लालपरीचा प्रवास महागणार! 'इतक्या' रुपयांनी वाढतील तिकीटांचे दर

लालपरीचा प्रवास महागणार! 'इतक्या' रुपयांनी वाढतील तिकीटांचे दर


ST Ticket Fare Hike In Marathi:  सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा प्रवास म्हणजे रेल्वे आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्राची लालपरी म्हणजे एसटी. मात्र याच लालपरीसंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. ऐन उन्हाळ्याच्या सुटीत गावाकडे जाण्यासाठी चाकरमान्यांची गर्दी होत असतानाच दुसरीकडे एसटी महामंडळाने एसटीच्या तिकीट दरात 10 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 

मुंबईसह राज्यभरातून राज्यात आणि राज्याबाहेर प्रवासी उन्हाळी सुट्यांसाठी, देवदर्शनासाठी एसटी बसने प्रवास करत असतात. तसेच उन्हाळी सुट्यांत अनेकजण गावी किंवा पर्यटनासाठी बाहेरगावी जात असतात. या काळात स्थलांतरित झालेल्यांची संख्या 13,000 पर्यंत वाढते. दररोज सुमारे 55 लाख स्थलांतरित होतात. आचारसंहितेमुळे प्रस्ताव पाठवण्यास निवडणूक आयोगाची परवानगी मागितली आहे. भाडेवाढीसाठी राज्य परिवहन प्राधिकरणाची परवानगी आवश्यक आहे. त्यामुळे हा प्रस्ताव राज्य परिवहन प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. तसेच एसटी महामंडळाकडून महसून वाढीसाठी हंगामी भाडेवाढ केली जाते. दरम्यान याच भाडेवाढीसाठीचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. 

किती वाढणार तिकीट दर?

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सर्व प्रकारच्या बसेसचे तिकीट दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हंगामी काळात बसच्या तिकीट दरात 10 टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

केव्हापासून लागू होणार नवीन निर्णय?

दरम्यान, ही तिकीट दरवाढ हंगामी  राहणार असून म्हणजेच, तिकीट दर वाढ केवळ एप्रिल ते 15 जूनपर्यंत ही भाडेवाढ असणार आहे.  त्यानंतर पुन्हा एकदा तिकिटाचे दर पूर्ववत केले जाणार, असे सांगण्यात येते. तसेच सध्याच्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता पाहता परिवहन प्राधिकरणाने  निवडणूक आयोगाची परवागनी घेऊन पुन्हा प्रस्ताव पाठविण्यास सांगितल्याची माहिती मिळत आहे.

2018 मध्ये झाली होती सर्वात मोठी दरवाढ

 2018 मध्ये दिवाळीच्या तोंडावर एसटी महामंडळाने 20 टक्के भाडेवाढ केली होती. डिझेलचे वाढलेले दर आणि कोरोनामुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी महामंडळाकडून भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला होता.  भाडेवाढीमुळे प्रवाशांची आर्थिक कोंडी देखील झाली होती. शिवशाहीतून पुण्याला जाण्यासाठी प्रवाशांना 545 रुपये मोजावे लागणार आहेत. 

उन्हाळी सुट्टीसाठी एसटीच्या विशेष गाड्या 

राज्यातील सर्वात कठीण मार्गांवर आणि प्रादेशिक स्तरावर स्थलांतरितांच्या मागणीनुसार विशेष गाड्या चालवल्या जातील. गर्दीच्या मार्गांवर मध्यवर्ती कार्यालयातून 496 बसेस चालवण्यात येणार आहेत. मुंबई राज्यात 211, पुण्यात 332, छत्रपती संभाजीनगरमध्ये 249, नाशिकमध्ये 199, अमरावतीमध्ये 51 आणि नागपूर राज्यात 46 विशेष गाड्या धावत आहेत. प्रत्येक विशेष ट्रेन सरासरी 450 किलोमीटर अंतराचा प्रवास करेल. त्यामुळे सुमारे पाच लाख किलोमीटर परप्रांतीय कामगारांची वाहतूक करण्याचा महामंडळाचा विचार आहे, असे परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.





Source link

देवेंद्र फडणवीस यांच्यावर डॅमेज कंट्रोलची मोठी जबादारी; घरी लागलेय नेत्यांची रीघ

देवेंद्र फडणवीस यांच्यावर डॅमेज कंट्रोलची मोठी जबादारी; घरी लागलेय नेत्यांची रीघ


Devendra Fadnavis : आधी मुंबईतला सागर बंगला… आणि आता नागपुरातला देवगिरी बंगला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या घरी गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांची रीघ लागलीय. कुणाला लोकसभेचे तिकीट हवंय, तर कुणी तिकीट मिळालं नाही म्हणून रुसलंय. कुणी महायुतीच्या उमेदवारालाच विरोध केलाय, तर कुणी अधिकृत उमेदवाराविरोधात बंडाचा झेंडा फडकवलाय… या सगळ्यांची समजूत काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस कामाला लागलेत. गेल्या चार दिवसांत फडणवीसांच्या घरी कुणी आणि का भेट घेतली जाणून घेवूया. 

12 एप्रिलला माढाचे भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर, दौंडचे भाजप आमदार राहुल कुल आणि माणचे आमदार जयकुमार गोरे खास विमानानं नागपूरला पोहोचले. माढामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, माजी विधानपरिषद सभापती रामराजे निंबाळकर महायुतीचा धर्म पाळत नसल्याची तक्रार त्यांनी केली. 13 एप्रिलला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी फडणवीसांची भेट घेतली. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा अजून सुटलेला नाही. त्याबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याचं समजतंय. त्याचदिवशी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनीही त्यांची भेट घेतली. कराड हे संभाजीनगरमधून भाजपची उमेदवारी मिळावी, यासाठी आग्रही आहेत. जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाकडं आहे.

14 एप्रिलला रत्नागिरी सिंधुदुर्गमधील शिवसेना ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार किरण सामंत नागपूरला पोहोचले. त्यांची फडणवीसांसोबत नेमकी काय चर्चा झाली, ते समजू शकलं नाही. मात्र रत्नागिरी सिंधुदुर्गातून केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी उमेदवारी जाहीर होण्याआधीच प्रचाराचा धडाका सुरू केलाय… त्याबाबत सामंतांनी तक्रार केल्याचं समजतंय.

माढा मतदारसंघ सध्या भाजपसाठी मोठी डोकेदुखी ठरतोय. धैर्यशील मोहिते पाटलांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश करून तुतारी हाती घेतल्यानं माढाचा तिढा आणखीच वाढलाय. त्यात उत्तमराव जानकरही नाराज झालेत. त्यांच्या नाराजीचा फटका माढा आणि सोलापुरात बसू शकतो. त्यामुळं फडणवीसांना त्यांना नागपूरला बोलावून घेतलं आणि त्यांची समजूत काढली.

त्याशिवाय काँग्रेस नेते आबा बागुल यांनीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतल्याची माहिती समजतेय. दोन्ही नेत्यांमध्ये 20 मिनिटं चर्चा झाली. आबा बागुलांसोबत त्यांची दोन मुलं अमित आणि हेमंत बागुलही उपस्थित होते. आबा बागुल हे पुण्यातून काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्यानं नाराज आहेत… मात्र, भेटीमागे राजकीय कारण नसल्याचा दावा बागुल कुटुंबीयांनी केलाय… एका लग्न समारंभात भेट झाल्याची माहिती कुटुंबियांकडून देण्यात आलीय.

लोकसभेला महाराष्ट्रातून खासदारांची संख्या 45 पार नेण्याचा विडा महायुतीच्या नेत्यांनी उचललाय. नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाची हॅटट्रिक साधण्यासाठी हा आकडा भाजपला गाठावाच लागेल… त्यासाठीच देवेंद्र फडणवीस मैदानात उतरलेत. त्यांच्या शिष्टाईला किती सफल होते, यावर भाजपचं यशापयश अवलंबून असणार आहे. 





Source link

Maharashtra Weather News : पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटा आणखी तीव्र होणार; कोणत्या भागात सूर्य आग ओकणार?

Maharashtra Weather News : पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटा आणखी तीव्र होणार; कोणत्या भागात सूर्य आग ओकणार?


Maharashtra Weather News :  हवामान विभागानं नव्या आठवड्याच्या अनुषंगानं येत्या 24 तासांसह एकंदरच पुढील तीन दिवसांपर्यंत हवामानाचे तालरंग नेमके कसे असतील याची माहिती देत नागरिकांना सतर्क केलं आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. यादरम्यान प्रतितास 30-40 किमी वेगानं वारेही वाहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यामध्येही पावसाची शक्यता असली तरीही उष्णतेचा दाह मात्र कमी होणार नाही हेसुद्धा हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे. 

राज्यात सध्या कोकणापासून मुंबईपर्यंत आणि मराठवाडा, मध्य महाराष्ट्रापर्यंतही तापमानाच अनेक चढउतार पाहायला मिळत आहेत. मध्य महाराष्ट्रात पारा 37 अंशांवर आला आहे, तर नवी मुंबई, रायगड, ठाण्यामध्ये तापमान 40 अंशांच्या घरात पोहोचलं आहे. दरम्यान पुढील तीन दिवस उष्णतेचा दाह अधिकाधिक प्रमाणात वाढणार असून त्यातील पहिले 48 तास अतिशय महत्त्वाचे असल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे. राज्यात पुढील तीन दिवसांत तापमानानं 45 अंशांचा आकडा गाठल्यास ही उष्णतेची लाट असल्याचं संबोधलं जाईल. 

तापमानवाढीमुळं मानवी शरीरावर परिणाम होऊन, ज्यावेळी तापमान 37 अंशांच्याही पलिकडे जातं तेव्हा वातावरणातील उष्मा शरीर शोषून घेतं. हवामानातील तापमान आणि आर्द्रतेमुळं ही प्रक्रिया घडत असते. उदाहरणार्थ, जर तापामान 34 अंशांवर असून, आर्द्रतेचं प्रमाण 75 टक्के असेल तर तापमानाचा निर्देशांक 49 अंश हा आकडा दर्शवतो. थोडक्यात हे तापमान मानवी शरीरासाठी घातक ठरू शकते. 

पावासाळी वातावरण 

सध्या राजस्थानच्या आग्नेयेपासून पश्चिम बंगालपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या भागावर त्यामुळं चक्रिय वाऱ्यांची निर्मिती होताना दिसत आहे. ज्यामुळं मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात हवामान काही अंशी ढगाळ राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 48 तासांमध्ये देशाच्या काही राज्यांमध्ये सरासरी 4 ते 6 अंशांची तापमानवाढ अपेक्षित असल्यामुळं नागरिकांनी या स्थितीमध्ये आरोग्याची काळजी घ्यावी.  





Source link

Loksabha : माढ्याच्या राजकारणात ट्विस्ट, करमाळ्याचे नारायण आबा पाटील फुंकणार तुतारी

Loksabha : माढ्याच्या राजकारणात ट्विस्ट, करमाळ्याचे नारायण आबा पाटील फुंकणार तुतारी



Narayan Patil In Sharad Pawar Group : करमाळ्यात महायुतीला मोठा धक्का बसला आहे. शिंदे गटाचे माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलंय. त्यामुळे आता माढ्याच्या राजकारणात (Madha Loksabha Political Scenario) मोठा ट्विटस पहायला मिळतोय.



Source link

Satara LokSabha : साताऱ्यात उदयनराजे वेटिंगवर… कॉलर उडवली खरी पण महायुतीचा तिढा कायम?

Satara LokSabha : साताऱ्यात उदयनराजे वेटिंगवर… कॉलर उडवली खरी पण महायुतीचा तिढा कायम?



Udayanraje On waiting in Satara : साताऱ्यात मविआकडून शशिकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र महायुतीचा घोळ संपता संपत नाही. सातारचा तिढा कसा सुटतो? ते पहावं लागणार आहे.



Source link

'देवेंद्र फडणवीस मागे लागल्याने….' नारायण राणेंनी सांगितला भाजप प्रवेशावेळचा 'तो' किस्सा

'देवेंद्र फडणवीस मागे लागल्याने….' नारायण राणेंनी सांगितला भाजप प्रवेशावेळचा 'तो' किस्सा


Narayan Rane On Devendra Fadanvis: भाजप नेते नारायण राणे यांनी आपल्या पक्षप्रवेशाबद्दलचा किस्सा सांगितला आहे. यामुळे साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ज्येष्ठ नेते नारायण राणे हे आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. शिवसेना, कॉंग्रेस नंतर भाजपमध्ये प्रवेश केलेल्या राणेंनी आपल्या पक्ष प्रवेशात देवेंद्र फडणवीसांचा कसा सहभाग होता, याबद्दल वक्तव्य केलंय. काय आहे हा किस्सा? जाणून घेऊया. 

नारायण राणे भाजपमध्ये आल्यानंतर त्यांना केंद्रीय मंत्री पदाचा दर्जा देण्यात आला. नारायण राणे हे नेहमीच उद्धव ठाकरे यांना आव्हान देत आले आहेत. याचा फायदा वेळोवेळी फडणवीस पर्यायाने भाजपला झाला. नारायण राणेंच्या रुपाने कोकणात ताकद असलेला मराठा चेहरा भाजपला मिळाला. पण नारायण राणेंच्या भाजप प्रवेशावेळी नेमकं काय झालं होतं? याचा उलगडा आता अनेक वर्षांनी झालाय

देवेंद्र फडणवीस मागे लागल्याने भाजप मध्ये गेलो, असे नारायण राणे म्हणाले. ‘भाजप मध्ये या’ असं भर रस्त्यात देवेंद्र फडणवीसांनी मला विचारलं. ‘मी एका पक्षाचा नेता आहे, रस्त्यावर विचारानं योग्य नाही’, असं राणे म्हणाले. यानंतर चर्चा करून मी भाजप मध्ये गेलो, असे नारायण राणेंनी सांगितले. 

मी प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करतो. पद मिळवण्यासाठी त्या लायकीचा बनण्याचा प्रयत्न करतो, असेही राणे पुढे म्हणाले.

कोकणातील प्रचार मोहिमेत भाजपाची आघाडी

मुंबई भाजपा अध्यक्ष कोकणात दाखल झाले आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारासाठी कोकणात प्रचार मोहिमेत भाजपाची आघाडी पाहायला मिळत आहे. कोकणातून अजून महायुतीचे उमेदवाराचं नाव जाहीर नाही.मात्र येथे भाजपाच पारडं जड आहे. कोकणात शिवसेनेतून उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत उमेदवार म्हणून इच्छुक होते. पण नारायण राणेंना पक्षाकडून हिरवा कंदील मिळाला. यानंतर स्वत: नारायण राणे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मध्ये प्रचार करत आहेत.

कोकणातील तिढा कायम

उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी नागपूर येथील त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेत. महायुतीमध्ये अजूनही रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटलेला नाहीये. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे नाते नारायण राणे तर शिवसेनेकडून किरण सामंत उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. उद्योग मंत्री उदय सामंत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघा संदर्भातच चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी पोहचले आहेत. आता या चर्चेत काय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp