by Hansraj Agrawal | Sep 24, 2023 | Trending News
Ganesh Visarjan 2023 : गणपती विसर्जनासाठी गेलेल्या नागरिकांवर मधमाशांचा हल्ला केला आहे. पुण्याच्या भोर तालुक्यातील हिर्डोशी गावात, नीरा देवघर धरण परिसरात हा प्रकार घडला आहे. हिर्डोशी येथील स्मशानभूमीशेजारी विसर्जनावेळी भाविकांवर मधमाशांनी अचानक हल्ला केला लहान मुलांसह, महिला आणि पुरुष अशा 100 हून अधिक जणांचा मधमाशांनी चावा घेतला. यामुळे एकच गोंधळ उडाला आणि पळापळ झाली. गणपती विसर्जन न करताच अनेकजण निघून गेले.
नेमकं काय घडले?
पुण्याच्या भोर तालुक्यातील हिर्डोशी गावात, नीरा देवघर धरणाच्या पाण्यात गणपती विसर्जनासाठी गेलेल्या नागरिकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडलीय. हिर्डोशी येथील स्मशानभूमीशेजारी विसर्जनावेळी धरणाच्यापाण्याजवळ आरती करत असताना मधमाशांनी नागरिकांवर अचानक हल्ला केला. यावेळी लहान मुलांसह, महिला आणि पुरुष अशा एकूण 100 हून अधिक जणांचा मधमाशांनी चावा घेतला. त्यानंतर झालेल्या पळापळीत शेवटी गणपती विसर्जन न करताच निघून जाण्याची नागरिकांवर वेळ आली. नंतर हिर्डोशी येथील काही ग्रामस्थांनी धरणाच्या पाण्याशेजारी असलेल्या त्या गणपतींच्या मूर्तींचे विसर्जन केले. भोर तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या हिर्डोशी येथे गणेश विसर्जनावेळी आरती करताना अचानक मधमाशांनी ग्रामस्थांवर हल्ला केला. त्यात अंदाजे 100 हून अधिक जणांना मधमाशांनी चावा घेतल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
मधमाशांनी चावा घेतल्याने पळापळ झाली
हिर्डोशी येथील स्मशानभूमीशेजारी असलेल्या नीरा देवघर धरणाच्या पाण्यात गणपती विसर्जन केले जाते. त्याच ठिकाणी विसर्जन मिरवणूक साडेतीन वाजण्याच्या पोहचली. गणेश विसर्जनापुर्वी आरती करत असताना अचानक मधमाशा घोंगाऊ लागल्या आणि आरती चालु असतानाच ग्रामस्थांवर मधमाशांनी हल्ला केला. विसर्जनासाठी लहान मुले, युवक, महिला, पुरुष असे अंदाजे दिडशे जण उपस्थित होते. त्या प्रत्येकाला मधमाशांनी चावा घेतला. त्यामुळे सर्व जण रानोमाळ पळू लागले. परंतु मधमाशा त्यांच्या मागे लागून चावत होत्या. शेवटी गणेश विसर्जन ठेवून लोकं निघून गेली. लहान मुलांना जास्त चावा घेतला. त्यामुळे त्यांना त्रास होत होता.
काही वेळाने मधमाशा गेल्यावर स्थानिक ग्रामस्थ धोंडिबा मालुसरे, बबन मालुसरे, बबन राजीवडे, अरुण मालुसरे, लक्ष्मण धामुनसे, संतोष मालुसरे, अंकुश धामुनसे आदी ग्रामस्थांनी गणेश आणि गौरी विसर्जन केले.
हिर्डोशी येथील आरोग्य केंद्रात डॉक्टर पदे रिक्त असल्याने या नागरिकांवर प्रथमोपचार करण्यास विलंब झाल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Sep 24, 2023 | Trending News
Pune Accident : पुण्यात ऐन गणेशोत्सवात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. शॉर्टसर्किटमुळे झोपेतच होरपळून तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Sep 23, 2023 | Trending News
Navi Mumbai Crime News : नवी मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. जिवंत बाळाला बॅगेत भरुन सोडून देण्यात आले आहे. बाळाच्या रडण्याचा आवाज आल्यानंतर या बॅगेत काय आहे ते उघडकीस आले. मात्र, बाळ असलेली बॅग ठेवून गुपचूप पलायन करणारा व्यक्ती CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
नवी मुंबईतीस घणसोली येथील सेक्टर 3 लक्ष्मी हॉस्पिटल आणि वनलाईट फिटनेस हब यामध्ये असलेल्या कॉमन जागेमध्ये ही बाळ असलेली बॅग ठेवण्यात आली. बॅग मध्ये पाच दिवसाच्या नवजात बालिकेला सोडून गेल्याची घटना घडली आहे.
काय आहे CCTV फुटेजमध्ये
बॅग सोडून जातानाची ही घटना सीसीटीव्ही मद्ये कैद झाली आहे. शुक्रवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास या बाळाला बंद अवस्थेत असलेल्या बॅग मद्ये ठेवण्यात आले होते. लक्ष्मी हॉस्पिटल आणि वनलाईट फिटनेस हब यामध्ये असलेल्या कॉमन जागे असलेल्या रॅकमध्ये बाळ असलेली बॅग ठेवण्यात आली. बॅग ठेवून एक व्यक्ती निघून गेल्याचे या व्हिडिओत दिसत आहे.
बाळाचा रडण्याचा आवाज आला
बाळाचा रडण्याचा आवाज आल्यावर आजूबाजूच्या लोकांना याबाबत कळले त्यांनी. बॅगेतून आवाज येत होता. नागरीकांनी बॅग उघडून पाहिली असताना जिवंत बाळ दिसले. नागरिकांनी तात्काळ पोलिसांना बोलावून घेतले. पोलिसांनी बाळाला रुग्णालयात नेले त्याची वैद्यकीय तपासणी झाल्यावर बाळाला नेरुळ मधील विश्व बाळ केंद्रात ठेवण्यात आले ,असून कोपरखौरनणे पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
नवी मुंबईत कचराकुंडीत आढळले नवजात अर्भक
नवी मुंबईतल्या तुर्भे इंदिरानगरमध्ये मनपा रूग्णालयाशेजारील कचराकुंडीत नवजात अर्भक आढळले होते. सकाळी कचरा नेण्यासाठी पालिकेचे कर्मचारी आले असता त्यांना हे अर्भक दिसलं…त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं मात्र त्याच मृत्यू झाला होता.
अर्भकाला नाल्यात फेकले
पिंपरी चिंचवडच्या बालाजीनगर भागातल्या नाल्यात एका अर्भकाला फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघड झाली. मॉर्निंग वॉकला आलेल्या नागरिकांना नाल्यात कुत्रे काही तरी खात असल्याचं जाणवलं म्हणून पोलिसांना बोलवण्यात आलं. पोलिसांनी पाहाणी केल्यानंतर अर्भक असल्याचं उघड झालं.
Source link
by Hansraj Agrawal | Sep 23, 2023 | Trending News
Nagpur Heavy Rain : नागपुरात मध्यरात्रीपासून पावसानं हाहाकार माजवलाय. मध्यरात्री ढगफुटी सदृश पाऊस (Cloudburst) पडलाय.. मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने (Heavy Rain) शहरात कहर केलाय. कधी नव्हे इतका पाऊस नागपुरात (Nagpur) झालाय. अनेक भागात पावसाचं पाणी घरांमध्येही शिरलंय. मोरभवन बसस्थानकात 12 ते 15 बसेस पावसाच्या पाण्यात अडकल्या होत्या. यात मध्यरात्री हॉल्ट करून थांबलेले चालक वाहक सुद्धा बसमध्ये अडकले होते त्यांची आता सुटका करण्यात आलीय. तर झाशी राणी चौक ते सीताबर्डी मेट्रो इंटरचेंज जाणाऱ्या मार्गावरून चक्क नदी प्रवाहीत होऊन शहरात पाणी शिरलं.
युद्धपातळीवर बचावकार्य
ढगफुटीसारख्या पावसानं उपराजधानी नागपूर जलमय झालीये. नागपूरच्या अंबाझरी (Ambazari) भागातील परिस्थीती हाताबाहेर गेल्यानं इथं मदतकार्यासाठी लष्कराला बोलावण्यात आलंय.. लष्कराची एक तुकडी या भागात दाखल झाली असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. रात्री झालेला मुसळधार पाऊस आणि त्यानंतर अंबाझरी तलाव ओव्हर फ्लो झाल्यावर अंबाझरी परिसरात अनेक ठिकाणी पाणी साचलंय. वर्मा ले आउट ,समता ले आउट या भागात 10 ते 15 फूट पाणी साचलंय. या भागात घरांचा पहिला माळा पाण्याखाली गेलाय. तिथे अनेक लोक अडकलेत..घरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलंय
अनेक घरात पाणी
नागपुरातील अंबाझरी भागात घराघरांमध्ये पाणी शिरलं. अचानक आलेल्या पाण्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत.घरातील सामानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. जमिनीपासून पाच फूट पाणी घरात शिरल्याने सर्वत्र चिखल झालेला दिसून येतोय. तसंच घरातील सोफे, खुर्च्या पाण्यावर तरंगत असल्याचंही नागरिकांनी सांगितलं.
मुसळधार पावसानं नागपूर रेल्वे स्थानकावरही पाणी शिरलंय. रेल्वे स्टेशनवरी प्लॉटफॉर्म क्रमांक 1चा भाग पूर्णपणे पाण्यात बुडाला होता.. तिकीट काउंटर परिसर आणि फलाटावर असल्यानं प्रवाश्यांना याचा मोठा फटका बसलाय..पाण्याचा प्रवाह इतका होता की रेल्वे फलाटावर जिकडे तिकडे पाणीच पाणी अशी अवस्था झाली होती.
नागपुरात शाळांना सुट्टी
नागपुरात आज शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलीय. नागपुरात 4 तासांत 106 मिलिमीटर पावसाची नोंद झालीय. .शहरातील रस्ते जलमय झाल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आलंय. त्यामुळे नागपूर शहरातील शाळांना सुट्टी देण्यात आलीय. जिल्ह्यातील शाळांना जिल्हा प्रशासन आणि मनपाकडून सुट्टी जाहीर करण्यात आलीय..
फडणवीसांकडून परिस्थितीचा आढावा
नागपूरतील पूर परिस्थितीचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने आढाव घेत आहेत. नागपुरात आतापर्यंत 400 जणांचं स्थलांतर करण्यात आलं असून अडकलेल्यांचं रेस्क्यू करण्याचं काम सुरु असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. तसंच पुरामुळे एक महिलेच मृत्यू झाल्याचंही त्यांनी सांगितलं. संध्याकाळी नागपुरातील पूरपरिस्थितीचा आढावा घेणार असन कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहनही फडणवीस यांनी केलं आहे.
विरोधीपक्षांचा आरोप
नागपुरात पाणी साठेपर्यंत प्रशासन झोपलं होतं का? असा संतप्त सवाल विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारानी विचारलाय.. हवामान विभागानं यलो अलर्ट दिला असतानाही प्रशासनानं लोकांना का अलर्ट केलं नाही? असा सवालही वडेट्टीवारांनी उपस्थित केला
Source link
by Hansraj Agrawal | Sep 22, 2023 | Trending News
सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : VO – वर्क फ्रॉम होम करुन पैसे कमवा, यू ट्युब व्हिडिओ लाईक करुन मालामाल व्हा, ऑनलाईन व्यवसाय सुरु करा लाखो कमवा, घरबसल्या कमाई करा, असे फोन तुम्हालाही आले असतील आणि तुमच्या मनातही झटपट पैसे कमवण्याचा विचार क्लिक झाला असेल, हे करुन बघूया असं तुम्हालाही वाटलं असेल तर सावधान व्हा. कारण तुमची फसवणूक होऊ शकते.
सायबर गुन्हेगारांनी (Cyber Crime) चोरीचा नवा फंडा शोधलाय. घरबसल्या पैसे देण्याचं आमिष दाखवत गुन्हेगार तुम्हाला लुटतायत. तंत्रज्ञान जसं बदललं तसं गुन्हेगारीचं स्वरुपही बदललं आहे. मुंबई पोलीसमधून (Mumbai Police) बोलतोय, कुरिअरमध्ये ड्रग्स सापडलंय, पैसे पाठवा नाहीतर कारवाई करु असे बनावट कॉल केले जातायत. पोलिसांच्याच नावे कॉल येत असल्याने सामान्य माणूस फसला जातोय.
एटीएम कार्ड बदलायचं आहे, लिंकवर क्लिक करा. वीजबील न भरल्याने वीज तोडण्यापासून वाचण्यासाठी लिंकवर दिलेल्या वेबसाईटवर माहिती भरा. क्रिप्टोकरन्सीत गुंतवणूक करण्यास सांगून फसवणूक करण्याचे असे अनेक प्रकार गेल्या काही वर्षात वाढलेत. बनावट वेबसाइट उघडून लोकांना लुबाडणं, सिमकार्ड क्लोन करून ओटीपी मिळवणं या प्रकारातही मोठी वाढ झालीय. एकट्या पुण्यात गेल्या आठ महिन्यात एक हजारपेक्षा जास्त सायबर गुन्ह्यांची नोंद झालीय. यात 20 कोटींपेक्षा जास्त रकमेची फसवणूक करण्यात आलीय.
ऑनलाईन फसवणूकीची प्रकरणं
टास्क फ्रॉडची 209 प्रकरणे
मनी ट्रान्स्फरची 56 प्रकरणे
KYC अपडेट करा या गुन्ह्यांचे 42
क्रीप्टोकरन्सीत गुंतवणूक करुन फसवणुकीचे 58
इन्शुरन्स फसवणुकीचे 10
घरबसल्या कमाईच्या फसवणुकीचे 31
शेअर मार्केट फ्रॉडचे 27
कर्ज देणार सांगून फसवणुकीचे 29
ऑनलाईन विक्री-खरेदीत फसवणुकीच 62
फेक प्रोफाईलचे 85
फेसबुक हॅकिंगचे 34
सेक्सटॉर्शनचे 35
अशा एकूण 1 हजार 114 तक्रारी फक्त 8 महिन्यात आल्यात.
आपण फसवले गेले याची जाणीव होईपर्यंत सायबर ठग ते पैसे एका बँक खात्यातून दुसऱ्या खात्यात वळवलेले असतात. तेव्हा ते मिळण्याची शक्यता खूपच कमी असते.. म्हणूनच सायबर गुन्हेगारीपासून सावध राहणंच गरजेचं आहे. डिस्काऊंट कूपन मिळतंय.. कॅशबॅक मिळतंय. अशा फसव्या जाहिरातींपासून दूर राहणं गरजेचं आहे. नोकरीसाठी कोणी पैसे घेत असल्यास संशय आला पाहिजे. कोणी पार्सल आल्याचा फोन केल्यावर खरंच ते आपलं पार्सल आहे का याची खातरजमा केली पाहिजे.
Source link
by Hansraj Agrawal | Sep 22, 2023 | Trending News
कुणाल जमादाडे, झी मीडिया, अहमदनगर : अहमदनगरच्या (Ahmednagar Crime) श्रीरामपूर दरोडा (robbery) आणि हत्या प्रकरणाबाबत एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. श्रीरामपूरच्या एकलहरे गावातील एका बंगल्यात दरोडेखोरांनी पतीची हत्या करत सात लाखांचा ऐवज पळवल्याची माहिती समोर आली होती. दरोडेखोरांनी पत्नीला देखील जखमी केले होते, असे पीडितेच्या वडिलांनी सांगितले होते. मात्र आता या दरोडा प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. पत्नीनेच पतीची हत्या करत बनाव रचल्याचे पोलीस (Shrirampur Police) तपासात समोर आलं आहे.
एकलहरे गावातील रस्त्याच्या कडेला असणाऱ्या बंगल्यावर बुधवारी मध्यरात्री एक ते दोनच्या सुमारास दरोडा पडल्याची माहिती मृताच्या पत्नीने दिली होती. दरोडेखोरांनी पती नईम रशीद पठाण (40) यांचा गळा आवळून खून केल्याचा दावा पत्नी बुशराने केला होता. दरोडेखोरांनी आपल्यावरही हल्ला केल्याचे बुशराने पोलिसांना सांगितले. तसेच त्यांनी घरातून रोख सात लाख रुपये व सोन्याचे दागिने लांबविण्यात अशी माहिती दिली होती. मात्र आता या प्रकरणाला धक्कादायक वळण लागलं आहे.
नईम पठाण यांस पत्नीने बुशरानेच संपवल्याची हादरवणारी माहिती समोर आली आहे. पती नईमची हत्या केल्यानंतर बुशराने दरोड्याचा बनाव केला होता. बुशराने नईमला झोपेच्या गोळ्या खावू घातल्यानंतर त्याचा साडीने गळा आवळल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत या दरोडा प्रकरणाचा छडा लावला आहे.
पोलिसांनी नईमची पत्नी बुशरासह आणखी दोन संशयितांना ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणात आणखी कुणाचा सहभाग आहे का? हे पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे. मात्र या प्रकरणानंतर अहमदनगरमध्ये खळबळ उडाली आहे.
एकलहरे- बेलापूर रस्त्यालगत नईम पठाण यांची शेतवस्ती आहे. नईम हे पत्नी बुशरा व दोन मुलांसह घरी होते. बुधवारी मध्यरात्री रात्री एक ते दोनच्या सुमारास त्यांच्या पत्नी लघुशंकेला घराबाहेरील स्वच्छतागृहात गेल्या तेव्हा बाहेर दबा धरून बसलेले चार पुरुष व एका महिलेने नईमच्या त्यांना फरफटत घरात आणले आणि जबर मारहाण केली. आरडाओरडा होताच नईम यांना दरोडेखोर घरात आल्याचे दिसले. मात्र काही कळायच्या आत दरोडेखोरांनी ओढणीने त्यांचा गळा आवळला, अशी माहिती बुशराने तिच्या वडिलांना सांगितली होती. बुशराचे वडील अन्वर चिराग शेख यांनी घरी पोहोचून पोलिसांना याची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच तात्काळ अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी घटनास्थळी धाव घेत दरोड्याच्या तपास सुरू केला होता. पोलिसांनी सखोल तपास केला असता बुशराने पतीची हत्या केल्याचे समोर आलं आहे.
Source link