राजकारण्यांच्या सौभाग्यवतींचं भारीपण! सणासुदींच्या उधळणीत धरला फेर; पाहा Video

राजकारण्यांच्या सौभाग्यवतींचं भारीपण! सणासुदींच्या उधळणीत धरला फेर; पाहा Video


Maharastra politicians wife Mangalagaur Video : श्रावण म्हटलं की हिरव्यागार रंगाने नटलेला निसर्ग आणि ऊनपावसाचा खेळ डोळ्यासमोर उभा राहतो. महाराष्ट्रात नीज श्रावणाला सुरूवात झाली आणि त्यापाठोपाठ व्रत, सण, समारंभ साजरे करण्यासही सुरूवात झाल्याचं पहायला मिळतंय. महिला मंडळ आता जोरदार पद्धतीने सणासुदीची उधळण करताना दिसत आहेत. अशातच आता महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या सौभाग्यवतींनी मंगळागौरच्या निमित्ताने फेर धरल्याचं पहायला मिळतंय.

महाराष्ट्राच्या राजकारणात खो खो सुरू असताना, राजकारण्यांच्या सौभाग्यवतींचं भारीपण दिसून आलं आहे. फु बाई फु म्हणत हसऱ्या श्रावणाचं स्वागत महिला मंडळाने केलं आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हर्षवर्धन पाटील यांची लेक आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नातू निहार ठाकरे यांची पत्नी अंकिता पाटील ठाकरे यांनी व्हिडीओ शेअर केला आहे.

काय म्हणतात अंकिता पाटील ठाकरे?

सणासुदीची घेऊन उधळण
आला हा हसरा श्रावण
सौभाग्यवती पुजती मंगळागौर
खेळ खेळूनी पारंपरिक थोर…..

मुंबई येथे आयोजित मंगळागौर कार्यक्रमाप्रसंगी सौ. शर्मिलाकाकी ठाकरे, सौ. सुनेत्राकाकी पवार, सौ. वृषालीताई शिंदे यांच्यासह मंगळागौर खेळ खेळण्याचा आनंद घेतला, अशी पोस्ट अंकिता पाटील ठाकरे यांनी केली आहे.

पाहा VIDEO

दरम्यान, अंकिता पाटील यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, मंगळागौरीच्या कार्यक्रमात शर्मिला ठाकरे, अंकिता पाटील ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सून वृषाली शिंदे यांनी सहभाग घेत सुनेत्रा पवारांसोबत एकत्र फुगडी घालण्याचा देखील आनंद लुटल्याचं पहायला मिळतंय. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असल्याचं दिसत आहे.





Source link

अजित पवारांकडून ‘गलती से मिस्टेक’ माफी मागितली; म्हणाले, ‘मला चंद्रकांत…’

अजित पवारांकडून ‘गलती से मिस्टेक’ माफी मागितली; म्हणाले, ‘मला चंद्रकांत…’



चांद्रयान मोहिमेचे कौतुक करताना, चुकलेल्या शब्दा बद्दल अजित पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. कामाच्या व्यापात अशा चूका होता, पण त्याचा बाऊ केला गेल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. 
 



Source link

‘चांद्रयान पाठवताना पंतप्रधान मोदींची एक चूक झाली’; शहाजी बापू पाटील असं का म्हणाले?

‘चांद्रयान पाठवताना पंतप्रधान मोदींची एक चूक झाली’; शहाजी बापू पाटील असं का म्हणाले?


chandrayaan 3 : भाराताची चांद्रयान 3 मोहिम यशस्वी झाली आहे. चांद्रयान 3 ने चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी लँडिग केली आहे.  सर्व भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. संपूर्ण जगातून भारतावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेचे कौतुक करताना शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी आपल्या खास स्टाईलमध्ये संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.  

चांद्रयान 3 मोहिम यशस्वी झाल्यानंतर जगभरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. शहाजी बापू पाटील यांनी पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन करताना मिश्किल टोलेबाजी केली आहे. या मिश्लिक टोलेबाजीतून शहाजी बापू पाटील यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. पंतप्रधान मोदी यांची एक चूक झाली चंद्रयान मध्ये संजय राऊत यांना तेवढं पाठवला असतं तर सगळी किरकिर मिटली असती असे टोला शहाजी बापू पाटील यांनी लगावला आहे. 

शरद पवार यांच्याकडून इस्रोच्या शास्त्रज्ञांचं खास कौतुक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचं खास कौतुक केलंय.. चांद्रयान 3 मोहीम यशस्वी झाल्यानं पवारांनी आनंद व्यक्त केला.. जगाला पुढं नेण्यास भारतीय शास्त्रज्ञ सक्षम आहेत, असं गौरवोद्गार पवारांनी काढले.

काय झाडी, काय डोंगर… डायलॉग फेमस

शिंदे यांनी बंडखोरी केली तेव्हा  शहाजी बापू पाटील देखील 40 आमदारांसोबत गुवाहाटीला गेले होते. यावेळी  शहाजी बापू पाटील  यांनी फोन द्वारे कार्यकर्त्यांशी फोनवर साधलेला संवाद व्हायरल झाला होता. काय झाडी, काय डोंगर… असं म्हणत शहाजी बापू पाटील यांनी गुवाहाटीचे वर्णन केले. त्यांचा काय झाडी, काय डोंगर…  हा डायलॉग चांगलात फेमस झाला होता. 

भाजपशी पॅचअप करण्याबाबत उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर  शहाजी बापू पाटील यांची प्रतिक्रिया

मी भाजपशी पॅचअप करू शकलो असतो. मात्र माझ्या नीतीमत्तेत ते बसत नव्हतं असं उद्धव ठाकरे आपल्या पदाधिका-यांसमोर म्हटले. ज्यांनी 2014 पासून आपल्याला फसवलं त्यांच्यासोबत कसं काय जाणार असा सवाल त्यांनी केला. मुख्यमंत्री होतो, आमदारांना डांबून ठेऊ शकलो असतो मात्र जे मनाने फुटले त्यांना डांबून काय उपयोग असा उद्विग्न सवालही त्यांनी केला.  यावर आमदार शहाजी बापू पाटील यांनी पलटवार केला आहे. तुम्ही स्वतः ला डांबून ठेवले त्यामुळे ही वेळ आली. आता आम्हाला कुठ डांबून ठेवता असा पलटवार शहाजी बापू पाटील यांनी केला. 

 





Source link

कांद्याला बाजारभाव मिळत नसेल तर जगायचं कसं? शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी

कांद्याला बाजारभाव मिळत नसेल तर जगायचं कसं? शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी


पुढील
बातमी

सांगलीत अघोरी प्रकार, घोड्यांचे गुप्तांग तारांनी शिवले, कारण ऐकून अंगावर काटा येईल





Source link

कल्याणमधील अल्पवयीन मुलीचे हत्या प्रकरण; ठाकरे गटाच्या युवासेना शहरप्रमुखासह 40 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

कल्याणमधील अल्पवयीन मुलीचे हत्या प्रकरण; ठाकरे गटाच्या युवासेना शहरप्रमुखासह 40 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल



कल्याणमध्ये आई समोरच 12 वर्षाच्या मुलीची हत्या करण्यात आली. 25 वर्षीय तरुणाने एकतर्फी प्रेमातून या 12 वर्षाच्या मुलीची हत्या केली. 



Source link

Maharashtra Rain : चांद्रयान चंद्रापर्यंत पोहोचलं तरी पावसाचा थांगपत्ता नाही; हवामान विभागानं स्पष्टच सांगितलं की…

Maharashtra Rain : चांद्रयान चंद्रापर्यंत पोहोचलं तरी पावसाचा थांगपत्ता नाही; हवामान विभागानं स्पष्टच सांगितलं की…


Maharashtra Rain : महाराष्ट्रातील पावसानं काही केल्या माघारी फिरण्याचं नाव घेतलं नाहीये त्यामुळं आता शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांनाही चिंता सतावू लागली आहे. पावसाअभावी शेतीची कामं ताटकळली आहेत. तर, शहरी भागांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये पुरेसा पाणीसाठा असला तरीही पावसाची सद्यस्थिती पाहता पालिका प्रशासनांन पाणीकपात सध्यातरी रद्द न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं इथंही चिंतेचीच लाट. राज्यात एकंदर अशीच परिस्थिती असल्यामुळं आता पाऊस नेमका कधी परतणार असाच प्रश्न सर्वांना पडतोय. ‘आतातर हे चांद्रयान चंद्रावर पोहोचेल पण, पाऊस काही महाराष्ट्रात परतण्याच्या मनस्थितीत दिसत नाही’, अशाही मिश्किल प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत. 

राज्यावर मान्सूनची कमजोर पकड 

महाराष्ट्रात सध्या पावसासाठी पोषक वातावरणनिर्मिती होत असली तरीही मान्सूनची पकड मात्र कमकुवत झालेली दिसत आहे. विदर्भात मध्यम स्वरुपाता पाऊस बरसतोय, तर कोकणात मात्र तुरळक सरीच सुरु आहेत. येत्या 24 तासांमध्येही हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 

येत्या काही दिवसांमध्ये मुंबई, नवी मुंबईसह रायगड, रत्नागिरी आणि मध्य महाराष्ट्रामध्ये ऊन- पावसाचा खेळ पाहायला मिळेल. तर, पुणे- सातारा आणि कोल्हापुरात घाटमाथ्यावर बहुतांशी ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. राज्यात पावसाच्या हलक्या सरी बरसणार असल्या तरीही पावसाचं हे प्रमाण दिलासा देणारं नसेल असंच हवामान विभागानं सांगितलं आहे. 

दरम्यान, राज्यात पावसाचं प्रमाण बेताचं असल्यामुळं सध्यातरी कोणत्याही जिल्ह्यासाठी ऑरेंज किंवा यलो अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. असं असलं तरीही भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि अमरावती येथे मात्र काहीसा दिलासादायक पाऊस होणार आहे. इथं साधारण 65 मिमी पाऊस होण्याची शक्यता हवामान  विभागानं वर्तवली आहे. 

भरतीच्या वेळा आणि किनारपट्टी भागासाठीचा इशारा 

मान्सूनचे वारे सध्या किनारपट्टी भागावर फारसा प्रभाव पाडणार नाहीयेत. पुढील 24 तासांमध्ये राज्यातील किनारपट्टी भागांमध्ये दुपारी 3 वाजून 32 मिनिटांनी भरतीचा इशारा देण्यात आला असून, इथं या काळात 3 मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळण्याचा इशारा दिला गेला आहे. 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp