आईसोबत घरी जात असताना शाळकरी मुलावर कोसळली सळई; पुण्यातील धक्कादायक प्रकार

आईसोबत घरी जात असताना शाळकरी मुलावर कोसळली सळई; पुण्यातील धक्कादायक प्रकार



Pune Accident : पुण्यात एक विचित्र अपघाताची घटना समोर आली आहे. डोक्यात लोखंडी सळई कोसळल्याने नऊ वर्षाच्या शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.



Source link

पुन्हा मनस्ताप? 27 नोव्हेंबरपासून पश्चिम रेल्वेवर 20 दिवसांचा ब्लॉक; काही लोकल रद्द होणार

पुन्हा मनस्ताप? 27 नोव्हेंबरपासून पश्चिम रेल्वेवर 20 दिवसांचा ब्लॉक; काही लोकल रद्द होणार


Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेकडून पुन्हा एकदा ब्लॉकची घोषणा करण्यात आली आहे. 27 नोव्हेंबरपासून 20 दिवसांसाठी मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. या मेगाब्लॉकमुळं काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. अंधेरीतील एसव्ही रोड आणि वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेला जोडणाऱ्या गोखले पुलाच्या कामासाठी पश्चिम रेल्वेकडून हा ब्लॉग घेण्यात आला आहे. 

अंधेरी स्टेशन परिसरातील गोखले पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. लवकरात लवकर पुल वाहतुकीसाठी खुला करण्याचे आव्हान पालिकेसमोर आहे. पुलाच्या कामासाठी महापालिकेने रेल्वेला ब्लॉक घेण्याची विनंती केली होती. रेल्वेने ही विनंती मान्य करुन पुलाच्या कामासाठी 20 दिवसांचा ब्लॉक घोषित केला आहे. गोखले पुलाचा एक महत्त्वाच्या गर्डर उभारणीच्या कामासाठी ब्लॉक घोषित करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वेवरील ब्लॉक हा रात्रकालीन असून रोज तीन चे चार तासांसाठी ब्लॉक घेण्यात येईल. रेल्वेकडून काहीच दिवसांत ब्लॉक शेड्युल केल्याची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. ऑक्टोबरमध्ये पुलाचा उत्तरेकडील गर्डर उभारण्यात आल्यानंतर आता दक्षिणेकडील गर्डर उभारण्यात येणार आहे. 

गोखले पुलासाठी 27 नोव्हेंबरपासून 20 दिवसांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असल्याने पुढील आठवड्यापासून लोकल प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागण्याची शक्यता आहे. प्रवाशांचा त्रास कमी व्हावा यासाठी रेल्वेकडून रात्रकालीन ब्लॉक घेण्यात आला आहे. येत्या काही दिवसांतच वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. 

1975 मध्ये गोखले पुलाचे बांधकाम करण्यात आले होते. 90 कोटी रुपये खर्चून आता पुलाची पुर्नबांधणी केली जात आहे. पालिकेने नोव्हेंबर 2023मध्ये पुल खुला करण्याची योजना केली होती. मात्र काही कारणास्तव काम पूर्ण होण्यास विलंब झाला. आता फेब्रुवारी 2024 मध्ये पुल वाहतूकीसाठी पुन्हा खुला करण्याचे प्रयत्न महापालिकेचे आहेत. 

पुण्यात शनिवारी-रविवारी रेल्वेचा मेगाब्लॉक

खडकी आणि शिवाजीनगर रेल्वेस्थानक या दरम्यान इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगच्या कामासाठी शनिवार, रविवार विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन, सिंहगड एक्स्प्रेस, इंटरसिटी, कोयना, डेक्कन एक्स्प्रेस या गाड्या रद्द केल्या आहेत. याचबराेबर लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या उशिराने धावणार असून, काहीच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. पुणे ते लोणावळा दरम्यान धावणाऱ्या लोकलच्या ४६ सेवा रद्द केल्या आहेत.





Source link

निरा भिमा जलस्थिरीकरणाच्या बोगद्यात कोसळले 2 शेतकरी; इंदापूर तालुक्यातील धक्कादायक घटना

निरा भिमा जलस्थिरीकरणाच्या बोगद्यात कोसळले 2 शेतकरी; इंदापूर तालुक्यातील धक्कादायक घटना



इंदापूर तालुक्यात नीरा-भीमा नदीच्या जलस्थिरीकरणाच्या बोगद्यात दोन शेतकरी पडल्याची दुर्घटना घडलीय. येथे युद्ध पाचळीवर बचावकार्य सुरु आहे. 



Source link

Weather Update : राज्याच्या ‘या’ भागांना पुढील 48 तासांसाठी पावसाचा इशारा; वादळी वारेही घोंगावणार

Weather Update : राज्याच्या ‘या’ भागांना पुढील 48 तासांसाठी पावसाचा इशारा; वादळी वारेही घोंगावणार


Maharashtra Weather : हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्याच्या घडीला तामिळनाडूच्या किनारपट्टी भागावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी महाराष्ट्रापर्यंत या वाऱ्यांचे परिणाम दिसणार असून, पुढील दोन दिवस म्हणजेच पुढच्या 48 तासांसाठी कोकण, मध्य महाराष्ट्रासह गोव्यातही पावसाच्या सरी बरसणार आहेत. शुक्रवारी वीजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा सुटेल. मात्र पावसाचं प्रमाण फारसं नसेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

श्रीलंकेपासून बांग्लाच्या उपसागरापर्यंत वाऱ्यांची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. तर, भारताच्या दक्षिणेला असणाऱ्या कोमोरीन पट्ट्यापासून आंध्र प्रदेशापर्यंत कमी दाबाचा पट्टाही तयार धाला आहे. ज्यामुळं महाराष्ट्रात पावसाला पोषक वातावतण तयार होत असून, त्यामुळं रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांसह सातारा आणि सोलापूरातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

 

23 नोव्हेंबरला रोजी गोवा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज असून शुक्रवारी राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळतील. बुधवारपर्यंत उत्तर महाराष्ट्रात वातावरण कोरडं राहण्याची शक्यता असून,  दोन दिवस किमान तापमानात घट होण्याचा अंदाज आहे

राज्यातील एकंदर हवामानाची स्थिती पाहता थंडीचं प्रमाण मोठ्या फरकानं कमी होताना दिसत आहे. उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे इथं अपवाद ठरत आहेत ही बाब मात्र नाकारता येत नाही. देशाच्या उत्तर पश्चिमेकडेसुद्धा हिवाळ्याचा फारसा प्रभाव दिसून येत नाही. पश्चिमी झंझावात सक्री असून, त्यात अल निनोच्या प्रभावाची भर पडल्यामुळं आता थंडी थेट डिसेंबरच्या अखेरीस आणि जानेवारीच्या सुरुवासीस जोर धरताना दिसणार आहे. 

सध्याच्या घडीला देशाच्या उत्तरेकडे दिल्ली आणि नजीकच्या भागामध्ये तापमानाच घट होताना दिसत आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि काश्मीरच्या खोऱ्यामध्ये पर्वतीय क्षेत्रांमध्ये बोचरी थंडी हल्लीच जोर धरताना दिसू लागली आहे. तर, याच राज्यांमधील मैदानी क्षेत्रांमध्ये मात्र पावसाची रिमझिम पाहायला मिळणार असल्यामुळं हवेतील गारवा आणखी वाढणार आहे. हिवाळी सहलीच्या निमित्तानं तुम्ही यापैकी कोणत्याही राज्याला भेट देण्यासाठी जाऊ इच्छिता, तर आधी हवामानाचा अंदाज पाहूनच घ्या. 





Source link

धनगर आरक्षणाचे आंदोलन पेटले; जालन्यात तुफान राडा,भाजप आमदाराला हाकलून लावलं

धनगर आरक्षणाचे आंदोलन पेटले; जालन्यात तुफान राडा,भाजप आमदाराला हाकलून लावलं



धनगर आरक्षणाचे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता आहे. आक्रमक आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक केली आहे. 



Source link

मुंबईत 4 बोगस डॉक्टरांना अटक; युनानी औषधाद्वारे उपचाराच्या नावाखाली लाखोंचा गंडा

मुंबईत 4 बोगस डॉक्टरांना अटक; युनानी औषधाद्वारे उपचाराच्या नावाखाली लाखोंचा गंडा


Mumbai Crime News : मुंबईत पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट तीनने 4 बोगस डॉक्टरांना अटक केली. युनानी औषधांद्वारे उपचाराच्या नावाखाली त्यांनी लाखोंची फसवणूक केली होती. विशेष म्हणजे या चौघांपैकी एकाकडेही वैद्यकीय शाखेची पदवी नव्हती. त्यांच्याकडून वैद्यकीय उपकरणांसह, 14 लाखांची रोकड जप्त करण्यात आली. 

मुंबईत युनानी औषधाच्या नावाखाली लोकांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी क्राईम ब्रँच युनियन 3 कडे वारंवार येत होत्या.  मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट 3 ने स्वतंत्र पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला.

ज्यामध्ये आरोपीने तक्रारदाराला ‘ट्रेमर’ नावाच्या आजाराने ग्रासल्याचा आरोप केला आहे.  ज्यात दोन्ही हात थरथर कापतात.  आरोपींना तक्रारदाराच्या घरी येऊन उपचार करावे लागणार आहेत.  ज्यामध्ये आरोपीच्या पित्तामध्ये पुरलेली नस दुरुस्त करावी लागणार आहे.  यासाठी पित्तामध्ये छिद्र करून त्यावर धातूच्या नळीद्वारे उपचार केले जातील.

यासाठी तक्रारदाराकडून 14 लाख 50 हजार रुपये रोख घेऊन आरोपी फरार झाले होते.  तांत्रिक विश्लेषण आणि सूत्रांच्या मदतीने चारही आरोपी नाशिकमध्ये असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट 3 ला मिळाली.  त्यानंतर गुन्हे शाखा युनिट 3 ने नाशिकमध्ये सापळा रचून चारही आरोपींना अटक केली.

आरोपींनी महाराष्ट्रातील मनोर, पालघर, भिवंडी, ठाणे, नाशिक मालेगाव या शहरात फसवणूक केली आहे.  जे घरोघरी फिरून उपचाराच्या नावाखाली फसवणूक करायचे.
मोहम्मद शेरू शेख मकसूद खान उर्फ ​​डॉ. आर. पटेल (49), मोहम्मद नफीस मोहम्मद शरीफ (39), मोहम्मद आसिफ मोहम्मद निसार (27) आणि मोहम्मद आसिफ मोहम्मद शरीफ (44) अशी अटक करण्यात आलेल्या चार आरोपींची नावे आहेत.  सर्व आरोपी राजस्थानचे रहिवासी आहेत.

त्यांच्याकडून युनानी उपचारासाठी वापरलेली उपकरणे, नऊ मोबाईल, सिम, कार आणि तक्रारदाराकडून फसवणूक केलेले १४ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.  क्राइम ब्रँच युनिट 3 आरोपींकडून तपास करत आहे की त्यांनी आतापर्यंत किती लोकांची फसवणूक केली आहे.

वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही पदवी नसताना तो रुग्णांवर उपचार करणारा डॉक्टर

मुंबईत एका बोगस डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.. वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही पदवी नसताना तो रुग्णांवर उपचार करत होता.  मुंबईतील शिवाजीनगर, गोवंडी भागात त्यानं क्लिनिक थाटलं होतं. रुग्णांकडून तो भरमसाठ फी आकारत होता. 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp