कोणत्या ठिकाणी नोकरी देणार? नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयावर उद्धव ठाकरे यांचा सवाल

कोणत्या ठिकाणी नोकरी देणार? नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयावर उद्धव ठाकरे यांचा सवाल


पुढील
बातमी

‘मराठा आरक्षणाचा अहवाल एखाद्या कार्यकर्त्याने लिहिल्यासारखाच!’ गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल





Source link

Maharastra Politics : 'अजित पवारांचा कट उधळून लावलाय, त्यांना…', जितेंद्र आव्हाडांची सडकून टीका!

Maharastra Politics : 'अजित पवारांचा कट उधळून लावलाय, त्यांना…', जितेंद्र आव्हाडांची सडकून टीका!


Jitendra Awhad On Ajit Pawar : निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि घड्याळ हे चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या (Ajit Pawar) गटाला दिलं होतं. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात शरद पवार गटानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली. अजित पवार गटाकडून राज्यसभा निवडणुकीसाठी व्हीप बजावला जाऊ शकतो, ही बाब पवार गटाकडून सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) निदर्शनास आणून दिली गेली. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाची याचिका तातडीनं सुनावणीसाठी घेण्याचं सुप्रीम कोर्टानं मान्य केलं होतं. त्यानंतर आज झालेल्या सुनावणीमध्ये पुढील तीन आठवडे तेच नाव कायम राहणार असल्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अजित पवार गटावर सडकून टीका केली आहे.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

आज सर्वोच्च न्यायालयाने भारतातील लोकशाही वाचली पाहिजे, अशी ठाम भूमिका घेतली. ही आपणासाठी आश्वासक बाब आहे. अजित पवार यांच्या वकिलांनी आज सर्वोच्च न्यायालयात, शरद पवार यांना पक्ष आणि पक्षचिन्ह मिळू नये, अशी भूमिका मांडली. म्हणजेच शरद पवार नावाच्या सूर्याचा अस्त करावा, अशीच अजित पवार गटाची इच्छा त्यांच्या वकिलांनी वादविवादात पुढे आणली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने, “भारतात लोकशाही आहे अन् लोकशाहीत कोणत्याही माणसाला पक्ष आणि चिन्ह न देणं हे अयोग्यच आहे. तुमच्या लोकांनी पक्षात फूट पाडली. त्याचा १० व्या अनुसुचिशी सबंध आहे की नाही ? आपल्या देशाच्या सीमेपलीकडे असलेल्या पाकिस्तानात काय झालंय?, असा सवाल करीत भारतातील महाराष्ट्रातील राजकारणाची पाकिस्तानातील राजकारणाशी तुलना केली. 

म्हणजेच, सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार यांच्या वकिलांनी जे मुद्दे मांडले… त्यातून शरद पवार यांना पक्ष आणि चिन्ह मिळू न देता त्यांचा राजकीय अस्त करण्याचा अजित पवार यांचा कट उधळून लावला आहे, अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी केलीये.

अपात्रतेच्या याचिका प्रलंबित असतानाच पक्षाबाबतचा निर्णय आलाच कसा? असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने आगामी सात दिवसात शरद पवार यांना चिन्ह देण्याचे आदेश दिले. तसेच, जे नाव आहे तेच नाव प्रक्रिया सुरू असेपर्यंत कायम ठेवण्याचे आदेश दिले. पण, यामध्ये एक बाब खटकली… शरद पवारांकडून पक्ष काढून घेतले, चिन्ह काढून घेतले.  सगळंच काढून घ्या.. आता कपडे काढून घ्यावे, इतके किळसवाणे राजकारण महाराष्ट्राचे करून ठेवले आहे. ज्यांनी दिले त्याच सगळेच काढून घ्यायचे हे कसलं राजकारण?, असं म्हणत आव्हाडांनी सडकून टीका केली आहे.





Source link

'मला जो संदेश द्यायचा होता तो दिलाय'; पोलिसांविषयीच्या 'त्या' वक्तव्यावर नितेश राणे ठाम

'मला जो संदेश द्यायचा होता तो दिलाय'; पोलिसांविषयीच्या 'त्या' वक्तव्यावर नितेश राणे ठाम


BJP MLA Nitesh Rane : सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदार नितेश राणे यांनी रविवारी अकोला येथे पोलिसांविषयी वादग्रस्त विधान केले होते. हे पोलीस माझं काही बिघडवू शकत नाही, असं नितेश राणेंनी म्हटलंय. माझे कितीही व्हिडिओ काढले तरी पोलीस ते व्हिडीओ फक्त बायकोलाच दाखवतील असंही नितेश राणे म्हटलं आहे. मात्र आता त्यानंतरही नितेश राणे त्यांच्या वक्तव्यावर ठाम आहेत. मी कुठेही चुकीचं बोललो नाही, असे नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

“पोलीस माझं काय वाकड करू शकत नाही ह्याचा अर्थ मी हिंदूंची बाजू लावून धरतोय. जे माझ्यावर टीका करत आहेत त्यांना मी विचारेन मी हिंदूंची बाजू घेतोय हे चुकीचं आहे का? मी कुठेही चुकीचं बोललो नाही. जो संदेश मला द्यायचा होता तो मी दिलाय,” असे स्पष्टीकरण नितेश राणे यांनी दिलं.

नितेश राणे यांनी विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या टीकेवरही भाष्य केलं. “विजय वडेट्टीवार यांनी माझ्या भाषणावर आक्षेप घेतला. महाविकास आघाडीच्या काळात पोलीस वसुलीसाठी वापरले जायचे. महाविकास आघाडीच्या काळात पोलीस उद्धव ठाकरेंचे घरगडी म्हनून वापरले जायचे. येणाऱ्या काळात वडेट्टीवार आणि आमचे बॉस एकच असतील,” असे नितेश राणे यांनी म्हटलं. 

काय म्हणाले होते विजय वडेट्टीवार?

“छत्रपती शिवाजी महाराजांसमोर सत्ताधारी भाजप आमदाराची भाषा बघा..पोलिस माझे व्हिडिओ स्वतःच्या बायकोला दाखवतील, पण कुणी माझं वाकड करू शकणार नाही. महिलांचा अपमान करणारी, राज्यातील पोलिसांना आव्हान देणारी ही स्क्रिप्ट भाजपने दिली का? महिलांचा अपमान करणारी, पोलिसांना आव्हान देणारी हीच का भाजपची संस्कृती? हीच का मोदी की गॅरंटी? छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेपुढे ही भाषा?,” असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

नितेश राणेंचे वादग्रस्त विधान

“मला काही करु शकणार नाही. पोलिसांना माझे भाषण रेकॉर्ड करु दे. जास्तीत जास्त बायकोला दाखू शकणार आणि काही करु शकणार आहे. आमच्या राज्यात आमच्यावर काय करु शकाल. जागेवर राहायच आहे. राजरोस पद्धतीने पाहिजे तिथे तुमच्या इथे अतिक्रमण सुरु आहे,” असे नितेश राणे म्हणाले.





Source link

ओडिशा जिल्हा समाजकल्याण कार्यालयाच्या चुकीमुळे नाशिकचे दोघेजण झाले मालामाल; बँकेत जमा झाले एक कोटी

ओडिशा जिल्हा समाजकल्याण कार्यालयाच्या चुकीमुळे नाशिकचे दोघेजण झाले मालामाल; बँकेत जमा झाले एक कोटी



Nashik Crime News : ओडिशा राज्यातील सुंदरगड येथील जिल्हा समाजकल्याण कार्यालयाला कॉपीराईट इन्फोटेक या संस्थेच्या खात्यावर एक कोटी रुपये ट्रान्स्फर करायचे होते ते नाशिकमधील दोघांच्या खात्यावर जमा झाले. 



Source link

क्रिकेट मॅच जीवावर बेतली; अमरावतीमध्ये भीषण घटनेत चौघांचा मृत्यू तर 10 जखमी

क्रिकेट मॅच जीवावर बेतली; अमरावतीमध्ये भीषण घटनेत चौघांचा मृत्यू तर 10 जखमी



Amravati Accident News : अमरावतीमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली असून या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.



Source link

खासदार श्रीकांत शिंदेंच्या शिरपेचात मानाचा तुरा, संसद रत्न पुरस्काराने गौरव!

खासदार श्रीकांत शिंदेंच्या शिरपेचात मानाचा तुरा, संसद रत्न पुरस्काराने गौरव!


MP Shrikant Shinde Parliament Ratna Award: शिवसेनेचे कल्याण मतदारसंघाचे खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्यात आलाय. श्रीकांत शिंदे यांना नुकताच 14 व्या संसद रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 17 व्या लोकसभेत बजाविलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला असून तेलंगणाच्या राज्यपाल तमिळीसई सौंदरराजन यांच्याहस्ते शिंदे यांचा गौरव करण्यात आला. 

महाराष्ट्र सदनात या पुरस्काराचे वितरण

चेन्नई येथील प्राईम पॉईंट फाऊंडेशन आणि ई मॅगझिन यांच्यावतीने देण्यात येणाऱ्या संसद रत्न पुरस्काराची घोषणा नुकतीच करण्यात आली होती. त्यानंतर शनिवारी नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात या पुरस्काराचे वितरण तेंलगणाच्या राज्यपाल तमिळसई सौंदररोजन आणि केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे हंसराज अहिर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायधीश संजय किशन कौल, गृहराज्यमंत्री अजय मिश्रा, संसदरत्न पुरस्कार समितीच्या प्रियदर्शनी राहुल, के.श्रीनिवासन आदी उपस्थित होते. 

माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार संसद रत्न पुरस्काराची सुरूवात करण्यात आली आहे. संसद रत्न पुरस्कार हा त्याच खासदारांना प्रदान करण्यात येतो, ज्यांचे लोकसभेत उत्कृष्ट काम आहे. जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी हिरीरिने सहभाग घेणाऱ्या खासदारांना हा सन्मान प्राप्त होतो. 

डॉ.श्रीकांत शिंदे यांना संसदेतील त्यांच्या कामासाठी यंदाच्या या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2019-23 या कालावधीत डॉ.श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत 556 प्रश्न विचारले तर 67 चर्चांमध्ये सहभागी झाले. याशिवाय 12 प्रायव्हेट मेंबर बिल त्यांनी समोर आणले आहे. त्यांची ही कामगिरी लक्षात घेता केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या नेतृत्वाखाली समितीने शिंदे यांची या पुरस्कारासाठी निवड केली. 

तर हा पुरस्कार प्रदान करताना तेलंगणाच्या राज्यमाल तमिळसई सौदंरराजन म्हणाल्या की, ‘मला जेव्हा या कार्यक्रमाचं आमंत्रण मिळालं तेव्हा आश्चर्य वाटलं की सर्व खासदारांमध्ये माझं नक्की काय काम ? केवळ पॉवरफुल व्यक्ती म्हणून मी इथे आले नाहीये तर माझ्याकडे असणाऱ्या मतदानाचा पॉवरफुल हक्काच्या जोरावर मी आज या कार्यक्रमाला हजर राहिले आहे. हा खासदारांचा दुसरा महत्त्वाचा पुरस्कार आहे, कारण त्यांच्या जनतेने त्यांना आधीच निवडून देत त्यांना पुरस्कार दिला आहे. महिला राज्यपालाने वुमन रिझर्व्हेशन बिल पास केले आहे, याचा आनंद असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसंच मतदानाबाबात अधिक जागरूकता करून त्याची टक्केवारी वाढविण्याचे कामही आपले असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

‘हा सामान्य शिवसैनिकांचा सन्मान’

कल्याण लोकसभेतील सर्व जनतेचा विश्वास आज सार्थकी लागला. हा पुरस्कार माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेचा आणि सामान्य शिवसैनिकांचा सन्मान करणार आहे. या पुरस्कारामुळे आपली जबाबदारी आणखीन वाढली असून जनतेचा हा विश्वास, प्रेम आणि आपुलकी यामुळेच याठिकाणापर्यंत पोहचू शकलो आहे. या पुरस्कारामुळे भविष्यात आणखीन जोमाने महाराष्ट्रातील जनतेची सेवा करण्याचे विश्वास मी यानिमित्ताने व्यक्त करतो, असे मत खासदार श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.

इतरही खासदारांचा सन्मान

यावर्षी महाराष्ट्रातील शिवसेना खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, श्रीरंग बारणे, बंगालचे खासदार सुकांत मुझुमदार, भाजप खासदार सुधीर गुप्ता, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या डॉ. अमोल कोल्हे आणि काँग्रेसचे कुलदीप राय शर्मा यांना सन्मानित करण्यात आले.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp