दरी पाहायला गेली अन् एक चूक जीवावर बेतली; मुंबईतल्या तरुणीचा सांधण व्हॅलीत दुर्दैवी मृत्यू

दरी पाहायला गेली अन् एक चूक जीवावर बेतली; मुंबईतल्या तरुणीचा सांधण व्हॅलीत दुर्दैवी मृत्यू


कुणाल जमदाडे, झी मीडिया, अहमदनगर : अहमदनगर (ahmednagar) जिल्ह्याच्या पश्चिमेला अकोले (Akole) तालुक्यात सह्याद्रीच्या रांगामध्ये असलेली सांधण व्हॅली (sandhan valley) नेहमीच पर्यटकांना आकर्षित करत आली आहे. अनेक ट्रेकर्स सांधणच्या घळीतून उतरणारा ट्रेक करत अविस्मरणीय अनुभव गाठीशी जोडत असतात. भंडारदरा धरणालगत सांम्रद गावापासून पुढे दीड ते दोन किमी नागमोडी वळणे घेत जाणारी ही खोल दरी ट्रेकर्ससह इतर भटक्यांनाही मोहात पाडते. पण याच सांधण व्हॅलीत मुंबईच्या (Mumbai News) एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. ट्रेकिंगसाठी गेलेल्या या तरुणीच्या मृत्यूने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अकोले तालुक्यातील पर्यटकांना आकर्षित ठरणाऱ्या सांधण व्हॅलीत पडून मुंबईतल्या एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुंबईहून पर्यटनासाठी आलेल्या चार तरुणींपैकी एकीचा सांधण दरीत पाय कोसळून पडल्याने मृत्यू झाला आहे. ऐश्वर्या खानविलकर असे 24 वर्षीय मुलीचे नाव असल्याचे समोर आलं आहे. ऐश्वर्या खानविलकर ही मुंबईच्या दहिसर परिसरात राहायला होती. ऐश्वर्या तीन मैत्रिणींसह सांधण दरी पाहण्यासाठी आली होती. मात्र सकाळी 11 च्या सुमारास पाय घसरुन पडल्याने ऐश्वर्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ऐश्वर्यासह चार तरुणी सकाळीच साडे सहा वाजता मुंबई येथून भंडारदरा परिसरात पर्यटनासाठी आल्या होत्या. भंडारदरा धरणाचा परिसर पाहिल्यानंतर चौघीजणी सांधण दरीत पाहण्यासाठी गेल्या होत्या. त्याचवेळी त्यांच्या ग्रुपमधील ऐश्वर्या खानविलकरचा एका खडकावरुन पाय घसरला. त्यामुळे ती दहा ते पंधरा फूट खाली पडली. खाली पडल्यामुळे ऐश्वर्याचे डोकं थेट खडकावर आपटलं. यामुळेच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

दरम्यान, घटनेची घटनेची माहिती मिळताच राजुर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने ऐश्वर्याचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला आहे. त्यानंतर मृतदेह अकोले ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. अकोले ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचा पंचनामा करण्याचे काम सुरु आहे. दुसरीकडे, सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे भंडारदरा परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे निसर्गाचा आनंद घेताना काळजी घेण्याचं आवाहन वनविभागासह पोलिसांनी केले आहे.





Source link

थेट अधिवेशनात दारुड्यांच्या अजब मागण्या; दारुड्यांच्या मागण्या सरकार मान्य करणार का?

थेट अधिवेशनात दारुड्यांच्या अजब मागण्या; दारुड्यांच्या मागण्या सरकार मान्य करणार का?



विधिमंडळ अधिवेशनादरम्यान आपल्या हक्कांसाठी अनेक जण आंदोलन करत असतात मात्र हिवाळी अधिवेशनात दारुड्यांनी केलेल्या आंदोलनाची चर्चा सुरु आहे. पाहुयात दारुड्यांनी नेमकं का आंदोलन केलंय.



Source link

डोंबिवलीत सापडला सराईत गुन्हेगार, अपंगत्वाचा फायदा घेत बाईकच्या मागे बसून…'

डोंबिवलीत सापडला सराईत गुन्हेगार, अपंगत्वाचा फायदा घेत बाईकच्या मागे बसून…'



Dombivli Crime: धक्कादायक म्हणजे बाईकवर मागे बसायचा तो इसम पायाने अपंग आहे. या दोघांनी मिळून आत्तापर्यंत पाच शहरात चैन स्नॅचिंग केल्याचे उघड झाले आहे.



Source link

'खासदार – आमदार पडल्यावर आमच्याकडे रडत यायचं नाही'; सूजात आंबेडकरांचा काँगेसला इशारा

'खासदार – आमदार पडल्यावर आमच्याकडे रडत यायचं नाही'; सूजात आंबेडकरांचा काँगेसला इशारा



Vanchit Bahujan Aghadi : ‘इंडिया’ आघाडीत येण्यासाठी वंचित बहुजन आघाडीकडून प्रस्ताव आला नसल्याचे काही दिवसांपूर्वी काँग्रेस पदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं होतं. त्यावर आता वंचित नेते सुजात आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.



Source link

रोखे खरेदी घोटाळ्यात सुनील केदार दोषी, नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळ्याचा 22 वर्षांनी निकाल

रोखे खरेदी घोटाळ्यात सुनील केदार दोषी, नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळ्याचा 22 वर्षांनी निकाल



Nagpur District Central Cooperative Bank Scam:  नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सरकारी रोखे खरेदी घोटाळा प्रकरणावरील निकाल आला आहे. यामध्ये राज्याचे माजी मंत्री सुनील केदार हे या प्रकरणात दोषी आढळले आहेत. तब्बल 22 वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल आला आहे.



Source link

जरांगे आणि मंत्र्यांच्या शिष्टमंडळातील चर्चा निष्फळ, 24 डिसेंबरच्या मुदतीवर जरांगे ठाम

जरांगे आणि मंत्र्यांच्या शिष्टमंडळातील चर्चा निष्फळ, 24 डिसेंबरच्या मुदतीवर जरांगे ठाम


Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील आणि सरकारच्या शिष्टमंडळाची आजची चर्चा निष्फळ ठरलीय. मनोज जरांगे 24 डिसेंबरच्या डेडलाईवर (Deadline) ठाम आहेत. आम्ही आमच्या शब्दावर ठाम आहोत, आता सरकारनं शब्द पाळावा, असं जरांगेंनी सांगितलंय. जरांगेंनी 24 तारखेचा हट्ट धरू नये, ही विनंती करण्यासाठी सरकारच्या शिष्टमंडळानं जरांगेंची (Manoj Jarange Patil) अंतरवाली सराटीमध्ये भेट घेतली. मात्र जरांगे 24 डिसेंबरवर ठाम आहेत. जरांगे आणि सरकारची चर्चेची गाडी सोयरे शब्दावर अडली. रक्ताच्या नात्यातल्या सगळ्या नातेवाईकांना, आई आणि पत्नीच्या नातेवाईकांनाही आरक्षण द्या, अशी जरांगेंची मागणी होती. तर आई किंवा पत्नी ही रक्ताच्या नात्यात येत नाही त्यामुळे कायद्यानुसार त्यांना आरक्षण देता येणार नाही, असं गिरीश महाजनांनी (Giris Mahajan) म्हटलं. तरीही सोयरे हा शब्द सरकार आरक्षणामध्ये घेईल, असं जरांगेंनी म्हटलंय. 

सगे सोयरे शब्दावरुन अडचण
कुणबी नोंदी सापडलेल्या सरकारच्या शिष्टमंडळाने नागरिकांच्या सगेसायरींना देखील आरक्षण दिलं जाईल, असं लेखी आश्वासन दिलं होतं असं मनोज जरांगे म्हणाले. पण मनोज जरांगे यांची ही मागणी गिरीश महाजन यांनी स्पष्टच नाकारली. ज्याची नोंद त्यालाच प्रमाणपत्र मिळत सगे सोयरे हा शब्द टाकला ,पण हा नियमात बसत नाही यात कोर्टात गेलं तरी आतापर्यंत कोर्टने फेटाळून लावलं, फक्त रक्तातील नात्यांनाच ते मिळत सोयरे शब्द पकडल्याने अडचण झाली,आता दोन महिने देखील लागणार नाही,अजूनही दोन अहवाल आपल्याकडे आले आहे अजूनही दाखले शोधणे सुरू आहे त्याची नोंद सापडेल त्यांच्या नातवाईकांना देणार असं गिरीश महाजनांनी सांगितलं. जरांगे यांची सगेसोयरेंची मागणी नियमात बसत नाही, असं गिरीश महाजन स्पष्ट म्हणाले.

विधानसभेत 4 दिवस चर्चा झाली. यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी सकारात्मक उत्तर दिलं. मागासवर्ग आयोगाचे काम वेगाने सुरू केलं आहे. आंपल्याला संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे,परिपूर्णता करून आरक्षण देणार, मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर तातडीनं आरक्षण देणार, आरक्षण अंतिम टप्प्यात आहे.  24 तारीख,अलटीमेटम करून चालणार नाही असंही महाजनांनी सांगितलं.

दरम्यान, मुंबईतल्या मोर्चावरून मराठा आंदोलकांना नोटीस बजावणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी जरांगे पाटलांनी केलीय. नोटीसा बजावल्या तरी मागे हटणार नसल्याचं जरांगेंनी स्पष्ट केलंय. तर खबरदारी म्हणून पोलिसांनी नोटीसा बजावल्याचा खुलासा ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी केलाय. 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp