by Hansraj Agrawal | Dec 4, 2023 | Trending News
Manoj Jarange : मनोज जरांगेंनी सरकारला दिलेला अल्टिमेटम संपायला काही दिवस बाकी आहे, त्यात जरांगे-पाटील मंत्री गिरीश महाजनांवर चांगलेच संतापलेत. गिरीश महाजनांनी चुकीची वक्तव्य करु नयेत, नाहीतर त्यांच्या बोलण्याची रेकॉर्डिंग आमच्याकडे आहेत असा थेट इशारा जरांगे-पाटलांनी दिला आहे.
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाहीत असं विधान मंत्री गिरीश महाजनांनी केलं होतं, त्यामुळे जरांगेंचा तिळपापड झालाय. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाहीत असं विधान मंत्री गिरीश महाजनांनी केलं होतं, त्यामुळे जरांगेंचा तिळपापड झालाय.
आधीच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ विरुद्ध जरांगे-पाटील असा सामना सुरु आहे. त्यात गिरीश महाजनांच्या रुपानं दुसरा मंत्री सरकारच्या निशाण्यावर आलाय.
जरांगे विरुद्ध भुजबळ वाद
मलकापूरमधल्या सभेत मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा छगन भुजबळांवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी आपल्या भाषणात भुजबळांचा उल्लेख ‘येडपट येवल्याचं’ असा केला. ओबीसी नेत्याचं ऐकू नका, असं आवाहन त्यांनी केलं. न्यायमूर्ती शिंदे समितीचा दुसरा अहवाल 9 डिसेंबरला येणाराय. 32 लाख पुरावे सापडल्यानं आता मराठ्यांना आरक्षण द्यावंच लागेल, असंही जरांगेंनी ठणकावून सांगितलं.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आपला विरोध नाही. मात्र त्यांना ओबीसींमधून आरक्षण देऊ नये ही आपली एकट्याचीच मागणी नाही. तर कुणबी समाजासह सर्व नेत्यांची हीच मागणी आहे. त्यामुळे जरांगेंनी आपल्यालाच टार्गेट करू नये असं छगन भुजबळांनी म्हंटलंय. जरांगेंनी भुजबळांचा एकेरी उल्लेख करत त्यांना लक्ष केलं होतं, त्याला भुजबळांनी उत्तर दिलंय.
24 डिसेंबरला सरकार अडचणीत आलं तर आम्ही जबाबदार नाही – जरांगे यांचा इशारा
मराठा आरक्षणासंदर्भात शिंदे, फडणवीस, अजित पवारांनी लक्ष घालावं. अन्यथा 24 डिसेंबरला सरकार अडचणीत आलं तर आम्ही जबाबदार नाही, असा इशारा मनोज जरांगेंनी दिलाय. त्याचबरोबर आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये 17 डिसेंबर रोजी बैठक होणार आहे. मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला बैठकीसाठी हजर राहण्याचं आवाहन केलंय. जळगाव दौ-यावर असताना जरांगे बोलत होते.
Source link
by Hansraj Agrawal | Dec 4, 2023 | Trending News
Pune Crime : आईच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी मुलाने मालकावर कोयत्याने हल्ला केल्याचा प्रकार पुण्याच्या लष्कर भागाता घडला आहे. पोलिसांनी आरोपी आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Dec 3, 2023 | Trending News
सांगलीतील रिलायन्स दरोडा प्रकरणी मुख्य सूत्रधाराला बिहारच्या तुरुंगातून अटक करण्यात आली आहे. जेलमधून बसून त्याने हा दरोडा घातला.
Source link
by Hansraj Agrawal | Dec 3, 2023 | Trending News
Michaung Cyclone : हवामान विभागाच्या माहितीनुसार, चक्रीवादळाचा फटका आज रविवारी महाराष्ट्रासह इतर राज्यांना बसणार आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे चक्रीवादळ होण्याची दाट शक्यता आहे. ‘मिचाँग’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
राज्यात पावसाची शक्यता
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र अधिक मजबूत होऊन त्याचं चक्रीवादळात रुपांतर होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच मोठं नुकसान झालं आहे. मुंबई, ठाणे, पालघर या भागांमध्ये गारठा जावण्याची दाट शक्यता आहे. मात्र कोकणात मात्र हवामान अतिशय कोरडं पाहायला मिळणार आहे.
मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. IMD च्या अंदाजानुसार, वाशिम, बुलढाणा, अमरावती, अकोला येथे वादळासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यात धडकलेल्या चक्रीवादळामुळे राज्यात पावसाची संततधार सुरू आहे. महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असून काही भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पुढील काही दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची योग्य काळजी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
चक्रीवादळामुळे भारतीय हवामान विभागाने तमिळनाडू, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. येत्या २४ तासांत महाराष्ट्रातही पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. त्यामुळे आधीच शेतीचे मोठे नुकसान झाले असून आता पुन्हा एकदा राज्यात २४ तास पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात गेली काही दिवसांपासून पहाटेच्या वेळी दाट धुके पसरल्याचे दिसून येत आहे. शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी येथे उच्चांकी ३२.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवला गेला आहे तर महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १६.१ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Dec 2, 2023 | Trending News
Honey Bee Attack : मधमाश्यांच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर, दाेघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालायत उपचार सुरू आहेत. लातुरमधील निलंगा तालुक्यातील ममदापूर येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
शेताकडे जात असताना बारा वर्षीय बालकावर आणि एका वृद्धावर मधमाशांनी अचानक हल्ला केला. यात बालक आणी वृध्द हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. तर, त्या दोघांना वाचवण्यासाठी गेलेल्या शेतकरी विश्वभंर बिराजदार यांचा मधमाशांच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. यामध्ये जखमी झालेला मुलगा आणि आजाेबावर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत.निलंगा तालुक्यातील ममदापूर येथील ही धक्कादायक घटना घडली आहे.
अंत्ययात्रेदरम्यान मधमाशांचा हल्ला; मृतदेह खाली ठेऊन नागरिक सैरावैरा पळाले
भंडा-यामध्ये मधमाशांनी नागरिकांवर हल्ला चढवलाय. यात तब्बल 200 नागरिक जखमी झालेत. तुमसर तालुक्यातील बाम्हणी इथल्या वैनगंगा नदीकाठी हा प्रकार घडलाय. अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाच्या अंत्ययात्रेदरम्यान मधमाशांनी हा हल्ला चढवलाय. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळ उडाला… मृतदेह खाली ठेऊन नागरिक सैरावैरा पळू लागले. अखेर आनेकांनी मधमाशांपासून सुटका करून घेण्यासाठी नदीत उड्या मारल्या. यावेळी काही तरुणांनी मोठ्या हिमतीनं पार्थिव नेऊन त्यावर अंत्यसंस्कार केले.
भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात हरदोली-झंझाळ इथं स्मशानभूमीत मधमाशांनी नागरिकांवर हल्ला केला. स्मशानभूमीत अंत्यसंस्कारावेळीच हा प्रकार घडला. चितेला अग्नी देताच जवळच्याच झाडावरील मधमाशांचा थवा आक्रमक झाला आणि त्यांनी तिथं जमलेल्या नागरिकांवर हल्ला चढवला. यात गेल्या काही दिवसातील भंडारा जिल्ह्यातील दुसरी घटना आहे.
राजगड किल्ल्यावर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला
राजगड किल्ल्यावर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केलाय. मधमाशांच्या हल्ल्यात 20 ते 25 पर्यटक जखमी झाले असून त्यातील एक जण बेशुद्ध पडलाय. सुवेळा माची परिसरात ही घटना घडलीये.. अचानक मधमाशांच्या थव्यानं हल्ला केल्यानं किल्ल्यावर एकच धावपळ उडाली. मधमाशांपासून वाचण्यासाठी काही पर्यटक गवतात लपून बसले.
गणपती विसर्जनावेळी मधमाशांनी ग्रामस्थांवर हल्ला
गणपती विसर्जनावेळी मधमाशांनी ग्रामस्थांवर हल्ला करत त्यांचा चावा घेतला. हिर्डोशी गावात नीरा देवधर धरणाच्या काठावर गणपती विसर्जनासाठी नागरिक आले होते. आरती करत असताना अचानक मधमाशांना ग्रामस्थांवर हल्ला चढवला. यात लहान मुलांसह, महिला आणि पुरुष अशा एकूण 100 पेक्षा जास्त जणांचा मधमाशांनी चावा घेतला. अखेर विसर्जन न करताच ग्रामस्थांवर तिथून निघून जाण्याची वेळ ओढवली. मधमाशा गेल्यानंतर मग काही ग्रामस्थांनी काठावर जात विसर्जन पार पाडलं.
Source link
by Hansraj Agrawal | Dec 2, 2023 | Trending News
अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नागपूर येथील खासदार सांस्कृतिक महोत्सवाला शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावले होती. यावेळी त्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. राजकारणात सारेच असूर नसतात सुरेल माणसेही असतात, असे म्हणत मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. यावेळी महोत्सवाचे आयोजक केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार कृपाल तुमाने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या संदर्भात मी संदर्भात मी बरच ऐकलं. राज्याच्या उपराजधानीत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे कलावंत इथं येतात. सुप्त कलागुणांना वाव देण्याचा एक व्यासपीठ इथं उपलब्ध करून देतात. मुंबई सारख्या मोठ्या शहरात अनेक मोठे कार्यक्रम होतात. मात्र नागपूर सारख्या ठिकाणी सर्वोत्कृष्ट कलावंत आणून त्यांचे कार्यक्रम होते त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा अभिनंदन करतो. आपला आग्रह म्हणजे प्रेमाचा आदेशच असतो. मलाही इथे उपस्थित राहताल यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंद म्हणाले.
“गडकरी साहेब जसे दर्दी आहे तसे खवय्ये सुद्धा आहेत. गडकरी यांचं बोलणं हे सावजीच्या रस्या सारखा झणझणीत असतं. त्यामुळे आपण बोलवल्यानंतर मी काय देवेंद्रजी काय नाही कसं म्हणू शकतो. आपल्या विभागामार्फत जे काम करत आहे देशभरात जे रस्त्याचं जाळ निर्माण करत आहे. ते देशाच्या विकासासाठी आवश्यक आहे. आपलं फार मोठे योगदान त्यात आहे. मला एम एस आर डी सी हे खाता जेव्हा दिल त्यावेळेस गंमत सांगायचं म्हणजे हे खातं साडेसहा कोटीने तोट्यात होतं. मला तेव्हा असं सांगण्यात आलं हे खात गडकरी साहेबांनी चालवलं. बाळासाहेबांच्या संकल्पनेतील एक्स्प्रेस हायवे त्यांनी पूर्ण केला. अनेक उड्डाणपूल बांधले. त्यावेळेस अनेक लोक म्हणतात हे कशासाठी. मात्र आज त्यांची दूरदृष्टी पाहता ते उपयोगी पडत आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
“मला देवेंद्रजी म्हणाले एमएसआरडीसी हे डब्यात गेलेले खातं शिंदे साहेब तुम्ही पाहा. शिंदे साहेब बघा लक्षात ठेवा तुम्ही बघा एमएसआरडीसीला इतका मोठे करू की तुम्ही एमएसआरडीसी हे खाते सोडणारच नाही. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना समृद्धीसारखा महामार्ग झाला. अनेक प्रकल्प झाले. नितीन गडकरी आपण देशभरात रस्त्याचं जाळ निर्माण करताय. विकास पुरुष म्हणून आपली छबी निर्माण झालेली आहे. या महोत्सवातून राज्याची परंपरा संस्कृती जोपासत आहे,” असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.
“नितीन गडकरी पण कलाकार आहेत. त्यांनी मुझसे नाराज नही हे गाणं म्हटलं होतं. देवेंद्र फडणवीस आणि माझा सूर एकच आहे. पण त्यांनी गायलेलं श्रीवल्ली हे गाणं फार व्हायरल झाल आहे. दोन्ही नागपूरकर (फडणवीस, गडकरी) अस्सल कलाकार सुद्धा आहे. म्हणून राजकारणात सारेच असूर नसतात सुरेल माणसेही असतात. आजकाल राजकीय प्रदूषण वाढलेले आहे. मी त्यावर बोलणार नाही. मात्र नितीन गडकरींसारख्या माणसांचा खेळीमेळीच्या वातावरणात हलक फुलक बोलून राजकीय प्रदूषण दूर करण्यात त्यांचा हातखंडा आहे,” असे म्हणत मुख्यंत्र्यांना टोला लगावला.
Source link