by Hansraj Agrawal | Feb 8, 2024 | Trending News
Konkan Railway Megablock News Update : कोकण रेल्वे मार्गावरील मेल-एक्स्प्रेस गाडया सुरळित आणि सुरक्षित धाव्यात म्हणून कोकण रेल्वेकडून देखभाल दुरुस्तीच्या कामावर लक्ष केंद्रित केले आहे. याचपार्श्वभूमीर कोकण रेल्वेकडून आडवली – आचिर्णे विभागादरम्यान मालमत्तेच्या देखभालीसाठी उद्या (9 फेब्रुवारी) ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र याचा परिणाम एक्स्प्रेस होणार आहे. मेगाब्लॉकमुळे दोन एक्स्प्रेस तब्बल 90 मिनिटे उशीराने धावणार आहेत. जर तुम्ही 9 फेब्रुवारील कोकण रेल्वे मार्गाने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर रेल्वेचे वेळापत्रक एकदा नक्का तपासा…
कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, आडवली – आचिर्णे स्थानकादरम्यान मालमत्तेच्या देखभालीसाठी 2.30 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक 9 फेब्रुवारीला सकाळी ते सकाळी 11.30 या वेळेत असणार आहे. मात्र या ब्लॉकचा परिणाम सावंतवाडी रोड – दिवा एक्स्प्रेस आणि मुंबई सीएसएमटी – मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसचा प्रवास विलंबाने होणार आहे.
10106 सावंतवाडी रोड – दिवा एक्स्प्रेसचा प्रवास 9 फेब्रुवारीला सावंतवाडी रोड – कणकवली विभागादरम्यान 90 मिनिटांसाठी थांबविला जाणार आहे. तर 12051 मुंबई सीएसएमटी – मडगाव जं.सुरू होणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसचा प्रवास रत्नागिरी स्थानकावर 10 मिनिटांसाठी थांबविण्यात येणार आहे.
कोकण रेल्वेची विशेष मेमू
कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खूशखबर असून कोकण रेल्वेने चिपळूण ते पनवेल आणि पनवेल ते रत्नागिरी दरम्यान अनारक्षित मेमू स्पेशल ट्रेन चालवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे मुंबईहून चिपळूणला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक 01158 चिपळूण – पनवेल अनारक्षित स्पेशल मेमू रविवारी दुपारी 3 वाजून 25 मिनिटांनी पनवेल, 31 मार्चपर्यंत त्याच दिवशी रात्री 8 वाजून 15 मिनिटांनी पनवेलला पोहोचेल. ट्रेन क्रमांक 01157 पनवेल-रत्नागिरी अनारक्षित विशेष मेमू रविवारी रात्री 8 वाजून 25 मिनिटांनी दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता रत्नागिरीला पोहोचेल.
या गाडीला अंजनी, खेड, कळंबणी बुद्रुक, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामणे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, निडी, नागोठणे, कासू, पेण, हमरापूर, जिते, आपटा, रसायनी आणि सोमाटणे स्टेशनवर थांबा असून या ट्रेनला 8 कोच आणि अनारक्षित मेमू असणार आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Feb 7, 2024 | Trending News
पुढील
बातमी
बजरंगबली हनुमानाच्या पायाचा ठसा असणारे महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण, पण जायचं कसं?
Source link
by Hansraj Agrawal | Feb 7, 2024 | Trending News
Devendra Fadnavis On NCP Name And Symbol: केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ हे चिन्हं अजित पवार गटाला दिलं आहे. अजित पवार गट हाच खरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. या निकालानंतर राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत. सध्या राज्यामध्ये सत्तेत असलेल्या अजित पवार गटाचा सहकारी पक्ष भारतीय जनता पार्टीचे राज्याची सर्वोच्च नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या निकालावर प्रतिक्रिया नोंदवली आहे. फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया अगदी 4 शब्दांमध्ये नोंदवल्या आहेत.
चार शब्दांमध्ये प्रतिक्रिया
“हा निर्णय अपेक्षित आहे,” या 4 मोजक्या शब्दांमध्ये फडणवीस यांनी या निकालावर प्रतिक्रिया नोंदवली. “गेल्या अनेक वर्षात सातत्याने निवडणूक आयोगाने जी भूमिका घेतली त्याकडे पाहिल्यास अगदी समाजवादी पार्टीच्या केस वेळीही निवडणूक आयोगाने घेतलेली भूमिका आणि इतर 5 प्रकरणात घेतलेली भूमिका पाहा. आयोगाची सातत्याने अशीच भूमिका राहिलेली आहे. आलेला निर्णय अपेक्षितच आहे,” असं फडणवीस म्हणाले.
अपेक्षा आहे की…
“बहुमताचा जो निर्णय घेतो तो लोकशाहीत महत्त्वाचा असतो,” असंही फडणवीस म्हणाले. “पक्षाचे जे संविधानाचे किती पालन करण्यात आले हे खूप महत्त्वाचे असते. या सगळ्या गोष्टींचा उहापोह निर्णयात करण्यात आला आहे. मी अजित पवार यांचे मनापासून अभिनंदन करतो,” असंही फडणवीस यांनी सांगितलं. “अपेक्षा आहे की, अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी पक्ष महाराष्ट्रात उत्तम काम करेल,” अशा शब्दांमध्ये फडणवीस यांनी प्रतिक्रिया नोंदवली.
सगळ्या गोष्टींचा उहापोह
“बहुमताला महत्त्व आहेच पण नुसत्या बहुमताच्या आधारावर हा निर्णय झालेला नाही. सगळ्या गोष्टींचा विचार झालेला आहे. पार्टीचं संविधान काय होतं, त्याचं किती पालन करण्यात आलं, निवडणुका झाल्या की नाही, पार्टी कोणाची आहे, अशा सगळ्या गोष्टींचा उहापोह यामध्ये झालेला आहे,” असं फडणवीस म्हणाले. फडणवीस यांनी ट्वीटरवरुनही यावर प्रतिक्रिया नोंदवली. “आमच्या महायुतीतील घटक पक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच घड्याळ चिन्ह म्हणून निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाली. मी त्यांचे, सर्व सहकारी तसेच कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन करतो,” असं फडणवीस ट्वीटरवर म्हणाले.
“2019 मध्ये लोकशाहीचा मुडदा ज्यांनी पाडलेला त्यांना आज लोकशाही काय असते हे त्यांना समजले,” असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.
Source link
by Hansraj Agrawal | Feb 6, 2024 | Trending News
पुण्यात एक अत्यंत विचित्र घटना घडली आहे. तहसूल कार्यालयात ठेवलेली EVM मशीन चोरीला गेली आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Feb 5, 2024 | Trending News
Ratnadurg Fort Ratnagiri Maharashtra : कोकणातील अथांग समुद्र किनारे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतात. याच कोकणात अनेक ऐतिहासिक पर्यटन स्थळ देखील आहेत. यापैकीच एक आहे तो रत्नागिरी शहराजवळ असलेला रत्नदुर्ग किल्ला. या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यात एक छुपा भुयारी मार्ग आहे. हा भुयारी मार्ग थेट अरबी समुद्रात बाहेर पडतो. हा किल्ला पाहण्यासाठी नेहमीच येथे पर्यटकांची गर्दी असते.
कुठे आहे रत्नदुर्ग किल्ला
रत्नदुर्ग किल्ला हा रत्नागिरी शहरापासून अवघ्या दोन ते तीन किलो मीटर अंतरावर आहे. रत्नागिरी शहरात फिरायला येणाऱ्या पर्यटकांना रत्नदुर्ग किल्ला हा मुख्य आकर्षण असते. हा किल्ला तीन बाजूंनी अरबी समुद्राने वेढलेला आहे. या किल्ल्याच्या आग्रेय दिशेला जमीन आहे. किल्ल्याच्या पायथ्याशीच मिरकरवाडा हे बंदर आहे. या किल्ल्याचा आकार किल्ल्याचा आकार घोडाच्या नालासारखा आहे. किल्ल्यावरुन दि्सणाऱ्या समुद्राच्या विहंगम दृश्यामुळे आणि समुद्रापर्यंत जाणाऱ्या किल्ल्यातील भुयारी मार्गामुळे किल्ला नेहमीच पर्यटकांना आकर्षित करतो. 120 एकर क्षेत्रफळावर पसरलेला हा किल्ला अतिशय सुदंर आहे.
काय आहे रत्नदुर्ग किल्ल्याचा इतिहास
बहामनी राजवटीत बांधला गेलेला हा किल्ला आदिलशहाने ताब्यात घेतला. यानंतर 1670 साली छत्रपती शिवाजी महाराज यांनी आदिलशहाच्या ताब्यातून हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. संभाजी राजेंनी या किल्ल्यावर काही काळ वास्तव्य केले. त्यानंतरच्या काळात हा किल्ला करवीर छत्रपतींच्या ताब्यात गेला. त्यानंतर हा किल्ला आंग्रे कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.आंग्रे सोबतच्या युद्धात पेशव्यांनी हा किल्ला जिंकला पण शेवटी 1818 मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
अशी आहे किल्ल्याची रचना
किल्ल्याची लांबी अंदाजे 1300 मीटर आणि रुंदी 1000 मीटर आहे. किल्ल्याच्या दक्षिण-पूर्वेकडून पश्चिमेकडे मजबूत तटबंदी आहे. तटबंदीच्या मध्यभागी एक मुख्य प्रवेशद्वार आहे. एका बुरुजावर दीपगृह आहे. या बुरुजाला “सिद्ध बुरुज” असे म्हणतात. किल्ल्याच्या परिसरात अनेक झाडे आहेत. किल्ल्यावर भगवती देवीचे मंदिर देखील आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावरच असलेले भगवती देवीचे मंदिर हे शिवकालीन मंदिर आहे. बालेकिल्ल्याला 9 बुरुज आहेत. तर, संपूर्ण किल्ल्याला एकूण 29 बुरुज आहेत. किल्ला पेठ, बालेकिल्ला आणि दीपगृह अशा तीन भागांत विभागला आहे. किल्ल्याच्या तीनही बाजूंना समुद्र तर एका बाजूला दीपगृह आहे.
गुहेसारखा भुयारी मार्ग
किल्ल्यावर तीन तोंडाचा भुयारी मार्ग आहे. हा भुयारी मार्ग पर्यटकांसाठी बंद आहे. हा भुयारी मार्ग समुद्रात बाहेर पडतो. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराकडे येतांना लागणाऱ्या तटबंदीवरून या भुयाराचा शेवट खाली समुद्रकिनाऱ्यावर ज्याठिकाणी होतो तेथे असलेले गुहेसारखे भुयार स्पष्ट दिसते.
रत्नदुर्ग किल्ल्यावर कसे जायचे
जवळचे रेल्वे स्थानक रत्नागिरी आहे. रत्नागिरी शहरातून रिक्षा पकडून थेट किल्यापर्यंत जाता येते. किल्ल्याजवळ राहण्याची तसेच जेवणाची सोय नाही.
Source link
by Hansraj Agrawal | Feb 5, 2024 | Trending News
आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या वक्तव्यावर उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच गायकवाड यांचे सर्व आरोप फेटाळाले आहेत.
Source link