Maharashtra Rain : राज्याला बसणार अवकाळी पावसाचा तडाखा, पुण्यासह 'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता!

Maharashtra Rain : राज्याला बसणार अवकाळी पावसाचा तडाखा, पुण्यासह 'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता!


Maharashtra Weather Update : ऐन हिवाळ्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने आता अनेकांची तारंबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. गुरूवारी अचानक राज्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढावलं आहे. राज्यातील अनेक भागांत पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास आता हिसकावला जाणार तर नाही ना? अशी चिंता लागून राहिली आहे. अशातच आता राज्यातील काही भागात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

बुलढाणा जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्याचबरोबर मुंबईत देखील पुढील 5 दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. अहमदनगरमध्ये शुक्रवारी पावसाने अचानक हजेरी लावल्याने लोकांना स्वेटर काढून छत्र्या बाहेर काढाव्या लागल्या. जळगाव जिल्ह्यात काही भागात झालेल्या अवकाळी पाऊस झाल्याने रब्बी पिकाला मोठा फटका बसलाय. तर पालघर जिल्ह्यात येत्या दोन दिवसात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्याचबरोबर राज्यात पुढील पाच दिवस वातावरण अंशत ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता

पुणे, कोल्हापूर, जळगाव, नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी, शनिवारी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आलाय. यासोबतच सातारा, सांगली, सोलापूर, बीड, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांमध्ये देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. 

दरम्यान, पुण्याच्या चाकण परिसराला आज रात्रीच्या सुमारास अचानक अवकाळी पावसाने झोपलं असून अचानक पडलेल्या या अवकाळी पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला असला, तरी या पावसामुळे कांदा सारख्या पिकांना मोठा फटका बसणार आहे. तर दुसरीकडे रोगराई पसरण्याचा ही धोका या अवकाळी पावसामुळे होऊ शकतो. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची ही तारांबळ उडाली. नगरच्या नेवासे तालुक्यातील कुकाणे, भेंडे परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे पावसाने उभी कांदा, गहू, हरभरा पिकांचे नुकसान होऊन उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.





Source link

महाबळेश्वरला पर्यटनासाठी जात असाल तर सावधान! घोड्यांमुळे ओढावलंय भयानक संकट

महाबळेश्वरला पर्यटनासाठी जात असाल तर सावधान! घोड्यांमुळे ओढावलंय भयानक संकट


-तुषार तपासे

Mahabaleshwar Health Issues & Horse Connection: थंडीच्या दिवसातच नाही तर 12 महिने महाराष्ट्रातील पर्यटकांबरोबरच देशभरातील पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या महाबळेश्वरमध्ये एक अजब संकट समोर आलं आहे. येथील वेण्णा तलावाजवळ पर्यटकांचे आकर्षण असणाऱ्या घोडे सफारीमुळे वेण्णा तलावात घोड्यांची विष्ठा जात असल्याने महाबळेश्वरमध्ये वर्षानुवर्षे रोगराई पसरवत असल्याचे एका अभ्यासातून समोर झाले आहे.

कोणी केला अभ्यास?

पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स आणि सायन्सने परीक्षण केलेल्या अहवालातून ही धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे. या भागातील घोड्यांची विष्ठा तलावाच्या पाण्यात मिसळत असल्याने अतिसार, अन्नविषबाधा, श्वसनाचा तीव्र संसर्ग, बुरशीजन्य संसर्ग आणि टायफाइड असे आजार होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील अनेक वर्षांपासून येथील स्थानिकांमध्ये या आजारांचं प्रमाण वाढल्याचंही या संशोधनामध्ये स्पष्ट झालं आहे.

कोणते विषाणू आढळून आले

महाबळेश्वरमध्ये येणारे पर्यटक हे वेण्णा लेक भागात घोडे सफरीचा आनंद घेत असतात. मात्र, या घोड्यांमुळे सध्या महाबळेश्वर आणि पाचगणी भागात एक समस्या निर्माण झाली आहे. महाबळेश्वर,पाचगणी भागाला याच वेण्णा तलावातून पाणीपुरवठा होतो. मात्र आता या तलावासंदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या तलावातील पाण्यात ईकोलाय आणि क्लोरिफॉर्म बॅक्टेरियासारखे संसर्गजन्य विषाणू सापडल्याचे समोर आले आहे.

कोणता त्रास होतो?

ईकोलाय आणि क्लोरिफॉर्म यासारख्या विषाणूंमुळे येथील स्थानिक नागरिकांना अतिसार, अन्नविषबाधा, श्वसनाचा तीव्र संसर्ग असं आजार होत आहेत. घोड्यांची विष्ठा पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांत मिसळत असल्याने या भागातील नागरिकांना पोटांसंदर्भातील गंभीर आजारांचा सामना करावा लागत असल्याचं दिसून आलं आहे. या अहवालाला जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दुजोरा दिला आहे. 

जिल्हाधिकारी काय म्हणाले?

“वेण्णा तलावातील पाण्यात ईकोलाय आणि क्लोरिफॉर्म बॅक्टेरियासारखे संसर्गजन्य विषाणू सापडले आहेत. मागील काही वर्षांपासून पोटासंदर्भातील रोगांमध्ये वाढ दिसत आहे,” असं जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी म्हटलं आहे.

प्राण्यांच्या माध्यमातून रोगप्रसार

प्राण्यांच्या माध्यमातून रोगप्रसार तशी फार सामान्य बाब आहे. बर्ल्ड फ्लू, कोरोना, स्वाइन फ्लू यासारख्या गोष्टींचा फैलाव प्राण्यांमधून माणसांना होतो. थेट प्राण्यांशी संपर्क येणे, प्राण्यांच्या विष्ठेतील अंश जलसाठ्यांच्या माध्यमातून पसरणे यासारख्या गोष्टींमधून आजारांचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात होतो. सध्या महाबळेश्वरमध्ये असाच प्रकार घडला आहे.

घोड्यांच्या विष्ठेमुळे होणारे आजार

> अतिसार 
> श्वसनाचा संसर्ग
> टाइफाइड
> पोटविकार
> लहान मुलांमध्ये रोटा व्हायरस
> बुरशीजन्य संसर्ग





Source link

शेतकऱ्यांनो सावधान? तुमच्या शेतातला पंप गेलाच म्हणून समजा…..

शेतकऱ्यांनो सावधान? तुमच्या शेतातला पंप गेलाच म्हणून समजा…..


पुढील
बातमी

मराठा आरक्षण मिळाल्यानंतरही स्वस्थ बसणार नाही, मनोज जरांगे ‘ही’ मोहिम घेणार हाती





Source link

दाऊद इब्राहिमच्या कोकणातील घराचा आज लिलाव; किंमत पाहून व्हाल थक्क

दाऊद इब्राहिमच्या कोकणातील घराचा आज लिलाव; किंमत पाहून व्हाल थक्क



Dawood Ibrahim Property Auction : मुंबई बॉम्बस्फोटाचा सूत्रधार दाऊद इब्राहिमवर भारतीय तपास यंत्रणा कठोर कारवाई करत आहे. त्यामुळे आता दाऊदच्या अनेक मालमत्तांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. 



Source link

राज्याच्या पोलिस महासंचालक पदावर रश्मी शुक्ला यांची नियुक्ती

राज्याच्या पोलिस महासंचालक पदावर रश्मी शुक्ला यांची नियुक्ती



Rashmi Shukla News:  .फोन टॅपिंग प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली. न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर आता पुन्हा त्यांना नवी संधी दिली जाणार, अशी चर्चा सुरू होती.



Source link

Mumbai Goa highway : मुंबई- गोवा महामार्गावरची कामं कधी पूर्ण होणार? अखेर तारीख ठरली

Mumbai Goa highway : मुंबई- गोवा महामार्गावरची कामं कधी पूर्ण होणार? अखेर तारीख ठरली



Mumbai Goa highway : न्यायालयानं खडसावल्यानंतर राज्य शासनाला खडबडून जाग; आता कामं पूर्ण झाली नाहीत तर…. न्यायालयानंच दिली तंबी. 
 



Source link

YouTube
Instagram
WhatsApp