by Hansraj Agrawal | Apr 22, 2024 | Trending News
लैलेश बारगजे, झी मिडिया, अहमदनगर : देशभरात हनुमानाचे लाखो भक्त आहेत. महाराष्ट्रात एक असे जाव जिथे हनुमानाची पूजा करत नाहीत. इतकचं काय तर ‘मारूती’ची नावाची गाडीही कुणी घेत नाही. अहमदनगरमधील पाथर्डी तालुक्यातील दैत्यनांदूर गाव असं आहे. जिथं हनुमानाच मंदिर नाही तर दैत्यमहाराजांचे मंदिर असून वर्षभर दैत्यांची पूजा अर्चा करून मनोभावे भक्ती गावकऱ्यांकडून होते.
पोथी पुराना उल्लेख असल्याप्रमाणे, निंबादैत्य व हनुमंत दोघांत घनघोर असे गदा युद्ध होते. त्यात दोघही जखमी होतात. निंबादैत्य प्रभुरामाचा धावा करतो. त्यामुळे हनुमंत आश्चर्यचकीत होतो. प्रभूराम येतात आणि निंबादैत्याला बरे करतात आणि वर देतात. या गावात तुझेच नाव निघेल. तुझे मंदिरही बांधले जाईल.रामाने वर दिल्यानंतर निंबादैत्य सांगतात, तुम्ही तर हनुमंताला प्रत्येक गावात तुझे मंदिर होईल, असे सांगितले आहे. मग हे कसे. त्यावर प्रभू राम म्हणतात, गाव तुझेच. इथे हनुमंताचे मंदिर नसेल आणि त्याच्या नावाचा उल्लेखही निघणार नाही.
दैत्य नांदूर हे गाव रामायण काळातील ही प्रथा आजही पाळते आहे. इथला भूमिपूत्र अमेरिकेत असला तरी त्याच्या घरात निंबादैत्याचे छायाचित्र असतेच. घर,गाडीवर तर दुकानांची नावे श्री निंबादैत्य या नावाने गावामध्ये आहेत. दैत्य नांदूर गावातील ग्रामस्थांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे मात्र शिक्षणाच्या प्रवाहात आल्यामुळे गावातील मोठ्या प्रमाणात नोकर वर्ग आहे हा नोकर वर्ग वेगवेगळ्या शहरांमध्ये वास्तव्य करत आहे व्यवसायाच्या निमित्ताने ही ग्रामस्थ गावाबाहेर पडले आहेत मात्र ते ग्रामस्थ जिथे राहतात तिथे आपल्या गावाची कथा पाळताना पाहायला मिळतात अगदी दुसऱ्या शहरात राहत असले तरी हनुमानाची पूजा करणे टाळतात याबरोबरच गावाकडे निंबादैत्याच्या यात्रा उत्सवाला न चुकता हजेरी लावतात
पडावा आणि पाडव्याचा दुसरा दिवस असे दोन दिवस यात्रा भरवली जाते.पाडव्याचा यात्रेचा मुख्य दिवस असतो. ऑर्केस्ट्रा कुस्त्या,तमाशा, छबिना, गंगेचे पाणी आणलेली कावडी, अभिषेक महाआरती अशी विविध कार्यक्रम पार पडतात. गेली पंधरा वर्षांपासून श्री. निंबादैत्य महाराज देवस्थान सार्वजनिक ट्रस्टची स्थापना केली असून त्यामाध्यमातून विकासाची कामे येथे सुरु आहे.लवकरच मंदिर जिर्णोद्धाराचे काम हाती घेण्यात येणार आहे.पंधरा दिवसातून एकदा दर शनिवारी दैत्य महाराजांची महाआरती होऊन अन्नदानाची महा पंगत गावासाठी व आलेल्या भाविकासांठीचा उपक्रम राबवण्यात येतो.
Source link
by Hansraj Agrawal | Apr 22, 2024 | Trending News
Pune Wakad News: पुण्यातून एक धक्कादायक घटना घडली आहे. गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या महिलेने तिच्या 4 वर्षांच्या मुलासह इमारतीच्या 9व्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली आहे. शनिवारी पहाटे 5 च्या सुमारास ही घटना घडली असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वाकड येथील रीगालिया या उच्चभ्रू सोसायटीत ही घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला ही स्क्रिझोफेनिया या आजाराने ग्रस्त होती. कोमल आवटे असं या महिलेचे नाव असून ती तिच्या 4 वर्षांच्या मुलासह राहत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोमल यांनी इमारतीतून उडी मारताना चार वर्षांचा मुलगा विहान याला कडेवर घेत उडी मारली होती. या घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोमल या स्किझोफ्रेनिया या आजाराने त्रासलेल्या होत्या. त्यांच्यावर परदेशात आणि भारतात उपचार सुरू होते. मात्र, या उपचारांना काहीच प्रतिसाद येत नव्हते. त्यामुळं त्या नैराश्यात गेल्या होत्या. काहीच दिवसांपूर्वी त्या पुण्यात परतल्या होत्या. त्यानंतर इथे आल्यानंतर त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला तिच्या पतीसह अमेरिकेत राहत होती. तर त्यांचे सासू-सासरे पुण्यात राहत होत्या. काही दिवसांपूर्वीच पुण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी चार वर्षांच्या मुलासह इमारतीतून उडी घेतली. यात त्यांचा जागेच मृत्यू झाला. या घटनेमुळं त्यांचे कुटुंबीय आणि शेजाऱ्यांनाही मोठा धक्का बसला आहे. याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. वाकड पोलीस तपास करीत आहेत.
लग्नाच्या दिवशीच नवरदेवाची आत्महत्या
लग्नाच्या दिवशीच नवरदेवाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. मावळ मधील तळेगावमध्ये ही धक्कादायक घटना आज सकाळी घडली. सूरज रायकर हा 28 वर्षीय तरुण मंगळवारी बोहल्यावर चढणार होता. देहूगावात सायंकाळी साडे पाच वाजता सूरज विवाहबंधनात अडकून, नव्या आयुष्याची सुरुवात करणार होता. लग्नाची सगळी तयारी झाली होती. लग्नाच्या दिवशीच सूरजने त्याच्या मामाला मेसेज केला. मी आत्महत्या करत आहे, असं त्यात नमूद असल्याचं पाहताच कुटुंबाला मोठा धक्का बसला. मग सर्वानी परिसरात सूरजला शोधण्याचा प्रयत्न केला, तेंव्हा घरापासून काही अंतरावर असणाऱ्या विहिरीजवळ गाडी अन काही वस्तू आढळल्या. यावरून सुरजने विहिरीत उडी मारली असेल, असा अंदाज बांधण्यात आला.
Source link
by Hansraj Agrawal | Apr 21, 2024 | Trending News
निवडणुकीच्या धामधुमीत ही गावकऱ्यांनी चारशे वर्ष जुनी परंपरा पाळली आहे. आहेरवाडीत 70 क्विंटल वांग्याच्या भाजीचा प्रसाद तयार करण्यात आला. हजारो भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला.
Source link
by Hansraj Agrawal | Apr 21, 2024 | Trending News
Mumbai Car Accident: रस्ता क्रॉस करणाऱ्या 2 मुलींना भरधाव वेगाने येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Apr 20, 2024 | Trending News
पुढील
बातमी
अचानक पवार साहेबांनी शब्द फिरवला… पहाटेच्या शपथविधीबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोठा गौप्यस्फोट
Source link
by Hansraj Agrawal | Apr 19, 2024 | Trending News
मतदारांना आकर्षित करण्यासाठी नेत्यांकडून विविध आयडिया वापरल्या जात आहेत. त्यात तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी सध्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. रिल्स, मिम, ग्राफिक्स सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.
Source link