क्षणात बदलतंय राज्यातील हवामान; आता कोणत्या भागात मुसळधार?

क्षणात बदलतंय राज्यातील हवामान; आता कोणत्या भागात मुसळधार?


Maharashtra Rain : यंदाच्या वर्षी पावसानं महाराष्ट्र निर्धारित तारखेपेक्षा उशिरानं गाठला. त्यातही जून महिन्यात तो काही फारसा बरसला नाही. पण, जुलै महिना मात्र पावसानंच गाजवला. ऑगस्ट महिन्यात हा मोसमी पाहुणा पुन्हा एकदा लपंडाव खेळताना दिसला. आता ऑगस्ट महिना सुरु होऊन पहिले दहा दिवसही ओलांडले तरी राज्याच्या काही भागांतील पावसाची विश्रांती मात्र संपलेली दिसत नाही. मुंबई, नवी मुंबईसह मध्य महाराष्ट्र आणि कोकणाच्या काही भागातही पावसानं उघडीप दिल्याचं पाहायला मिळालं. 

मधून येणाऱ्या पावसाच्या जोरदार सरीनं अनेकांची त्रेधातिरपीट उडवली खरी पण, ही सर पाणीटंचाईसारख्या समस्या मिटवण्यास पुरेशी नाही हीच वस्तुस्थिती. राज्यात आता पुढचे काही दिवस नेमकं कसं पर्जन्यमान असेल यांची अनेकांनाच चिंता लागून राहिलेली असताना आता नव्यानं हवामानाचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. ज्या धर्तीवर येत्या काही दिवसांत पाऊस राज्यात पुन्हा सक्रिय होणार असल्याचं सांगितलं जात आहे. 

आठवडी सुट्टी पाऊस गाजवणार… 

पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पालघर, ठाण्यासह मुंबई आणि नवी मुंबईच्या काही भागांना पुढील 48 तासांसाठी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, पुढील दोन दिवसांमध्ये सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरीमध्ये ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसेल असा इशारा देण्यात आला आहे. 

तिथं विदर्भातही अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळणार आहे. विदर्भाच्या नागपूर, अमरावती, बुलढाणा, अकोल्यासह इतर काही भागांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी असेल. तर, मराठवाड्याची तहानही हा पाऊस भागवेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. संभाजीनगरपासून नांदेडपर्यंत चांगला पाऊस होण्याची शक्यता आयएमडीनं वर्तवली आहे. तर पश्चिम महाराष्ट्र पट्ट्यात येणाऱ्या सातारा, कोल्हापूर भागातही पावसाची हजेरी असेल असं सांगिण्यात आलं आहे. ज्यामुळं या आठवड्याचा शेवट पावसानं होईल हे आता स्पष्ट होत आहे. 

उत्तर भारतात पावसाचा जोर… 

तिथं उत्तर भारतामध्ये सध्या पावसानं चांलगा जोर धरल्याचं पाहायला मिळत आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानसह पंजाब आणि जम्मू काश्मीरपर्यंत पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज आहे. तर, हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटीमुळं सखल भागांमध्ये असणाऱ्या गावांना याचा पटका बसताना दिसत आहे. 

 

 





Source link

CID पेक्षा भारी Investigation; अहमदनगर पोलिसांनी एका सॅनिटरी पॅडवरून शोधला खुनी

CID पेक्षा भारी Investigation; अहमदनगर पोलिसांनी एका सॅनिटरी पॅडवरून शोधला खुनी


Ahmednagar Crime News : CID या क्राईम शो मध्ये कोणताही पुरावा नसताना CID ची टीम आरोपींचा छडा लावतात.  CID पेक्षा भारी Investigation अमहमदनगरच्या राजूर पोलिसांनी केले आहे. एका महिलेच्या हत्या प्रकरणात कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी एका सॅनिटरी पॅडवरुन खुनी शोधला आहे. पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. 

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील दुर्गम भागात एका अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला होता. या महिलेची ओळख पटवण्यासोबतच तिची हत्या करणाऱ्याचा छडा पोलिसांनी लावला. एका सॅनेटरी पॅडमुळे पोलीसांना हे शक्य झाले आहे.

नेमकं काय घडलं?

अमहमदनगरच्या राजूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कातळापूर परीसरात एका 25 वर्षीय महिलेचा मृतदेह काही दिवसांपूर्वी पोलीसांना आढळून आला होता. महिलेची हत्या झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. या मृतदेहाती ओळख पोलिसांना पटली नाही. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेवून तो शवविच्छेदनासाठी पाठवला. या महिलेची हत्या झाल्याचे शवविच्छेदन अहवालात समोर आले. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला.

सॅनिटरी पॅडवरुन असा सापडला खुनी

महिलेच्या मृतदेहाजवळ पोलीसांना पर्समध्ये सॅनिटरी पॅड सापडले. यावरुन पोलिसांनी तपास सुरु केला.  ही महिला राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील असून या महिलेचे नाव कल्याणी महेश जाधव असल्याचे पोलिसांना समजले.  जिल्हा परिषदेच्या मदतीने पोलीसांनी या महिलेच्या घराता पत्ता तसेच इतर माहिती मिळवली. यानंतर पोलिसांनी थेट महिलेचे घर गाठले आणि तिच्या पतीला चौकशीसाठी ताब्यात घेतले.

पतीनेच केली हत्या

आरोपीने आधी पोलिसांना उडवाउडीवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने पत्नीच्या हत्येची कबुली दिली.  पत्नीवर असलेल्या अनैतिक संबधाच्या संशयावरून पती महेश जाधव आणी त्याचा भाचा मयूर साळवे यांनी खुन केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पोलीसांनी दोघांनाही गजाआड केले असून पोलीसांनी केवळ सॅनेटरी पॅडच्या माध्यमातून केलेल्या तपासामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.

घरफोडी करून मुंबई, ठाणे,नवी मुंबईत धुमाकूळ घालणाऱ्या दोघांना अटक

मुंबई, ठाणे, नवी मुंबई त्याचबरोबर डोंबिवली शहरात घरफोड्या करून धुमाकूळ घालणाऱ्या दोघां सराईत चोरट्यांना डोंबिवली मानपाडा पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली आहे. युसुफ शेख आणि नौशाद आलम असे अटक करण्यात आलेल्या सराईत चोरट्यांची नावे आहेत. मौजमजा करण्यासाठी हे दोघे घरफोडया करायचे. या चोरट्यांकडून पोलिसांनी 200 ग्रॅम वजनाचे सोने, त्याचबरोबर 20 लाखांपेक्षा जास्त रोकड हस्तगत केली आहे. विशेषतः सकाळच्या वेळेस बंद घर हेरून त्या घरांमध्ये ते घरफोडी करून पोबारा करायचे. 





Source link

Narayan Rane: तुमची ‘औकात’ काढेल म्हणणाऱ्या राणेंचा Video व्हायरल; प्रियंका चतुर्वेदींचा जोरदार हल्लाबोल!

Narayan Rane: तुमची ‘औकात’ काढेल म्हणणाऱ्या राणेंचा Video व्हायरल; प्रियंका चतुर्वेदींचा जोरदार हल्लाबोल!


Narayan Rane On Arvind Sawant: लोकसभेत मोदी सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावरुन (No Confidence Motion) जोरदार घमासान पहायला मिळालं. चर्चा सुरू असताना महाराष्ट्राचे दोन खासदारांच्या हमरीतुमरी पहायला मिळाली. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचं राज्यसभेत रौद्ररूप पाहायला मिळालं. विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना नारायण राणे चांगलेच बरसले. त्यावेळी त्यांनी शिवसेना खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांना चांगलंच फटकारलं. औकात शब्दांचा उल्लेख राणे यांनी सावंतांवर जोरदार हल्लाबोल केला. त्यावरून आता देशाच्या राजकीय वर्तुळात मोठा वाद पेटल्याचं पहायला मिळतंय. त्यावर आता  ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

प्रियंका चतुर्वेदी यांनी नारायण राणेंचा व्हिडीओ (Narayan Rane Video) शेअर करत मोदी सरकारवर हल्लाबोल केला. हा माणूस एक मंत्री आहे. तो या सरकारचा दर्जा किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो, हे दाखवताना दिसत आहे, असं म्हणत चतुर्वेदी यांनी सडकून टीका केली आहे. अरविंद सावंत यांनी यापुढे भाजप आणि पंतप्रधानजी आणि अमितजी शाह यांच्यावर बोट जरी उगारलं तर तुमची औकात मी काढेल.. काय खरं आहे ते मी बाहेर काढेल, असं नारायण राणे (Narayan Rane On Arvind Sawant) यांनी म्हटलं आहे. 

पाहा Video

अविश्वास प्रस्तावावर बोलताना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला. त्यावर उत्तर देताना, हे पळपुटे आम्हाला हिंदुत्व शिकवणार का? असा खोचक सवाल सावंत यांनी केला होता. त्यावरून राणे यांनी पुढचा मोर्चा सांभाळला.

आणखी वाचा –  ‘अंबादास दानवे फक्त अंगावर धावून गेले, मी मारलं असतं….’, चंद्रकांत खैरे यांचं धक्कादायक वक्तव्य!

तुम्ही शरद पवार यांच्यासोबत गेले तेव्हा तुम्हाला हिंदुत्व नाही आठवलं का? पक्ष वाढवायला पण ताकद लागते, असं नारायण राणे म्हणाले. त्यावेळी नारायण राणे यांनी अरविंद सावंत यांना शिंगावर घेतलं. हा शिवसेनेत कधी आला? मी 1966 चा शिवसैनिक आहे… अरे बस खाली बस, असं म्हणत असताना संसदेचा पारा चढला. त्यावेळी त्यांनी औकात शब्दाचा वापर करत अरविंद सावंत यांच्यावर टीका केली. त्यानंतर मोठा वाद झाल्याचं दिसून आलं.





Source link

TMC Job: ठाणे पालिकेत पुन्हा भरती, बारावी उत्तीर्णांना मिळेल ‘इतक्या’ पगाराची नोकरी

TMC Job: ठाणे पालिकेत पुन्हा भरती, बारावी उत्तीर्णांना मिळेल ‘इतक्या’ पगाराची नोकरी


Thane Municipality Job: ठाणे महानगरपालिकेअंतर्गत काही दिवसांपुर्वी ज्युनिअर रेसिडन्स पदांची भरती करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 

ठाणे महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या तरण तलाव विभागात नोकरीची संधी आहे. येथे येणाऱ्या नागरीक आणि सभासदानां पोहायला शिकविण्याकरिता जलनिर्देशक / जलजिवरक्षक ही पदे भरली जाणार आहेत. यामध्ये 1 महिला आणि 5 पुरूष जलनिर्देशक/जलजिवरक्षक पदे भरली जातील. यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी दिलेल्या मुदतीपर्यंत अर्ज पाठविणे आवश्यत आहे. 

ही भरती  तात्पुरत्या स्वरूपाची असेल, याची उमेदवारांनी नोंद घ्या. निवड झालेल्या उमेदवारांना कंत्राटी पध्दतीने 6 महिन्याकरिता काम करावे लागणार आहे. कर्मचाऱ्याचे काम बघून किंवा तेथील कामाची गरज ओळखून हा कालावधी वाढवायचा की नाही, याचा निर्णय घेतला जाईल. त्यावेळी प्रशासनाने दिलेल्या निर्णयाचे उमेदवारांना पालन करावे लागेल. 

BMC Job: मुंबई पालिकेत नवीन भरती; पदवीधरांना 1 लाखापर्यंत मिळेल पगार

या पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरु असून उमेदवारांना 14 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज पाठवता येणार आहे. अर्ज करताना बंद लिफाफ्यावर ‘जलनिर्देशक/ जलजिवरक्षक म्हणुन नेमणुक करणेकरिता’ असे ठळक अक्षरात नमूद करावे. 

Bank Job: सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये आठवी ते पदवीधरांना नोकरी, ‘ही’ घ्या अर्जाची थेट लिंक

उमेदवारांनी आपले अर्ज नागरी सुविधा केंन्द्र, ठाणे महानगरपालिका, (मुख्यालय), तळमजला, पांचपाखाडी, ठाणे. या पत्त्यावर पाठवायचे आहेत. दिलेल्या मुदतीनंतर आणि चुकीच्या पद्धतीने पाठवलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्या. 

ठाणे महापालिकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

हिंदुस्तान एरोनॉटिक्समध्ये ‘शिका आणि कमवा’

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये  पदवीधर अप्रेंटिस,  डिप्लोमा अप्रेंटिस आणि आयटीआय अप्रेंटिस पदाची भरती केली जाणार आहे. या पदाच्या तब्बल 647 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. 

पदवीधर अप्रेंटिसच्या एकूण 186 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून संबंधित इंजिनीअरिंग ब्रांचमध्ये पदवीधर असणे गरजेचे आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 9 हजार इतका पगार दिला जाणार आहे.

या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना नाशिक येथे काम करावे लागेल. यासाठी अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन माध्यमातून अर्ज करावा लागणार आहे.  23 ऑगस्ट 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. 





Source link

शाहरुखच्या स्वदेश चित्रपटाची प्रेरणा असलेला महाराष्ट्रातील बारामुखी धबधबा; ग्रामस्थ पर्यटकांना येथे का येऊ देत नाहीत?

शाहरुखच्या स्वदेश चित्रपटाची प्रेरणा असलेला महाराष्ट्रातील बारामुखी धबधबा; ग्रामस्थ पर्यटकांना येथे का येऊ देत नाहीत?


प्रशांत परदेषी, झी मीडिया, नंदुरबार :  शाहरुखच्या स्वदेश चित्रपटात दाखवलेला धबधबा महाराष्ट्रात आहे.  नंदुरबार जिल्ह्यातला असलेला हा बारामुखी धबधबा पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. याठिकाणी गेल्या 4 वर्षापासून दुर्घटना होत आहेत. जोवर सरकार उपाययोजना करत नाही तोवर पर्यटकांना बंदी घालण्याचा निर्णय गावक-यांनी घेतला आहे (Nandurbar Baradhara Waterfall).

सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये नैसर्गिक पर्यटनाची संधी

गुजरात राज्य नर्मदा नदीवरील सरदार सरोवराचा परिसर पर्यटन पंढरी म्हणून विकसित करीत आहे. मात्र, याच सरोवराच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या महाराष्ट्राला या निसर्गाच्या उधळणीचा आणि सरोवराच्या पाण्याचा लाभ घेता आलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार सरोवरा लगत स्टॅचू ऑफ युनिटी उभारला आणि त्याच भागात जागतिक पर्यटन केंद्र विकसित केले. तशीच किंबहुना त्याहून सरस नैसर्गिक पर्यटनाची संधी सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये मात्र महाराष्ट्र सरकाराच्या दूरदृष्टीच्या अभावामुळे या भागातील पर्यटन विकासाकडे लक्ष दिले गेलेलं नाही. 

पर्यटन स्थळ विकसीत करण्याची मागणी

गुजरात सरकार आणि त्याच्या मदतीला केंद्र सरकार सरोवराच्या शेजारी ज्या पद्धतीने मोठ्या उद्योजकांना पूरक भूमिका घेऊन केवडीया परिसरात एकामोगोमाग एक पर्यटन केंद्र विकसित करीत आहे, त्यापद्धतीने महाराष्ट्रात उद्योग धार्जिणे धोरण न अंमलात आणता स्थानिकांना सोबत घेऊन त्यांची उन्नती होईल या विचाराने पर्यटन विकास केला गेला तर या भागातील स्थलांतर, कुपोषण, बेरोजगारी , निरक्षरता असे सर्व प्रश्न निकाली निघणार आहेत.  सातपुड्याच्या या डोंगर रांगांमध्ये तोरणमाळ, डाब हि थंड हवेची ठिकाणे आहेत. शेकडो मैल नर्मदेचे अडवलेले पाणी आहे.  बिलगावचा ऐतिहासिक धबधबा याच भागात आहे. महूची फुल .. औषधी वनस्पती .. असं निसर्गाचे वरदान लाभलेला हा परिसर नेहमी पर्यटन विकासापासून लांब राहिला आहे.  

12 विविध ठिकाणावरून एकच धबधबा प्रवाहित होतो

बिलगावच्या या धबधब्याला बारामुखी धबधबा ही म्हटलं जातं. उदय नदी वर असलेला हा धबधबा पावसाळ्यामध्ये सर्व पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत असतो. 12 विविध ठिकाणावरून एकच धबधबा वाहण्याच बहुदा हे देशातलं एकमेव ठिकाण असेल. एकाच डोंगरावरून बारा ठिकाणावरून कोसळणारा हा धबधबा आपलं रौद्ररूप धारण करतो, तेव्हा चांगल्या चांगल्यांची भंबेरी उडतो. 

धबधबा दिसायला जितका आकर्षक आहे तितका तो जीवघेणा 

अभिनेता शाहरुख खान यांचा स्वदेश चित्रपट याच धबधब्यावर उभारण्यात आलेल्या प्रकल्पाच्या प्रेरणेतून तयार करण्यात आला होता. ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांनी नर्मदा सरोवराच्या याच धबधब्यावर  ऊर्जा  प्रकल्प उभारला असल्याचे स्थानिक सांगतात. मात्र आता या प्रकल्पाचे कुठले अवशेष त्या ठिकाणी नसले, तरी हा धबधबा मात्र सर्वांना आपल्याकडे आकर्षित करीत आहे. उंच कड्यावरून पडणाऱ्या बारा पाण्याच्या धारा या नर्मदा नदीला जाऊन मिळतात. हा धबधबा दिसायला जितका आकर्षक आहे तितका तो जीवघेणा देखील आहे. या ठिकाणी धबधब्याच सुंदर रूप पाहून अनेक जणांना पाण्यात उतरण्याचा मोह टाळला जात नाही आणि पाण्याचा अंदाज न आल्याने अनेक जण या ठिकाणी बळी पडतात. हीच बाब लक्षात घेऊन स्थानिक नागरिक ग्रामस्थांनी आता या धबधब्यावर सुरक्षा कठळे निर्माण होत नाही तोवर पर्यटकांना बंदी घातली आहे. शासनाने या धबधब्याच्या ठिकाणी सुरक्षित कठडे बांधावे जेणेकरून पावसाळ्यामध्ये पर्यटन या ठिकाणी सुरू होऊ शकेल आणि या भागातल्या आदिवासी बांधवांना रोजगाराचे एक नाव साधन उपलब्ध होईल.  





Source link

चार लाखांची रोकड, 40 तोळे सोनं अन्… लाचलुचपत विभागाच्या हाती लागला कोट्याधीश भ्रष्टाचारी अधिकारी

चार लाखांची रोकड, 40 तोळे सोनं अन्… लाचलुचपत विभागाच्या हाती लागला कोट्याधीश भ्रष्टाचारी अधिकारी



Nashik Crime : राज्य सरकार व महसूल विभाग राज्यात महसूल सप्ताह साजरा करीत असतानाच नाशिक विभागातील तहसीलदार नरेश बहिराम याने तब्बल 15 लाख रुपयांची लाच स्विकारल्याचे समोर आले आहे.



Source link

YouTube
Instagram
WhatsApp