by Hansraj Agrawal | Nov 27, 2023 | Trending News
वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव : नाशिकमध्ये (Nashik Accident) रविवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच जळगाव जिल्ह्यात आणखी एक मोठा अपघात झाला आहे. चाळीसगावानजीक कन्नड घाटात तवेरा गाडीचा अपघात झाल्याने चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. देवदर्शनावरुन परतत असताना हा भीषण अपघात झाला. गाडीतील सात जण देखील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातातील मृतांमध्ये एका आठ वर्षाच्या मुलीचा देखील समावेश आहे.
देवदर्शनावरून घरी येत असताना चाळीसगावाजवळील कन्नड घाटात रात्री 12 वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. रात्रीचा अंधार आणि धुक्याचा अंदाज न आल्यामुळे गाडी थेट खोल दरीत कोसळली. गाडीमध्ये एकूण 11 जण प्रवास करत होते. त्यातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन महिला एक पुरुषाचा समावेश आहे. तवेरा गाडीतून हे सर्वजण रात्रीच्या सुमारास घरी परतत होते. मात्र त्याआधीच कन्नड घाटात त्यांची गाडी दरीत कोसळली. गाडीतील सर्वजण हे मालेगाव येथील रहिवासी आहेत. घटनेची माहित मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. इतर जखमींना पोलीस प्रशासनाच्या मदतीने तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मालेगावातील हे सर्वजण तवेरा गाडीने अक्कलकोटला दर्शनासाठी गेले होते. रविवारी रात्री गाडीने सर्वजण मालेगावला येत होते. मात्र कन्नड घाटात धुक्याचा अंदाज न आल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ती दरीत कोसळली. यामध्ये चौघांचा मृत्यू झाला आहे. सात जण जखमी झाले आहे.
मृतांची नावे –
प्रकाश गुलाबराव शिर्के,वय -65
शिलाबाई प्रकाश शिर्के,वय -60
वैशाली धर्मेंद्र सुर्यवंशी,वय -35
पूर्वा गणेश देशमुख, वय -08
दरम्यान, रविवारी संध्याकाळी नाशिक जिल्ह्यातील मनमाडजवळ अनकवाडे रेल्वे उड्डाणपुलावर भीषण अपघात झाला होता. कार आणि कंटेनरमध्ये झालेल्या पाच जणांचा मृत्यू झाला. या अपघातात रोहित धनवटे, श्रेयस धनवटे, ललित सोनवणे, गणेश सोनवणे आणि प्रतीक नाईक हे पाचही तरुण ठार झाले. सर्व जण मनमाड जवळच्या म्हसोबा देवस्थान येथील धार्मिक कार्यक्रमाला गेले होते.
Source link
by Hansraj Agrawal | Nov 26, 2023 | Trending News
Manmad Yeola Road Accident: मनमाड-येवला राज्यमार्गावर भीषण अपघात झाला आहे. कंटेनर आणि स्विफ्ट कारची समोरा समोर धडक होवून हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच तरुण जागीच ठार झाले आहेत. या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.
अंकाई रेल्वे उड्डाण पुलावर हा झाला अपघात झाला. अपघातात 5 जण जागीच ठार झाले. भरधाव वेगात असलेल्या स्वीफ्ट कारने कंटनेनरला धडक दिल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही धडक इतकी भीषण होती या अपघतात स्वीफ्ट कारचा चुराडा झाला आहे. स्थानिकांनी अपघात ग्रस्तांना कार मधून बाहेर काढले. मात्र, अपघात ऐवढा भीषण होता ही कारमधील सर्वांचा मृत्यू झाला आहे. अपघातातील सर्व जण नाशिक येथील तरुण आहेत. पोलिस मृत तरुणांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत.
Source link
by Hansraj Agrawal | Nov 26, 2023 | Trending News
Mumbai Water Taxi: गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर प्रवास अवघ्या एख तासात होणार आहे. लवकरच या मार्गावर वॉटर टॅक्सी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सेवेमुळं चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार असून मुंबईहून नवी मुंबईपर्यंतचा प्रवास सोप्पा होणार आहे. डिसेंबरपासून ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. त्यासाठी गोव्यात चार बोटींची बांधणी करण्यात येत असून त्यापैकी दोन बोटी पुढील महिन्यात मुंबईत दाखल होऊ शकतात.
गेल्या काही वर्षांपूर्वी एका खासगी कंपनीच्या मदतीने गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर, मांडवा अशी वॉटर टॅक्सी सेवा सुरू केली होती. 200 प्रवाशी क्षमता असलेली ही वॉटर टॅक्सी अल्पप्रतिसादामुळं कालांतराने बंद करण्याचा निर्ण. घेण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर अशी इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात येत आहे. मुंबई सागरी मंडळ आणि मुंबई बंदर प्राधिकरण यांच्यावतीने जलवाहतुकीला चालना देण्यासाठी ही सेवा सुरू करण्यात येत आहे.
मुंबईतून नवी मुंबई गाठायचं म्हटल्यास रस्ते मार्गे एक तासांचा वेळ लागतो. कार्यालयीन कामाच्या वेळात वाहतुक कोंडीमुळं अधिकचा वेळ लागतो. त्यामुळं नवी मुंबईकरांना प्रवासाचा आणखी एख पर्याय समोर आला आहे. ई-वॉटर टॅक्सीमुळं एक तासांत गेट वे ते बेलापूरपर्यंतचा प्रवास शक्य होणार आहे. मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होईल, अशीदेखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. वॉटर टॅक्सी ही इलेक्ट्रिकवर चालणारी अशल्याने प्रदुषणालाही आळा बसणार आहे. हार्बर सर्व्हिस या खासगी संस्थेला चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात ई-वॉटर टॅक्सी सेवा सुरू होणार आहे. गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर दैनंदिन जलवाहतूक सुरू होईल, अशी माहिती हार्बर सर्व्हिस कंपनीकडून देण्यात आली आहे. 24 प्रवासी आसन क्षमता असलेली ही वॉटर टॅक्सी तूर्तास गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर अशी सुरू करण्यात येत आहे. तशी परवानगी मुंबई बंदर प्राधिकरण आणि महाराष्ट्र सागरी मंडळाने दिली आहे.
प्रवासी भाडे किती आणि वेळापत्रक कसे असेल?
गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर अशी दैनंदिन सेवा सुरू करण्यात येणार आहे. सकाळपासून सायंकाळपर्यंत दर तासाने गेट वे आणि बेलापूर जेट्टीवरून ई वॉटर टॅक्सी सुटतील. या सेवेच्या दररोज दहा फेऱ्या होतील.
ई-वॉटर टॅक्सी इतर बोटींच्या तुलनेत अधिक वेगवान असून त्यामुळं बेलापूरला एक तासात तर एलिफंटाला अर्ध्या तासात पोहोचता येणार आहे या प्रवासासाठी 100 ते 150 रुपये भाडे आकारले जाणार आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Nov 25, 2023 | Trending News
तिस-या टप्प्यातील दौ-यानंतर मनोज जरांगे मुंबईत दाखल झाले आहेत. लवकरच ते मुंबई दौ-याच्या कार्यक्रमाची आखणी करणार आहेत.
Source link
by Hansraj Agrawal | Nov 24, 2023 | Trending News
Maharastra Suman Sanstha : सुरक्षित मातृत्व आश्वासन कार्यक्रम (सुमन) कार्यक्रमांतर्गत राज्यात सन 2023-24 वर्षासाठी 600 संस्थांची सुमन संस्था म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील 600 संस्था सुमन संस्था होणार आहेत. यामध्ये 538 आरोग्य संस्थांची सुमन बेसिक म्हणून, 47 आरोग्य संस्थांची बेसिक इमरजन्सी ऑब्सेट्रीक अँड न्यु बॉर्न केअर व 15 आरोग्य संस्थांची कॉम्प्रेहेन्सीव्ह इमरजन्सी ऑब्सेट्रीक अँड न्यु बॉर्न केअर या प्रकारात निवड करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी दिली आहे.
सुरक्षित मातृत्व आश्वासन कार्यक्रमांतर्गत राज्यातील आरोगय संस्थांची सुमन संस्था म्हणून निवड करून त्यांच्या माध्यमातून दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविण्याचा आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांचा मानस आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार सुमन संस्थांची संकल्पना मूर्त रूपात आणण्यात येत आहे. आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांच्या संकल्पनेतून राज्याच्या आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी विविध निर्णय घेण्यात येत आहे. राज्यात 600 संस्था सुमन संस्था म्हणून निवड करण्याचा शासन निर्णयही निर्गमित करण्यात आला आहे.
सुरक्षित मातृत्व आश्वासन कार्यक्रमाचे (सुमन) ध्येय हे, टाळता येण्याजोग्या कारणांमुळे होणारे माता व बालमृत्यू, आजार संपुष्टात आणून प्रसुतीचा सकारात्मक अनुभव प्राप्त करणे आहे. सुमन अंतर्गत सर्व लाभार्थींना उच्च दर्जाच्या वैद्यकीय व अत्यावश्यक सेवा, संदर्भ सेवा देणे, लाभार्थ्यांना उपलब्ध सोयी सुविधांची नियमित माहिती देण्यासाठी आणि तक्रारींना त्वरित प्रतिसाद देणारी प्रभावी आरोग्य सेवा प्रणाली निर्माण करणे, स्वयंसेवी संस्था, स्वयंसहाय्यता गट, लोकप्रतिनिधी यांची 100 टक्के माता मृत्यूच्या नोंदणीसाठी मदत घेणे व त्या मृत्यूच्या अन्वेषणासाठी जनजागृती निर्माण करणे, आरोग्य सेवा पुरविणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे ज्ञान, कौशल्य बळकटीकरण करून त्यांच्यामध्ये लाभार्थींच्या हक्काबाबत जागृती निर्माण करणे, लाभार्थ्यांना गुणात्मक सेवा देण्यासाठी प्रवृत्त करणे, आंतरविभागीय समन्वय साधण्यासाठी कृती योजना तयार करणे ही सुमन कार्यक्रमाची वैशिष्ट्य आहे.
या कार्यक्रमांतर्गंत सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये येणाऱ्या सर्व गर्भवती महिला, नवजात बालकांना आवश्यक आरोग्य सेवा मोफत देण्यात येणार आहे. सर्व आरोग्य संस्थांमध्ये उपलब्ध संसाधनांच्या आणि सेवांच्या आधारे सेवा हमी पॅकेजनुसार सुमन बेसिक, सुमन बेसिक इमरजन्सी ऑब्सेट्रीक अँड न्यु बॉर्न केअर आणि सुमन कॉम्प्रेहेन्सीव्ह इमरजन्सी ऑब्सेट्रीक अँड न्यु बॉर्न केअर याप्रमाणे वर्गीकरण करण्यात आले आहे. तसेच सुमन कॉम्प्रेहेन्सीव्ह इमरजन्सी ऑब्सेट्रीक अँड न्यु बॉर्न केअर यामध्ये जिल्हा, स्त्री रूग्णालये व संदर्भ सेवा केंद्रे यांचा समावेश आहे. सुमन बेसिक इमरजन्सी ऑब्सेट्रीक अँड न्यु बॉर्न केअर यामध्ये प्रथम संदर्भ सेवा केंद्र नसलेल्या काही उपजिल्हा रूग्णालये व ग्रामीण रूग्णालये यांचा समावेश आहे. तसेच सुमन बेसिकमध्ये राज्यस्तरावरील संस्थांमध्ये निवड करण्यात आली आहे. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रांचाही समावेश आहे, या आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून राज्यातील जनतेला अधिकाधिक दर्जेदार व सहज आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे उद्दीष्ट आहे. यामुळे निश्चितच राज्याची आरोग्य व्यवस्था आणखी बळकट होईल, असा विश्वासही आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी व्यक्त केला आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Nov 24, 2023 | Trending News
कुणाल जमदाडे, झी मीडिया, अहमदनगर : अहमदनगर (Ahmednagar Crime) जिल्ह्यातील श्रीरामपूर आरटीओ (RTO) कार्यालयात एजंटंची दादागीरी पुन्हा एकदा समोर आली आहे. काम करून देत नाही म्हणून एजंटने थेट प्रादेशिक परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यावर खुनी हल्ला केला आहे. कार्यालयात घुसून या एजंटने कर्मचाऱ्यावर चॉपरने वार करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी (Ahmednagar Police) याप्रकरणी मुख्य आरोपीस ताब्यात घेतलं पुढील तपास सुरु केला आहे.
श्रीरामपूर आरटीओ कार्यालयाला एजंटंचा विळखा पडला असून दिवसेंदिवस त्यांची दादागीरी समोर येताना दिसतेय. वाहनावरील बोजा कमी करून ट्रान्स्फर करून दे अशी मागणी करत आरटीओ कर्मचाऱ्यावर जमावाने खुनी हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार श्रीरामपूरमध्ये समोर आला आहे. गुरुवारी दुपारी हा सगळा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आलं आहे.
एजंटगिरी करणाऱ्या हुजेफ यूनुस जमादार याच्यासह 15 जणांनी कनिष्ठ लिपिक सुनील जगन्नाथ शेवरे यांना मारहाण करत चॉपरने जिवे मारण्याचा प्रयत्न केलाय. सुनिल शेवरे यांच्या फिर्यादीवरून, श्रीरामपूर पोलीस ठाण्यात भादवी कलम 353,332, 186,34, अनुसूचित जाती आणि जमाती (अत्याचार प्रतिबंध कायदा 3(1), (R)(S) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी हुजेफ यूनुस जमादार याला ताब्यात घेतले आहे. तर इतर आरोपींचा शोध सध्या श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत..
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आरटीओ कार्यालयाला एजंटाचा विळखा पडला असून विभागाची पुनर्रचना करण्याची गरज असल्याचं म्हटलं होतं. मात्र त्यांनतर देखील हा गंभीर प्रकार समोर आल्याने आरटीओचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कार्यालय परिसरात असणाऱ्या एजंटसोबत आर्थिक हितसंबंध आहेत असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पोलिसांनी काय सांगितले?
“श्रीरामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आरटीओ कार्यालयात एजंट म्हणून काम करणाऱ्या हुजेफ यूनुस जमादार याने आणि त्याच्या भावाने बनावट कागदपत्रे तयार करुन कनिष्ठ लिपिक सुनील जगन्नाथ शेवरे यांना जबरदस्तीने सही करुन देण्यास सांगितले. शेवरे यांनी नकार दिल्यानंतर दोन्ही भावांनी दमदाटी केली आणि मारहाण केली. त्यामध्ये प्राणघातक शस्त्राचा देखील वापर केला आहे. हुजेबवर यापूर्वी देखील तीन गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत,” अशी माहिती श्रीरामपुरचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी दिली.
Source link