by Hansraj Agrawal | Mar 24, 2024 | Trending News
Loksabha Election: लोकसभा निवडणुकांची घोषणा होताच राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. लोकसभा निवडणुकीसाठी मित्र पक्षांना बाजूला ठेवत भाजपने 20 तर काँग्रेस पक्षाने 11 उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये अनेक दिग्गजांचे तिकीट कापून काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. दोन्ही पक्षांनी आतापर्यंत जाहीर केलेल्या जागांवरुन काँग्रेस आणि भाजपच्या पाच उमेदवारांमध्ये थेट लढत होणार आहे. यामध्ये अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली असून या लढती तुल्यबळ होणार एकतर्फी याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
भाजप उमेदवारांची यादी
नंदुरबार – हीना गावित
धुळे – सुभाष भामरे
जळगाव – स्मिता वाघ
रावेर – रक्षा खडसे
अकोला – अनुप धोत्रे
वर्धा – रामदास तडस
नागपूर – नितीन गडकरी
चंद्रपूर – सुधीर मुनगंटीवार
नांदेड – प्रताप पाटील चिखलीकर
जालना – रावसाहेब दानवे
दिंडोरी – भारती पवार
भिवंडी – कपिल पाटील
उत्तर मुंबई – पियुष गोयल
उत्तर पूर्व (ईशान्य) मुंबई – मिहिर कोटेचा
पुणे – मुरलीधर मोहोळ
बीड – पंकजा मुंडे
लातूर – सुधाकर श्रृंगारे
माढा – रणजीत नाईक निंबाळकर
सांगली – संजयकाका पाटील
अहमदनगर – सुजय विखे
काँग्रेस उमेदवारांची यादी
सोलापूर – प्रणिती शिंदे
कोल्हापूर – शाहू महाराज छत्रपती
पुणे – रवींद्र धंगेकर
नंदुरबार – गोवाल पाडवी
अमरावती – वळवंत वानखेडे
लातूर – डॉ. शिवाजी काळगे
नांदेड – वसंतराव चव्हाण
नागपूर – विकास ठाकरे
रामटेक – रश्मी बर्वे
भंडारा-गोंदिया – डॉ. प्रशांत पडोळे
गडचिरोली- चिमूर – डॉ. नामदेव किरसान
हिना गावित – गोवाल पाडवी (नंदुरबार)
नंदुरबार लोकसभा निवडणुकीत भाजपच्या हिना गावित यांची लढत काँग्रेसच्या माजी मंत्री के सी पाडवी यांचे पुत्र गोवाल पाडवी यांच्यासोबत होणार आहे. त्यामुळे नंदुरबारमध्ये आता वकील विरुद्ध डॉक्टर असा सामना होणार असल्याची चर्चा सुरु आहेत. गोवाल पाडवी हे वकील तर हिना गावित या डॉक्टर आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत केसी पाडवी यांना हिना गावित यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे गोवाल पाडवी हे वडिलांच्या पराभवाचा वचपा काढणार का? याकडे नंदुरबारवासियांचे लक्ष लागलं आहे.
नितीन गडकरी-विकास ठाकरे (नागपूर)
भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या विरोधात पक्षाने विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नागपुरात गडकरी विरुद्ध ठाकरे अशी लढत होणार आहे. विकास ठाकरे हे नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. उमेदवारीची घोषणा होताच विकास ठाकरे यांनी गडकरींवर टीका केली आहे. नितीन गडकरी म्हणतात की त्यांनी नागपूर शहराचा विकास केला. मग त्यांच्या आधी हा विकास कधी झाला नव्हता का? असा सवाल ठाकरेंनी केला आहे. नितीन गडकरी यांच्यामुळे भाजपसाठी ही जागा प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे नागपूरच्या जागेवर नेमका कोणाचा विजय होणार आहे? याकडे राज्यासह देशाचं लक्ष असणार आहे.
प्रताप पाटील चिखलीकर-वसंतराव चव्हाण (नांदेड)
काँग्रेसने नांदेड लोकसभा मतदारसंघातून खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याविरोधात वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली आहे. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर नांदेडमधील बरीच राजकीय समीकरणे बदलली असून एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले एकत्र आल्याने या लढतीकडे अनेकांचे लक्ष लागलं आहे. पूर्वी एकमेकांविरोधात लढलो पण आता एकदिलाने काम करा असा संदेश समर्थकांना अशोक चव्हाण यांनी दिला आहे. तर जिल्ह्यात अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वातच कामं होतील असा स्पष्ट संदेश चिखलीकर यांनी दिला आहे. दुसरीकडे अनेक वर्षे वसंतराव चव्हाण यांच्यासोबत काम केलेल्या अशोक चव्हाणांना त्यांच्याविरोधातील चिखलीकरांना निवडणून आणावं लागणार आहे.
मुरलीधर मोहोळ-रवींद्र धंगेकर (पुणे)
पुण्यात भाजपकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ पुणे लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. तर त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर हे मैदानात उतरले आहेत. धंगेकर यांना उमेदवारी मिळताच काँग्रेस नेते आबा बागुल यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांना निवडणुकीत काँग्रेससमर्थकांकडून नाराजीचा सामना करावा लागू शकतो.
सुधाकर शृंगारे- डॉ. शिवाजी काळगे (लातूर)
लातूर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव मतदारसंघ आहे. लातूरमध्ये भाजपकडून खासदार सुधाकर शृंगारे यांना संधी देण्यात आली आहे. तर काँग्रेसने इथे नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे. काँग्रेसकडून डॉ. शिवाजी काळगे हे निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेस पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे तो पात्र ठरवण्याचा पूर्ण प्रयत्न मी करेन, असे डॉ. शिवाजी काळगे यांनी म्हटलं आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Mar 23, 2024 | Trending News
Congress Maharashtra Loksabha Candidate List : लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासून राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. गेल्या काही दिवसांपासून विविध पक्षांकडून उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली जात आहे. आता काँग्रेसकडून महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील चार लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवारांची नावे पाहायला मिळत आहेत.
काँग्रेसकडून चौथी यादी जाहीर
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आतापर्यंत तीन यादी जाहीर केल्या होत्या. यातील तिसऱ्या यादीत महाराष्ट्रातील सात लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवारांच्या नावांचा समावेश होता. त्यानंतर आता काँग्रेसकडून देशभरातील 46 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील 4 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचा समावेश आहे.
चार जागांवरील उमेदवारांची घोषणा
काँग्रेसने नुकत्याच जाहीर केलेल्या यादीत नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली-चिमुर, रामटेक या जागांवरील उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. यात रामटेकमधून रश्मी बर्वे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर नागपूर मतदारसंघातून विकास ठाकरे निवडणूक लढणार आहे. तसेच गडचिरोलीमधून नामदेव किरसान यांना तिकीट मिळालं आहे. त्यासोबतच भंडारा-गोंदियामधून प्रशांत पडोले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
यापूर्वी काँग्रेसने महाराष्ट्रातील सात उमेदवारांची यादी जाहीर केली होती. यात कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर पुण्यामधून आमदार रवींद्र धंगेकर, नंदुरबारमधून गोवळ पडवी, अमरावतीमधून बळवंत वानखेडे, नांदेडमधून वसंतराव बळवंतराव चव्हाण, लातूरमधून शिवाजीराव काळगे आणि सोलापूरमधून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली होती.
Source link
by Hansraj Agrawal | Mar 23, 2024 | Trending News
Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरढोणच्या युवकाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला अखेर यश आलं आहे. हा तरुण तब्बल पाच दिवस पंचगंगा नदी पात्रातील परिसरात अडकून पडला होता.
Source link
by Hansraj Agrawal | Mar 22, 2024 | Trending News
कुणाल जमदाडे, झी मीडिया, शिर्डी : शिर्डी… जगभरातील भाविकांना श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र देणाऱ्या साईबाबांची शिर्डी (Shirdi Contstituency). अहमदनगर जिल्ह्यातल्या दोन लोकसभा मतदारसंघापैकी एक. पूर्वीचा कोपरगाव मतदारसंघ. मात्र 2009 सालच्या पुनर्रचनेनंतर शिर्डी हा अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला नवा मतदारसंघ अस्तित्वात आला. तरीही इथल्या नागरिकांच्या अडचणी काही सुटल्या नाहीत.
शिर्डीतील रखडलेले प्रश्न
आंतरराष्ट्रीय दर्जाचं तीर्थक्षेत्र असूनही शिर्डीचा व्हायचा तसा विकास झाला नाही. शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न वर्षानुवर्षं प्रलंबित आहे. निळवंडे धरणाचा कालवा सुरू झाल्यानं शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांना अडचणीचं ठरलेलं निर्यात धोरण अजून बदललेलं नाही
बाळासाहेब विखे पाटलांच्या काळात कोपरगाव, शिर्डी भागात काँग्रेसचं (Congress) वर्चस्व होतं. मात्र 2009 साली मतदारसंघ राखीव झाल्यापासून लागोपाठ तीनवेळा शिवसेनेचाच खासदार विजयी झालाय.
शिर्डीचं राजकीय गणित
2009 मध्ये शिवसेनेच्या भाऊसाहेब वाकचौरेंनी रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि विद्यमान केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांचा सव्वा लाख मतांनी पराभव केला. 2014 मध्ये भाऊसाहेब वाकचौरेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळं ऐनवेळी माजी आमदार सदाशिव लोखंडेंना शिवसेनेनं उमेदवारी दिली. मोदी लाटेत लोखंडेंनी काँग्रेसच्या वाकचौरेंचा सुमारे 2 लाख मतांनी पराभव केला. 2019 मध्ये लोखंडेंनी काँग्रेस उमेदवार भाऊसाहेब कांबळेंना सव्वा लाख मतांनी हरवलं. विधानसभेचा विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 2, काँग्रेसचे 2 आणि भाजप-शिवसेनेचा प्रत्येकी 1 आमदार विजयी झालेत.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर खासदार सदाशिव लोखंडेंनी एकनाथ शिंदेंसोबत जाणं पसंत केलं. ते तिसऱ्यांदा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र या मतदारसंघावर आता भाजपनं दावा केलाय. राधाकृष्ण विखे पाटलांनी भाजप उमेदवारीसाठी शक्ती पणाला लावलीय. शिवसेना की भाजप, असा तिढा महायुतीत निर्माण झाला असताना रिपब्लिकन पक्षाच्या रामदास आठवलेंनीही त्यात उडी घेतलीय. लोखंडेंना राज्यसभेवर पाठवावं आणि शिर्डीची उमेदवारी आपल्याला द्यावी, असा प्रस्ताव आठवलेंनी महायुतीपुढं ठेवलाय.
दुसरीकडं महाविकास आघाडीतही शिर्डीच्या जागेवरून रस्सीखेच सुरूय. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे पुन्हा स्वगृही शिवसेनेत परतलेत. शिर्डीतून उमेदवारीसाठी त्यांनी मातोश्रीपर्यंत फिल्डिंग लावलीय. मात्र त्यांच्यावर बौद्ध समाज नाराज असल्याचं समजतंय. काँग्रेसकडून राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्ष रुपवते या देखील उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. दक्षिण नगरमधून भाजपनं उमेदवार जाहीर केला… मात्र शिर्डीत उमेदवारीसाठी चढाओढ असल्यानं अद्याप उमेदवाराच्या नावाची घोषणा झालेली नाही.
मतदारसंघ एक आणि उमेदवार अनेक अशी शिर्डीत अवस्था आहे. त्यात आता मनसेचीही भर पडलीय. राज ठाकरेंनी दिल्लीत अमित शाहांची भेट घेतल्यानंतर, शिर्डी मतदारसंघातून बाळा नांदगावकांच्या नावाची चर्चा सुरू झालीय… त्यामुळं राजकीय गुंता आणखी वाढलाय…
Source link
by Hansraj Agrawal | Mar 22, 2024 | Trending News
Maharashtra Weather News : हवामान विभागाकडून मिळालेल्या इशाऱ्यानुसारच राज्यात सद्यस्थिती पाहायला मिळत आहे. मुंबई आणि पश्चिम किनारपट्टी भागामध्ये असणाऱ्या अनेक भागांमध्ये हवेतील आर्द्रतेमुळं तापमान सातत्यानं वाढत चाललं आहे. येत्या दोन ते तीन दिवसांतही अशीच परिस्थिती कायम राहणार असून, राज्यातील तापमान 2 ते 4 अंशांनी वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. दरम्यान, अवकाळीचं सावट मात्र काही अंशी निवळल्याचंही चित्र आहे.
गुरुवारी सोलापुरात राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली. इथं तापमानाचा आकडा 39 अंशांवर पोहोचला होता. यामध्ये येत्या 48 तासांत 2 ते 4 अंशांची वाढ अपेक्षित असल्यामुळं राज्यात उन्हाचा दाह अडचणी निर्माण करण्याचं चित्र आहे. दरम्यान, विदर्भाच्या पश्चिमेला सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली असून, त्यातच केरळपासून महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तिथं झारखंडपासून मेघालयपर्यंतसुद्धा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळं या सर्व परिस्थितीचे थेट परिणाम विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील ढगाळ वातावरणावर दिसून येत आहेत.
IMD नं वर्तवलेल्या अंदाजानुसार देशाच्या काही भागांमध्ये 26 मार्चपर्यंत ढगांच्या गडगडाटासह वीजांच्या कडकडाटात पावसाची हजेरी असेल. जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टीस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या अतीव उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसासह हिमवृष्टीचा इशारा भारतील हवामानशास्त्र विभागानं दिला आहे.
रायलसीमा, केरळ, माहे, सौराष्ट्र आणि कच्छ येथे पुढील चार दिवस तर, तामिळनाडू, पुदूच्चेरी आणि करईकल येथे पुढील दोन दिवस दमट वातावरण त्रास वाढवणार आहे. देशाच्या पूर्वोत्तर भागात येणाऱ्या अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघलय, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, उप हिमालयीन क्षेत्र आणि सिक्कीम येथे 21 ते 26 मार्चदरम्यान मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर आणि उत्तर पूर्वेला सुरु असणाऱ्या हवामानाच्या या स्थितीमुळं आता महाराष्ट्रातही सातत्यानं तापमानात बदल अपेक्षित आहेत.
Source link
by Hansraj Agrawal | Mar 21, 2024 | Trending News
Eknath Shinde on Sanjay Raut: उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना औरंगजेबाशी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया देताना संताप व्यक्त केला असून हा देशद्रोह असल्याचं म्हटलं आहे. तसंच महाराष्ट्रातील जनता निवडणुकीतून उत्तर देत मोदींच्या अमपानाचा सूड घेईल असा विश्वासही व्यक्त केली आहे. पक्षाच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना औरंगजेबाशी केल्याने त्यांनी संताप केला. “हे दुर्देव आहे. देशभक्त आणि राष्ट्रभक्त असणाऱ्या मोदींनी देशाला नवा आयाम, उंची दिली. बाळासाहेबांचं राम मंदिर बांधण्याचं, जम्मू काश्मीरमधून 370 कलम हटवण्याचं स्वप्न मोदींनी पूर्ण केलं. अशा आदरणीय पंतप्रधानांना औरंगजेब म्हणणं देशाचा अपमान, देशद्रोह आहे. त्यांची निंदा करावी तेवढी कमी आहे. कारण त्यांनी औरंगजेबी वृत्ती त्यांनी दाखवली आहे. औरंगजेबाने भावांना, वडिलांनाही सोडलं नव्हतं. पण यांना महाराष्ट्रातील जनता निवडणुकीतून उत्तर देत सूड घेईल”, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
संजय राऊत काय म्हणाले आहेत?
“या मातीत छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. जे महाराष्ट्रावर आज चाल करून येत आहेत ते, गुजरातचे राज्यकर्ते मोदी अथवा शाह असतील. महाराष्ट्रात शिवाजी महाराज जन्माला आले आणि औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला. गुजरातमध्ये जिथे मोदी जन्माला आले त्याच्या बाजूला दाहोद नावाचे गाव आहे. तिथे औरंगजेब जन्माला आला. म्हणून ही औरंगजेबी वृत्ती गुजरात आणि दिल्लीतून या महाराष्ट्रावर चाल करून येतेय आणि शिवसेनेच्या विरोधात, आमच्या स्वाभिमानाच्या विरोधात,” अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. यापुढे मोदी नव्हे तर औरंगजेब म्हणा असंही ते म्हणाले आहेत.
उद्धव ठाकरेंनाही प्रत्युत्तर
अमित शाह यांनी मणिपूरमध्ये शेपूट घातली अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, “देशाचे कणखर आणि धाडसी गृहमंत्र्यांनी मोदींच्या नेतृत्वात 370 कलम हटवलं. त्यांनी स्वप्न खरं करुन दाखवलं. त्यांना शेपूट घालणं म्हणणं ही मर्दुमकी नाही. हे फोटोग्राफर असून त्यांना शेपूट असलेल्या प्राण्यांचे फोटो काढायला आवडत होते. वेळप्रसंगी शेपूट घालणारे, दिल्लीत जाऊन लोटांगण घालणारे, नोटीस आल्यावर शेपूट घालणारे आहेत. सत्तेसाठी, मुख्यमंत्रीपदासाठी यांनी सगळं सोडलं होतं”.
Source link