‘मुख्यमंत्र्यांनी शपथ घेणं ही चांगली बाब तरी माघार नाहीच’ मनोज जरांगे पाटील यांचा निर्धार


Maratha Reservation : मुंबईच्या आझाद मैदानात झालेल्या  शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेत, शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होत मराठ्यांना टिकणारं आरक्षण देऊ असं आश्वासन दिलं. मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिलेली डेडलाईन 24 ऑक्टोबरला संपली असून 25 ऑक्टोबरपासून पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेलं आश्वासन महत्त्वाचं मानलं जात आहे. यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

उपोषणावर ठाम
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं असेल तर चांगली गोष्ट आहे. मुख्यमंत्री आपल्या शब्दाला पक्के आहेत. पण आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण पाहिजे. पन्नास टक्क्यांच्यावर आरक्षण आम्हाला मान्य नाही. कारण ते टिकतच नाही. किती दिवस तुम्ही माझ्या मराठा समाजावर अन्याय करणार आहात, किती दिवस माझ्या मराठा समाजाला त्रास सहन करावा लागणार आहे. हे आता आमच्या सहनशीलतेच्या पलीकडे गेलं आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. 

आमच्या लेका-बाळांनी असं काय पाप केलं आहे की आमच्या हक्काचं आरक्षण असतानाही दिलं जात नाही. मराठा समाजाने आरक्षणाचे सर्व निकष पार केले आहेत. त्यामुळे आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण पाहिजे, आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे

मुख्यमंत्र्यांचा शब्द आणि त्या शब्दाचा सन्मान करुन मुख्यमंत्री आणि राज्यातील सर्व पक्षांनी ठराव करुन आमच्याकडून शब्द घेतला होता की फक्त तीस दिवस द्या, आम्ही त्यांना चाळीस दिवस दिले. त्यामुळे माझ्या मराठा समाजाने याचा सन्मान केला. आता आरक्षण देऊन मुख्यमंत्र्यांनी आमचा सन्मान करावा, ही आमचा प्रामाणिक मागणी आहे. मुख्यमंत्री शब्दाला पक्के आहेत, अशी मराठा समाजाची भावना आहे.  त्यामुळे त्यांनी दिलेल्या शब्दाला खरं ठरावं असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय. 

आम्ही मराठे आरक्षण घेतल्याशिवाय आता थांबणार नाही, उद्यापासून लढायला आम्ही सज्ज झालोय. मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली असेल तर आम्ही त्यांचा सन्मान करतो पण आंदोलन थांबवणार नाही, असा निर्धार मनोज जरांगे यांनी केला आहे. 

मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठा आरक्षणासाठी शिवरायांच्या पुतळ्याला साक्षी ठेवून शपथ घेतलीय. मराठ्यांना टिकणारं आरक्षण देणार, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दसरा मेळाव्यात दिली. मराठा आरक्षण द्यायला कटिबद्ध असल्याची घोषणा शिंदेंनी केली. तर गद्दारांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी आरक्षणाचा प्रश्न सोडवून दाखवावा असं आव्हान उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदे आणि भाजपला दिलंय. लोकसभेत आरक्षणाचा निर्णय का झाला नाही असा सवालही उद्धव ठाकरेंनी केलाय तसच मनोज जरांगेंच्या आंदोलनाचं कौतुकही केलं.





Source link

‘डेडलाईन संपायला उरले काही तास, उद्यापासून सरकारला जेरीस आणायचं’ मनोज जरांगेंचा इशारा


Maratha Reservation : अहमदनगरच्या चौंडीत दसऱ्यानिमित्तानं धनगर समाजानं एसटी आरक्षणाच्या (Dhangar Reservation) मागणीसाठी मेळावा आयोजिक केला. या मेळाव्याला मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी हजेरी लावत धनगरांच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिला. जरांगेंचं काठी आणि घोंगडं देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यशवंत सेनेच्यावतीने हा मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला  यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोलतडे, आमदार राम शिंदे आणि माजी आमदार अण्णासाहेब डांगे उपस्थित होते. या मेळाव्यात बोलताना जरांगे पाटील यांनी मराठा समाजा (Maratha) संपूर्ण ताकदीने धनगर समाजाच्या पाठिशी उभं असल्याचं सांगितलं. धनगर समाजाला घटनेत आरक्षण आहे, मग तुम्हाला आरक्षण मिळालं कसं नाही हे कळायला मार्ग असल्याचं सांगत मनोज जरांगेंनी सरकारवर निशाणा साधला.

सर्वसामान्य धनगर बांधवांनी मनात आणलं तर आरक्षण मिळणार म्हणजे मिळणारच, इथं बसलेले सर्व धनगर प्रत्येक घरात गेले तर लाखो धनगर उभे राहतील आणि आरक्षण मिळेल असं जरांगे यांनी म्हटलंय. मराठा आरक्षणासाठी आम्हाला 40 दिवस दिले आणि धनगर समाजाला 50 दिवस दिले, यात काहीतरी गोंधळ आहे, पण मी छाताडावर बसून आरक्षण घेणार असल्याचा इशारा जरांगे-पाटील यांनी दिला. आज आम्ही दिलेल्या डेडलाईनचा शेवटचा दिवस आहे, संध्यााकाळपर्यंत आशा आहे, पण आज दिवसभरात काहीच झालं नाही तर उद्यापासून सरकारला जेरीस आणायचं असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिलीय.

आरक्षण द्यायचं नसेल तर गावात येऊ नका, पुढच्या 50 दिवसात सरकराचं डोकं ठिकाणावर येईल, असंही मनोज जरांगे-पाटील यांनी म्हटलं आहे. आरक्षणावरुन आता धनगर समाजही आक्रमक झालाय.. धनगर समाजाचा अनुसूचित जाती प्रवर्गात म्हणजे एसटीमध्ये समावेश करावा अशी मागणी करण्यात आलीय. आरक्षणासाठी धनगर समाजाने याआधी आमरण उपोषणही केलं होतं. चौंडी हे अहिल्याबाई होळकर यांचं जन्मस्थान आहे.

आज डेडलाईन संपणार
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेली डेडलाईन आज संपतेय. मराठा आरक्षण आंदोलन गांभीर्याने घ्या असं आवाहन मनोज जरांगे पाटील राज्य सरकारला केलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शब्दाला पक्के आहेत.. ते मराठा आरक्षण देतीलच असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलाय.. नाहीतर 25 तारखेनंतर मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण आणि नेत्यांना गावबंदी करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. 

गावबंदीचा नेत्यांना फटका
मराठा आरक्षणासाठी आंदोलकांनी राजकीय नेत्यांना केलेल्या गावबंदींचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. याचा फडका लातूरच्या देशमुख कुटुंबीयांनाही बसलाय. माजी मंत्री आणि आमदार अमित देशमुख, आमदार धीरज देशमुख आणि माजी मंत्री दिलीप देशमुख लातूरच्या रेणा सहकारी कारखान्यावर जाताना मराठा आंदोलकांनी त्यांचा ताफा रस्त्यात अडवला. यावेळी आंदोलकांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला आणि जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी अमित देशमुखांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलक आंदोलनावर ठाम होते.  यावेळी पोलिसांचा मोठा फौज फाटा देखील तैनात करण्यात आला होता. 

काँगेस नेते अशोक चव्हाण यांनाही मराठा समाजाकडून काळे झेंडे दाखवण्यात आले. अर्धापूर तालुक्यातल्या येळेगावात भाऊराव चव्हाण साखर कारखाना आहे. त्या कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ अशोक चव्हाणांकडून करण्यात आला. भाषण सुरू होताच त्यांना काळे झेंडे दाखवून मराठा आरक्षणाच्या घोषणा देण्यात आल्या. मराठा आरक्षणासाठी राजीनामा द्यावा अशी मागणी घोषणा देणाऱ्या तरुणांनी केली. पोलीसांनी तत्काळ तिघांना ताब्यात घेत कार्यक्रम स्थळावरून बाहेर काढले. 

शरद पवारांचा ताफा अडवला
पुण्यात मराठा समाजाने शरद पवारांचा ताफा अडवण्यात आला. अलका टॉकीज चौकात मराठा आंदोलकांनी शरद पवारांचा हा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. शरद पवार गो बॅक अशा आशयाचे पोस्टर दाखवण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र पोलिसांनी आदोलकांना बाजुला काढण्यात यश मिळवलं. आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झालाय. राज्याच्या गावागावात मराठा समाजाने नेत्यांना बंदी घातलीय.काल शरद पवारांनी सोलापूर दौराही रद्द केला होत. मराठा समाजाच्या इशाऱ्यामुळेच शरद पवारांनी सोलापूर दौरा रद्द केल्याचा दावा मराठा समाजाने केला होता. तर अजित पवारांनाही मराठा समाजाने काल काळे झेंडे दाखवले होते.





Source link

कुत्र्यांच्या पुढ्यातून अन्न उचलून फेकले; पोलिस महिलेची महिलेवरच दादागिरी



रस्त्यावर कुत्र्यांना जेवण टाकण्यावरुन वाद झाला. एका महिला पोलिसाने महिलेला मारहाण केली आहे. पुण्यात हा प्रकार घडला आहे. 



Source link

अनुकंपा तत्वावर नोकरी मिळवण्यासाठी सख्ख्या बहिणींचा काटा काढला; सूपमध्ये विष टाकून घेतला जीव



Alibaug News Today: भावानेच काढला दोघा सख्ख्या बहिणींचा काटा.अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 



Source link

महाराष्ट्राच्या पहिल्या अग्निवीराला सियाचीनमध्ये वीरमरण; पंचक्रोशीत शोककळा

महाराष्ट्राच्या पहिल्या अग्निवीराला सियाचीनमध्ये वीरमरण; पंचक्रोशीत शोककळा


मयुर निकम, झी मीडिया, बुलढाणा : महाराष्ट्राच्या पहिल्या अग्निवीराला सियाचीनमध्ये वीरमरण आहे. अक्षय लक्ष्मण गवते असे या जवानाचे नाव आहे.  बुलढाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई येथील अक्षय वयाच्या 23 व्या वर्षी देशासाठी शहीद झाला आहे. अक्षयच्या दु:खद निधनामुळे  पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. 

सियाचीन मधील याचीन ग्लेशियर मध्ये कर्तव्यावर असताना अक्षय यांना वीरमरण आले. 20 ऑक्टोंबरच्या रात्री रुग्णालयात तहृदयविकाराचा तीव्र झटका आला त्यातच अक्षय यांचा मृत्यू झाला. अक्षय याच्यावर सोमवारी 23 ऑक्टोंबर ला सकाळी त्यांच्या  जन्मगावी पिंपळगाव सराई येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने दिली आहे.

३० डिसेंबर २०२२ रोजी अक्षय “अग्निवीर”म्हणून सैन्यात भरती झाले होते. सियाचीन मधील याचीन ग्लेशियर मध्ये ते कर्तव्यावर होते जिल्हा सैनिक कार्यालयाला प्राप्त माहितीनुसार प्रकृती अवस्थामुळेच त्यांना सैनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रात्री त्यांचा हृदयविकाराचा धक्का आला त्यातच त्यांचा मृत्यू झाला आज सायंकाळी इंडिको विमानाने अक्षय यांचे पार्थिव छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आणण्यात येईल सोमवारी सकाळी पार्थिव छत्रपती संभाजीनगर वरून पिंपळगाव सराई येथे आणण्यात येईल तिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा 

गेल्या वर्षी त्यांची अग्निवीर मध्ये भरती झाली अक्षय हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता अक्षय यांना एक लहान बहिण अक्षय यांचे आई वडील शेती करतात अक्षय यांची मृत्यूची वार्ता  कळताच पिंपळगाव सराई गावावर शोककळा पसरली आहे…

मूळ गावी होणार अंत्य संस्कार 

दिवंगत अक्षय गवते यांचे पार्थिव विमानाने चंदीगड, दिल्लीमार्गे छत्रपती संभाजीनगर येथे आणले जाणार आहे. उद्या २३ ऑक्टोबरला सकाळ पर्यंत पार्थिव गावी आणले जाण्याची शक्यता असल्याचे सैनिक कल्याण कार्यालयाचे कल्याण संघटक विष्णू उबरहंडे यांनी सांगितले.. उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. यावेळी सैनिक कल्याण कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, निवासी उपजिल्हाधिकारी, एसडीओ, तहसीलदार तसेच पोलीस अधिकारी उपस्थित राहणार असल्याचे उबरहंडे यांनी माहिती दिली.





Source link

VIDEO : संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती! मद्यधुंद चालकाने प्रवाशांनी भरलेल्या बसने वाहनांना उडवलं

VIDEO : संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती! मद्यधुंद चालकाने प्रवाशांनी भरलेल्या बसने वाहनांना उडवलं



Pune Crime : पुण्यात पीएमटी बसचालकाने दारुच्या नशेच प्रवाशांनी भरलेली बस उलटी चालवत वाहनांना उडवलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.



Source link

YouTube
Instagram
WhatsApp