NCCच्या विद्यार्थ्यांवर तालिबानी अत्याचार, ठाण्यातील जोशी-बेडेकर कॉलेजमधला Video व्हायरल

NCCच्या विद्यार्थ्यांवर तालिबानी अत्याचार, ठाण्यातील जोशी-बेडेकर कॉलेजमधला Video व्हायरल


विशाल वैद्य, झी मीडिया, ठाणे : ठाण्यातील बांदोडकर (Bandodkar College) आणि जोशी बेडेकर महाविद्यालयातील (Joshi-Bedekar College)  NCC च्या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण होत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Viral Video) व्हायरल झाला आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये एकच खळबळ माजलीय. जोशी बेडेकर कॉलेजच्या प्रांगणात बांदोडकर, बेडेकर आणि पॉलिटेक्निक या तिन्ही विभागांच्या विद्यार्थ्यांना संयुक्त असे NCC चे प्रशिक्षण देण्यात येतं. या प्रशिक्षणदरम्यान विद्यार्थ्याना आर्मी आणि नेव्हीच्या प्रशिक्षण पूर्वीचे धडे देण्यात येतात. पण विद्यार्थ्यांकडून एखादी चूक झाल्यास त्यांना अमानुष शिक्षा करण्यात येत असल्याचं समोर आलं आहे. 

ही शिक्षा अमानवी प्रकारची असल्याचं समोर आल्याने खळबळ माजलीय. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत विद्यार्थ्यांना कॉलेजच्या कॅम्पसमध्ये साचलेल्या पाण्यात डोकं आणि पायावर उभं करण्यात आलं आहे. सीनिअर विद्यार्थी हातात लाकडी दांडा घेऊन उभा आहे. विद्यार्थी थोडासा हलला तरी हा सीनिअर त्यांना लाकडी दांडक्याने अमानुष मारहाण करताना दिसत आहे. ही मारहाण इतकी अमानुष आहे की विद्यार्थी अक्षरश: कळवळताना दिसत आहेत. कॉलेजमधल्याच एका जागरुक विद्यार्थ्याने मोबाईलमध्ये हा व्हिडिओ शूट केला आहे. 

या सीनिअर विद्यार्थ्यांची इतकी दहशत आहे की ज्युनिअर विद्यार्थी त्यांना घाबरुन तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत. कॉलेजमध्ये शिकायचं आहे, आमचं करियअर उद्धव्स्त होईल या भीतीने विद्यार्थीच नाही तर त्यांचे पालकही समोर येऊन तक्रार करत नाहीत. बांदोडकर आणि जोशी-बेडेकर कॉलेजच्या प्राचार्यांनीही शिक्षा झालेल्या विद्यार्थ्यांनी पुढे येऊन तक्रारर करावी असं आवाहन केलं आहे. पण यानंतरही विद्यार्थी स्वत:हून पुढे येण्यास धजावत नाहीएत. यावरुन या सीनिअर विद्यार्थ्यांची किती दहशत आहे हे पाहिला मिळतंय. 

अशा शिक्षेमुळे विद्यार्थ्यानमध्ये एनसीसी बाबत दहशत पसरली असून अनेक विद्यार्थी एनसीसी नकोच असं म्हणतात दिसतायत. एनसीसीचे युनिट हेड सीनियर विद्यार्थीच असतात. या सीनिअर विद्यार्थ्यांकडून ज्युनिअर विद्यार्थ्यांना अशा प्रकारे शिक्षा दिली जाते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता या सीनिअर विद्यार्थ्यावर कारवाईची मागणी केली जात आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जोशी-बेडेकर कॉलेजच्या प्राचार्य सुचित्रा नाईक यानी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं आहे.  विद्यार्थ्यांनी अजिबात काळजी करू नये हे असले प्रकार आम्ही कोणीही खपवून घेणार नसल्याचं सुचित्रा नाईक यांनी म्हटलंय. 

तसंच या प्रकारामुळे याने एनसीसीमार्फत जी चांगली काम होतात ती झाकोळली गेली आहेत. विद्यार्थ्यांना अमानुष शिक्षा देणाऱ्या सीनिअरवर तात्काळ कारवाई करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर हे असले प्रकार यापुढे होऊन नयेत म्हणून एक कमिटीची स्थापनाही आम्ही तत्काळ करत असून ज्या कोणा विद्यार्थ्यांबाबत असे प्रकार घडले असतील त्यांनी अजिबात घाबरून जाऊ नये आम्हाला येऊन भेटावे एनसीसी सोडण्याचा विचार अजिबात करु नये असेही सुचित्रा नाईक यांनी सांगितलं आहे. दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यावर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. 





Source link

नितीन देसाई यांनी एवढं टोकाचं पाऊल का उचललं? धक्कादायक माहिती समोर

नितीन देसाई यांनी एवढं टोकाचं पाऊल का उचललं? धक्कादायक माहिती समोर


Nitin Desai Death :  प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी कर्जतमधील एनडी स्टुडीओमध्ये गळफास घेत आयुष्य संपवलं. नितीन देसाईंच्या आत्महत्येनं हिंदी आणि मराठी सिनेसृष्टी हादरली आहे. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी आयुष्य संपवलं आहे. नितीन देसाई हे लोकप्रिय कलादिग्दर्शक असण्यासोबत निर्माता दिग्दर्शक आणि अभिनेतेदेखील होते.  नितीन देसाईंच्या आत्महत्येमुळे सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला. त्यांनी एवढं टोकाचं पाऊल का उचललं, याची चर्चा आता सुरू झाली. 

नितीन चंद्रकांत देसाई या नावातच कलेचं भव्य दिव्य स्वप्न आणि रिकाम्या जागेला दिमाखदार करण्याची जादू होती. कलाकार म्हणून घडवलेली सर्वोच्च वास्तू एन डी स्टुडिओमध्येच त्यांनी जगण्याचा शेवट केला. पहाटे चारच्या सुमाराला स्टुडिओमध्ये गळफास लावून नितीन देसाईंनी आत्महत्या केली. 

भारतातला अव्वल कलादिग्दर्शक 

भारतातला अव्वल कलादिग्दर्शक अशी नितीन चंद्रकांत देसाई यांची ओळख होती. 1942 लव्ह स्टोरी सिनेमापासून नितीन देसाईंची घोडदौड सुरू झाली…लगान, देवदास, जोधा अकबर अशा एक से बढकर एक चित्रपटांमधल्या भव्य दिव्य सेटचे बॉलिवूडमध्ये नवे बेंचमार्क सेट केले. काही हॉलिवूड सिनेमांसाठीही त्यांनी योगदान दिलं. प्रजासत्ताक दिनाच्या महाराष्ट्राच्या चित्ररथांचं कलादिग्दर्शनही चंद्रकांत देसाईच करायचे. त्याचबरोबर लालबागच्या राजाचा सेटही नितीन चंद्रकांत देसाईच उभारायचे. 

नितीन देसाईंच्या आत्महत्येबाबत  धक्कादायक माहिती समोर

नितीन देसाईंनी एवढं टोकाचं पाऊल का उचललं, यावर आता चर्चा सुरू झालीय. यासंदर्भात काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. नितीन देसाई दिल्लीहून रात्री अडीचला एनडी स्टुडिओत पोहोचले होते. आत्महत्येपूर्वी त्यांनी काही व्हॉईस क्लिप रेकॉर्ड केल्याची चर्चा  आहे. या व्हॉईस क्लिपमध्ये काही उद्योगपतींची नावं असल्याचा दावा करण्यात येत आहे.  आर्थिक अडचणीतून त्यांनी आत्महत्या केल्याचं बोललं जातंय. त्यांनी उभारलेल्या एन डी स्टुडिओवरचं अडीचशे कोटींचं कर्ज न फेडल्यानं जप्तीची कारवाई होणार होती, अशीही चर्चा आहे. बॉलिवूडमधला एक गट एनडी स्टुडिओमध्ये शूटिंग होऊ देत नव्हता, असा आरोप देसाईंच्या निकटवर्तीयांनी केला आहे. 
नितीन देसाई म्हणायचे अख्खं आकाश हा माझ्यासाठी कॅनव्हास आहे. आभाळाएवढ्या मोठ्या कॅनव्हासमधून जगण्यातली उत्तरंही नक्कीच सापडली असती. मात्र, स्वतःच उभारलेल्या भव्य दिव्य सेटमध्ये या अवलिया कलाकारानं घेतलेली धक्कादायक एक्झिट सगळ्यांनाच चटका लावून गेली. 

नितीन देसाईंच्या आत्महत्येची कसून चौकशी होणार

नितीन देसाईंच्या आत्महत्येची कसून चौकशी केली जाईल अशी माहिती रायगडच्या पोलीस अधिक्षकांनी दिलीय. त्यांच्याजवळ सापडलेला मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसचा तपास केला जाईल असही त्यांनी सांगितलंय. नितीन देसाईंचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जेजे हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला असून 5 डॉक्टरांमार्फत शवविच्छेदन केलं जाणारंय. त्यांच्या मृतदेहावर ND स्टुडिओतच अत्यंसंस्कार केले जाण्याची शक्यता आहे. नितीन देसाईंच्या आत्महत्येची कसून चौकशी केली जाईल अशी माहिती रायगडच्या पोलीस अधिक्षकांनी दिलीय. त्यांच्याजवळ सापडलेला मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसचा तपास केला जाईल असही त्यांनी सांगितलंय. नितीन देसाईंचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जेजे हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला असून 5 डॉक्टरांमार्फत शवविच्छेदन केलं जाणारंय. त्यांच्या मृतदेहावर ND स्टुडिओतच अत्यंसंस्कार केले जाण्याची शक्यता आहे. 





Source link

भिडेंसह काँग्रेसच्या ‘शिदोरी’ वर सुद्धा कारवाई होणार! फडणवीसांची विधानसभेत स्पष्टोक्ती

भिडेंसह काँग्रेसच्या ‘शिदोरी’ वर सुद्धा कारवाई होणार! फडणवीसांची विधानसभेत स्पष्टोक्ती


Action On Shidori: शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त विधानावरुन विधानसभेत आज मोठा गोंधळ पाहायला मिळाला. संभाजी भिडेंच्या विधानाचा विषय आज विधानसभेत मांडण्यात आला. यावेळी भिडे यांच्याविषयी शुक्रवारी विषय आणलेला स्थगन प्रस्ताव नाकारला. आता तो विषय आणता येणार नाही, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटले होते. 

संभाजी भिडे प्रकरणावरुन विरोधकांनी चांगलाच गदारोळ केला. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी निवेदन सादर केले. यामध्ये अमरावती पोलिसांकडून भिडेंना नोटीस पाठवली असल्याचे ते म्हणाले. संभाजी भिडे यांच्यावर अमरावतीत येथे गुन्हा दाखल केला आहे. यासोबतच सावरकरांच्या अपमानाप्रकरणी कॉंग्रेसचे मुखपत्र ‘शिदोरी’ वर कारवाई होणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

माध्यमात प्रसारीत झालेल्या संभाजी भिडे यांच्या वक्तव्यांचे व्हीडीओ व्हाईट सॅम्पल घेतले घेतले जातील, असे फडणवीस म्हणाले. जितेंद्र आव्हाडांनी यासंदर्भात तक्रार केली होती. 

संभाजी भिडे यांना सीआरपीसी 41 अ ची नोटीस पाठवली आहे. अमरावती पोलिसांनी पाठवलेली नोटीस संभाजी भिडे यांनी स्वीकारली आहे. त्यानुसार चौकशी होईल. भाषणाचे व्हिडीओ उपलब्ध नाहीत असे पोलिसांनी सांगितले. माध्यमांमध्ये फिरत आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणावरील आहेत. 

यासंदर्भात जितेंद्र आव्हाड यांनीही तक्रार दाखल केली आहे. ती अमरावती पोलिसांकडे वर्ग केली आहे. कुठल्याही राष्ट्रीय नेत्याच्या संदर्भात कोणीही अवमानजनक वक्तव्य केले तर त्यांच्यावर पोलीस कारवाई होईल, असे फडणवीस म्हणाले.

संभाजी भिडे हिंदुत्वासाठी काम करतात. छत्रपती शिवाजी महाराजांसोबत त्यांच्या किल्ल्यांसोबत ते बहुजन समाजाला जोडतात. हे कार्य चांगले आहे. त्यांना महापुरुषांवर वक्तव्य करण्याचा अधिकार दिलेला नाही. महापुरुषांवर कोणी वक्तव्य केले तर कारवाई होईल,” असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले

सभागृहात कोणी असे वक्तव्य केले तर त्याच्यावर कारवाई होईल. वीर सावरकरांवर वादग्रस्त लिखाण करणाऱ्यांवर कारवाई होईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 





Source link

TMC Job: ठाणे पालिकेत बंपर भरती, निवड झाल्यास 75 हजारपर्यंत मिळेल पगार

TMC Job: ठाणे पालिकेत बंपर भरती, निवड झाल्यास 75 हजारपर्यंत मिळेल पगार


TMC Job 2023: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. ठाणे महानगरपालिकामध्ये बंपर भरती सुरु असून उमेदवारांना येथे चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे. ठाणे महापालिकेकडून या भरतीसंदर्भात नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड येणार आहे.

ठाणे महापालिका भरतीअंतर्गत विविध पदांच्या एकूण 116 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ज्युनिअर रेसिडन्सना याअंतर्गत नोकरी मिळणार आहे. 

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून एम.डी. पदव्युत्तर पदवी, डी.एन.बी. पदव्युत्तर पदवी. डिप्लोमा,FCPS, एम.बी.बी.एस पदवी आणि दंतचिकित्सा बी.डी.एस. पदवीसह एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. 

निवड झालेल्या उमेदवारांना ठाणे महानगरपालिकेच्या नियमाप्रमाणे एकत्रित विद्यावेतन लागू राहणार आहे. उमेदवारांनी अर्जासोबत M.M.C/M.S.D.C चे वैध प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. हे जोडले नसल्यास अर्ज स्विकारले जाणार नाही.

राखीव संवगीतील उमेदवार उपलब्ध न झाल्यास या जागेवरील नेमणुकणीकीसाठी इतर उपलब्ध उमेदवारांची गुणानुक्रमे नेमणुक करण्यात येणार आहे. 

SEBC/EWS संवर्गातील अर्जदारास शासन निर्णयानुसार पुरावा सादर करावा लागेल. तसेच (विजा / भज, इमाव, विमाप्र या उमेदवारांनी नुतनीकरण झालेले नॉनक्रिमीलेयर प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे अन्यथा अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्या. 

ठाणे महानगरपालिकेची अधिकृत वेबसाइट www.thanecity.gov.in वर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. पात्र अर्जदारांची निवड यादी महानरपालिकेच्या वेबसाइटवर जाहीर करण्यात येणार आहे. 

उमेदवारांकडून कोणतेही परीक्षा शुल्क घेण्यात येणार नाही. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 75 हजार 144 रुपये ते 76 हजार 587 रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. 

निवड झालेल्या उमेदवारांना ठाण्यात नोकरी करावी लागेल. थेट मुलाखतीच्या माध्यमातून ही निवड केली जाईल. उमेदवारांना मुलाखतीसाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय, पहिला मजला, कळवा, ठाणे येथे उपस्थित रहावे लागेल. अर्ज अपूर्ण असल्यास तो रद्द ठरविण्यात येईल.

आयआयटी मुंबईत विविध पदांची भरती

आयआयटी मुंबईत प्रकल्प संशोधन वैज्ञानिक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांना 01 वर्षाच्या कालावधीसाठी नियुक्त केले जाणार आहे. केवळ प्रकल्पाच्या कालावधीसाठीही निवड असेल याची उमेदवारांनी नोंद घ्या. आयआयटी मुंबईच्या नोटिफिकेशननुसार, प्रोजेक्ट रिसर्च सायन्टिस्ट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मुख्यतः प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी काम करणे आवश्यक आहे. आयआयटी बॉम्बेने वरील-उल्लेखित पदासाठी फक्त 1 रिक्त जागा सोडली आहे. 

या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना पात्रता आणि अनुभवानुसार रु. 42,000 ते रु 84,000 (लेव्हल PR-O2) पर्यंत मासिक पगार मिळेल. निवडलेल्या उमेदवाराला “लक्ष्यित उपसंच निवड आणि सक्रिय अर्ध-पर्यवेक्षित शिक्षण वापरून भाषण ओळखण्यात निष्पक्षता” या शीर्षकाच्या प्रकल्पावर काम करावे लागेल.





Source link

‘स्पेशल 26’ पाहून बनवला प्लॅन; नवी मुंबईतील बड्या व्यक्तीच्या घरी धाड टाकली, तासाभरात 34 लाखांवर डल्ला

‘स्पेशल 26’ पाहून बनवला प्लॅन; नवी मुंबईतील बड्या व्यक्तीच्या घरी धाड टाकली, तासाभरात 34 लाखांवर डल्ला



क्राईम पट्रोल, सावधान इंडिया सारखे क्राईम शो पाहून गुन्ह्यांचे प्लानिंग केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यातच आता नवी मुंबईत एका गँगने  ‘स्पेशल 26’ चित्रपट पाहून 34 लाखांचा डल्ला मारला आहे. 



Source link

YouTube
Instagram
WhatsApp