विधीमंडळाच्या लॉबीत शिंदे गटात राडा, महेंद्र थोरवे-दादा भुसे एकमेकांना भिडले?

विधीमंडळाच्या लॉबीत शिंदे गटात राडा, महेंद्र थोरवे-दादा भुसे एकमेकांना भिडले?


Shinde Group Conflict: शिंदेच्या आमदारांमध्ये विधीमंडळाच्या लॅाबीत राडा झाल्याचे वृत्त आहे. कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे मंत्री दादा भुसे भिडल्याचे वृत्त समोर आले आहे. दोघांमध्ये धक्काबुक्की झाल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर भरतशेठ गोगावले आणि मंत्री शंभुराजे देसाई यांनी मधस्थी केली. दोघांच्या भांडणानं विधीमंडळाच्या लॅाबीत खळबळ माजली. रस्त्याच्या कामावरून हा वाद झाला आहे. शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या राड्यावरुन शिंदे सरकारवर टीका केली आहे. 

दरम्यान असं काही झालंच नसल्याचा दावा शंभुराज देसाई यांनी केलाय. विधिमंडळात राडा झाल्याचा काय पुरावा आहे? तिथे कोणताही कॅमेरा नाही. मग राडा झाला असं कोण म्हणत? असा उलटप्रश्न त्यांनी माध्यमांना विचारला.  आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली नाही. चर्चा करताना दोघांचा आवाज वाढला असे, शंभुराज देसाई म्हणाले. 

आताही सुरुवात आहे. पिक्चर अजून बाकी आहे. निवडणुका होईपर्यंत अजून काय काय होतंय हे पाहा, असे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी म्हणाले. या सरकारमध्ये कोणाला शिस्त नसल्याचे ते म्हणाले. 

असा कुठलाही वाद झालेला नाही. आम्ही सर्व एकत्र तिथं होतो, चहाही घेतला सोबत. पण वाद झालेला नाही, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी दिली. 

काय घडला प्रकार?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहामध्ये आले होते, त्यावेळी शिवसेना प्रवक्ते भरत गोगावले आणि इतर शिंदे गटातील आमदारही त्यांच्यासोबत होते. एकनाथ शिंदे हे सभागृहात गेल्यानंतर महेंद्र थोरवे आणि दादा भुसे यांच्यात लॉबीमध्ये धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आली आहे. हा वाद नेमका कोणत्या कारणांनी झाला, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण या वादामुळे एकाच पक्षातील दोन नेत्यांमध्ये वाद झाल्यामुळे राजकीय वर्तुळात पक्षांतर्गत कलहाच्या चर्चा सुरु झाल्या आहे

महायुती सरकारमध्ये एकाच पक्षातील दोन आमदारांमध्ये अशाप्रकराची धक्काबुक्की होण्याची ही पहिलीच घटना आहे. एकीकडे गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकारमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत आहे. त्यात आता या घटनेमुळे राजकीय वर्तुळात वातावरण तापलं आहे. दरम्यान महेंद्र थोरे आणि दादा भुसे यांच्यात लॉबीमध्ये वाद झाला. यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेले भरत गोगावले आणि मंत्री शंभूराजे देसाई यांनी त्यांच्या मध्यस्थी केली आणि त्यांनाथांबण्याचा प्रयत्न केला.

कामकाज एक तासासाठी तहकूब

राज्याचे मंत्री दादा भुसे आणि शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांच्यात  विधानभवनात बाचाबाची झाल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित करत याबद्दल खुलासा करण्याची मागणी केली .या घटनेनबद्दल तपासून माहिती घेतली जाईल असं उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं. तसंच तोपर्यंत अर्थसंकल्पावरील चर्चेला मंत्री केसरकर उत्तर देतील असं त्या म्हणाल्या. मात्र विरोधकांचं समाधान झालं नाही. यावेळी उपसभापती आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. यानंतर उपसभापतींनी उद्विग्न होऊन कामकाज एक तासासाठी तहकूब केलं.





