पाऊस ओसरणार, सूर्यदेवाचं दर्शन घडणार; पाहा काय सांगतोय हवामानाचा अंदाज

पाऊस ओसरणार, सूर्यदेवाचं दर्शन घडणार; पाहा काय सांगतोय हवामानाचा अंदाज


Maharashtra Weather News : जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच थैमान घालणाऱ्या पावसानं आता अखेरच्या टप्प्यातही धुमाकूळ घातल्यानंतर काहीशी उसंत घेतल्याचं चिन्हं आहे. सतत बरसणाऱ्या वरुणराजानं रविवारीसुद्धा मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागांमध्ये विश्रांती घेतली. हे असंच काहीसं चित्र येत्या दिवसांमध्येही पाहायला मिळणार आहे. ज्यामुळं लख्ख सूर्यप्रकाशाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या अनेकांनाच मोठा दिलासाही मिळणार आहे. थोडक्यात हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार येत्या काही दिवसांमध्ये राज्यात पावसाचा जोर काही अंशी कमी होणार आहे. ज्यामुळं विस्कळीत झालेलं जनजीवन पुन्हा एकदा रुळावर येईल. 

पुढील दोन दिवसांमध्ये राज्यातील घाटमाथा आणि कोकण पट्ट्याच्या काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपातील पावसाच्या सरी बरसणार आहेत. तर, विदर्भामध्येही पाऊस नमतं घेण्याची चिन्हं आहेत. जुलै महिना गाजवणारा हा पाऊस ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये किमान बरसेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. ज्यामुळं पूरपरिस्थिती निर्माण झालेल्या ठिकाणांवरून पूर ओसरून नागरिकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. 

उर्वरित राज्यात काय परिस्थिती?

कोकणाच्या काही भागांमध्ये येत्या दोन ते तीन दिवसांच मध्यम पर्जन्यमानाचा अंदाज वर्तवण्यात आला असून, ठाणे, पालघर, पुणे, सातारा भागातही अशीच परिस्थिती असेल असं हवामान विभागानं सांगितलं आहे. मराठवाड्यात पुढच्या 24 तासांच पावसाच्या तुरळक सरी बरसतील असा अंदाज आहे. 

एकाएकी महाराष्ट्रात कुठून आलेला इतका पाऊस? 

जुलै महिन्यात पावसानं जोर धरला आणि अनेकांनाच धडकी भरली. काहींना तर, हा पाऊस आला तरी कुठून असा प्रश्नही अनेकांनीच केला. हवामान खात्यानं या प्रश्नाचं उत्तर दिलं. मोसमी वाऱ्यांच्या प्रवाहामध्ये जेव्हा खंड येतो तेव्हा हिमालयाच्या पायथ्यासह सह्याद्रीच्या पायथ्याशी असणाऱ्याभागांमध्ये पाऊस वाढते असं त्यांनी स्पष्ट केलं. तज्ज्ञांच्या मते पावसानं मुंबईसह उपनगरांमध्ये सरासरी ओलांडली असून, ही आकडेवारी खालीलप्रमाणे…. 

मुंबई – 71.41 टक्के 
शहर- 70.26 टक्के 
उपनगर – 68.85 टक्के 

दरम्यान, पावसाचा जोर ओसरणार असल्यामुळं आजारपणंही दूर जातील अशी आशा अनेकांनी व्यक्त केली आहे. मागील काही दिवसांपासून पावसामुळं राज्याच्या बहुतांश भागांमध्ये साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याचं पाहायला मिळालं होतं. पण, आता मात्र ही परिस्थिती आटोक्यात येण्याचं चित्र आहे. त्यामुळं पावसा आता तू जरा विश्रांती घेच!, असाच सूर अनेकजण आळवताना दिसत आहेत. 





Source link

धर्मवीर आनंद दिघेंचा मृत्यू नेमका कसा झाला होता? अपघात की घातपात?

धर्मवीर आनंद दिघेंचा मृत्यू नेमका कसा झाला होता? अपघात की घातपात?


Dharmveer Anand Dighe: धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) हे नाव तसं महाराष्ट्राला परिचित आहे. पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांच्या नावाचा वारंवार उल्लेख होत आहे. बंड पुकारल्यापासून एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह आनंद दिघे यांच्याही नावाचा उल्लेख करत आहेत. पण यानिमित्ताने अनेक जुने मुद्देही उरकून काढले जात आहेत. नुकतंच संजय शिरसाट यांनी आनंद दिघे यांच्या निधनाचा मुद्दा उपस्थित करत त्यांच्या अंत्ययात्रेला ठाकरे कुटुंबातील एकही माणूस हजर का नव्हता? अशी विचारणा केली आहे. तसंच ज्यांनी दिघे साहेबांचा घात केला आहे, त्यांना ठाणेकर कौल देणार नाही, ते बदला घेतील असं म्हणत उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाण साधला आहे. यामुळे पुन्हा एकदा आनंद दिघे यांचा मृत्यू नेमका कसा झाला होता याची चर्चा सुरु झाली आहे. 

संजय शिरसाट काय म्हणाले आहेत?

“खऱ्या अर्थाने गद्दारी उद्धव ठाकरे गटाने केली आहे. काल भाषणात अनेकांनी दिघे यांचे नाव घेतले. माझा प्रश्न आहे त्यांना, जेव्हा दिघे साहेब गेले तेव्हा त्यांच्या अंत्ययात्रेला ठाकरे कुटुंबातील एकही माणूस हजर का नव्हता ते सांगा. त्यांच्या अंत्ययात्रेला जायला वेळ नव्हता का? काय कारण होतं? त्यांना माहिती होतं की, अंत्ययात्रेला गेलो तर लोक दगडाने मारतील.  म्हणून आम्हाला शिकवू नका,” असं संजय शिरसाट म्हणाले आहेत. 

“ज्यांनी दिघे साहेबांचा घात केला आहे, त्यांना ठाणेकर कौल देणार नाहीत. ते बदला घेतील. दिघे साहेबांचं कर्तृत्व यांना पुसता येणार नाहीय दिघे साहेबांचा घातपात झाला हे ठाणेकरांना माहित आहे. माणूस आपल्यापेक्षा मोठा होऊ नये म्हणून हा घातपात केला,” असा जाहीर आरोपच संजय शिरसाट यांनी केला आहे. 

याआधी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सूपूत्र निलेश राणे यांनीही आनंद दिघे यांच्या हत्येसाठी बाळासाहेब ठाकरे जबाबदार होते, असा आरोप केला होता. दरम्यान एकनाथ शिंदे यांनीही आनंद दिघे यांच्या निधनासंबंधी बोलताना योग्य वेळ येईल तेव्हा बोलेन. ज्या दिवशी माझी मुलाखत होईल त्यादिवशी या राज्यात आणि देशात मोठा भूकंप झाल्याशिवाय राहणार नाही असं विधान केलं होतं. 

आनंद दिघेंचा मृत्यू नेमका कसा झाला?

एकनाथ शिंदे यांनीच आनंद दिघे यांचं निधन कसं झालं याची माहिती दिली होती. त्यांनी सांगितलं होतं की, “गणपतीच्या दिवसांमध्ये त्यांचा 19 ऑगस्टला अपघात झाला. ते पहाटेपर्यंत आपल्या कार्यकर्त्यांकडे फिरत असत. त्याचवेळी हा अपघात झाला होता. कारमधून जात असताना एसटी आणि कारचा अपघात झाला आणि त्यात ते जखमी झाले होते. अपघातात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. मात्र उपचार सुरु असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांच निधन झालं अशी माहिती समोर आली” 

दरम्यान नेत्यांची वेगवेगळी विधानं, आरोप-प्रत्यारोप यामुळे आनंद दिघेंच्या निधनाबाबत नेहमी उलटसुलट चर्चा रंगत असतात. सध्या संजय शिरसाट यांनी केलेल्या विधानामुळे ही चर्चा नव्याने सुरु झाली आहे. 





Source link

Uddhav Thackeray: ‘राष्ट्रपतींना संवेदना आहेत का? महिलांची अब्रू लुटली तरी..’; शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरी तोफ कडाडली!

Uddhav Thackeray: ‘राष्ट्रपतींना संवेदना आहेत का? महिलांची अब्रू लुटली तरी..’; शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरी तोफ कडाडली!


पुढील
बातमी

पावसासंदर्भात मोठी अपडेट; पिकनिकचा प्लान करणाऱ्यांचा मूड ऑफ करणारी बातमी





Source link

सुषमा अंधारेंच्या टीकेनंतर ‘या’ व्यक्तीने शरद पोक्षेंना म्हटलं माथेफिरु! आरक्षणाच्या पोस्टवरुन संताप

सुषमा अंधारेंच्या टीकेनंतर ‘या’ व्यक्तीने शरद पोक्षेंना म्हटलं माथेफिरु! आरक्षणाच्या पोस्टवरुन संताप


Sushma Andhare On Sharad Ponkshe :  मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांची मुलगी पालयट झाली आहे. पायलट झाल्यानंतर लेकीचे कौतुक करताना  शरद पोक्षें यांनी फेसबुकवर टाकलेल्या पोस्टमध्ये आरक्षणाचा उल्लेख केला आहे. शरद पोंक्षे यांच्या या  आरक्षणाच्या पोस्टवरुन चांगलाच वाद झाला आहे. लेकीचं कौतुक करताना क्षुद्र किंवा नालायकपणा दाखवायलाच हवा का? असा प्रश्न उपस्थित करत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी  शरद पोंक्षे यांच्यावर सडकून टीका केली. यानंतर आता अभिनेते किरण माने यांनी एक पोस्ट केली आहे. यात त्यांनी शरद पोंक्षे यांच्या लेकीचं कौतुक करत त्यांच्या मात्र माथेफिरु असा उल्लेख केला आहे. शरद पोंक्षे यांनी पोस्टमध्ये आरक्षणाचा उल्लेख केल्याने मनोरंजन व राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटत आहेत.

काय आहे शरद पोंक्षे यांची वादग्रस्त पोस्ट?

“कु सिध्दी शरद पोंक्षे आज पायलट झाली. ईयत्ता ४ पासून तिने पाहीलेलं स्वप्न पुर्ण झालं. अत्यंत खडतर परीस्थितीतून,माझं आजारपण,कोरोना, लॉकडाऊन, आर्थिक स्थिती बिकट हे सगळे अडथळे पार करत.कोणतीही सवलत,आरक्षण नसताना केवळ मेहनत ,बुध्दीमत्ता ,परिश्रम व निष्ठा ह्या जोरावर ती पायलट झाली.बापाला आणखी काय हव नाही का? आज अभिमान अभिमान फक्त अभिमान वाटतोय तूझा सिध्दी.मोठी हो पुढे देशाची सेवा कर. उत्तम सेवा दे.करशिलच खात्रीच आहे. लव यू बाळा”, असे शरद पोंक्षेंनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

किरण माने यांची शरद पोंक्षेवर अप्रत्यक्ष टीका

पोरी, नव्या जगात नवी उड्डाणं घे.
तुझ्या करीयरनं छान ‘टेक ऑफ’ घेतलाय. आता तू जगभर फिरशील… मात्र सगळ्या सीमा पार करून खुल्या आसमंतात भरारी घेताना तुला आश्चर्याचे अनेक धक्के बसतील… घरात लहानपणापासून तुझ्या घरातल्या जवळच्या माणसानं, तुझ्या मनात ज्या थोर व्यक्तीविषयी द्वेष पेरलाय, ती व्यक्ती जगभर पूजनीय आहे, हे कळल्यावर मनामेंदूला बसणार्‍या हादर्‍याची आत्तापासून तयारी कर… जाशील त्या देशात तुला महात्मा गांधींच्या देशातली मुलगी म्हणून ओळखले जाईल… जाशील त्या गांवात तुला बापूजींचा पुतळा दिसेल !
ऑस्ट्रेलियात ब्रिस्वेनमध्ये तुला गांधी भेटेल… ताजीकिस्तानमधल्या ड्युशान्बेमध्येही तुला महात्म्याच्या पुतळ्याचे दर्शन होईल… स्पेनच्या बर्गोस शहरात, चायनाच्या बिजिंगमध्ये, माॅरीशस, सुरीनाम, पोलंड, कोरीया जाशील तिथे गांधी,गांधी आणि गांधीच असेल…. इंग्लंडमध्ये लंडन,वेस्टमिन्स्टर अशा अनेक शहरात तुला गांधीपुतळा दिसेल… अमेरीकेत तर भारताखालोखाल विक्रमी संख्येनं तुला आपल्या महात्म्याची मूर्ती दिसेल !
गांधीविचारापुढं नतमस्तक होणारं हे सगळं जग वेडं आहे, की या सुर्यावर थुंकण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारा माणूस माथेफिरू आहे, याचा तू गांभीर्यानं विचार करू लागशील… 
…हा विचार करेस्तोवर अचानक तुला दुसरा हादरा बसेल. अमेरीकेत कोलंबिया विश्वविद्यालयात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक दिसेल.. लंडनला सर्वांगसुंदर डाॅ. भिमराव रामजी आंबेडकर मेमोरीयल दिसेल ! हंगेरीला डाॅ. आंबेडकर हायस्कूल, इंग्लंडमध्ये वॉल्वरहॅम्प्टन बुद्ध विहार पाहून डोळे दिपतील… कॅनडाची सायमन फ्रेझर युनिव्हर्सिटी आणि जपानची कोयासन युनिव्हर्सिटी यांनी डाॅ. आंबेडकरांच्या कार्याची, साहित्याची, शोधनिबंधांची माहिती देणारे विशेष विभाग स्थापलेत ते ही पहाशील… लंडन स्कूल ऑफ इकाॅनाॅमिक्समध्येही डाॅ. आंबेडकरांचा पुतळा दिसेल.
या सगळ्या ठिकाणी जगभरातले विद्यार्थी डाॅ. आंबेडकरांनी लिहीलेल्या पुस्तकांचा अभ्यास करताना दिसतील ! काहीजण ‘Annihilation of Caste’ वाचत असतील, तर काहीजण ‘The Untouchables: Who were they and why they Became Untouchables’ ची पारायणं करत असतील ! तू आंबेडकरांच्या इंडियामधली आहेस हे कळल्यावर त्या विद्यार्थ्यांना खूप आनंद होईल. ते तुला भारतातल्या हजारो वर्षांच्या अस्पृश्यतेबद्दल अनेक प्रश्न विचारतील. हजारो वर्ष ज्यांना शिक्षणापासून आणि सर्व गोष्टींपासून वंचित ठेवलं गेलं होतं… गुलामगिरीत पिचवलं होतं, ते शोषित-पिडीत आता या इनमिन पाऊणशे वर्षांत कुठपर्यन्त पोहोचलेत अशीही चौकशी करतील… त्यांना हे सांगू नकोस की ‘मी यश मिळवल्यावर, माझ्या घरातल्या जवळच्या व्यक्तीनं त्या बांधवांना सवलतींवरून टोमणे मारले आहेत…’ अजिबात सांगू नकोस हे… कारण जगभर वाईट मेसेज जाईल की या लोकांच्या मनात आजही अस्पृश्यतेचं विष आहे. आपल्या घरात अजून कितीही कचरा असला तरी बाहेरच्यांना तो दिसता कामा नये. त्यामुळं तू त्यांना खोटं हसत बळंबळंच सांग ‘सगळं ठीक आहे आमच्याकडे आता.’
…नंतर मात्र तुझ्या धडावर असलेलं तुझं डोकं वापरून या सगळ्यावर विचार कर. वाचन कर. पुन्हा विचार कर. तुला आसपास फक्त ‘माणूस’ दिसेपर्यन्त विचार करत रहा ! तू भाग्यवान आहेस की तू अशा क्षेत्रात करीयर करतीयेस जिथं एकाचवेळी अनेक जात,धर्म,वंश,रंग,प्रांत,देशांची अनेक माणसं रोज एकत्र प्रवास करतात !! तुला रोज जाणवेल की या जगात जर कुठला धर्म असेल तर तो आहे ‘मानवता’. बाकी सब झूठ. मग तू हेच विचार तुझ्या पुढच्या पिढ्यांमध्ये मुरव. तुझ्या आधीच्या पिढीतल्या अविवेकी माणसांनी पसरवलेल्या द्वेषाच्या कॅन्सरवर मात करायची हीच थेरपी आहे पोरी…
तुझं अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा ! ❤️
– किरण माने.

सुषमा अंधारे यांची घणाघाती टीका

शरद राव (पोंक्षे )नमस्कार
एरवी मला दादा भाऊ असं बोलून सुरुवात करायची सवय आहे . मात्र निश्चितपणे तुम्हाला ते आवडणार नाही.  कारण तुमची माझी ना जात एक आहे.. ना गोत्र एक आहे.  
     कारण माणसा माणसात भेद निर्माण करणारा जो सनातनी धर्म तुम्ही सांगत आहात तो कदाचित मला मान्य होणार नाही आणि प्रबोधनकारांनी किंवा शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब यांनी किंवा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब सांगत असलेले सर्व समावेशक हिंदुत्व तुम्हाला कळणार नाही. 
          तुमच्या लेकीचं मनःपूर्वक अभिनंदन.  लेक कुणाचीही असो तिचं कौतुक झालंच पाहिजे. पण शरदराव कौतुक करताना  सुध्दा  माणूस म्हणून कसे आपण क्षुद्र किंवा नालायक आहोत हे दाखवायलाच हवे का ? 
         शरदराव, “भेकड आणि भित्र्या माणसाची अहिंसा ही अहिंसा मानली जात नाही.  हे माहीत असेलच तुम्हाला. 
       उलट ज्याच्यामध्ये कमालीचं बाहुबल आहे,  भल्या भल्यांना सहज धूळ चारण्याची धमक आहे पण तरीही जो आपल्या बलाचा प्रयोग निष्कारण करत नाही तो खऱ्या अर्थाने अहिंसा मानणारा.” 
            हे इथे लिहिण्याचे कारण म्हणजे आज माझ्या राजकीय कारकीर्दीला अर्थात मी शिवसेनेत प्रवेश केला या घटनेला एक वर्ष पूर्ण होत आहे. मला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही.  ना कुठलं जातीय किंवा आर्थिक पाठबळ आहे. पण कुठल्याही जातीय आर्थिक आरक्षणाशिवाय माझ्या गुणवत्तेने मी काय करू शकते हे एक वर्षात तुमच्यासह महाराष्ट्राने बघितलंच आहे. 
                अर्थात् कुठलेही जातीय आर्थिक किँवा वांशिक  निकष न लावता निव्वळ माझ्यातल्या गुणवत्तेची पारख करत मला राज्यभर काम करण्याची संधी देणारे सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांचा मानवतावादी दृष्टिकोनही तितकाच महत्त्वाचा आहे. पण हे तुमच्यासारख्या माणूसद्वेषष्ट्यांना अजिबात कळणार नाही. 
        आणि हो ज्या आरक्षणाबद्दल तुम्ही प्रचंड तिरस्कृतपणाने लिहलत ना, त्या आरक्षणाची लाभार्थी होणे मला सहज शक्य असताना सुद्धा माझं संपूर्ण शिक्षण मी खुल्या प्रवर्गातून पूर्ण केले आहे. आणि हो नुसतं पूर्ण केलं नाही तर विशेष प्राविण्यासह आणि विद्यापीठ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील तब्बल पाच सुवर्णपदकांसह पूर्ण केले आहे. त्यामुळे आरक्षण लाभार्थी होणे शक्य असतानाही ते नाकारण्याची हिंमत जर मी करू शकत असेल तर तुमच्यासारख्या माणसाला (?) आरसा दाखवण्याची हिंमत मी करूच शकते. नाही म्हणजे माझं कौतुक तुमच्या पेक्षा दुप्पट नाही का ? 
   अहो शरदराव कुणी कोणत्या जातीत जन्माला यावे यासाठी कुठेही अर्ज केलेला नसतो हे माहीत असेलच तुम्हाला त्यामुळे जी गोष्ट मिळवण्यामध्ये आपले कसलेही स्वकर्तृत्व नाही त्याची जशी लाज असू नये तसा माजही असू नये याचं भान असेलच तुम्हाला. 
        शरद राव तुम्ही एका दुर्धर आजारातून बरे झालात. पण या आजारा दरम्यान उपचार घेत असताना रक्त लघवी तपासण्याचे ठिकाण असेल, मेडिकल स्टोअरवर काम करणारी मुलं असतील,  शस्त्रक्रिया दरम्यान आवश्यकता असणारे भुलतज्ञ , केमोथेरपी देणारे डॉक्टर्स,  रक्ताची गरजच पडली असेल तर रक्तपेढीत काम करणारे कर्मचारी किंवा दिवस रात्र सेवा करणाऱ्या नर्सेस यांच्या जाती तुम्हाला माहीत होत्या का हो… 
      असो बोलण्यासारखे बरेच आहे.. पण तूर्तास एवढेच.. ! लवकर बरे व्हा..!!
ता. क. जातविषयक पित्त वारंवार उफाळून येत असेल तर बुद्ध गुरुनानक महावीर कबीर संत ज्ञानेश्वर तुकोबाराय यांच्या विचारांचा काढा नियमित घेत चला खात्रीने पित्त असे उफाळून येणार नाही. 
    _प्रा. सुषमा अंधारे

 





Source link

मुंबईत ‘इंडिया’ची बैठक; उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटावर मोठी जबाबदारी

मुंबईत ‘इंडिया’ची बैठक; उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटावर मोठी जबाबदारी


INDIA Meeting In Mumbai : विरोधकांच्या इंडिया (INDIA) आघाडीची तिसरी बैठक मुंबईत होणार आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत होणा-या इंडियाच्या बैठकीच्या आयोजनाची जबाबदारी महाविकास आघाडीनं घेतली आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटावर मोठी जबाबदारी असणार आहे. या बैठकीचा नेमका अजेंडा काय असेल? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

मुंबईत INDIAची वज्रमूठ 

INDIA अर्थात इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स. तब्बल २६ राजकीय पक्षांनी मिळून बनवलेली विरोधकांची महाआघाडी. सत्ताधारी भाजपप्रणित एनडीएला टक्कर देण्यासाठी विरोधकांची एकवटलेली वज्रमूठ आहे. या इंडिया आघाडीची तिसरी बैठक सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत होणार आहे. या बैठकीच्या आयोजनाची जबाबदारी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीवर असणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेससोबतच शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस गट आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्रितपणे या तिस-या बैठकीचं आयोजन करणार आहेत.

सत्ता नसलेल्या राज्यात इंडिया आघाडीची पहिली बैठक 

या भाजपविरोधी आघाडीची पहिली बैठक 23 जून रोजी पाटणामध्ये झाली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आयोजक होते. आघाडीची दुसरी बैठक 17 आणि 18 जुलैला बंगळुरूत झाली. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बैठकीचं आयोजन केलं. या बैठकीला तब्बल 26 राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते. याच बैठकीत या आघाडीचं इंडिया असं नामकरण झालं. आता पहिल्यांदाच सत्ता नसलेल्या राज्यात इंडिया आघाडीची बैठक होत आहे. 

मुंबईतील बैठकीचा अजेंडा काय?

या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाचं सूत्र निश्चित होण्याची शक्यता आहे. त्यासाठी नेमण्यात येणा-या 11 जणांच्या समन्वय समितीतली नावं ठरणार असल्याचं समजते. त्याशिवाय विरोधी आघाडीचं संयोजक नेमका कोण, याचाही निर्णय अपेक्षित आहे. अनेक राज्यांमध्ये विरोधी आघाडीतील घटकपक्षांची आपापसातच स्पर्धा आहे. केरळमध्ये काँग्रेस विरुद्ध डावे, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल विरुद्ध काँग्रेस विरुद्ध डावे, पंजाब आणि दिल्लीमध्ये काँग्रेस विरुद्ध आप, उत्तर प्रदेशात काँग्रेस विरुद्ध समाजवादी पार्टी, जम्मू काश्मीरमध्ये पीडीपी विरुद्ध नॅशनल कॉन्फरन्स अशी राजकीय लढाई आहे त्यामुळं घटकपक्षांमधील मतभेद दूर करण्यासाठी मुंबईतल्या बैठकीत रणनीती आखली जाण्याची शक्यता आहे

बंगळुरूत ज्यादिवशी विरोधी इंडिया आघाडीची बैठक झाली, त्याचदिवशी दिल्लीत भाजपप्रणित एनडीएनं देखील शक्तिप्रदर्शन केले.  अलिकडंच पंतप्रधानांनी विरोधकांच्या इंडिया आघाडीची तुलना ईस्ट इंडिया कंपनी आणि इंडियन मुजाहिद्दीनशी केली. त्यामुळं आता भाजपचा मुकाबला करण्यासाठी मुंबईत होणा-या बैठकीत विरोधक काय रणनीती आखतात, याकडं सगळ्यांचं लक्ष असणार आहे.

 





Source link

1 ऑगस्टपासून मेट्रो पुणेकरांच्या सेवेत, ‘या’ प्रवाशांना तिकिट दरात मिळणार 30 % सूट, अशी असतील स्थानके

1 ऑगस्टपासून मेट्रो पुणेकरांच्या सेवेत, ‘या’ प्रवाशांना तिकिट दरात मिळणार 30 % सूट, अशी असतील स्थानके


Pune Metro: मुंबईनंतर आता पुणे शहरातही मेट्रो सेवेचा (Pune Metro News) विस्तार होत आहे. शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मेट्रो प्रकल्पांची व्याप्ती वाढवण्यात येत आहे. सध्या पिंपरी चिंचवड महापालिका स्थानक ते फुगेवाडी स्थानक आणि वनाझ स्थानक ते गरवारे महाविद्यालय स्थानक हे मार्ग प्रावाशांसाठी सुरु होते. मात्र, 1 ऑगस्टपासून फुगेवाडी ते जिल्हा न्यायालय आणि गरवारे महाविद्यालय ते रुबी हॉल स्थानक या मार्गावर मेट्रो सुरु होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या मार्गांचे उद्घाटन करणार आहेत. मेट्रोच्या प्रवाशांसाठी खास सवलतही देण्यात येणार आहे. (Pune Metro Ticket Price)

फुगेवाडी ते जिल्हा न्यायालय आणि गरवारे महाविद्यालय ते रुबी हॉल स्थानक हे एकूण 13 किलोमीटरच्या विस्तारिक मार्गाचे काम पूर्ण पूर्ण झाले असून 1 ऑगस्टपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. यासाठी यशस्वी चाचणी झाली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते 12.30 च्या दरम्यान या मार्गाचे उद्घाटन होणार असून दुपारी तीन वाजल्यापासून मेट्रो प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे. 

मेट्रोतून प्रवाशांची संख्या वाढावी तसेत लोकांपर्यंत मेट्रोची सेवा पोहचावी याबाबत महमेट्रो प्रयत्नशील आहे. म्हणूनच सामान्यांना तिकिटाच्या किंमती परवडाव्यात आणि विद्यार्थ्यांनाही मेट्रोतून प्रवास करता यावा, यासाठी तिकिट दरांत सूट देण्यात आली आहे, असं मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. 

मेट्रोतून प्रवास करण्यासाठी विद्यार्थ्यांना 30 टक्के सवलत देण्यात येणार आहे. पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ही सवलत मिळणार आहे. तसंच, इतर नागरिकांना शनिवारी आणि रविवारीही खास सवलत मिळणार आहे. मेट्रोचे तिकिट किती असेल याबाबतही अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेट्रोच्या तिकिटाचे दर 10 ते 30 रुपयांपर्यंत आहेत. तर, दहा मिनिटांना मेट्रो प्रवाशांसाठी उपलब्ध असती. पण कमी गर्दीच्या वेळी पंधरा मिनिटांच्या अंतराने मेट्रो धावेल. सध्या प्रवाशांच्या सेवेत 13 मेट्रो आहेत. तर, सकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत मेट्रोची सेवा सुरु राहणार आहे. 

या स्थानकांवर थांबेल मेट्रो

 गरवारे महाविद्यालय ते रूबी हॉल स्थानक

स्थानके-  गरवारे महाविद्यालय, डेक्कन, छत्रपती संभाजी उद्यान, पुणे महापालिका, जिल्हा न्यायालय, आरटीओ, पुणे रेल्वे स्थानक, रुबी हॉल

फुगेवाडी ते जिल्हा न्यायालय

फुगेवाडी, दापोडी, बोपोडी, शिवाजीनगर, जिल्हा न्यायालय





Source link

YouTube
Instagram
WhatsApp