महाविकास आघाडीसोबत काडीमोड; प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितची जरांगेंसोबत नवी आघाडी
जागावाटपावरुन वंचितची महाविकास आघाडीसोबतची बोलणी फिस्कटली. वंचितने आघाडीवर घाव घालत नवी खेळी केली आहे. वंचितने थेट जरांगेंसोबत हातमिळवणी केली आहे.
Source link
जागावाटपावरुन वंचितची महाविकास आघाडीसोबतची बोलणी फिस्कटली. वंचितने आघाडीवर घाव घालत नवी खेळी केली आहे. वंचितने थेट जरांगेंसोबत हातमिळवणी केली आहे.
Source link
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचा धुरळा उडण्यास सुरुवात झाली असतानाच राज्यातील काही महत्त्वाच्या मददार संघांमधील घडामोडींनाही प्रचंड वेग मिळताना दिसत आहे. सध्याच्या घडीला राज्याच्या राजकीय पटलावर बारामती लोकसभा मतदार संघावकर अनेकांची नजर असून, खुद्द अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर आता इथं सुनेत्रा पवार यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
पुढील दोन दिवसांमध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची यादी जाहीर होणार असून, त्यामध्ये बारामतीची जागा राष्ट्रवादीच लढवणार असल्याचं स्पष्ट वक्तव्य अजित पवार यांनी केलं आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झालं. सुनेत्रा पवारही गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या परिनं गावखेड्यांमध्ये जात जनसामान्यांच्या भेटी घेताना दिसल्या आणि आता त्यांनी ठामपणे आपलीही राजकीय भूमिका स्पष्ट केल्याचं पाहायला मिळालं.
गावांमध्ये जाऊन भेटीगाठींच्या या सत्रादरम्यान अजित पवार यांच्या पत्नीकडून त्यांच्या राजकीय भूमिकेच समर्थन करत सासरे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना सवाल करण्यात आला. अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये बंड केल्यानंतर शरद पवार आणि समर्थकांनी त्यांच्यावर पक्ष चोरला अशा शब्दांत टीका केली. याच टीकेचं उत्तर सुनेत्रा पवार यांनी दिलं.
‘अनेक वर्षांपासून पवार साहेबही सांगत आले की व्यक्तीस्वातंत्र्य प्रत्येकालाच मिळालं पाहिजे आपण सर्वजण त्याबद्दल बोलतो आणि लोकशाहीच्या गोष्टी ऐकतो. याच लोकशाहीत दादांच्या भूमिकेसोबत राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून असणारी जवळपास 80 टक्के लोक आले. मग त्यांनी पक्ष चोरला कसं म्हणता?’ असं म्हणत सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या भूमिकेवर पहिल्यांदाच भाष्य केलं. श्रीकृष्णाविरोधात सारी भावकी होती. पण अखेर जिंकला तो कृष्णच अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
अजित पवार यांनी सरकारशी हातमिलवलणी करण्यामागचा हेतूही त्यांनी सामान्यांपुढे मांडला. ‘सरकारमध्ये असलं तरच आपण काम करू शकतो, आदरणीय मोदी साहेबांना साथ द्यायची असेल आणि तळागाळातील जनतेचा विकास करायचा असेल तर आपण ससरकारसोबत असणं गरजेचं आहे. राज्यात आणि केंद्रात आपली माणसं असणं गरजेचं आहे’, हा अजित पवार यांचा विचार सर्वांपुढे मांडताना यंदाच्या निवडणुकीत घड्याळाला म्हणजेच विकासाला मत द्या असं आवाहन सुनेत्रा पवार यांनी केलं.
जनसामान्यांना उद्देशून, ‘तुम्ही सर्वांनीच आम्हा कुटुंबीयांना साथ दिली; प्रेम दिलं. तुमचं प्रेम हीच आमची उर्जा आहे. येणाऱ्या काळात आम्हाला तुमची हीच साथ अपेक्षित आहे त्यामुळं हेच पाठबळ कायम ठेवा’ अशा शब्दांत सुनेत्रा पवार यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
village in Maharashtra: महाराष्ट्रात असं एक अनोखे गाव आहे जिथे साप व गावकरी एकत्र राहतात. सापाला येथे देवासमान पुजले जाते.
Source link
Nashik Lok Sabha Election 2024 : नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीहून महायुतीत कलगीतुरा वाढताना दिसत आहे. शिवसेनेपाठोपाठ भाजपाने मुंबईत शक्तिप्रदर्शन करुन आपली ताकद दाखवली आहे. नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे शेकडो समर्थकांसह ठाण्यात रविवारी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. त्यांनी एकनाथ शिंदे निवासस्थानी जाऊन यांची भेट घेतली. तर दुसरीकडे 3 आमदारांसह इच्छुकांनी सोमवारी सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. (Loksabha Election 2024 Nashik Hemant Godse interested candidates and four mlas meet Devendra Fadnavis)
या बैठकीत नाशिकच्या जागेसंदर्भात स्थानिक आमदार आणि पदाधिकाऱ्यांसोबत देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली. आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले यांनी नाशिकची जागा भापलाच मिळावी, अशी मागणी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
सांगर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी तासभर चर्चा केल्यानंतर आमदार देवयानी फरांदे यांनी आता काय झालं याबद्दल माध्यमांना सांगितलं. त्या म्हणाल्या की, आजचा विचार केला तर आमचे तीन आमदार, 100 नगरसेवक आहेत. त्यामुळे नाशिकची जागा भाजपला मिळावी यासाठी त्यांनी आग्रही आहेत. आमच्या सर्वांची ही मनापासूनची इच्छा की नाशिकची जागा भाजपला मिळावी, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं.
मनसे महायुतीत सहभागी होण्याची चर्चा असल्याने नाशिक आणि शिर्डीची जागा त्यांच्याकडे जाणार अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्ये आणि इच्छुकांमध्ये नाशिकच्या जागेवरुन धुसफुस सुरु आहे. पत्रकारांनी या मनसेबद्दल प्रश्न विचारल्यावर फरांदे म्हणाल्या की, जर त्यांची ताकद अधिक असेल तर त्यांना उमेदवारी द्यावी. मात्र आज ताकदीच्या विचार केल्यास भाजप नाशिकमध्ये श्रेष्ठ आहे.
मनसे नाशिकसाठी दावा करतील असा चर्चा असताना दुसरीकडे छगन भुजबळ यांनीदेखील नाशिकच्या जागेवर हक्क सांगितला आहे. यावर देवयानी फरांदे म्हणाल्यात की, ही जागा सगळेच मागतील, पण ज्यांची जास्त ताकत त्यांना ही जागा मिळावी. आम्ही आज महत्त्वाचे लोक आलो आहोत, मात्र आम्हालाही 5-10 हजार लोकांना घेऊन येता येतं. मात्र भारतीय जनता पक्षाची ती संस्कृती नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिकच्या लोकसभेचे हेमंत गोडसे हेच उमेदवार असतील, असं वक्तव्य केलं. त्यानंतर महायुतीत मिठाचा खडा पडला. एकंदरीत लोकसभेतील महत्त्वाचा मतदारसंघ असून महायुतीमधील धुसफूस वाढली असून याठिकाणी नेमकी कोणा विरुद्ध कोणाची लढत होणार, लवकर स्पष्ट होईल.
Solapur LokSabha Constituency : भाजपने लोकसभेची पाचवी यादी जाहीर केली अन् पुन्हा धक्कांतत्रांचा अवलंब केला. देवेंद्र फडणवीसांचे मर्जीतील नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राम सातपुते यांना सोलापूरच्या जागेवर तिकीट देण्यात आलं. त्यामुळे आता सोलापुरात राम सातपुते आणि काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यात लढत (Ram Satpute Vs Praniti Shinde) पहायला मिळणार आहे. अशातच आता दोन्ही उमेदवारांमध्ये वेलकम वॉर सुरू झालं आहे. राम सातपुते यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रणिती शिंदे यांच्या या पत्रातून त्यांनी नकळतपणे राम सातपुते हे बाहेरचे उमेदवार आहेत हे ठसवण्याचा प्रयत्न केला आहे. इथला असो किंवा बाहेरचा, असं म्हणत प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. तर राम सातपुते यांनी देखील प्रणिती शिंदेंना धन्यवाद पत्र लिहित सोलापूरच्या जनतेने चांगलंच ओळखलंय, असं म्हणत प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे आता सोलापूरची लढाई ही चांगलीच गाजणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
प्रणिती शिंदे म्हणतात…
राम सातपुते आपलं सोलापूर लोकसभेच्या निवडणुक रिंगणात स्वागत आहे. सोलापूर हे कायमच बहुभाषिक, बहुधार्मिक, सर्वधर्मसमभाव मानणारं शहर आणि जिल्हा आहे, इथे सर्वांना आपली मतं मांडण्याची मुभा मिळते, मग तो इथला असो किंवा बाहेरचा… मी सोलापूरची लेक म्हणून तुमचं सोलापूरात स्वागत करते. तसंच या उमेदवारीच्या निमित्ताने तुम्हाला जी संधी मिळालीये त्या बद्दल शुभेच्छा देते. लोकांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, त्यांच्या गरजा आणि मतदारसंघाचा विकास हेच कुठल्याही निवडणुकीच्या केंद्रस्थानी असणं अपेक्षित असतं. लोकशाहीत जनहिताचे मुद्दे आणि संवाद यांना सर्वात जास्त महत्व असावं असं माझं मत आहे. पुढील ४० दिवस याचं भान राखून, लोकशाहीचा आदर करत, आपण विचारांची लढाई लढत एकमेकांविरुद्ध उभे राहू आणि समाजात फूट न पाडता, समाजाचा एकत्रित विकास होण्यासाठी काय करू शकतो यावर लढाई लढू, अशी मी आशा करते. सोलापूरकरांच्या वतीने पुन्हा एकदा तुमचं सोलापूरात स्वागत करते आणि तुम्हाला शुभेच्छा देते, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या होत्या. त्यावर राम सातपुते यांनी पत्र लिहित प्रत्युत्तर दिलं.
काय म्हणाले राम सातपुते?
मी 2019 पासून सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतोय. मी आमदार झाल्यापासून ते आजतोवर मी माझ्या मतदारसंघातील जनतेच्या, आणि त्यायोगे सोलापूर जिल्ह्यातील जनतेच्या सेवेत माझ्या परीने प्रामाणिकपणे होईल तेवढी विकासकामे करण्याचा प्रयत्न केलाय. मी ज्या भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे, तिथे आम्ही समाजाला एकसंध ठेवण्यासाठी नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास” या मंत्राला सार्थ ठरवत समाजातील शेवटच्या घटकाच्या कल्याणासाठी झटत आहोत. समाजात धर्म, जातीपातीत फूट पाडून कुणी एवढं वर्ष राजकारण केलंय, हे सोलापूरच्याच नव्हे तर पूर्ण देशाच्या जनतेनं आता चांगलंच ओळखलंय. राजकारणाची कुठलीही पार्श्वभूमी नसलेल्या एका ऊसतोड कामगाराच्या कुटूंबात जन्मलेल्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर भारतीय जनता पार्टीने जो विश्वास दाखवलाय, त्याला सोलापूरचा सर्वांगिण विकास करून सार्थ ठरवण्यासाठी मी नक्कीच प्रयत्नशील राहीन, असं म्हणत राम सातपुते यांनी प्रणिती शिंदे यांना उत्तर दिलंय.
दरम्यान, भाजपच्या पाचव्या यादीत बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतला लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. कंगना मंडीमधून निवडणूक लढवेल. तर बेगुसरायमधून गिरिराज सिंग यांची उमेदवारी निश्चित झालीये. तसेच पटना साहिबमधून रवी शंकर प्रसाद लढतील. त्याचबरोबर सुल्तानपूरमधून मेनका गांधी यांना तिकीट देण्यात आलं आहे. भाजपने पाचव्या यादीत एकूण 111 उमेदवारांची नावं निश्चित केली.
Malvan Beach : कोकण म्हटलं की निसर्गसौंदर्य… पर्यटक इथे निसर्गाचा भरभरून आनंद लुटतात. अथांग सागरी किनाऱ्यावर फिरताना पर्यटक मंत्रमुग्ध होतात. कोकणात एक असाच चमत्कारिक समुद्र किनारा आहे. हा समुद्र किनारा रात्रींच्या अंधारात चमकतो. महाराष्ट्रतील हा एकमेव समुद्र किनारा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण समुद्र किनाऱ्यावर हा अद्धबूत नजारा पहायला मिळतो.
भारतात अनेक ठिकाणी असे रात्रीच्या अंधारात चमकणारे समुद्र किनारे पहायला मिळतात. अंदमान आणि निकोबार येथील हॅवलॉक बेटावरील राधानगरी बीचवर हा नजारा पहायला मिळतो. रात्रीच्या वेळेस हा समुद्र निळ्या-हिरव्या रोषणाईने उजळलेला दिसतो. केरळमधील वर्कला समुद्र किनारा देखील रात्रीच्या अंधारात चमकतो. पश्चिम बंगालच्या पूर्व मिदनापूर जिल्ह्यात स्थित, मंदारमणी बीच देखील रात्री ताऱ्याप्रमाणे चमकतो. गोव्यातील पालोलेम बीच रात्रीच्या अंधारात चमकतो. तर, महाराष्ट्रातील मालवण समुद्र किनाऱ्यावर देखील असा अद्भूत नजारा पहायला मिळतो.
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणचा समुद्रकिनारा सुंदर सूर्यास्त आणि बायोल्युमिनेसेंट पाण्यासाठी प्रसिद्ध आहे. सुंदर निळ्या-हिरव्या रंगात चमकानारा समुद्र पाहण्यासाठी अनेकजण रात्री बोटीतून सफर करतात. रात्रीच्या वेळेस चमकणाऱ्या या समुद्र किनाऱ्यांमागे एक वैज्ञानिक कारण आहे. ज्याला बायोल्युमिनेसेंट फायटोप्लँक्टन म्हणतात. समुद्रात असे अनेक जीव आहेत, ज्यांच्या शरीरात प्रकाश निर्माण होतो. समुद्रात डाईनोफ्लॅगेट्स नावाचे जीव असतात. हे जीव रात्रीच्या अंधारात निळा प्रकाश फेकतात.
सिंधुदुर्ग जिल्ह्य पर्यटन समृद्ध जिल्हा म्हमटल्यास वावगे ठरणार नाही. मालवणसह तारकर्ली, देवबाग असे अनेक सुंदर आणि स्वच्छ समुद्र किनारे येथे आहेत. यासह सिंधुदुर्ग यासारखे किल्ले देखील येथे आहेत. यामुळे कोकणची सफर अधिक थरारक आणि अविस्मरणीय होते.
कोकण आणि पर्यटनाचं नातं अलीकडे अधिक दृढ होतंय. गोव्या पाठोपाठ आता रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला पर्यटकांची पसंदी मिळू लागलीय मालवणचा सिंधुदुर्ग किल्ला त्याच्या दिमतीला स्वच्छ सुंदर समुद्र किनारे आणि माशाचं मस्त जेवण हे सारं पर्यटकांना भुरळ घालत असतं. त्यामुळे सहाजिकच अलीकडे सिंधुदुर्ग मधील पर्यटकांची संख्या वाढली आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचं महत्वाचं आकर्षण म्हणजे इथले वॉटर स्पोर्ट्स.. आणि स्कूबा डायव्हींग.. महाकाय समुद्रच्या पोटात काय दडलय हे बघण्याची उत्सुकता प्रत्येकालाच असते… पर्यटकांची इच्छी इथं कोकणात पूर्ण होते.. तारकर्लीच्या समुद्रतील रंगीत मासे..पाण वनस्पती… आणि समुद्रातला तळ… सारं काही पाहून पर्यटक हरखून जातात..