Central Railway : गुरुवारपर्यंत 'या' रेल्वेमार्गावर मेगा ब्लॉक, पुण्यातील वेळापत्रकात बदल
चिपळूणमध्ये उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आणि निलेश राणे यांचे समर्थक भिडले आहेत. दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर दगडफेक करण्यात आली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.
उद्धव ठाकरेंची सिंधुदूर्ग जिल्ह्यात सभा पार पडली होती. या सभेत भास्कर जाधव यांनी राणे कुटुंबावर जहरी टीका केली होती. निलेश राणे यांनी भास्कर जाधव यांच्या टीकेला उत्तर देत आव्हानही दिलं होतं. गुहागरमध्ये येऊन मी जशास तसं उत्तर देईन असा इशारा त्यांनी दिला होता. त्यानुसार आज निलेश राणे यांची सभा आज आयोजित होती. या सभेला ते जात असतानाच हा राडा झाला आहे. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न आहे. तसंच वाहतूक विस्कळीत झाली असून तीदेखील सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
भास्कर जाधव यांनी या राड्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की, “आज भाजपाचे सरचिटणीस निलेश राणे आज गुहागरमध्ये, माझ्या मतदारसंघात सभा घेण्यासाठी येत असल्याची मोठी जाहिरातबाजी करण्यात आली होती. त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात टीझर व्हायरल करुन लोकांना उचवण्याचा प्रयत्न केला होता. माझ्या कार्यालयासमोर मोठे बॅनर लावत गुन्ह्याला माफी नाही, हिशोब चुकता करणार अशा आव्हानात्मक घोषणा देण्यात आल्या होत्या. पण कोणाच्याही झेंड्याला, बॅनरला हात लावायची नाही अशी चिपळूण जिल्ह्याची संस्कृती नाही”.
पुढे ते म्हणाले की, “सभा गुहागरला असताना निलेश राणे मुंबईतून आले. त्यांनी दापोलीमार्ग फेरी बोटीने थेट गुहागरला जावं अशी अपेक्षा होती. पण ते जाणीवपूर्वक चिपळूणला आले. माझ्या घर, कार्यालयासमोर जाणीवपूर्वक आपला सत्कार करुन घेण्याचा प्लान केला. मी पोलिसांनी यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेण्यास सांगितलं होतं. त्याप्रमाणे ते विश्रांतीगृहावर गेले. पारनाक्यावर सत्कार करण्याचं ठरवलं होतं. ती जागाही जाणीवपूर्वक निवडली होती. पण 3.30 ते 5 वाजेपर्यंत रस्त्यावर बाहेर आलेच नाहीत. तसंच स्वागतासाठी लावण्यात आलेली क्रेन नाक्यावर होती. ती ऑफिसच्या बाजूला आणण्याचा प्रयत्न केला. मी पोलिसांना क्रेन पुढे आणू नका अशी विनंती केली होती. गुहागरमध्ये माणसंच सभेला नसल्याने ते पोलीस पुढे जाऊ देत नाही कारण सांगून मागे फिरतील असं वाटलं. यानंतर मी सर्वांना घरी जाण्यास सांगितलं. पण त्याचवेळी त्यांनी सत्कार केला आणि फटाके बजावले. ते रस्त्यावरुन मुद्दामून चालत, नाच गाणी करत पुढे आले. हात दाखवत उचकावण्याचा प्रयत्न केला. पण मी शांत राहण्यास सांगितलं होतं. त्याचवेळी पलीक़डून दगडफेक सुरु झाली. यानंतर येथूनही दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी त्यांना मिरवणूक काढू द्यायला नको होती. त्यांनी परिस्थिती नीट हाताळायला हवी होती”.
पोलिसांनी एकतर्फी कारवाई केली असून आमच्यावर लाठीचार्ज आणि अश्रूधुरांचा वापर केला असा आरोप भास्कर जाधव यांनी केला आहे. कित्येक वर्षं राणे कुटुंब चिपळूणची शांतता भंग करण्याचा प्रयत्न सुरु असून आज तो पूर्णत्वास नेला असाही आरोप त्यांनी केला.
Madhav Bhandari : काँग्रेसचे बडे नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर भाजपमध्ये नाराजीनाट्य रंगल्याचे चित्र पहायला मिळत आहे. भाजपचे वरिष्ठ नेते आणि प्रवक्ते माधव भंडारी यांना 12 वेळा उमेदवारी नाकारली आहे. माधव भंडारींच्या मुलानं X या सोशल मीडियावर ट्विट करून आपल्या मनातली खदखद व्यक्त केली आहे.
जवळपास 12 वेळा माधव भंडारींचं नाव उमेदवार म्हणून चर्चेत आलं. मात्र त्यांना कधीच उमेदवारी मिळाली नाही, अशा शब्दात मुलगा चिन्मय भंडारी यांनी आपली नाराजी व्यक्त केलीय.. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झालीय. आपल्या वडिलांनी पक्षासाठी कशा खस्ता खाल्ल्या, निस्वार्थीपणे मेहनत घेतली, याचं चित्र चिन्मय यांनी पोस्टमधून मांडल आहे.
भाजपच्या तीनही उमेदवारांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. अशोक चव्हाणांनी भाजपकडून राज्यसभेचा अर्ज भरलाय. तर मेधा कुलकर्णींनीही अर्ज दाखल केलाय. डॉ. अजित गोपछडेंनीही राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करण्यात आला.
रायगड लोकसभा मतदारसंघावरुन भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आमनेसामने आलेले असताना आता रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरुन भाजप-शिवसेना शिंदे गट आमनेसामने आलेत. केंद्रीय मंत्री नारायण राणेंना राज्यसभेत पाठवलं जाणार नाहीये, त्यामुळे राणेंनी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केलेली असतानाच शिंदे गटानं मोठा दावा केलाय. रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावर दावा केलाय. विनायक राऊत या मतदारसंघातून दोन टर्म निवडून आलेत, विशेष म्हणजे दोन वेळा निलेश राणेंचा पराभव करुन राऊत निवडून आलेत. विनायक राऊत ठाकरे गटात असले तरी या मतदारसंघात शिंदे गटाची ताकद असल्याचं सांगत सामंत यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावर दावा केलाय.
महायुतीच्या उमेदवारांनी राज्यसभेसाठीचे अर्ज दाखल केलेत. शिवसेना शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांनी अर्ज भरलाय. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि शिंदे गटाचे नेते उपस्थित होते. तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेलांनी राज्यसभेसाठी अर्ज भरला. त्यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. तर काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरेंनीही अर्ज दाखल केलाय. प्रफुल्ल पटेलांना पुन्हा एकदा राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यामुळे विरोधकांनी अजित पवार गटावर निशाणा साधलाय. अपात्रतेची टांगती तलवार असल्यामुळे पटेलांना पुन्हा संधी दिली अशी टीका राऊतांनी केलीय तर काही गोष्टी गुलदस्त्यातच राहू द्या, असं उत्तर अर्ज भरल्यावर प्रफुल्ल पटेलांनी दिलंय.
Mhada Mill Worker Lottery : हक्काच्या घराच्या प्रतिक्षेत असलेल्या गिरणी कामगारांसह त्यांच्या वारसांना मोठा दिलासा देमारा निर्णय म्हाडाने घेतला आहे. मुंबईतील 58 बंद गिरण्यांमधील म्हाडाकडे नोंदणीकृत झालेल्या तसेच यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या एकूण 1,50,484 गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांची पात्रता निश्चितीकरिता ‘म्हाडा’तर्फे ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रे स्वीकारण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या कालबद्ध विशेष अभियानाला 15 मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
म्हाडाचा विभागीय घटक मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांसाठी 14 सप्टेंबर 2023 पासून राबविण्यात येत असलेल्या या विशेष अभियानाअंतर्गत अद्यापी गिरणी कामगार व त्यांच्या वारसांकडून ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने एकूण 1, 8, 492 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 89, 648 अर्जदार पात्र ठरले असून उर्वरित अर्जांची छाननी करून पात्र तसेच अपात्र निश्चितीची कार्यवाही सुरू आहे. राज्य शासन गिरणी कामगारांच्या हक्काच्या घराविषयी अत्यंत संवेदनशील असून त्यांना हक्काचे घर मिळवून देऊन त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचवण्याकरिता कटिबद्ध आहे. म्हणूनच या अभियानाचा लाभ अधिकाधिक गिरणी कामगार व त्यांच्या वारसांना घेता यावा याकरिता सदरील मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती मंडळाचे मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी आज दिली.
यापूर्वी ऑफलाइन अथवा ऑनलाईन पद्धतीने कागदपत्रे सादर केलेल्या गिरणी कामगार वारसांना नव्याने कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नसल्याचे मंडळातर्फे कळविण्यात आले आहे. गिरणी कामगार व त्यांच्या वारसांनी गिरणीमध्ये काम केले असल्याचा पुरावा दर्शविणारी कागदपत्रे ऑफलाइन पद्धतीने सादर करता यावीत याकरिता म्हाडाच्या मुंबईतील वांद्रे पूर्व येथील एमआयजी क्रिकेट क्लब जवळील समाज मंदिर हॉल येथे तात्पुरते स्वरूपाचे मदत केंद्र स्थापन करण्यात आले आहे. तसेच ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रे सादर करण्यासाठी Mill workers eligibility हे मोबाइल ॲप तयार करण्यात आले असून सदर ॲप Google Play Store वर उपलब्ध आहे. तसेच https://millworkereligibility.mhada.gov.in या संकेतस्थळावरही ऑनलाइन कागदपत्रे सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या 1, 50, 484 गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांपैकी ज्या गिरणी कामगार वारसांनी पात्रतेसंबंधीची कागदपत्रे सादर केलेली नाहीत, अशा गिरणी कामगार व त्यांच्या वारसांनी पात्रतेसाठी आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अथवा ऑफलाइन पद्धतीने सादर करावी. सदर प्रक्रियेदरम्यान काही अडचण उद्भवल्यास मार्गदर्शनाकरिता 9711194191 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात येत आहे.
