Pune News : लेकीनं गोल्ड मेडल जिंकलं, बापाच्या डोळ्यात पाणी; काळजाला भिडणारा Video एकदा पहाच

Pune News : लेकीनं गोल्ड मेडल जिंकलं, बापाच्या डोळ्यात पाणी; काळजाला भिडणारा Video एकदा पहाच


Pune Airport Viral Video : चीनमध्ये खेळवल्या गेलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांचा (Asian Games 2023) रविवार म्हणजेच 8 ऑक्टोबर रोजी समारोप करण्यात झाला. भारताने आशियाई स्पर्धांमध्ये शंभरचा आकडा पार केला. दरम्यान या स्पर्धेमध्ये भारताच्या खात्यामध्ये 107 पदकं जमा झाली. यामध्ये  28 सुवर्ण, 38 रौप्य आणि 41 कांस्य पदकांचा समावेश आहे. समारोपानंतर भारतीय खेळाडू मायदेशी आली आहेत. आशिया क्रिडा स्पर्धेमध्ये भारताच्या महिला कबड्डीपटूंनी दमदार कामगिरी केली अन् गोल्ड मेडल पटकावलं. या संघात पुण्याची कबड्डीपटू स्नेहल शिंदे हिचा देखील समावेश होता. स्नेहल शिंदे जेव्हा पुण्यात आली तेव्हा तिचं दमदार स्वागत करण्यात आलं.

स्नेहल शिंदेचे वडील प्रदीप शिंदे हे आपल्या सुवर्णपदक विजेत्या मुलीच्या स्वागतासाठी पुणे विमानतळावर दाखल झाले तेव्हा त्यांना त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवता आलं नाही. त्यांनी मुलींच्या गळ्यातील मेडल पाहिलं अन् कष्टाचं फळ सार्थक झाल्याची भावना त्यांच्या मनात आली. मुलीला आनंदी पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. मुलीला मिठी मारून ते ओक्साबोक्शी रडले. तिच्या गळ्यात विजयमाला घातली अन् शाब्बासकी दिली. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाली आहे. 

पाहा Video

एशियन्स गेम्समध्ये महिला कबड्डीच्या अंतिम फेरीत भारताला चायनीज तैपेईकडून कठीण आव्हानाचा सामना करावा लागला. दोन्ही संघात काटे की टक्कर झाली. मात्र, शेवटी भारताने 26-25 गुणांसह सुवर्णपदक जिंकलं अन् पदकांच्या क्रमावारीत शतक ठोकलं. यामध्ये भारताच्या लेकींना देखील भारताची मान अभिमाने उंचावली. भारतीय महिला क्रिकेट आणि कबड्डी संघाने दमदार कामगिरी केली. 

आणखी वाचा – विराट…विराटच्या नावाने मैदानात गुंजलं, पण कोहलीने प्रेक्षकांना शांत केलं, मैदानात नेमंक काय घडलं?

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात भारतीय महिला कबड्डी संघाने जिंकलेलं हे तिसरं सुवर्णपदक ठरलं. भारताने ग्वांगझू 2010 येथे सुवर्णपदक जिंकलं होतं, तर 2014 मध्ये इंचॉन येथे विजेतेपद पटकावलं होतं आणि जकार्ता 2018 येथे उपविजेतेपद पटकावलं होतं.





Source link

रातोरात PSI बनला कोट्यधीश! काही तासांत झाला दीड कोटींचा मालक

रातोरात PSI बनला कोट्यधीश! काही तासांत झाला दीड कोटींचा मालक



Ban vs Eng Dream 11 : बांगलादेश विरुद्ध इंग्लड सामन्यात ड्रीम 11 वर टीम बनवणाऱ्या पिंपरी चिंचवडमधील पोलीस उपनिरीक्षकाला तब्बल दीड कोटींच बक्षिस लागलं आहे. एकीकडे यावर बंदीची मागणी होत असतानाच या पोलीस उपनिरीक्षकालाच आता लॉटरी लागली आहे.



Source link

Maharastra Politics : शरद पवारांच्या सभांना दादा देणार उत्तर; कोंडी करण्यासाठी अजित पवारांची नवी स्ट्रॅटेजी!

Maharastra Politics : शरद पवारांच्या सभांना दादा देणार उत्तर; कोंडी करण्यासाठी अजित पवारांची नवी स्ट्रॅटेजी!


पुढील
बातमी

महाराष्ट्राची भाग्यरेषा बदलणार सातारा जिल्ह्याचे रुपडं; कोयना जलाशयाशी संबधित गुपिते कायद्यात मोठा बदल





Source link

Weather Update : गेला गेला म्हणताना पावसानं पुन्हा मारली एन्ट्री; ‘या’ भागांमध्ये अचानक मुसळधार

Weather Update : गेला गेला म्हणताना पावसानं पुन्हा मारली एन्ट्री; ‘या’ भागांमध्ये अचानक मुसळधार


Maharashtra Rain Latest Weather Update : जवळपास महिनाभर दडी मारलेल्या पावसानं महाराष्ट्राला सप्टेंबर महिन्यात ओलंचिंब केलं. अनेकांनी याचं श्रेय नक्षत्राला दिलं, तर हवमान विभागाकडून मात्र अरबी समुद्रावरील कमी दाबाच्या पट्ट्यामुळं दिलासादायकत पर्जन्यमान झाल्याचं म्हटलं. मुद्दा असा, की हा पाऊस आता मात्र परतीच्या वाटेवर लागला आहे. इतकंच काय तर, मुंबईतून दक्षिण पश्चिम मान्सूननं निरोप घेतला असून, आता शहरातील हवामान कोरडं होत असल्याची बाब निरीक्षणास आली आहे. 

परिणामी सध्यातरी शहरात पावसाची शक्यता वर्तवली जात नाहीये. असं असलं तरीही फक्त कोकणातील काही भागांमध्ये मात्र पाऊस मधूनच हजेरी लावू शकतो. त्यामुळं अचानक आलेल्या या सरी उष्णता आणखी वाढवण्यास कारणीभूत ठरणार आहे. तिथं विदर्भ आणि मराठवाड्यातूनही पावसानं काढता पाय घेतला आहे. 

देशाच्या उत्तरेकडे थंडीची चाहूल असतानाच पावसाचीही हजेरी 

‘स्कायमेट’ (Skymet) या खासगी संस्थेच्या माहितीनुसार पश्चिमी झंझावातामुळं आता जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, लडाख आणि उत्तराखंडसब देशातील उत्तरेकडे असणाऱ्या पर्वतीय भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील दोन दिवसांसाठी या भागात पावसाची हजेरी असेल. 

 

मागील काही दिवसांपासून उत्तर भारतामध्ये थंडीची चाहूल लागली होती. पण, आता मात्र या भागांमध्ये पावसानंही हजेरी लावल्यामुळं मैदानी भागांमधील तापमानाच काही अंशी घट झाल्याचं पाहायला मिळू शकतं. तर, पर्वतीय भागांमध्ये पारा बराच खाली जेण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गिलगिट, बाल्टिस्टान आणि जम्मू काश्मीरमध्ये काही प्रांतांवर हिमवर्षावही होऊ शकतो. 

देशाच्या दक्षिणेकडे आंध्र प्रदेशचा किनारपट्टी भाग आणि लक्षद्वीपमध्ये पावसाच्या हलक्या सरी असतील. तर, केरळच्या किनारपट्टी भागात हवमान दमट राहील. देशातील इतर राज्यांमध्ये तुलनेनं हवामान कोरडच असणार आहे. 





Source link

शिक्षकाने बारावीच्या विद्यार्थिनीला आपल्या जागी रोजंदारीवर ठेवले आणि… महाराष्ट्रातील धक्कादायक प्रकार

शिक्षकाने बारावीच्या विद्यार्थिनीला आपल्या जागी रोजंदारीवर ठेवले आणि… महाराष्ट्रातील धक्कादायक प्रकार



गडचिरोली जिल्ह्यात अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. एका शिक्षकाने एका विद्यार्थीनीला रोजंदारीवर कामावर ठेवले आहे.



Source link

अजित पवार यांच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांचा मोठा डाव

अजित पवार यांच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांचा मोठा डाव


Ajit Pawar Vs Sharad Pawar :  पिंपरी चिंचवडच्या बालेकिल्ल्यात अजित पवारांना धक्का देण्यासाठी शरद पवारांनी मोठा डाव टाकला आहे. अजितदादांचा एकेकाळचा कट्टर समर्थक नेता लवकरच शरद पवार गोटात सामील होणार आहे. पिंपरीत मोठी राजकीय घडामोड घडली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. 

अजित पवारांचा बालेकिल्ल्याला सुरुंग

पिंपरी चिंचवड म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बालेकिल्ला. मात्र, याच बालेकिल्ल्याला सुरूंग लावण्यासाठी सिनिअर पवारांनी मोठा डाव टाकला आहे. पिंपरी चिंचवडचे माजी महापौर आझम पानसरे यांनी रविवारी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात. 

कोण आहेत आझम पानसरे?

पिंपरी चिंचवडच्या राजकारणात आझम पानसरे हे मोठं नाव आहे. अजित पवारांचे एकेकाळचे कट्टर समर्थक ही त्यांची ओळख पिंपरीत राष्ट्रवादीची सत्ता आणण्यात पानसरेंचा मोठा वाटा होता. प्रतिकूल परिस्थितीत पानसरेंनी राष्ट्रवादीची खिंड लढवली
भाजपची सत्ता आल्यानंतर आझम पानसरेंनी भाजपात प्रवेश केला. पानसरेंचा मुलगा निहाल पानसरे अजित पवार गटात सामील झाला. तर, आझम पानसरे लवकरच शरद पवारांना पाठिंबा देतील, असा दावा केला जात आहे.

काका विरुद्ध पुतण्या अशी नवी लढाई

पुण्यात पवार-पानसरे भेटीच्या वेळी राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तुषार कामठेही सोबत उपस्थित होते. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पक्ष मजबूत करण्यासाठी शरद पवार पुन्हा एकदा मैदानात उतरलेत. पक्षाच्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घ्यायला त्यांनी सुरूवात केलीय.  त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये पवारांनी खास लक्ष घातलंय. गणेशोत्सव काळात रोहित पवारही पिंपरी चिंचवडमध्ये सक्रीय झाल्यानं काका विरुद्ध पुतण्या अशी नवी लढाई सुरू झाल्याचं चित्र दिसलं.

अजित पवार गट खिळखिळा करण्याची रणनीती 

आगामी निवडणुकीत पानसरेंसारख्या कट्टर समर्थकाला मानाचं पान देऊन अजित पवार गट खिळखिळा करण्याची रणनीती पवारांनी आखलीय. पानसरेंना आपलंसं करून एकाच दगडात अजित पवार आणि भाजप असे दोन पक्षी गारद करण्याची शरद पवारांची खेळी दिसत आहे.

शरद पवार गटानंतर अजित पवार गटाची सुप्रीम कोर्टात धाव 

राष्ट्रवादी कुणाची? हा वाद शिगेला पोहचलेला असतानाच आता शरद पवार गटानंतर अजित पवार गटानेही सुप्रीम कोर्टात धाव घेतलीय. आमचं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये अशी विनंती अजित पवार गटाने केलीय. अजित पवार गटाकडून कॅव्हेट दाखल दाखल करण्यात आलंय. अजित पवारांच्या गटातील आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांना द्यावेत.. अशी मागणी शरद पवार गटाकडून करण्यात आलीय. या प्रकरणाची सुनावणी उद्या म्हणजे 9 ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टात होणार आहे. त्यामुळेच अजित पवार गटाकडून कॅव्हेट दाखल करण्यात आलंय. 
 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp