मुंबई महापालिकेची छप्परफाड कमाई! एका दिवसात 100 कोटींची कर वसुली

मुंबई महापालिकेची छप्परफाड कमाई! एका दिवसात 100 कोटींची कर वसुली


BMC Tax Collection : मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन विभागाने मालमत्ता कर वसुलीकामी मोठ्या मालमत्‍ताधारकांकडे पाठपुरावा सुरू केला असून त्‍याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. चालू आर्थिक वर्ष २०२३ – २४  मध्ये मंगळवार, दिनांक १९ मार्च २०२४ रोजी एकाच दिवसात तब्बल १०० कोटी रुपयांची विक्रमी वसुली करण्‍यात करनिर्धारण व संकलन विभागाला यश आले. करदात्‍या नागरिकांनी ३१ मार्च २०२४ पूर्वी कर भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.  

मुंबई महानगरपालिकेचा करनिर्धारण व संकलन विभाग गत वर्षभरापासून सातत्याने कर वसुलीकामी पाठपुरावा करत आहे. आर्थिक वर्ष २०२३ – २०२४ ची सुधारित कर देयके फेब्रुवारी २०२४ अखेरीस निर्गमित झाल्यानंतर विविध प्रसार माध्यमांचा व समाज माध्‍यमांचा वापर करत नागरिकांना मालमत्ता कर भरण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. मालमत्ता कर न भरलेल्यांची यादी जाहीर करून मालमत्‍ताधारकांना नोटीस देणे, थकबाकीदारांना टेलिकॉलिंग, एसएमएस करणे आदींवर भर दिला जात आहे.

करनिर्धारण व संकलन विभागातील कर्मचाऱ्यांनाही नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने कमीतकमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त मालमत्ता कर कसा वसूल केला जाऊ शकतो, याचेही प्रशिक्षण दिले जात आहे. या सर्वांचा परिणाम म्हणजे नागरिकांचे मालमत्ता कर भरण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. मंगळवार, दिनांक १९ मार्च २०२४ रोजी एकाच दिवसात तब्बल १०० कोटी रुपयांची विक्रमी वसुली करण्‍यात आली आहे. आर्थिक वर्षातील उर्वरित ११ दिवसांत अधिकाधिक कर वसूल करण्याचे महानगरपालिकेचे प्रयत्न सुरू आहेत.

मालमत्ताकर वसुलीचे निर्धारित उद्दिष्ट  पूर्ण करण्यासाठी करनिर्धारण व संकलन विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी परिश्रम घेत आहेत. मालमत्ताधारकांनी सुद्धा मालमत्ता कर भरण्यासाठी स्वतःहून पुढे यावे.  थकबाकीदारांनी आपला थकीत मालमत्ता कर तसेच मालमत्‍ताधारकांनी आपला नियमित कर भरून महानगरपालिकेला  सहकार्य करावे असे आवाहन बृहन्‍मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्‍या वतीने करण्यात आले आहे

मंगळवार, दिनांक १९ मार्च २०२४ रोजीची विभागनिहाय मालमत्‍ताकर वसुली

१) ए विभाग – ५ कोटी ३९ लाख रूपये
२) बी विभाग – ६७ लाख ३७ हजार रूपये
३) सी विभाग – १ कोटी ६९ लाख रूपये
४) डी विभाग – ६ कोटी ९२ लाख
५) ई विभाग – १ कोटी ६३ लाख रूपये
६) एफ दक्षिण विभाग – ५३ लाख ७२ हजार रूपये
७) एफ उत्तर विभाग – ७९ लाख ९६ हजार रूपये
८) जी दक्षिण विभाग – ४ कोटी ४४ लाख रूपये
९) जी उत्तर विभाग – ३ कोटी ३१ लाख रूपये
१०) एच पूर्व विभाग – ५ कोटी ७२ लाख रूपये
११) एच पश्चिम विभाग – ५ कोटी ९० लाख रूपये
१२) के पूर्व विभाग – ७ कोटी ७२ लाख रूपये
१३) के पश्चिम विभाग – ५ कोटी ७३ लाख रूपये
१४) पी दक्षिण विभाग – २ कोटी ७८ लाख रूपये
१५) पी उत्तर विभाग – ३ कोटी १७ लाख रूपये
१६) आर दक्षिण विभाग – १ कोटी ७४ लाख रूपये
१७) आर मध्य विभाग – २ कोटी ५१ लाख रूपये
१८) आर उत्तर विभाग – १ कोटी ८६ लाख रूपये
१९) एल विभाग – २ कोटी २१ लाख रूपये
२०) एम पूर्व विभाग – ५८ लाख ९१ हजार रूपये
२१) एम पश्चिम विभाग – २ कोटी ४६ हजार रूपये
२२) एन विभाग – १ कोटी २६ लाख रूपये
२३) एस विभाग – २९ कोटी ३ लाख ४८ हजार रूपये
२४) टी विभाग – २ कोटी ३७ लाख ६४ हजार रूपये





Source link

मुंबईत उन्हाचा ताप वाढणार; पुढचे दोन दिवस काळजीचे, उष्णतेच्या लाटेचा इशारा

मुंबईत उन्हाचा ताप वाढणार; पुढचे दोन दिवस काळजीचे, उष्णतेच्या लाटेचा इशारा


Maharashtra Weather News Today:  मार्च महिना आता सरत आला आहे. एप्रिल महिना सुरू होण्याच्या आधीच उन्हाचे चटके बसू लागले आहेत. महाराष्ट्रातील काही भागात अवकाळी पावसाचा फटका बसला आहे तर काही भागान उकाडा वाढला आहे. मुंबईतही उन्हाचा पारा चढला आहे. गुरुवारपर्यंत मुंबईत उन्हाचा ताप आणखी चढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 38 अंशापर्यंत उन्हाचा पारा चढू शकतो, असे प्रादेशिक हवामान विभागाने म्हटलं आहे. (Maharashtra Weather Update)

मुंबईत मंगळवारी कमाल तापमान अवघ्या 24 तासांत 2.2 अंशानी वाढले होते. कोकणातील दमट आणि उष्ण हवामानामुळं आधिक उकाडा जाणवू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, मुंबईत कुलाबा येथे 32.2 तर, सांताक्रुझ येथे 34.2 अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद मंगळवारी झाली होती. सोमवारपेक्षा मंगळवारी कमाल तापमानात वाढ नोंदवण्यात आली आहे. 

कोकण विभागात येत्या दोन ते तीन दिवसांत काही प्रमाणात दमट हवा असेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उन्हाळ्याच्या दिवसात समुद्रावरुन येणारे वारे उशिराने वाहतात. त्यामुळं हवेत दीर्घकाळ उष्णता राहते. 20 मार्च ते 22 मार्च या काळात कोकण विभागात कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. तर, राज्यातील इतर भागात कमाल तापमान 3 ते 4 अंशांनी वाढू शकेल. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात तापमानात आणखी वाढ होऊ शकेल. ही अवस्था एप्रिल ते मेपर्यंत राहण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटांची शक्यताही मराठवाडा आणि विदर्भात वर्तवण्यात आली आहे. 

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटांची तीव्रता इतर राज्यातील भागांपेक्षा अधिक असू शकते. तर, कोकणात त्या तुलनेने उष्णतेची तीव्रता कमी असू शकते. एकीकडे उष्णतेचा पारा चढत असताना काही ठिकाणी अवकाळी पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात मार्च ते मेपर्यंत अवकाळी पाऊस होऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. अल निनोच्या प्रभावामुळं ही परिस्थिती उद्भवू शकते. 

दरम्यान, हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी विदर्भात गारपीट आणि वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मराठवाड्यावरही पावसाळी ढगांचं सावट असेल. 





Source link

Maharastra Politics : रोहित पवारांनी काढली अमोल मिटकरींची लायकी, राज ठाकरेंना सल्ला देत म्हणाले…

Maharastra Politics : रोहित पवारांनी काढली अमोल मिटकरींची लायकी, राज ठाकरेंना सल्ला देत म्हणाले…


Rohit Pawar advised Raj Thackeray : अजित पवार यांचे सख्ये भाऊ श्रीनिवास पवार (Shriniwas Pawar) यांनीही अजित पवार यांच्यावर टीका केली होती. त्याला अजित पवार गटाकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे. बारामतीत भावनिक वातारण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. अजितदादांचा परिवार हा सबंध बारामतीकर आहे. आज श्रीनिवास पवार बोलत आहेत ते यापूर्वी काही का बोलले नाही? असा सवाल अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी उपस्थित केला होता. त्यावर बोलताना आता रोहित पवारांनी (Rohit Pawar) अमोल मिटकरींची लायकी काढली आहे.

काय म्हणाले रोहित पवार?

अमोल मिटकरी यांनी असा आरोप केलाय की, श्रीनिवास पाटील यांना पुत्र प्रेमाचा मोह झालाय. यावर रोहित पवार यांनी उत्तर देत अमोल मिटकरी यांची लायकी काढली. ज्यांनी श्रीनिवास काकांच्या विरोधात वक्तव्य केलं त्या व्यक्तीची नेमकी काय लायकी आहे, हे लोकांना माहीत आहे. त्यामुळे अमोल मिटकरीवर बोलून मी वेळ वाया घालवणार नाही, असं रोहित पवार म्हणाले. जी भूमिका श्रीनिवास काकांनी मांडली ती भूमिका सामान्य जनतेची आहे. आपल्या काकाला सोडून जाणे हे योग्य नसल्याचे सर्वांना वाटते. त्यामुळे साहेबांच्या विचाराने चालणारे पवार कुटुंब आहे म्हणून आम्ही पवार साहेब सोबत आहोत. अजितदादांनी स्वतः निर्णय घेत स्वतःला पवार कुटुंबापासून वेगळे केले आहे, असं रोहित पवार म्हणाले आहेत.

महाविकास आघाडीला येत्या लोकसभा निवडणूक 30 पेक्षा अधिक जागा मिळतील. कमीत कमी 30 जास्तीत जास्त 40 असा जागा महविकास आघाडीला मिळतील, असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला. त्यावेळी त्यांनी राज ठाकरे यांना देखील सल्ला दिलाय. 2019 ला राज ठाकरेंनी जी भाषणे केली होती ती शेतकऱ्यांच्या बाजूने युवकांच्या बाजूने होती. बेरोजगारीचा प्रश्न हा 2019 चा जेवढा अडचणीचा होता, त्यापेक्षा 2024 मध्ये हा प्रश्न अडचणीचा झालाय. त्यावेळी ते भाजपच्या विरोधात आणि युवा पिढीच्या बाजूने बोलले होते त्यामुळे युवकांनी बाजूने भूमिका घेत राज ठाकरेंनी भाजपच्या विरोधात लढावं. मराठी अस्मिता जपण्याचा काम हे राज ठाकरेंनी केला आहे त्यामुळे स्वाभिमानी माणूस हा भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेणार नाही हा विश्वास माझ्यासारख्याला आहे, असंही रोहित पवार म्हणतात.

राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे नेत्यांची चर्चा करून महाविकास आघाडी सोबत राहण्याचा निर्णय घेतल्यास हा सर्वसामान्य जनतेला पटू शकतो असं मला वाटतं. दिल्लीला जाणे हेच मुळात आम्हाला पटत नाही, लोकांच्या मनात त्यांच्याविषयी वेगळी भावना तयार होते. लोक खुश नाहीत, त्यांचे पदाधिकारी, कार्यकर्त यांना देखील भूमिका आवडेली नाही, असं म्हणत रोहित पवारांनी राज ठाकरेंना भाजपसोबत न जाण्याचा सल्ला दिलाय.





Source link

खसखसच्या नावाखाली अफूची शेती; पुण्यातील शेतकऱ्याचा धक्कादायक प्रयोग

खसखसच्या नावाखाली अफूची शेती; पुण्यातील शेतकऱ्याचा धक्कादायक प्रयोग



पुण्यातील एका शेतकऱ्याने अत्यंत धक्कादायक प्रयोग केला आहेय या शेतकऱ्याने खसखसच्या पिकाखाली अफूची लागवड केली आहे. 



Source link

Nagpur LokSabha : नितीन गडकरींची हॅटट्रिक रोखणार कोण? काँग्रेससाठी कोण ठरणार गेमचेंजर?

Nagpur LokSabha : नितीन गडकरींची हॅटट्रिक रोखणार कोण? काँग्रेससाठी कोण ठरणार गेमचेंजर?


Nitin Gadkari vs Congress : नागपूर… महाराष्ट्राची उपराजधानी… राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं रेशीमबाग मुख्यालय इथंच आहे. ज्याठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ साली बौद्ध धर्माची दीक्षा घेतली, ती दीक्षाभूमी देखील नागपूरचीच.. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं होमपिच… त्यामुळं आयआयटी, आयआयएम, एम्स, कायदा विद्यापीठ, सिम्बॉयसीस, मिहान प्रकल्प, उड्डाणपुल, मेट्रो रेल, रस्त्यांचं जाळं अशी विकासाची गंगा नागपुरात पोहोचलीय… मात्र तरीही अनेक प्रश्न कायम आहेत.

नागपूरच्या समस्या

नागपुरात पायाभूत सुविधा प्रकल्प मोठ्या प्रमाणात राबवले तरी अनेक प्रकल्पांच्या कामात सुसूत्रता नसल्यानं नागपूरकर त्रासलेले आहेत
सीमावर्ती भागात पाण्याची समस्या कायम आहे. नाग नदीनं दिलेला महापुराचा तडाखा अजूनही नागपूरकरांच्या स्मरणात आहे. नाग नदी सौंदर्यीकरण कधी होणार, असा सवालही ते करतायत. बड्या कंपन्या, उद्योगसमूहांचा अजूनही अभाव आहे. त्यामुळं पाहिजे तेवढी रोजगारनिर्मिती झालेली नाही.

खरं तर नागपूर मतदारसंघ हा काँग्रेसचा परंपरागत बालेकिल्ला… 1998 पासून लागोपाठ चारवेळा काँग्रेसचे विलास मुत्तेमवार नागपुरात खासदार म्हणून विजयी झाले. 

नागपूरचं राजकीय गणित

2009 मध्ये मुत्तेमवारांनी भाजपचे माजी खासदार बनवारीलाल पुरोहितांना २४ हजार मतांनी हरवलं. मात्र, २०१४ च्या मोदी लाटेत फासे पलटले. नितीन गडकरी मैदानात उतरले आणि त्यांनी मुत्तेमवारांना तब्बल पावणे तीन लाख मतांनी पराभवाचं पाणी पाजलं. 2019 मध्ये पुन्हा एकदा गडकरींनी काँग्रेसच्या नाना पटोलेंना २ लाखांहून अधिक मताधिक्यानं धूळ चारली. विधानसभा मतदारसंघावर नजर टाकली तर नागपूरमधून भाजपचे 4 आमदार निवडून आलेत. तर नागपूर पश्चिम आणि नागपूर उत्तर या मतदारसंघात काँग्रेसचे 2 आमदार विजयी झालेत.

आता नितीन गडकरी विजयाच्या हॅटट्रिकसाठी सज्ज झालेत. तर काँग्रेसकडून आमदार अभिजीत वंजारी, शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे, माजी खासदार विलास मुत्तेमवार यांचे पुत्र विशाल मुत्तेमवार, प्रफुल्ल गुडधे, नितीन कुंभलकर यांची नावं उमेदवारीसाठी चर्चेत आहेत.

नागपुरात आंबेडकरी विचारांच्या मतदारांची संख्या मोठी आहे. मात्र, त्यांची मतं बसपा आणि इतर पक्षांमध्ये विभागली जातात. कुणबी समाज मोठ्या संख्येनं आहे. त्यामुळं मराठा विरुद्ध ओबीसी वादाचा थोडाफार परिणाम इथं पाहायला मिळू शकतो. त्याशिवाय तेली, ओबीसी आणि अनुसूचित जातीच्या मतदारांची संख्याही लक्षणीय आहे. नागपुरात भाजप आणि काँग्रेस अशीच थेट दुरंगी लढत रंगते. इतर पक्षांना फारसं स्थान नाही.

एकीकडं विकासपुरूष अशी ओळख असलेला नितीन गडकरी यांच्यासारखा हेवीवेट नेता… तर दुसरीकडं त्यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेसचा कुणीही बडा नेता उत्सूक नाही, असं नागपुरातलं सध्याचं चित्र आहे. त्यामुळं गडकरींची हॅटट्रिक रोखण्यासाठी काँग्रेस नेमकी कोणती जादूची कांडी फिरवणार?, हाच मोठा प्रश्न आहे.





Source link

'मरेपर्यंत आई-वडिलांना…; सोडल्याने अजित पवारांवर सख्ख्या भावाची जोरदार टीका

'मरेपर्यंत आई-वडिलांना…; सोडल्याने अजित पवारांवर सख्ख्या भावाची जोरदार टीका



Srinivas Pawar on Ajit Pawar : वयस्कर झालेल्या माणसाची आपण किंमत करत नाही हा विचारच मला वेदना देऊन गेला म्हणत श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांवर टीकास्त्र डागलं आहे



Source link

YouTube
Instagram
WhatsApp