अकरावीच्या विद्यार्थ्यांकडून दहावीच्या 35 मुलांना मारहाण, पालघरमधल्या महाविद्यालात रँगिगचा धक्कादायक प्रकार
योगेश खरे, झी मीडिया नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) दुसरी चूल मांडल्यानंतरही अजित पवार गटाने शरद पवारांना (Sharad Pawar) विठ्ठलाची उपमा दिली होती. मात्र आता चित्र बदललं आहे. आता अजित पवार गटानं (Ajit Pawar Group) आपलं दैवतच बदलल्याची चर्चा आहे. कारण अजित पवार गटानं शरद पवारांऐवजी त्यांचे राजकीय गुरु यशवंतराव चव्हाणांचे (Yashwantrao Chavan) फोटो बॅनरवर (Banner) वापरायला सुरुवात केलीय. बॅनरवरुन शरद पवार गायब आहेत, त्या जागी यशवंतराव झळकताना दिसतायत. अजित पवार गटाला शरद पवारांनी आपले फोटो बॅनरवर वापरु नये अशी तंबी दिली होती, त्यानंतर चक्क नाशिकमध्ये अजित पवार गटाच्या होल्डिंग्सवर पवारांऐवजी यशवंतरावांचे फोटो दिसलेत.
यशवंतरावांचेच फोटो का?
यशवंतराव चव्हाण हे शरद पवारांचे राजकीय गुरु मानले जातात. यशवंतराव चव्हाणांनी पवारांना मानसपुत्र मानलं होतं. चव्हाण हे नाशिकमधून लोकसभेवर बिनविरोध निवडून गेले होते. चव्हाणांचा फोटो वापरत पवारांना शह देण्याचा अजित पवार गटाचा प्रयत्न आहे. दरम्यान अजित पवार गटाच्या या खेळीवर शरद पवार गटानं टीकास्त्र सोडलंय. पण पवारांना डावलून यशवंतरावांचा फोटो वापरण्यात आल्यानं अजित पवार गटाच्या या खेळीची चर्चा होतेय..
अजित पवार यांच्या गटाकडून वापरण्यात येत असलेल्या शरद पवारांच्या फोटोवर खुद्द शरद पवारांनीच आक्षेप घेतला होता. त्यानंतर शरद पवारांचा फोटो डावलत थेट यशवंतरावांचा फोटो अजित पवार गटाकडून वापरण्यात आलाय.. हा अजित पवार गटाकडून शरद पवार गटाला चेकमेट करण्याचा प्रयत्न असल्याचं मानलं जातंय.
अजित पवारांना छुपा पाठिंबा?
राष्ट्रवादी कुणाची यावर निवडणूक आयोगामध्ये वादळी सुनावणी झाली….शिवसेनेला ज्या पद्धतीनं संख्याबळाच्या आधारावर चिन्ह दिलं गेलं, त्याचा दाखला अजित पवार गटानं निवडणूक आयोगासमोर दिला. तर अंतिम निर्णय होईपर्यंत चिन्ह गोठवू नका, अशी मागणी शरद पवार गटानं केली.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीवर निवडणूक आयोगाच्या सुनावणीला स्वत: शरद पवार उपस्थित राहिल्यामुळे या बंडाला पवारांचा छुपा पाठिंबा असल्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळालाय. आयोगाच्या पहिल्याच सुनावणीला थेट दिल्लीत जाऊन पवार हजर राहिल्यामुळे त्यांनी ही लढाई निकाराची केल्याचं स्पष्ट झालंय. विशेष म्हणजे या वयात पवार सर्व आघाड्यांवर स्वत: मैदानात उतरत आहेत. मग ते अजित पवारांसोबत गेलेल्या मंत्र्यांच्या मतदारसंघात सभा घेऊन थेट आव्हान देणं असो की भाजपविरोधात उघडलेल्या इंडिया आघाडीचा पुढाकार असो, पवार प्रत्येक आखाड्यात स्वत: शड्डू ठोकून उभे आहेत.
अमर काणे, झी मीडिया, नागपूर : आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2023) आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक ठरला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने ऐतिहासिक कामगिरी करत 101 पदकांची कमाई केली आहे. यामध्ये 25 सुवर्ण पदकांचा देखील समावेश आहे. आजच्या महत्त्वाच्या दिवशीच नागपूरकर (Nagpur) ओजस देवतळेनेही (Ojas Devtale) आशियाई क्रीडा स्पर्धेत तिसरे सुवर्णपदक मिळवले आहे. ओजस देवतळेने शनिवारी तिरंदाजीत कंपाउंड इव्हेंटमध्ये( वैयक्तिक) गोल्ड मेडल मिळवले आहे. याअगोदर ओजसने मेन्स टीम कंपाऊंड आणि मिक्स टीम कंपाउंड मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे.
तिरंदाजीत कंपाउंड इव्हेंटच्या फायनलमध्ये ओजस देवतळेने भारताच्या अभिषेक वर्मा विरुद्ध सरशी साधली आहे. तिसचे सुवर्णपदक जिंकत असताना नागपुरात ओजसच्या घरी त्याचे कुटुंबीय आणि तिरंदाज मित्रमंडळी एकत्र त्याचा इव्हेंट पाहिला. त्याने सुवर्णपदक जिंकल्यानंतर त्यांनी फटाके फोडून, मिठाई वाटून आणि ढोल ताशावर नाचत आपला आनंद साजरा केला आहे.
दरम्यान, याआधीआशियाई क्रीडा स्पर्धेत कंपाउंड मिश्र सांघिक तिरंदाजी इव्हेंटमध्ये मराठमोळ्या ओजस देवतळे व ज्योती वेण्णम यांनी सुवर्णवेध घेतला होता. देशाकरता सुवर्णपदकाची कमाई करताना ओजसने आशियाई क्रीडा स्पर्धेत मेडल मिळवणारा पहिला नागपूरकर होण्याचाही मान मिळवला आहे. झपाटल्यागत 12 तासांची मेहनत आणि सोशल मीडियापासून अलिप्त राहत आणि प्रचंड कष्ट आणि मेहनत घेत ओजसने आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक मिळवण्याची ही किमया साधली आहे.
ओजसने मिळवलेल्या या यशानंतर त्याचे आई-वडीलही भावनिक झाले होते. नागपुरात तिरंदाजीच्या फारशा सुविधा उपलब्ध नसताना ओजसने सातारा येथे जाऊन सराव केला. पाऊस ,ऊन असला तरी त्याच्या सरावात कधीच खंड पडला नाही. ओजसला लहानपणापासून तिरंदाजीमध्ये आवड होती. त्याने शालेय, राज्य आणि देशपातळीवर आपलं कौशल्य दाखवत अनेक पदकं मिळवली आहेत. बालपणी नेम मारण्यासाठी खेळण्यातल्या धनुष्य हाती आल्यानंतर खराट्याच्या काड्यांचा ओजसने वापर केला होता आणि इथूनच त्याच्या तिरंदाजीचा प्रवास सुरु झाला होता.
पंतप्रधानांकडून कौतुक
ओजस देवतळेने कंपाऊंड तिरंदाजीत सुवर्णपदक पटकावल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचं कौतुक केलं आहे. दृढ संकल्प आणि एकाग्रता यामुळे ओजसने चाांगली कामगिरी केली आहे. त्याने सूवर्ण पदक जिंकून देशाचा गौरव वाढवला आहे, असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ओजसच्या या यशाबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्याचे कौतुक केलं होतं. देवेंद्र फडणवीस यांनी ओजसचे वडील प्रवीण देवतळे आणि आई अर्चना देवतळे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून त्यांचंही अभिनंदन केलं होतं.
कल्याणमध्ये भर दिवसा महिलेची छेड काढण्यात आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
Source link
Mahadev app case: बॉलिवूड स्टार रणबीर कपूरला ईडीचे समन्स आले आहे. एका सट्टा अॅपची जाहिरात केल्याप्रकरणी रणबीरला समन्स बजावण्यात आलेत. आता याच प्रकरणी कॉमेडियन कपिल शर्मा याच्यासह अभिनेक्षी हुमा कुरेशी या दोघांना देखील ईडीचे समन्स आले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. आता कपिल शर्मा आणि हुमा कुरेशी यांना ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागणरा आहे.
महादेव ऑनलाईन सट्ट्याच्या अॅप प्रकरणी रणबीर कपूरनं ईडीकडे दोन आठवड्यांची वेळ मागितलीय. बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूरला ईडीनं समन्स पाठवलंय. रणबीर कपूरला ६ ऑक्टोबरला चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. महादेव अॅपप्रकरणी रणबीरची चौकशी करण्यात येणार आहे. महादेव अॅप हे ऑनलाईन सट्ट्याचं अॅप आहे. आणि या अॅपच्या जाहिरातीप्रकरणी यापूर्वीच अनेक बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्रींची चौकशी करण्यात आलेली आहे. याआधी सनी लिओनीसह, भाग्यश्री, टायगर श्रॉफ यांचीही चौकशी झालीय. आता रणबीरपर्यंत हे धागेदोरे गेले आहेत. आता रणबीर कपूरच्या मागणीवर ईडी काय उत्तर देतं, याकडे लक्ष लागलंय.
आतिफ अस्लम, राहत फतेह अली खान, अली असगर, विशाल ददलानी, टायगर श्रॉफ, नेगा कक्कर, भारती सिंग, एली अवराम, सनी लिओन, भाग्यश्री, पलकित सम्राट, कीर्ती खरबंदा, नुसरत भरूचा आणि कृष्णा असे अनेक सेलिब्रिटी ईडीच्या रडारवर आहेत.
महादेव ऍप हे ऑनलाईन सट्ट्याचं ऍप आहे आणि या ऍपच्या जाहिरातीमुळे रणबीरसह अनेक स्टार्स ईडीच्या निशाण्यावर आले आहेत. फेब्रुवारीमध्ये यूएईमधल्या अलिशान हॉटेलात ऑनलाईन सट्टा ऍपप्रकरणातील आरोपी सौरभ चंद्राकरचा लग्न सोहळा पार पडला. या सोहळ्यातील व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे रणबीरसह अनेक कलाकार ईडीच्या रडारवर आलेत. त्यामुळे हे प्रकरण केवळ ऑनलाईन सट्ट्यापुरतं मर्यादित नाही असा संशय ईडीला आहे.