घरचा आहेर मिळाला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

आमदार प्रकाश सोळंकी यांनी धनंजय मुंडे यांना त्यांच्या या विधानावरुन घरचा आहेर दिला आहे. फारच खंत झाली तर त्याच्या शेजारी जाऊन बसा तुम्हा आणि खंत दूर करा, असं म्हणत प्रकाश सोळंकी यांनी घरचा आहेर लगावला आहे. 

काय म्हणाले प्रकाश सोळंकी 

आमदार धनंजय मुंडे यांनी परळी येथील जाहीर सभेत बोलताना एक व्यक्ती या ठिकाणी नसल्याची जाणीव होत असल्याचे वक्तव्य केले होते त्यावर आता माजलगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी त्यांना टोला लगावला आहे. आमदार धनंजय मुंडे यांनी त्यांच्यासोबत सावलीसारख्या राहणाऱ्या वाल्मीक कराडबाबत हे वक्तव्य केलं असावं तो नसण्याची एवढी खंत वाटत आहे तर त्याच्यासोबत जाऊन बसा आणि खंत दूर करा असे आमदार प्रकाश सोळंके यांनी म्हटले आहे. वाल्मीक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणात सध्या बीडच्या कारागृहात आहे त्याबाबतच्या या वक्तव्यावरून आता बीडच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

(हे पण वाचा – ‘आपली व्यक्ती आज इथे नाही…’, म्हणत धनंजय मुंडेंकडून वाल्मिक कराडचा उल्लेख) 

अंबादास दानवे काय म्हणाले?

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात वाल्मीक कराड जेल मध्ये आहे. याचा अर्थ धनंजय मुंडेने प्रूफ केलं वाल्मीकराड धनंजय मुंडे एकच आहे. धनंजय मुंडे यांच्या सपोर्टमुळे वाल्मीक कराड यांची गुन्हेगारी प्रवृत्ती फोफावली होती. वारंवार त्या भागातल्या जनतेने याबाबत तक्रार केली होती. देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या पाठिंबांमुळे सर्व गोष्टी घडल्या आहे. निवडणूक आयोगाने यावर स्पष्ट भूमिका घेणे गरजेचे आहे, असं देखील अंबादास दानवे यावेळी म्हणाले. 

काय म्हणाले होते धनंजय मुंडे?

परळीतील नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ आज परळी मध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये संयुक्त मेळाव्याचे आयोजन केले होते यावेळी आमदार धनंजय मुंडे यांनी बोलत असताना भाषणाच्या शेवटी म्हटले की आज परळीतील जगमित्र कार्यालय गेल्या नऊ ते सहा महिन्यापासून आजही सर्वसामान्य जनतेसाठी खुल आहे मात्र आज या मंचावर मला एका व्यक्ती नसल्याची जाणीव भासत आहे ती व्यक्ती आज आपल्यात नाही जे काहीअसेल नसेल ते न्यायालय पाहील काय व्हायचे ते होईल मात्र त्या व्यक्तीची आज जाणीव भासत आहे असं धनंजय मुंडे यांनी नाव न घेता आरोपी वाल्मिक कराडची आठवण काढली.





Source link

सगळ्याचं पक्षांचं भवितव्य दावणीला… धाकधूक वाढली! कोणत्याही क्षणी 'तो' निर्णय; निवडणूक आयोगही सज्ज

सगळ्याचं पक्षांचं भवितव्य दावणीला… धाकधूक वाढली! कोणत्याही क्षणी 'तो' निर्णय; निवडणूक आयोगही सज्ज


Maharashtra Local Body Election Supreme Court Decision: स्थानिक स्वराज्य संस्थांसंदर्भातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय आज सर्वोच्च न्यायालयात घेतला जाणार आहे. इतर मागासवर्गीयांसाठी (ओबीसी) सरसकट 27 टक्के आरक्षण लागू केल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ही 17 जिल्हा परिषदा, 83 पंचायत समित्या, दोन महानगरपालिका आणि 57 नगरपालिका- नगर पंचायती अशा 159 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओलांडण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यात आल्याबद्दल राज्य सरकारवर ताशेरे ओढले असून, आज होणाऱ्या सुनावणीच्या वेळी निवडणुकांचे भवितव्य ठरणार आहे. आधीच कोर्टाने निवडणुका पुढे का ढकलत नाहीत असा सवाल 19 तारखेला झालेल्या सुनावणीदरम्यान राज्य सरकारला विचारलेला. त्यामुळे आरक्षणाची टक्केवारी वाढल्याने सध्या प्रचार सुरु असलेल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांबरोबरच जिल्हापरिषदेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकाही अधिक लांबणीवर पडू शकतात. स्थगित करण्याचे आदेश कोर्टाने दिल्यास सारं काही अगदी नोटीफिकेशन काढण्यापासून पुन्हा सुरु करावं लागेल. 

Add Zee News as a Preferred Source

खंडपीठाने नापसंती व्यक्त केली

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आपल्या सोयीनुसार अर्थ लावत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी इतर मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) सरसकट 27 टक्के आरक्षण लागू करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयात तत्कालीन न्यायमूर्ती आणि कालच सरन्यायाधीशपदाची शपथ घेतलेले सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने नापसंती व्यक्त केली होती. आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा अधिक झाले असल्यास निवडणुकांना स्थगिती देण्याचा इशारा खंडपीठाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयात आज यावर सुनावणी होणार आहे.

निवडणुकांचे भवितव्य काय?

सर्वोच्च न्यायालयाने आधीच्या सुनावण्यांदरम्यान आरक्षणाच्या मर्यादेवरून संतप्त भावना व्यक्त केल्याच्या पार्श्वभूमीवर यातून मार्ग कसा काढता येईल, यावर राज्य सरकारमध्ये चर्चा झाल्याचे समजते. आजच्या सुनावणीत राज्य सरकारच्या वतीने कोणती भूमिका घ्यायची यावर खल झाला. आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या पालिका निवडणुकांना कदाचित स्थगिती दिली जाऊ शकते, असा अंदाज वर्तविला जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा अधिक झाले असल्यास निवडणुकांना स्थगिती देण्याचा इशारा खंडपीठाने दिला आहे. त्यामुळे आजच्या निकालावर केवळ शिवसेना किंवा भाजपाच नाही तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सर्वच राजकीय पक्षांचं भवितव्य अवलंबून आहे. कारण निवडणुका पुढे गेल्यास सर्वांना परत नव्याने तयारी आणि नियोजन करावं लागणार आहे.

खंडपीठाने काय विचारलं?

याप्रकरणी राहुल रमेश वाघ आणि किसनराव गवळी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर बुधवारी सुनावणी झाली. त्यावेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी ओबीसी आरक्षणाशी संबंधित अतिरिक्त कागदपत्रे सादर करण्यासाठी वेळ मागितल्यानंतर ‘आम्ही या मुद्द्यावर विचार करेपर्यंत तुम्ही नामांकन प्रक्रिया पुढे ढकलण्याचा विचार का करू शकत नाही?’ असा सवाल खंडपीठाने केला. आरक्षणास विरोध करणाऱ्या पक्षांच्या वकिलांनी निवडणूक प्रक्रिया सुरू राहिल्यास ती मागे घेता येणार नाही, असे निदर्शनास आणले.

निवडणूक आयोगाला निर्णयाची प्रतीक्षा

आज सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते, याकडे राज्य निवडणूक आयोगाचे लक्ष लागले आहे. न्यायालयीन निर्णयाच्या अधीन राहून आरक्षणात सुधारणा करण्याची तयारी आयोगाने ठेवली आहे. न्यायालयाची पुढील सुनावणी पार पडेपर्यंत निवडणूक आयोगाकडून जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार नाही. तसेच या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची अजून नेमणूक झालेली नाही. याबाबत महसूल विभागाकडून अहवाल अप्राप्त आहे. नियुक्त झालेले निवडणूक निर्णय अधिकारी हजर झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्यावर आयोगाकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. 

राजकारण ढवळून निघणार

काही तज्ज्ञांच्या मते या प्रकरणामध्ये सरकारला अपेक्षित असलेल्या निर्णयापेक्षा वेगळा निर्णय लागला तर जाहीर झालेल्या निवडणुकाही रद्द करण्याची वेळ सुद्धा येऊ शकते. असं झालं तर महाराष्ट्राचं संपूर्ण राजकारण पुन्हा ढवळून निघाल्याचं पाहायला मिळेल.

कोणत्या ठिकाणी किती आरक्षण?

आदिवासीबहुल स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये आरक्षण 100 टक्के झाले आहे. पालघरमध्ये 93 टक्के, गडचिरोली 78 टक्के, धुळे 73 टक्के, नाशिक 72 टक्के आरक्षण लागू झाले आहे. अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला जिल्हा परिषदांमध्ये 60 ते 70 टक्केदरम्यान आरक्षण लागू झाले आले आहे. नागपूर, ठाणे, वाशीम, नांदेड, जळगाव, हिंगोली, वर्धा आणि बुलढाणा या आठ जिल्हा परिषदांमध्ये 51 ते 60 टक्केदरम्यान आरक्षण देण्यात आले आहे.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp