by Hansraj Agrawal | Nov 28, 2023 | Trending News
Abhijeet Bichukale Milking Ceremony: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते 28 मे 2023 रोजी संसदेच्या नवीन वास्तूचं उद्घाटन करण्यात आले. संपूर्ण देशासाठी हा ऐतिहासिक क्षण होता. संसदेची इमारत साधारण 100 वर्षे जुनी असून त्यात खासदारांना बसण्यासाठी पुरेशी जागा नसल्याचे केंद्र सरकारने म्हटले होते. दरम्यान नव्या संसदेला काय नाव द्यायच? यावरुन देशभरात चर्चा सुरु आहे. दुसरीकडे साताऱ्यात प्रसिद्ध अभिनेते आणि कवी अभिजीत बिचुकले यांचा दुग्धाभिषेक करण्यात आला आहे. या दोन घटनांचा एकमेकांशी काय संबंध असा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असले. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाकडून सातारा येथे अभिजीत बिचुकले यांचा दुग्धाभिषेक करण्यात आला. नव्या संसद भवनाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी अभिजीत बिचुकले यांनी केली होती. यामुळे साताऱ्यातील आरपीआय गटाने हा निर्णय घेतला. भारत देशाच्या सर्वोच्च सभागृहाला बाबासाहेबांचे नाव देणारा नेता, अभिनेता हा सातारा जिल्ह्यातील सुपुत्र आहे, याचा आम्हाला अभिमान असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या दुग्धाभिषेकानंतर अभिजीत बिचुकले यांनी माध्यमांशी संवाद साधला. देशात नवी संसद उभारण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेबांचे नाव नव्या संसदेला द्यावे, असे पत्र मी पंतप्रधान मोदींना लिहिले. अशी मागणी करणारा मी पहिला भारतीय आहे. यामुळे माझ्या नकळत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने माझा दुग्धाभिषेक करण्याचा निर्णय घेतला. दुग्धाभिषेकाला स्मरुन मी सांगतो, माझा लढा सुरु झाला आहे. नवीन संसद भवनाला संविधान निर्माते डॉ. बाबासाहेबांचे नाव द्यावे, यासाठी मी उरुन पुरुणार आहे, असे यावेळी त्यांनी सांगितले.
सोशल मीडियात हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अभिजित बिचुकले यांचे कौतूक केले जात आहे. आज अभिजीत बिचुकले सारख्या नेतृत्वाची देशाला आणि लोकशाहीला वाचवू शकते, अशा कमेंट लिहिल्या गेल्या आहेत.
तसेच मागणी खूप सुंदर आहे. नक्कीच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच नाव दिलं पाहिजे. पण त्यांच्याच पुतळ्यासमोर एखाद्या व्यक्तीच्या अंगावर दूध टाकून असा अभिषेक करणे हे चुकीचे आहे. नक्कीच तुमच्या मागणीला यश लाभो ही प्रार्थना करतो. पण कृपया करून बाबासाहेबांचे नाव घेऊन अशी स्टंटबाजी करू नये, अशी प्रतिक्रिया दुसऱ्या एका युजरने लिहिली आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Nov 27, 2023 | Trending News
बोरिवली रेल्वे स्थानकात अत्यंत विचित्र घटना घडली आहे. विना तिकीट प्रवास करणाऱ्या एका तरुणीने रेल्वे टीसीला मारहाण केली आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Nov 27, 2023 | Trending News
वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव : नाशिकमध्ये (Nashik Accident) रविवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच जळगाव जिल्ह्यात आणखी एक मोठा अपघात झाला आहे. चाळीसगावानजीक कन्नड घाटात तवेरा गाडीचा अपघात झाल्याने चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. देवदर्शनावरुन परतत असताना हा भीषण अपघात झाला. गाडीतील सात जण देखील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातातील मृतांमध्ये एका आठ वर्षाच्या मुलीचा देखील समावेश आहे.
देवदर्शनावरून घरी येत असताना चाळीसगावाजवळील कन्नड घाटात रात्री 12 वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. रात्रीचा अंधार आणि धुक्याचा अंदाज न आल्यामुळे गाडी थेट खोल दरीत कोसळली. गाडीमध्ये एकूण 11 जण प्रवास करत होते. त्यातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन महिला एक पुरुषाचा समावेश आहे. तवेरा गाडीतून हे सर्वजण रात्रीच्या सुमारास घरी परतत होते. मात्र त्याआधीच कन्नड घाटात त्यांची गाडी दरीत कोसळली. गाडीतील सर्वजण हे मालेगाव येथील रहिवासी आहेत. घटनेची माहित मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. इतर जखमींना पोलीस प्रशासनाच्या मदतीने तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मालेगावातील हे सर्वजण तवेरा गाडीने अक्कलकोटला दर्शनासाठी गेले होते. रविवारी रात्री गाडीने सर्वजण मालेगावला येत होते. मात्र कन्नड घाटात धुक्याचा अंदाज न आल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ती दरीत कोसळली. यामध्ये चौघांचा मृत्यू झाला आहे. सात जण जखमी झाले आहे.
मृतांची नावे –
प्रकाश गुलाबराव शिर्के,वय -65
शिलाबाई प्रकाश शिर्के,वय -60
वैशाली धर्मेंद्र सुर्यवंशी,वय -35
पूर्वा गणेश देशमुख, वय -08
दरम्यान, रविवारी संध्याकाळी नाशिक जिल्ह्यातील मनमाडजवळ अनकवाडे रेल्वे उड्डाणपुलावर भीषण अपघात झाला होता. कार आणि कंटेनरमध्ये झालेल्या पाच जणांचा मृत्यू झाला. या अपघातात रोहित धनवटे, श्रेयस धनवटे, ललित सोनवणे, गणेश सोनवणे आणि प्रतीक नाईक हे पाचही तरुण ठार झाले. सर्व जण मनमाड जवळच्या म्हसोबा देवस्थान येथील धार्मिक कार्यक्रमाला गेले होते.
Source link
by Hansraj Agrawal | Nov 26, 2023 | Trending News
Manmad Yeola Road Accident: मनमाड-येवला राज्यमार्गावर भीषण अपघात झाला आहे. कंटेनर आणि स्विफ्ट कारची समोरा समोर धडक होवून हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच तरुण जागीच ठार झाले आहेत. या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.
अंकाई रेल्वे उड्डाण पुलावर हा झाला अपघात झाला. अपघातात 5 जण जागीच ठार झाले. भरधाव वेगात असलेल्या स्वीफ्ट कारने कंटनेनरला धडक दिल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही धडक इतकी भीषण होती या अपघतात स्वीफ्ट कारचा चुराडा झाला आहे. स्थानिकांनी अपघात ग्रस्तांना कार मधून बाहेर काढले. मात्र, अपघात ऐवढा भीषण होता ही कारमधील सर्वांचा मृत्यू झाला आहे. अपघातातील सर्व जण नाशिक येथील तरुण आहेत. पोलिस मृत तरुणांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत.
Source link
by Hansraj Agrawal | Nov 26, 2023 | Trending News
Mumbai Water Taxi: गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर प्रवास अवघ्या एख तासात होणार आहे. लवकरच या मार्गावर वॉटर टॅक्सी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सेवेमुळं चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार असून मुंबईहून नवी मुंबईपर्यंतचा प्रवास सोप्पा होणार आहे. डिसेंबरपासून ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. त्यासाठी गोव्यात चार बोटींची बांधणी करण्यात येत असून त्यापैकी दोन बोटी पुढील महिन्यात मुंबईत दाखल होऊ शकतात.
गेल्या काही वर्षांपूर्वी एका खासगी कंपनीच्या मदतीने गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर, मांडवा अशी वॉटर टॅक्सी सेवा सुरू केली होती. 200 प्रवाशी क्षमता असलेली ही वॉटर टॅक्सी अल्पप्रतिसादामुळं कालांतराने बंद करण्याचा निर्ण. घेण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर अशी इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात येत आहे. मुंबई सागरी मंडळ आणि मुंबई बंदर प्राधिकरण यांच्यावतीने जलवाहतुकीला चालना देण्यासाठी ही सेवा सुरू करण्यात येत आहे.
मुंबईतून नवी मुंबई गाठायचं म्हटल्यास रस्ते मार्गे एक तासांचा वेळ लागतो. कार्यालयीन कामाच्या वेळात वाहतुक कोंडीमुळं अधिकचा वेळ लागतो. त्यामुळं नवी मुंबईकरांना प्रवासाचा आणखी एख पर्याय समोर आला आहे. ई-वॉटर टॅक्सीमुळं एक तासांत गेट वे ते बेलापूरपर्यंतचा प्रवास शक्य होणार आहे. मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होईल, अशीदेखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. वॉटर टॅक्सी ही इलेक्ट्रिकवर चालणारी अशल्याने प्रदुषणालाही आळा बसणार आहे. हार्बर सर्व्हिस या खासगी संस्थेला चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात ई-वॉटर टॅक्सी सेवा सुरू होणार आहे. गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर दैनंदिन जलवाहतूक सुरू होईल, अशी माहिती हार्बर सर्व्हिस कंपनीकडून देण्यात आली आहे. 24 प्रवासी आसन क्षमता असलेली ही वॉटर टॅक्सी तूर्तास गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर अशी सुरू करण्यात येत आहे. तशी परवानगी मुंबई बंदर प्राधिकरण आणि महाराष्ट्र सागरी मंडळाने दिली आहे.
प्रवासी भाडे किती आणि वेळापत्रक कसे असेल?
गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर अशी दैनंदिन सेवा सुरू करण्यात येणार आहे. सकाळपासून सायंकाळपर्यंत दर तासाने गेट वे आणि बेलापूर जेट्टीवरून ई वॉटर टॅक्सी सुटतील. या सेवेच्या दररोज दहा फेऱ्या होतील.
ई-वॉटर टॅक्सी इतर बोटींच्या तुलनेत अधिक वेगवान असून त्यामुळं बेलापूरला एक तासात तर एलिफंटाला अर्ध्या तासात पोहोचता येणार आहे या प्रवासासाठी 100 ते 150 रुपये भाडे आकारले जाणार आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Nov 25, 2023 | Trending News
तिस-या टप्प्यातील दौ-यानंतर मनोज जरांगे मुंबईत दाखल झाले आहेत. लवकरच ते मुंबई दौ-याच्या कार्यक्रमाची आखणी करणार आहेत.
Source link