by Hansraj Agrawal | Mar 7, 2024 | Trending News
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झालीय, पुढच्या आठवड्यात निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे दोन दिवसांच्या मराठवाड्या दौऱ्यावर आहेत. लातूरमधल्या औसा तालुक्यात उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा
अमित शाह हे शेपूट घाले गृहमंत्री असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. मणिपूर पेटलं तेव्हा तिकडे अमित शाहांनी शेपूट घातलं आणि महाराष्ट्रात फणा उगारतात, अशी टीका उद्धव ठाकरेंनी लातूरमधल्या सभेत केलीय.
मोदी हे नाव नव्हतं तेव्हाही धाराशिव शिवसेनेचंच होतं. हिंमत असेल तर अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरला जावं, असं आव्हानच उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिलं.
उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांचा उल्लेख नागोबा असाही केला. काश्मीरमध्ये जायची त्यांची हिंमत नाही, अरुणाचलमध्ये चीन घुसलंय तिथे जात नाही. या राज्यात त्यांनी शेपूट घातलंय. असा हा शेपूट घाल्या गृहमंत्री महाराष्ट्रात येतो आणि आमच्यावर फणा काढून जातो. पण त्यांची या राज्यांमध्ये जायची हिंमत होत नाही, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.
‘देवेंद्र फडणवीस चोरांचा सरदार’
यावेळी संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केलीय. फडणवीस म्हणजे चोरांचा सरदार, त्यांना आता जेलमध्ये टाकायचंय, असं राऊत लातूरमधल्या औसाच्या सभेत म्हणाले.
शिवसेना-भाजपात वादाची ठिणगी
शिवसेना-भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली. लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून शिंदे गटाचे नेते रामदास कदमांनी भाजपला इशारा दिलाय. केसानं गळा कापू नका, विश्वासघात करू नका, असा इशारा कदमांनी दिलाय. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत जागावाटपावरून रणकंदन सुरू असताना रामदास कदमांच्या थेट इशा-यामुळे शिवसेना-भाजपत वादाची ठिणगी पडलीय.. तर रामदास कदमांनी टोकाचं बोलू नये, आमचं शिंदेंना पूर्ण समर्थन असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. तर संजय राऊतांनी रामदास कदमांना टोला लगावलाय..
बच्चू कडूंचा धक्कादायक दावा
दरम्यान, लोकसभेसाठी उमेदवार शिंदे-अजित पवार गटाचे आणि चिन्हं कमळ असं चित्र पाहायला मिळेल असा खळबळजनक दावा आमदार बच्चू कडू यांनी केलाय. सत्ताधारी पक्षातील आमदारानंच असा दावा केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय. तर आम्ही घड्याळ निशाण्यावरच लढू असं उत्तर मंत्री छगन भुजबळांनी दिलंय.
Source link
by Hansraj Agrawal | Mar 6, 2024 | Trending News
चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, उल्हासनगर : पुरोगामी महाराष्ट्रात आजही अंधश्रद्धा, जादूटोणासारख्या गोष्टींवर विश्वास ठेवला जातो. याचं एक ज्वलंत उदाहरण ठाणे जिल्ह्यातील मुरबाडमध्ये समोर आलं आहे. जादूटोणा करत असल्याच्या संशयातून 75 वर्षांच्या एका वृद्धाला पेटत्या आगीवर नाचवण्यात आलं. महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा (Witchcraft) अस्तित्वात आला तरी देखील या कायद्याला धाब्यावर बसवून दिवसाढवळ्या करणी, जादूटोणा आणि भानामतीचे प्रकार असताना उघड होत आहेत.
काय आहे नेमकी घटना
4 मार्च रोजी रात्री मुरबाड (Murbad) तालुक्यातील केरवेळे गावात गोधळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जागरणाचा गोंधळ सुरू असताना 15 ते 20 जणांचा जमाव त्याच गावात राहाणाऱ्या 75 वर्षांच्या वृद्धाच्या घरात घुसला. जमावाने त्या वृदधाला घरातून ओढत जागरणाच्या ठिकाणी घेऊन गेले. या ठिकाणी आग पेटवण्यात आली होती. त्या आगीवर या वृद्धाला नाचवलं. हा वृद्ध करणी करतो या संशयावरुन त्याला मारहाण देखील करण्यात आली. आगीवर नाचविल्याने त्या 75 वर्षीय वृध्दाचे पाय गंभीररित्या भाजले आहेत. वृद्धाच्या पायाला फोड आले असून पाठिवरही जखमा झाल्या आहेत.
या बाबत या वृद्धाच्या मुलीने मुरबाड पोलिस स्टेशन गाठुन तक्रार दाखल केली. पण पोलिसांनी अद्यापही गुन्हा दाखल केलेला नाही. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. हा वृद्ध व्यक्ती जादूटोणा करतो असा गावातील लोकांचा संशय होता. तसंच त्यांच्या अंगात देव येत असले तर त्यांना आगीवरून चालवल्यावरही काहीही इजा होणार नाही असं गावकऱ्यांना वाटलं, त्यामुळे त्यांची परीक्षा घेण्यासाठी त्यांनी या वृद्धाला आगीवरुन चालवलं. या घटनेने मुरबाड तालुक्यात खळबळ उडाली आहे.
भंडारा जिल्ह्यातही अशीच घटना
काही महिन्यांपूर्वी भंडारा जिल्ह्यातही अशीच घटना उघडकीस आली होती. जादूटोणा करत आपल्या पत्नीला मारल्याच्या संशयातून एका व्यक्तीने आपल्या मित्राच्या मदतीने 45 वर्षीय महिलेची काठिने हल्ला करत हत्या केली. जादूटोणा केल्यामुळे पत्नी मायाबाई हिचा मृत्यू झाल्याचं आरोपीचं म्हणणं होतं. हा राग मनात धरून बदला घेण्यासाठी महिलेची हत्या केल्याची कबुली आरोपी विनोद रामटेके याने दिली.
काय आहे जादूटोणा कायदा?
महाराष्ट्र सरकारने 2013 मध्ये ‘महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अघोरी व दुष्कर्मी प्रथा आणि काळी जादू अधिनियम 2013’, हा कायदा संमत केला. हा फौजदारी कायदा आहे. या कायद्याला जादूटोणा विरोधी कायदा, असंही म्हटलं जातं. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दिवंगत अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांनी या कायद्यासाठी 16 वर्षे संघर्ष केला. त्यांनी या कायद्याचा मसुदा तयार केला होता. सरकारने यासंदर्भातील विधेयक विधिमंडळात मांडले. पण त्याला काही राजकीय पक्षांचा विरोध झाल्याने ते 14 वर्षे अडकले होतं.
Source link
by Hansraj Agrawal | Mar 6, 2024 | Trending News
Lok Sabha Elections 2024 : मागील अनेक वर्षापासून बारामती ही शरद पवारांचीच असे समीकरण गेली सहा दशके राज्यात आहे. परंतू आता हे समीकरण बदलणार का ? अजित पवारांच्या बंडामुळे सुप्रिया सुळे यांच्या लोकसभा निवडणुकीचा मार्ग खडतर झाला आहे का? असा सवाल उपस्थित झाला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडल्याने पवारांचे होम ग्राउंड असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळे यांचे काय होणार? उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप बरोबर सत्तेत जाऊन पक्ष आणि चिन्ह आपल्याकडे घेत आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांना रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतलाय.
तर बारामतीत काका पुतण्याची ताकद किती याच्याच अंदाज घेणं सुरू झालंय. अनेक ठिकाणी नगरसेवक, आमदार यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांचे आगामी लोकसभा निवडणुकीत काय होणार? याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. गेल्या तीन दशकापासून बारामतीचा कारभार शरद पवारांनी अजित पवारांच्या हातात सोपवला. त्यामुळे पक्षाचे पदाधिकरी असतील किंवा कार्यकर्ते असतील यांचा थेट संबंध अजित पवारांशी येत गेला. परंतु अजित पवारांनी जेव्हा बंड केलं तेव्हा बारामतीतील सगळे पदाधिकारी अजित पवारांच्या पाठिमागे उभे राहिले. आगामी लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना पाडण्यासाठी भाजपने चंग बांधला असताना अजित पवारांचे बंड व पत्नी सुनेत्रा पवार यांना आपली बहिण सुप्रिया सुळे यांना आव्हान देणारे ठरणार आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती तालुक्यासह मतदार लोकसभा मतदारसंघात देखील मोठी विकासकामे केले आहेत त्यामुळेच मी दौंडला आले आहे बाकी तुम्ही समजून घ्या, असं सुनेत्रा पवार म्हणाल्या आहेत. तर ही लोकशाही आहे यामध्ये प्रत्येकाला उभे राहण्याचा अधिकार आहे माझी भाजपशी वैचारिक लढाई आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
बारामतीचं गणित कसं?
बारामती लोकसभा मतदार संघात विधानसभा मतदार संघाचे ६ मतदार संघ येतात. बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर हवेली, भोर आणि खडकवासला असे सहा विधानसभा मतदार संघांचा समावेश होतो. यामध्ये राष्ट्रवादीचे दोन, काँग्रेसचे दोन, आणि भाजपचे दोन असे आमदार आहेत. राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे बारामतीत अजित पवार आणि इंदापूरचे दत्तात्रय भरणे, काँग्रेस पक्षाचे भोरचे संग्राम थोपटे आणि पुरंदरचे संजय जगताप भाजपचे दौंडचे राहुल कुल आणि खडकवासला मतदारसंघाचे भीमराव तापकीर असे आमदार आहेत.
सुप्रिया सुळे गड राखणार?
बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार हे महाराष्ट्रातून एक नंबरने विक्रमी मताधिक्याने निवडून आले होते तर सुप्रिया सुळे यांनाही बारामतीतून विक्रमी मतदान मिळाले होते. बारामती विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना मोठ्या प्रमाणात मतदान मिळाले मात्र आता अजित पवार शिंदे गट आणि भाजप यांनी एकत्रित निवडणूक लढवली तर अजित पवार यांचे मताधिक्य आणखीन वाढणार आहे. मात्र, सुप्रिया सुळे यांना बारामती मतदारसंघात समसमान मतदान मिळेल. दौंडचे भाजपाचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी 2019 साली कांचन कुल या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभ्या राहिल्या होत्या. त्यावेळी कांचन कुल यांचा 1 लाख 30 हजार मतांनी पराभव झाला होता.
कोण कोणाच्या बाजूने?
दत्तात्रय भरणे, राहुल कुल, भीमराव तापकीर स्वतः अजित पवार हे सुप्रिया सुळे यांच्या विरोधात प्रचार करतील तर संग्राम थोपटे आणि संजय जगताप हे सुप्रिया सुळे यांचा प्रचार करतील का? याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे. आमदार संजय जगताप हे अजित पवारांमूळ निवडून आले आहेत तर संग्राम थोपटे आणि शरद पवारांचे संबंध सलोख्याचे नाहीत. याचा फटका सुप्रिया सुळे यांना बसू शकतो. राष्ट्रवादीत निर्माण झालेल्या दुफळीमुळे राज्यात, जिल्ह्यात आणि गावागावात राष्ट्रवादी काँगेस मध्ये फूट पडलीये. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील सुप्रिया सुळे यांचे लोकसभा निवडणुकीत काय होणार याकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Mar 5, 2024 | Trending News
Khupte Tithe Gupte : अजित पवारांवरती बायोपिक निघालाच, तर कुठल्या अभिनेत्यानं अजित पवारांची भूमिका करावी, असा प्रश्न झी चित्र गौरव पुरस्कारामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांना विचारण्यात आला. यावेळी त्यांनी डॉ. निलेश साबळे यांचे नाव घेतले.
Source link
by Hansraj Agrawal | Mar 5, 2024 | Trending News
Mumbai Goa Highway: तब्बल 13 वर्ष रखडलेला मुंबई गोवा महामार्ग लवकरच प्रवाशांसाठी खुला होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या लोकार्पणाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. गणपतीला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ही बातमी दिलासादायक ठरु शकते.
मुंबईहून कोकण आणि गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास जलद आणि आरामदायी व्हावा यासाठी मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू आहे. मात्र, गेल्या कित्येक वर्षांपासून या महामार्गाचे काम रखडलेले आहे. गौरी-गणपतीला आणि होळीला मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणात जातात. मात्र रखडलेल्या महामार्गामुळं प्रवास करणे कठिण होते. तसंच, वाहतुककोंडीचा सामनाही करावा लागतो. मात्र, यंदा हा त्रास वाचण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर 2024 पर्यंत मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर सिंधुदुर्गाकडे जाणारा दुसरा रस्ता आणि पुढे गोव्याकडे जाणाऱ्या ग्रीनफिल्ड कॉरिडॉरचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. यामुळं कोकणातील प्रवाशांना थेट रस्ता उपलब्ध होणार आहे.
कोकणासाठी महत्त्वाचा मार्ग
ग्रीनफिल्ड कोकण एक्स्प्रेस वे नावाने ओळखला जाणारा हा रस्ता मुंबईला रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील सागरी किनाऱ्यांवरील शहरांशी जोडतो. हा महामार्ग मुंबईला कोकणासह गोवा, कर्नाटक, केरळ या राज्यांशी जोडणाऱ्या NH 66 या मार्गाचा भाग असून पनवेलपासून सुरू होणारा हा रस्ता गोव्याच्या पणजीमधून पुढे कन्याकुमारीपर्यंत जातो.
उच्च न्यायालयाने खडसावले
गेल्या कित्येक वर्षापासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावरुन उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. गेले दशकभर या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम रखडले आहे. हा प्रकल्प कधी पूर्ण होणार? याची अंतिम तारीख न्यायालयाने सरकारला विचारली असता राज्य सरकार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 31 डिसेंबर 2024 पर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होईल, असं आश्वासन दिलं आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरण आणि दुरुस्तीच्या इतर कामांसह इतर सर्व गोष्टीची कामं 31 डिसेंबर 2024च्या आत पूर्ण करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
गणपतीच्या आधी पूर्ण होणार का?
यंदा 7 सप्टेंबर 2024 रोजी गणेश चतुर्थी असून 16 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असणार आहे. त्यामुळं यंदा तरी चाकरमान्यांना मुंबई-गोवा महामार्गाने प्रवास करता येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Mar 4, 2024 | Trending News
भांडुप येथील SBI बँकेत विचित्र प्रकार घडला आहे. बँक मॅनेजरने जुगार खेळण्यासाठी ग्राहकांनी बँकेत गहाण ठेवलेल्या 3 कोटींच्या सोन्यावर डल्ला मारला आहे.
Source link