by Hansraj Agrawal | Feb 27, 2024 | Trending News
Pune News: पुणे ग्रामीण पोलिसांनी अवैध व्यवसायावर मोठी छापेमारी केली आहे. यावेळी पुणे शहराजवळ पोलिसांनी मोठा दारूसाठा जप्त केला आहे. ड्रग्स प्रकरणानंतर आता अवैध मद्य विक्रीवर पोलिसांची करडी नजर आहे. उरुळी कांचन पोलीसांची मोठी कारवाई केली आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Feb 26, 2024 | Trending News
पुढील
बातमी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय, तुमच्यासाठी महत्त्वाची सूचना; खोपोली एक्झिटपासून…
Source link
by Hansraj Agrawal | Feb 25, 2024 | Trending News
Devendra Fadnavis On Manoj Jarange : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, अशा मागणीसाठी सगेसोयरेच्या मागणीवर ठाम असलेल्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर घणाघाती टीका केली. जालन्यातील अंतरवाली सराटीत पत्रकार परिषदेत यामुळे मोठा गोंधळ उडाल्याचं पहायला मिळालं. मला विष देण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करत मनोज जरांगे पाटील यांनी सागर बंगल्यावर येण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर अंतरवाली सराटीत मोठा गोंधळ उडाल्याचं पहायला मिळालं. अशातच आता मनोज जरांगेंच्या आरोपावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
मनोज जरांगेंवर कारवाई करणार का? असा सवाल देवेंद्र फडणवीसांना विचारला गेला. तेव्हा, सागर बंगला हा सरकारी बंगला आहे, तिथं कोणालाही अडवलं जाणार नाही. जरांगेंना कुठली सहानुभूती घेयचीये, मला माहित नाही. त्यांचे आरोप धादांत खोटे आहेत. मराठा आरक्षण मी हायकोर्टात टिकवलं. मी सर्वोच्च न्यायालयात देखील आरक्षण टिकवलं. माझ्यानंतर जे मुख्यमंत्री आले, त्यांना ते टिकवता आलं नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली आहे.
जी स्क्रिप्ट आत्तापर्यंत उद्धव ठाकरे बोलत होते, पवार साहेब बोलत होते, तीच स्क्रिप्ट, तेच विषय जरांगेंनी का मांडावे? असा प्रश्न आहे. याच्याच्या पाठीशी काय आहे? मुख्यमंत्र्यांनी जे काही सांगतं, त्याची काही कल्पना आमच्याकडे आहे. कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही. कुणीही आंदोलन केलं तर आमची काहीही हरकत नाही, परंतू कायदा आणि सुव्यवस्था जर बिघडवली तर कारवाई करावी लागेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, 1 सीएम, 2 डीसीएम या तिघांपैकी जनरल डायर कोण? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी केलाय. जरांगेंच्या आरोपानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केलीय. जनरल डायर कोण, हे समजायला पाहिजे. वरिष्ठांच्या आदेशाशिवाय पोलीस लाठीचार्ज करणार नाहीत, असंही ते म्हणाले. तर मनोज जरांगे हा आधीपासूनच दिशाहीन आहे. जो दिशाहीन आहे तो दिशा काय ठरवणार? अशा शब्दात भुजबळांनी जरांगेंवर टीका केलीय. सगेसोयरेबाबत सरकार अंमलबजावणी करत नसल्याने आज जरांगेंनी निर्णायक बैठक बोलावलीय. या बैठकीत पुढची दिशा ठरवली जाणार आहे. या बैठकीवरून भुजबळांनी जरांगेंवर निशाणा साधलाय.
Source link
by Hansraj Agrawal | Feb 25, 2024 | Trending News
Kashedi Tunnel : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय ठरणा-या बोगद्यातून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Feb 24, 2024 | Trending News
Sanjay Gaikwads Problems: आमदार संजय गायकवाड यांच्या गळ्यातील वाघाच्या दाताबद्दल वक्तव्यामुळे अडचणी वाढणार आहेत. बुलढाणा येथील शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवजयंती दिवशी त्यांच्या गळ्यातील वाघाच्या दातासंदर्भात वादग्रस्त विधान केले होते. गायकवाडांनी केलेल्या वक्तव्यावरून वन विभागाच्या पथकाने त्यांचे स्टेटमेंट नोंदविले आहे. वनविभागाने त्यांच्यावर आज गुन्हा दाखल केला आहे.
बुलढाणा विधानसभा सदस्य संजय गायकवाड यांनी एक विधान केले आहेत. 1987 साली मी वाघाची शिकार केली आणि तो दात माझ्या गळयात असे विधान केले आहे. त्याबद्यलची ध्वनीचित्रफित समाज मध्यमावर प्रसारित झाली आहे. त्याची दखल घेऊन बुलढाणा वनविभागाने वाघाचा दात रितसर ताब्यात घेण्यात आल्याची माहिती वनविभागाने दिली.
यासंदर्भात वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, 1972 अतर्गत बनगुन्हा क्रमांक-636/3/24 दिनांक-23.02.2024 नोंदविण्यात आला आहे. हा दात न्यायवैधीकीय तपासणीसाठी (Identification) तज्ञ संस्थेकडे पाठविण्यात आला आहे. याचा अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक वनसंरक्षक (प्रा व कैम्पा) बुलढाणा हे करीत आहेत.
आमदारांच्या गळ्यातील तो वाघाचा दात सदृश्य वस्तूसुद्धा वन विभागाचे पथकाने जप्त केल्या आहेत. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे..वाघदात सदृश वस्तू वन विभागाने ताब्यात घेतली आहे. ही वस्तू देहरादून येथील वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूटमध्ये डीएनए तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. बुलढाणा वनपरिक्षेत्र अधिकारी अभिजीत ठाकरे यांनी यासंदर्भातील माहिती दिली.
बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी 19 फेब्रुवारी रोजी एका स्थानिक प्रसारमाध्यमाला त्यांच्या वेशभूषेसंदर्भात मुलाखत दिली होती. गळ्यातील दात हा वाघाचा असून 1987 मध्ये त्याची शिकार केल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते.
व्हिडीओ व्हायरल
आमदार गायकवाडांचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरलही होतोय. आता यासंदर्भातील अहवाल आल्यानंतर प्रत्यक्ष नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट होईल, असे बुलढाणा प्रादेशिक वन विभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी अभिजीत ठाकरे यांनी सांगितले. हा दात खरंच वाघाचा असेल तर यामधे 3 वर्षांच्या शिक्षेचे प्रावधान असल्याचेही ठाकरे यांनी सांगितले.
Source link
by Hansraj Agrawal | Feb 24, 2024 | Trending News
छत्रपतींचे कधीच नाव घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवला, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शरद पवारांवर केली. तुम्ही शाहू, फुले, आंबेडकरांचे नाव घेता पण छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव कधी घेत नाही, असा प्रश्न मी त्यांना विचारला होता. छत्रपतींचे नाव घेतल्यास मुसलमानांची मतं मिळत नाहीत, असे म्हणत त्यांनी पवारांवर टिका केली. शरद पावर यांना तुतारी निशाणी मिळाला आहे तर फुका..महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चिखल झालाय अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
Source link