छगन भुजबळ मागे हटताच शिंदे गटाचा खळबळजनक दावा, '…म्हणून घेतली माघार?'
Shinde group claimed For Nashik: आम्ही भुजबळांचे मनापासून आभार मानतो, असे शिरसाठ म्हणाले.
Source link
Shinde group claimed For Nashik: आम्ही भुजबळांचे मनापासून आभार मानतो, असे शिरसाठ म्हणाले.
Source link
Devendra Fadnavis In baramati : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुनेत्रा पवारांसाठी (Sunetra Pawar) फडणवीस मैदानात उतरले आहेत. पुणे मुक्कामी असताना फडणवीसांनी अजित पवारांसोबत (Ajit Pawar) बैठकही केली. भाजप पदाधिकारीसुद्धा या बैठकीत उपस्थित होते. बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांना उमेदवारी का दिली? याचा खुलासा फडणवीसांनी या बैठकीत केला. भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही म्हणत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न फडणवीसांनी (Devendra Fadnavis) केला. शरद पवारांनी सोबत येण्याचा शब्द दिला होता, नंतर तो बदलला असा गौप्यस्फोटही फडणवीसांनी केलाय. मात्र, अजितदादा असताना देखील महायुतीत बारामतीत फडणवीसांना मैदानात उतरावं लागतंय.
विजय शिवतारेंचं बंड शमवलं
सुनेत्रा पवारांना बारामती लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यावर पहिलं बंड केलं ते शिवसेनेच्या विजय शिवतारेंनी.. बारामती कोणाचा सातबारा नाही म्हणत शिवतारेंनी अजित पवारांविरोधात रणशिंग फुंकलं. मात्र शिवतारेंचं हे बंड शमवण्यात मोठा वाटा होता तो देवेंद्र फडणवीसांचा.. देवेंद्र फडणवीसांनी शिवतारेंची भेट घेऊन त्यांची मनधरणी केली अन् अजितदादांचा रस्ता मोकळा केला.
हर्षवर्धन पाटलांसोबत शिष्टाई
अजित पवारांनी बारामतीची लढाई जिंकायची तर साथ हवी होती ती भाजप नेते हर्षवर्धन पाटलांची.. मात्र अजित पवारांमुळे दुखावलेल्या हर्षवर्धन पाटलांची नाराजी देवेंद्र फडणवीसांनी शिष्टाई करत दूर केली. हर्षवर्धन पाटलांनी अजित पवारांना साथ दिली अन् इंदापूरची ताकद अजितदादांसोबत आली.
सुनेत्रांसाठी फडणवीस मैदानात का?
राष्ट्रवादी काँग्रेसचं काम करण्यासाठी भाजप आणि संघ कार्यकर्ते नाखूष असल्याची चर्चा आहे. सुनेत्रा पवारांविरोधात दौंड आणि इंदापूरमध्ये नाराजी असल्याने खुद्द फडणवीसांना मैदानात यावं लागलंय. फडणवीसांनी इंदापूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला अन् मार्गदर्शन केलं. खडकवासला शहरी मतदारसंघात भाजप आणि संघाची मोठी ताकद असल्याने खडकवासलामध्ये सुनेत्रांसाठी काम करावं यासाठी फडणवीसांची फिल्डिंग लावली.
बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार किंवा सुनेत्रा पवार यांच्याविरोधात जिथे जिथे नाराजी आहे, तिथे फडणवीस डॅमेज कंट्रोलचं काम करत आहेत. बारामतीची लढाई ही फक्त काका आणि पुतण्याची नाही. तर महायुतीसाठी आणि भाजपचं मिशन 400 पारमध्येही अत्यंत महत्त्वाची आहे. बारामतीचा खासदार हा मोदींच्या बाजूने उभा राहायचा असेल तर सुनेत्रा पवारांचा विजय आवश्यक आहे. आणि त्यासाठीच फडणवीस मैदानात उतरले आहेत.
LokSabha Election: लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या प्रचाराचा धुराळा उडत आहे. प्रचारसभांमधून नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत. पण यादरम्यान चिखलफेकही केल्या जात आहेत. यादरम्यान संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नवनीत राणा (Navneet Rana) यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं आहे. बळवंत वानखेडे यांच्याविरोधात नाचीची नाही, तर देशाची लढाई आहे असं संजय राऊत म्हणाले आहेत. तसंच तुम्हाला बाई खुणावेल, ती पडद्यावरची नटी आहे असंही म्हटलं आहे.
“ही लढाई देशाची आहे. ही लढाई बळवंत वानखेडे विरोधात नाची अशी नाही. आमची लढाई बबली सोबत नाही. ही लढाई मोदी विरुद्ध महाराष्ट्र, मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे, शरद पवार, राहुल गांधी अशी आहे,” अशी टीका संजय राऊत यांनी नाव न घेता नवनीत राणांवर केली आहे.
पुढे ते म्हणाले, “तुम्हाला बाई खुणावेल ती पडद्यावरची नटी आहे. बाई तुम्हाला प्रेमाने बोलावेल पण तुम्ही मोहाला बळी पडू नका. आपण सावध राहिलं पाहिजे. डोळा मारला की जायचं नाही. आता आपला विचार बळवंत वानखेडे हाच आहे”. ज्या बाईने मातोश्रीचा अवमान केला आणि मातोश्रीत घुसण्याचा प्रयत्न केला तिचा पराभव करणं हे आमचं प्रथम काम आहे असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
“पक्ष प्रथमच फुटलेला नाही, बाळासाहेब यांच्या हयातीत अनेकजण त्यांना सोडून गेले. आमच्या पाठी शिवसेनेचे चार अक्षर नसते तर आम्ही कुठे असतो. शिवसेना प्रमुखानंतर महत्वाचं पद शिवसेनेत कोणतं असेल तर ते शिवसैनिक आहे. माझ्या पाठीत इतक्या लोकांनी खंजीर खुपसले आता पाठीत खंजीर खुपसायला जागा राहिली नाही असं आम्हाला बाळासाहेब सांगायचे. जेव्हा महत्वाचे ऑपरेशन करायचे तेव्हा बाळासाहेब रणरागिणी रस्त्यावर उतरवायच. आम्ही इथे महाराष्ट्र म्हणून आलेलो आहे आणि महाराष्ट्र कोणाच्या बापाला भीती नाही,” असा इशाराही संजय राऊतांनी दिला आहे.
“मुंबई महाराष्ट्रात राहिली पाहिजे यासाठी काँग्रेसने आम्हाला मदत केली. आता गुजरातचे ढवळे पवळे आले त्यांना आम्ही घाबरत नाही. तुमची 56 इंचाची छाती कोणी मोजली? गुजरात कधी देशासाठी लढला का हे सांगा? चीन आपल्या देशात घुसला तरी मोदी तोंड का उघडत नाहीत. 56 इंचाची छातीवला मणिपूरला जाऊ शकला नाही. ही 56 इंचाची छाती आहे काय़
या पोकळ छातीने महाराष्ट्राशी लढाई करू नये,” अशी टीका संजय राऊतांनी केली.
राज्याच्या मुख्यमंत्र्याला आठ आठ दिवस वेटिंगवर ठेवलं जातं हा महाराष्ट्राचा अपमान आहे. मुख्यमंत्री एवढा लाचार आणि लोचट आहे की तो वारंवार दिल्लीला जातो अशी टीका त्यांनी केली. भाजपवाल्यांनी महाराष्ट्राला नामर्द केलं. भाजपने महाराष्ट्राला षंड केलं असंही ते म्हणाले.
LokSabha Election: आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वांचं लक्ष बारामतीकडे असणार आहे. कारण या मतदारसंघात थेट पवार कुटुंबात लढत होणार आहे. सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) अशी ननंद-भावजयेत हा सामना होणार आहे.
Source link
Dhule Loksabha Election 2024 : धुळे… खान्देशातलं महत्त्वाचं शहर… तापी आणि गिरणा नदीच्या खोऱ्याचा हा भाग कापसाची पंढरी म्हणून ओळखला जातो. कापूस, कांदा ही इथलं प्रमुख पिकं… राष्ट्रीय महामार्गांचं जाळं देखील धुळ्यात आहे. यंत्रमाग उद्योग ही धुळ्याची ओळख. मात्र राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी विकासाची गंगा इथं पोहचू शकलेली नाही. धार्मिक आणि जातीय धुव्रीकरणामुळं विकासात धुळे मागे पडलं. दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडोरचे स्वप्न अधुरेच आहे. एमआयडीसीमध्ये पुरेशा सुविधा नाहीत. इंदूर रेल्वेमार्ग रखडलेलाच आहे. बेरोजगारी हे देखील धुळेकरांचं मोठं दुखणं आहे. धुळे हा मतदारसंघ अलिकडच्या काळात भाजपचा बालेकिल्ला बनलाय. त्यानंतर धुळ्याचं राजकीय गणित बदललंय.
धुळ्याचं राजकीय गणित
2009 मध्ये भाजपच्या प्रताप सोनावणेंनी काँग्रेसच्या अमरीशभाई पटेलांचा पराभव केला. 2014 मध्ये भाजपनं डॉ. सुभाष भामरेंना उमेदवारी दिली. त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसच्या अमरीशभाईंना हरवलं. 2019 मध्ये काँग्रेसनं कुणाल पाटलांना संधी दिली. मात्र भामरेंनी त्यांचा पाडाव करून दुस-यांदा खासदारकी मिळवली. विधानसभेचा विचार केला तर भाजपचे 2, एमआयएमचे 2, काँग्रेसचा 1 आणि शिवसेना शिंदे गटाचा 1 आमदार आहे. भाजपनं यंदा तिसऱ्यांदा डॉ. सुभाष भामरेंना मैदानात (Subhash Bhamre vs Shobha Bachhao) उतरवलंय. त्यांच्या उमेदवारीवर जनता काहीशी नाराज असल्याचं चित्र आहे. तर दुसरीकडं काँग्रेसनं माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी दिलीय. मात्र त्यांच्या उमेदवारीला काँग्रेस पक्षातूनच विरोध होतोय.
वंचित बहुजन आघाडीने आय पी एस अधिकारी राहिलेल्या अब्दूर रेहमान यांना तिकीट दिलंय. वंचितमुळं काँग्रेसची हक्काची वोट बँक विभाजनाच्या वळणावर आहे. भाजपच्या विरोधात एकास एक उमेदवार देण्याचा प्रयत्न झाला. मात्र महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते आणि जिल्हास्तरीय नेते यांच्यात नीट समन्वय होऊ शकला नाही. ही बाब भाजपच्या पथ्यावर पडली, तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही.
दरम्यान, पाच दिवसांपूर्वी कॉंग्रेसने अखेर डॉ. शोभा बच्छाव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय. त्यांच्या उमेदवारीमुळे मालेगाव – धुळे विभागात नाराजी नाट्य सुरु झाल्याचं पहायला मिळतंय. नाशिक आणि धुळे या दोन्ही जिल्ह्यांचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे आणि श्याम सनेर यांनी राजीनामे दिले आहेत. तर माजी आमदार अनिल गोटे यांच्या पुढाकारातून परिवर्तन मंचतर्फे धुळे लोकसभेसाठी सर्वसमावेशक तिसऱ्या पर्यायासाठी सक्षम उमेदवाराची चाचपणी सुरु झाली आहे.