मंडळातर्फे सर्व संबंधित गिरणी कामगार व वारसांना आवाहन करण्यात येत आहे की, पात्रता निश्चितीकरिता मंडळाने विहित केलेल्या 13 पैकी कोणत्याही कागदपत्रांची स्वसाक्षांकीत छायांकित प्रत सादर करावी. यामध्ये गिरणी कामगारांचे ओळख पत्र , तिकीट नंबरची प्रत, सर्व्हिस प्रमाणपत्र, लाल पास, प्रॉव्हिडंट फंड क्रमांक, इ एस आय सी क्रमांक, मिल प्रमाणपत्र प्रत, हजेरी पत्र , लीव्ह रजिस्टर प्रत, उपदान प्रदान आदेश, भविष्य निर्वाह निधी सेटलमेंट आदेशाची प्रत, पगार पावती यापैकी उपलब्ध कागदपत्र सादर करावीत. तसेच आधार कार्ड सादर करणे बंधनकारक आहे. सदरील अभियान कालबद्ध असल्याने अधिकाधिक गिरणी कामगार व वारसांनी या विशेष अभियानात सहभागी होऊन शासनास सहकार्य करावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
Mysterious Lonar Crater Lake: कधीच न ऐकलेल्या आणि पाहिलेल्या गोष्टींकडे लोक आकर्षित होतात. उत्सुकता म्हणून अशाच रहस्यमयी ठिकाणांचा शोध घेत असतात. यासाठी परदेश दौरे सुद्धा करतात. तुम्हालाही अशा रहस्यमयी ठिकाणांची आवड असेल तर महाष्ट्राबाहेर जाण्याची गरज नाही. एक नव्हे तर कित्येक ठिकाण येथे सापडतील. त्यापैकीच एक म्हणजे, लोणार सरोवर!
भारतातील महाराष्ट्रात असलेले लोणार सरोवर हे पृथ्वीवरील सर्वात रहस्यमयी ठिकाण आहे. लोणार सरोवर म्हणजे पृथ्वी आणि अंतराळाला जोडणारा चमत्कारच आहे. बुलढाणा जिल्ह्यात असलेले लोणार सरोवर हे एक अद्वितीय आणि रहस्यमय नैसर्गिक आश्चर्य आहे. 50,000 वर्षांपूर्वी उल्कापातामुळे हे सरोवर तयार झाले. या सरोवराचे वैशिष्ट्य म्हणजे अग्निजन्य खडकात निर्माण झालेलं खाऱ्या पाण्याचे हे जगातील एकमेव सरोवर आहे.
लोणार सरोवर हे उल्कापातामुळे तयार झाले आहे. लोणार सरोवर हे 47000 हजार वर्ष जुनं असल्याचा संशोधकांचा दावा आहे. एक महाकाया उल्का दख्खनच्या पठारावर धडकली. त्याठिकाणी 1.8 किलोमीटर व्यासाचा आणि 150 मीटर खोल असा प्रचंड खड्डा तयार झाला. या सरोवराला पौराणिक महत्व देकील आहे. ब्रिटिश राजवटीमध्ये जे. ई. अलेक्झांडर यानं या सरोवराची नोंद केली आहे. त्याचबरोबर आईने अकबरी, पद्मपुराण आणि स्कंदपुराणातही या विवराचा उल्लेख आढळतो.
लोणार हे उल्कापातापासून तयार झालेलं सरोवर आहे. चंद्रावरील मातीचं या खाऱ्या पाण्याच्या गुणधर्माशी जवळचं नातं असल्याचं, जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या संशोधनातून सिद्ध झालं आहे. या सरोवराचा विविध अंगांनी अभ्यास करण्यासाठी जगाच्या कोनाकोपऱ्यातून इथे संशोधक नेहमी येतात. लोणार सरोवर परिसरात सातत्याने भूगर्भीय, पुरातत्त्व, पर्यावरण आणि आंतराळिकदृष्ट्या संशोधन केले जाते. लोणार सरोवर परिसरात अनेक प्रकारचे दुर्मीळ खडक, खनिज, काचमनी, पाण्यावर तरंगणारे दगड सापडतात. लोणार सरोवराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पाण्यातील क्षारांचे प्रमाण, आम्लारी गुणधर्म म्हणजेच सरोवराच्या पाण्याची पीएच लेव्हल इतकी जास्त असूनही याच्या बाजूला घेतलेल्या छोट्याशा खड्ड्यात मात्र गोड पाणी मिळते. या पाण्यात कुठलाही जीव जिवंत राहू शकत नाही परंतु यात विविध प्रकारचे जिवाणू, विषाणू, हरितनील शेवाळ आहेत NASA च्या वैज्ञानिकांनाही याचे रहस्य उलगडता आलेले नाही. येथे एक सासू सूनेची विहीर म्हणून ही ओळखली जाणारी पुरातन विहीर देखील आहे. या विहिरीचं अर्धं पाणी गोडं आणि अर्धं पाणी खारं असतं. संपूर्ण तलावात मिठासारखं खारं पाणी मात्र या विहीरीत अर्धं पाणी गोड असल्यानं हा एक निसर्गाचा चमत्कार समजला जातो.
Gold Silver Price on 14 February 2024 : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या चांदीच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. सोने चांदीच्या दरवाढीच्या मागे अनेक कारणं सांगितले जात आहे. अनेक देश सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करत असतात. त्यामुळे जागतिक पातळीवर सोन्याची मागणी वर्षभरात वाढली होती. ग्रामीण भागातील महिला तर आजही सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहताच. म्हणूनच दर गुरुपुष्यामृत योगावर एक ग्रॅम का होईना सोने खरेदी करण्याचा प्रयत्न करतात. शहरी भागात महिलांना छंद म्हणून सोने खरेदी करतात. तर दुसरीकडे सरकारी कर्मचारी तर सोन्याकडे गुंतवणुकीचे मोठे साधन म्हणून पाहतात.
सोन्याच्या दरात मे महिन्यात 55 हजारांवरून 60 हजारांची उसळी झाल्याची पाहायला मिळाली. तर जून महिन्यात 60 हजारांपर्यंत सोने गेले. नोव्हेंबरपर्यंत सोने 69 ते 60 हजारच्या घरात होते. तर नोव्हेंबरच्या दिवाळीच्या पर्वात सोने 61 हजारांवर उसळी घेतली. डिसेंबर 2023 पर्यंत सोन्याचे दर वाढतच राहिले. सध्या सोन्याचा दर 63 हजार रुपये प्रति तोळा आहे. वर्षभरात सोन्याने ग्राहकांना प्रति तोळ्यामागे 8 हजार 200 रुपयांचा नफा मिळवून दिला.
चांदीची किंमत केवळ 69 हजार रुपये होती. तर मार्च 2023 मध्ये 72 हजार रुपयांवर पोहचली. मे महिन्याच चांदील पहिला उच्चांक दर 77 हजार रुपये प्रति किलो मिळाला. त्यानंतर चांदीचे दर कमी होत ऑक्टोबरमध्ये 71 हजारांपर्यंत खाली आला. डिसेंबरमध्ये पुन्हा ७८ हजारांचा उच्चांक गाठला गेला. सध्या चांदीचा दर 75 हजारांपर्यंत पोहोचले आहे.
आज (14 फेब्रुवारी) 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 61,590 रुपये आहे. तर सराफा बाजारात चांदी 69,910 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. तर मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 56,357 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,480 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 56,357 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा दर 61,480 रुपये आहे. नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 56,357 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 61,480 रुपये आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 56,357 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 61,480 रुपये आहे.
सोन्या चांदीचे वाढते दर पाहता सोन्यातील गुंतवणूकही वाढली आहे. अडचणीच्या काळात सोने मोडून चांगला परतावाही मिळतो. जानेवारी 2023 मध्ये सोने 55 हजार 300 रुपये प्रति तोळा झाले असते. डिसेंबर 2023 अखेर सोन्याचा दर 63 हजार 200 झाला. ग्राहकांना प्रति तोळामध्ये 8,200 रुपये एकूण नफा झाला आहे. जानेवारी 2023 पर्यंत चांदी 69 हजार रुपये प्रतिकिलो झाली होती. तर डिसेंबरअखेर 75 हजारांवर पोहचला. सहा हाजारांचा नफा ग्राहकांना वर्षभरापूर्वी घेतलेल्या चांदीतून झाला आहे. जवळपास जानेवारी 2023 मध्ये सुवर्ण नगरीमध्ये सोन्याने 55 हजारांची खरेदी करून 58 हजार 500 चा विक्रमी टप्पा गाठला होता. त्यामुळे सोन्याच्या खरेदीवर ग्राहकांनी थांबा आणि बघा अशी भूमिका घेतली.