Source link

मुंबईतील राणीच्या बागेतील पेंग्विन्सची डिमांड वाढली; गुजरातसह अनेक राज्यांनी केली पेंग्विन्स देण्याची मागणी

मुंबईतील राणीच्या बागेतील पेंग्विन्सची डिमांड वाढली; गुजरातसह अनेक राज्यांनी केली पेंग्विन्स देण्याची मागणी



मुंबईतील राणीच्या बागेतील पेंग्विन्सची मागणी देशभरातून वाढली आहे. 



Source link

पुणे हादरलं: जुना राग मनात ठेवून ओल्या पार्टीला बोलावलं, मग Live Stream करून केला ‘गेम’

पुणे हादरलं: जुना राग मनात ठेवून ओल्या पार्टीला बोलावलं, मग Live Stream करून केला ‘गेम’


पुढील
बातमी

शिंदे गटाचा बडा नेता अजित पवार गटात? महायुतीचा उमेदवार स्वॅपिंग फॉर्मुला





Source link

सरकारचा मोठा निर्णय; मराठी विषय न शिकवणाऱ्या शाळांची मान्यता रद्द होणार

सरकारचा मोठा निर्णय; मराठी विषय न शिकवणाऱ्या शाळांची मान्यता रद्द होणार



शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्याबाबतच्या अधिनियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. या अंतर्गत मराठी विषय न शिकवणाऱ्या शाळांची मान्यता रद्द होवू शकते. 



Source link

यवतमाळ : मोदींच्या सभेतील खुर्च्यांवर राहुल गांधीचे स्टीकर्स, काँग्रेसला देणगी देण्यासाठी Scan Code

यवतमाळ : मोदींच्या सभेतील खुर्च्यांवर राहुल गांधीचे स्टीकर्स, काँग्रेसला देणगी देण्यासाठी Scan Code


PM Modi Yavatmal Rally Chairs With Rahul Gandhi Photo: यवतमाळमध्ये आज दुपारी साडेचारच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. सदर सभेसाठी दीड ते 2 लाख महिला उपस्थित राहणार असल्याने 26 एकरांवर सभा मंडप टाकण्यात आला आहे. मात्र या सभेसाठी केलेल्या तयारीमधील खुर्चांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे. पंतप्रधान मोदींच्या सभास्थळी ठेवण्यात आलेल्या खुर्चांच्या मागील बाजूस चक्क सातत्याने भारतीय जनता पार्टीवर टीका करणारे काँग्रेसचे खासदार राहुल गांधींचा फोटो असल्याचं दिसून येत आहे. सदर बाब लक्षात आल्यानंतर आयोजकांची तारंबळ उडाली असून तातडीने हे स्टीकर्स काढण्याचे प्रयत्न सुरु झालेत.

नेमकं घडलं काय

संजय राठोड यांनी ‘झी 24 तास’ला दिलेल्या माहितीनुसार, केंद्रातील लोकांनी थेट या खुर्चा आणून सभा स्थळी ठेवल्या. मात्र या खुर्चांवर राहुल गांधींचे स्टीकर्स असल्याचं समजल्यानंतर येथील महायुतीच्या समन्वयकांना निरोप आला. त्यानंतर या मंडपामधील खुर्चांवरील राहुल गांधींचे स्टीकर्स काढण्याचं काम सुरु करण्यात आलं. मात्र मोदींच्या सभेची एवढी जय्यत तयारी केलेली असताना त्यात राहुल गांधींच्या स्टीकर्स खुर्चा दिसल्याने आयोजनामध्ये समन्वयाचा आभाव राहिल्याचं दिसून आल्याची चर्चा आहे. सदर घटना ही येथील स्थानिक केंद्रातील लोकांच्या चुकीमुळे घडल्याचं राठोड यांनी स्पष्ट केलं. 

या स्टीकर्सवर काय लिहिलेलं आहे?

मोदींच्या सभेतील खुर्चांवर लावण्यात आलेल्या स्टीकर्सवर राहुल गांधी नमस्कार करताना दिसत आहेत. त्याच्या बाजूला एक स्कॅन कोडही देण्यात आला आहे. या स्टीकर्सवर “138 वर्षांपासून एका चागंल्या भारताच्या निर्माणासाठी संघर्ष करत आहोत”, असा संदेश काँग्रेसचा प्रचार करण्यासाठी आणि संघर्ष अधोरेखित करण्याच्या उद्देशाने लिहिला आहे. फोटोवरील स्कॅन कोड काँग्रेसला देणगी मिळविण्यासाठी स्कॅन कोडही देण्यात आला आहे. मोदींच्या सभेत काँग्रेसला देणगी देण्यासाठीच्या स्कॅन कोड्सचे स्टीकर्स लागल्याने ही सभा पंतप्रधान नरेंद्र मोदींची की राहुल गांधींची अशी चर्चा स्थानिकांमध्ये आहे.

रोहित पवारांचा खोचक टोला

शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणावरुन भाजपावर खोचक शब्दात निशाणा साधला आहे. “या स्टीकर्सच्या माध्यमातून भाजपाचे पदाधिकारी तेथील नागरिकांना संदेश देत आहेत. इथं या भाषण ऐका, जेवण करा आणि शेवटी मतदान हे काँग्रेस आणि मित्र पक्षांनाच करा हा संदेश भाजपाचेच नेते देत असतील तर त्याला आम्ही काय करणार? मात्र हा संदेश अधिक योग्य आहे. येत्या काळात भाजपाला सर्व मतदार नाकारतील हे आपल्याला बघायला मिळेल,” असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> ₹4900 कोटींचे प्रकल्प आणि मोदींचा आजचा यवतमाळ दौरा! राज्यातील 88 लाख शेतकऱ्यांना फायदा

निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर महत्त्व अधिक

आगामी लोकसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन फार मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकल्पांचं उद्घाटन आणि शुभारंभ पंतप्रधान मोदींच्या हस्ते केलं जाणार आहे. या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. मागील महिन्याभरामधील पंतप्रधान मोदींचा हा तिसरा महाराष्ट्र दौरा असणार आहे. त्यावरुनच महाराष्ट्राकडे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्राचं विशेष लक्ष असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र त्यात हा राहुल गांधींच्या खुर्च्यांचा घोळ झाल्याने उलट सुलट चर्चा सुरु आहेत.

मोदी करणार अनेक प्रकल्पांचं उद्घाटन

पंतप्रधान मोदी आजच्या दौऱ्यादरम्यान 4,900 कोटी रुपयांच्या वेगवेगळ्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. यामध्ये वर्धा-कळंब या 39 किलोमीटरच्या ब्रॉडगेज रेल्वे लाइन मार्गाचाही शुभारंभ होणार आहे. तसेच नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दुसरा आणि तिसरा हफ्ता वितरित केला जाणार आहे. पीएम किसान सन्मान निधीचा 16 वा हफ्ताही याच कार्यक्रमात वितरित केला जाईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांसहीत संपूर्ण मंत्रीमंडळच हजर राहणार आहे.





Source link

मनोज जरांगेंना बीडमधून उमेदवारी देणार? पत्रकारांचा प्रश्न ऐकताच शरद पवार खदकन हसले अन्…

मनोज जरांगेंना बीडमधून उमेदवारी देणार? पत्रकारांचा प्रश्न ऐकताच शरद पवार खदकन हसले अन्…


पुढील
बातमी

‘बोलवता धनी कोण?..’, ‘त्या’ भेटीत जरांगेंशी काय बोललो? शरद पवारांनी सर्वच सांगितलं…





Source link

YouTube
Instagram
WhatsApp