by Hansraj Agrawal | Sep 15, 2023 | Trending News
Sangli News : सांगलीत दुष्काळजन्य परिस्थिती असताना सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ऑर्केस्टाचे आयोजन करण्यात करण्यात आले होते. यावेळी सभेसाठी आलेल्या शेतकऱ्यांनी लावणीच्या गाण्यावर ठेका धरल्याचे पाहायला मिळालं
Source link
by Hansraj Agrawal | Sep 14, 2023 | Trending News
प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : वाराणसी आणि मथुरा कॉरिडॉरच्या धर्तीवर कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराचा विकास करण्याची योजना कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं हाती घेतलीय. मात्र, या विकासकामात अनेक दुकानं आणि घरांच्या भूसंपादनावरून नवा वाद सुरू झालाय. नेमका काय आहे हा वाद जाणून घ्या.
कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर म्हणजे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक. श्री करवीर निवासिनी अंबाबाई महालक्ष्मी मंदिर परिसराचा विकास करण्यासाठी राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनानं महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतलीय. त्यासाठी अंबाबाई मंदिर विकास कॉरिडॉरचा आराखडा तयार करण्यात आलाय.
कसा असेल अंबाबाई विकास कॉरिडॉर?
अंबाबाई विकास कॉरिडॉर नुसार बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, वस्त्र सजावट आणि भव्यराज स्नान पॉईंट परिसराचा विकास केला जाणार आहे. त्यादृष्टीनं तब्बल 240 घरमालक आणि दुकान गाळा मालकांना भूसंपादनासाठी नोटिसा बजावण्यात आल्यात यापैकी 180 मिळकतदारांनी सकारात्मक उत्तर दिलंय
मात्र, अंबाबाई मंदिर विकास आराखड्यावरून नव्या वादाला तोंड फुटलंय. ज्यांची घरं आणि दुकानं जाणार आहेत, त्यांना मोबदला किती मिळणार, याबाबत अंधारात ठेवलं जात असल्याचा आरोप संबंधितांनी केलाय. मंदिर विकासाच्या नावाखाली आम्हाला भकास करू नका, अशी भूमिका त्यांनी घेतलीय.
श्री अंबाबाई मंदिराचा विकास करून भाविकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. मंदिर विकासाला कोल्हापूरकर नागरिक आणि व्यापा-यांचा विरोध नाही. मात्र, हा विकास कॉरिडॉर राबवताना प्रशासनानं पारदर्शी कारभार करावा आणि संबंधितांना विश्वासात घेऊन त्यांचं योग्य पुनर्वसन करावं, अशीच त्यांची भूमिका आहे. तसं झालं तरच अंबाबाई मंदिर विकासाला गती मिळेल.
Source link
by Hansraj Agrawal | Sep 14, 2023 | Trending News
मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे-पाटील यांनी तब्बल 17 दिवसांनंतर आपलं उपोषण मागे घेतलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिदेंची शिष्टाई यशस्वी ठरलीय. जालन्यातील लाठीचार्ज ते उपोषणाचा अखेरचा दिवस. एकूणच हा सगळा प्रवास कसा राहिला,
Source link
by Hansraj Agrawal | Sep 13, 2023 | Trending News
ऐन पावसाळ्यात आंबा कलमांना मोहोर आला आहे. वेंगुर्ल्यातल्या भोगवे गावात हापूसला फळधारणा झाली आहे. मोहोर टिकवून ठेवल्यास बागायतदारांना फायदा होणार आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Sep 13, 2023 | Trending News
Maharashtra Politics : राष्ट्रवादीतल्या बंडानंतर शरद पवार गटाने अजित पवार गटावर कारवाई केली आहे. एक्स सोशल मीडिया अकाऊंटबाबत तक्रार दिल्यानंतर अजित पवार गटाचे डिजिटल अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Sep 12, 2023 | Trending News
15 सप्टेंबरपासून दादरहून सुटणा-या लोकल्स परळमधून सुटणार आहेत. तसंच आणि दादरपर्यंत धावणा-या लोकल्स परळपर्यंत धावणार आहेत. दादर प्लॅटफॉर्म क्रमांक 1 च्या रुंदीकरणासाठी हा बदल करण्यात आलाय.
Source link