Marrige: नाद खुळा! हेलिकॉप्टर मधून निघाली नवरा नवरीची वरात; थाट पाहून वऱ्हाडी चाट पडले

Marrige: नाद खुळा! हेलिकॉप्टर मधून निघाली नवरा नवरीची वरात; थाट पाहून वऱ्हाडी चाट पडले


असाच एक नाद खुळा लग्न सोहळा नंदुरबारमध्ये (Nandurbar) पहायला मिळाला आहे. जिथे वाहनही लगेच मिळत नाही अशा अतिदुर्गम भागात नवरा नवरीने लग्नसोहळ्यासाठी हेलिकॉप्टरने Entry केली. 


Updated: Feb 14, 2023, 11:02 PM IST





Source link

पोतंभर सापडलेल्या आधारकार्डांबाबत धक्कादायक माहिती समोर

पोतंभर सापडलेल्या आधारकार्डांबाबत धक्कादायक माहिती समोर


Aadhaar cards found in Panchganga : प्रताप नाईक, झी २४ तास, कोल्हापूर /  पंचगंगा नदीत आढळलेल्या आधारकार्डांबाबत (Aadhaar cards) धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Kolhapur) या आधार कार्डचा पेन्शन योजनेसाठी गैरवापर झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय.. सापडलेल्या आधार कार्डमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या कार्डची संख्या अधिक असल्यानं संशय बळावलाय. तलाठी कार्यालयाकडून सापडलेल्या सर्व आधार कार्डची तपासणी केली जाणार आहे.  दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

इचलकरंजीत पंचगंगा पात्रात पोतंभर आधारकार्ड मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही आधार कार्ड कुणाची याचा शोध पोलीस घेत आहेत.  कोल्हापूरकरांनो तुमची आधारकार्ड सुरक्षित आहेत की नाही हे तपासा कारण पंचगंगा नदीपात्रात पोतंभरुन आधारकार्ड मिळालीयत. काही महिन्यांपूर्वी कोल्हापुरात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात रेशन कार्ड आढळून आली होती, त्यानंतर आता हजारो आधारकार्ड सापडल्यानं चिंता व्यक्त केलीय जात आहे. इचलकरंजीमध्ये पंचगंगा नदी पात्रात स्वच्छता करत असताना राष्ट्रसेवा दलाच्या कार्यकर्त्यांना एक पोतं तरंगताना दिसलं. हे पोतं बाहेर काढल्यावर हजारो आधारकार्ड त्यात सापडली. 

पंचगंगेत पोतंभर आधारकार्ड  

– शासकीय योजनांसाठी आधारकार्ड महत्वाचा दस्तावेज आहे

– पंचगंगा पात्रात सापडलेल्या आधार कार्डवरील बहुतांश नागरिकांचं वय साधारण 60 ते 65 आहे. 

– पोलिसांच्या प्राथमिक तपासात सापडलेली सर्व आधार कार्ड इचलकरंजी शहर आणि परिसरातील असल्याचे समजतंय

– आधार कार्ड बाहेर काढल्यानंतर सर्व ओरिजिनल असल्याचे समजतंय.

– इचलकरंजी शहरासह जवाहरनगर, कोरोची, कबनूर भागातील आहेत. 

– आधार कार्डवरुन काहींना संपर्क करण्यात आल्यानंतर त्यांनी ती आपल्याकडेच सांगितलं. त्यामुळे हजारो बोगस आधार कार्ड छापली गेल्याचा संशय पोलिसांना आहे.

 सर्व आधार कार्ड बोगस आहेत का?

सापडलेली सर्वच्या सर्व आधार कार्ड ही बोगस आहेत की, कुणी जाणीवपूर्वक पंचगंगा नदी पात्रात टाकलीयत याचा शोध पोलीस घेत आहेत. मात्र त्यानिमित्तानं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पेन्शन मंजुरीच्या हेतूने आधार कार्डवर वय वाढवण्याचे प्रकार सुरु आहेत, त्यासाठी हा प्रकार सुरु आहे का? आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बोगस आधारकार्डांची छपाई सुरु आहे का? असे सवाल उपस्थित होत आहेत.





Source link

Shivsena Symbol : ‘व्हॅलेंटाईन डे दिवशी शिवसेनेच्या ‘ब्रेकअप’ची सुनावणी; धनुष्यबाण आणि 16 आमदारांच्या पात्रतेचा वाद

Shivsena Symbol : ‘व्हॅलेंटाईन डे दिवशी शिवसेनेच्या ‘ब्रेकअप’ची सुनावणी; धनुष्यबाण आणि 16 आमदारांच्या पात्रतेचा वाद


Shiv Sena Symbol Row on  valentine day 2023: ‘व्हॅलेंटाईन डे  (valentine day 2023) दिवशी  शिवसेनेच्या ‘ब्रेकअप’ची सुनावणी होत आहे. शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण आणि 16 आमदारांच्या पात्रतेचा मुद्द्याबाबत सुप्रीम कोर्टात फैसला होणार आहे.  शिवसेना (Shiv Sena) पक्ष आणि धनुष्यबाण  (Shiv Sena Symbol)  चिन्हं यावर काय निर्णय होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे. शिवसेना पक्षावर दावा करण्यासह शिवसेनेचे चिन्ह असलेल्या धनुष्यबाण  (Dhanushyaban) चिन्ह मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM  Eknath Shinde) गटात जोरदार रस्सीखेच पहायला मिळत (Maharashtra Political News) आहे. 

शिंदे सरकारचं काय होणार याचा फैसला सुप्रीम कोर्टात होणार आहे. कारण शिवसेनेच्या ‘ब्रेकअप’ची सुनावणी ‘व्हॅलेंटाईन डे’ला म्हणजे 14 फ्रेबुवारीला होत आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटात शिवसेना कोणाची यावरुन वाद सुरु आहे. त्यावर दोन्ही गटांची सुप्रीम कोर्टात याचिका केल्या आहेत.  

तसेच 16 आमदारांचा अविश्वास ठराव आणि विधानसभा अध्यक्षांविरोधात आणलेला अविश्वास प्रस्ताव याभोवती प्रामुख्यानं ही सुनावणी फिरत आहे. खुद्द मुख्यमंत्री शिंदेंच्या आमदारकीविरोधात ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. शिंदेंना घेरायचं, इतर 15 आमदारांना अपात्र ठरवायचं आणि सरकार अल्पमतात आणायचं अशी ठाकरेंची रणनीती आहे. सुप्रीम कोर्टात उद्या सकाळी 10.30 वाजता यावर सुनावणी होणार आहे. तेव्हा राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल कोणाच्या बाजून लागणार याकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्ट भाजपने विकत घेतलं आहे का? संजय राऊतांचा सवाल

केंद्रीय निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्ट भाजपने विकत घेतलं आहे का असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. आपण कायद्यानुसारच सरकार स्थापन केलं असल्याने निकाल आपल्याच बाजूने लागेल असं विधान फडणवीसांनी केलं होतं. त्यावर राऊतांनी हा सवाल केला. 

धनुष्यबाण परत आणायचाच, पटोलेंचा निर्धार

आपल्याला धनुष्यबाण परत आणायचाय, धनुष्यबाण कसा आणायचा तो प्लॅन आम्ही करु असं विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलंय. पिंपरी पोटनिवडणुकीतील उमेदवार नाना काटे यांच्यासाठी आज मविआची सभा झाली. या सभेत आदित्य ठाकरेंसमोर नाना पटोलेंनी हे विधान केलंय. 

उद्धव ठाकरेंना ज्या प्रकारे मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार व्हावं लागलं त्याचा बदला घ्यायचा – अजित पवार

मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार व्हावं लागलं, त्याचा बदला आपल्याला पोटनिवडणुकीत घ्यायचाय, असं अजित पवारांनी म्हटलं. आज चिंचवडमध्ये मविआचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारासाठी मविआचा मेळावा झाला. या मेळाव्याला नाना पटोले, अजित पवार, आदित्य ठाकरे उपस्थित होते. 





Source link

Honeytrap : जागा पाहण्याचे नाटक करत तिने तरुणाला प्रेमात पाडलं अन्… अलिबागमधल्या घटनेनं खळबळ

Honeytrap : जागा पाहण्याचे नाटक करत तिने तरुणाला प्रेमात पाडलं अन्… अलिबागमधल्या घटनेनं खळबळ


Crime News : रायगड पोलिसांनी आरोपी महिलेला आधी चर्चगेटमध्ये अटक केली आणि त्यानंतर पुन्हा अलिबाग गाठत तिच्या दुसऱ्या साथीदाराला ताब्यात घेतले. पोलिसांनी सापळा रचून अगदी फिल्मी स्टाईलने अटक केली आहे


Updated: Feb 13, 2023, 11:57 AM IST

(प्रातिनिधीक छायाचित्र)





Source link

Farmer : महाष्ट्रातील शेतकऱ्याची केंद्र सरकारविरोधात कोर्टात याचिका

Farmer : महाष्ट्रातील शेतकऱ्याची केंद्र सरकारविरोधात कोर्टात याचिका



राज्यातील शेतकऱ्यांनी कापूस विक्री थांबवली आहे. त्यामुळे राज्यभरातच कापूस कोंडी निर्माण झाली आहे. ही कोंडी सोडवण्याच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली आहे.



Source link

Ramesh Bais : राज्याचे नवे राज्यपाल रमेश बैस, अमरिंदर सिंह यांना हुलकावणी

Ramesh Bais : राज्याचे नवे राज्यपाल रमेश बैस, अमरिंदर सिंह यांना हुलकावणी


Maharashtra Governor Ramesh Bais : महाराष्ट्र राज्याचे नवे राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) आता असणार आहेत. ते लवकरच आपल्या पदाची शपथ घेतील. ( Maharashtra Political News) दरम्यान, काही दिवासंपूर्वी भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे आपल्याला राज्यपाल पदावरुन पायउतार व्हायचे आहे, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, पुन्हा एकदा भाजपने धक्कातंत्र वापरले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या जवळचे रमेश बैस यांची नियुक्ती आता होणार आहे.

रमेश बैस, यांचा जन्म 2 ऑगस्ट 1947 रोजी रायपूर येथे झाला. रमेश बैस 1989 मध्ये पहिल्यांदा खासदार झाले. तेव्हापासून ते 2019 पर्यंत रायपूरचे प्रतिनिधित्व करत राहिले. अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते राज्यमंत्रीही होते. ते लोकसभेतील भाजपचे चीफ व्हिपही होते. 2019 मध्ये, भाजपने 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आधारावर लोकसभेचे तिकीट दिले नाही, परंतु त्यांच्या वचनबद्धतेमुळे त्यांना जुलै 2019 मध्ये त्रिपुराचे राज्यपाल बनवण्यात आले होते.  सध्या ते झारखंडचे राज्यपाल आहेत. त्यांनी त्रिपुराचंही राज्यपालपद भूषवले आहे. 

Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर

त्याआधी पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली जात होती. तशी माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत होती. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल पदावरुन आपल्याला पदमुक्त करण्यात यावे, अशी इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे व्यक्त केली होती. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला होता. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह हे आता भाजपसोबत आहेत. त्यामुळे काँग्रेसमधून आलेल्या या बड्या नेत्याचे राजकीय पुनवर्सन करण्याचा हालचाली सुरु झाल्या होत्या. यानंतर आता जर कोश्यारींचा राजीनामा मंजूर झाल्यास पुढचे राज्यपाल कोण याबाबत चर्चा सुरु झाली होती. यातच आता पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांची राज्यपालपदी नियुक्ती होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना दिसत होती. मात्र, त्यांच्या ऐवजी रमेश बैस यांना संधी देण्यात आली आहे.

महाराष्ट्राच्या राज्यपालांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला आहे. तसेच याशिवाय डझनभर राज्यांमध्येही मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. लडाखचे नायब राज्यपाल राधाकृष्ण माथूर यांचाही राजीनामाही स्वीकारण्यात आला आहे. झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल बीडी मिश्रा यांना लडाखचे नायब राज्यपाल बनवण्यात आले आहे. त्याचबरोबर माजी अर्थ राज्यमंत्री शिव प्रताप शुक्ला यांची हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राजस्थानचे मजबूत नेते गुलाबचंद कटारिया यांना आसामचे राज्यपाल बनवण्यात आले आहे. त्याचबरोबर माजी न्यायमूर्ती एस अब्दुल नजीर हे आंध्र प्रदेशचे राज्यपाल बनले आहेत. बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांना मेघालयचे राज्यपाल बनवण्यात आले आहे. हिमाचलचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp