मुंबई, नवी मुंबईत पावसाच्या तुरळक सरी; विदर्भाला यलो अलर्ट, कोकणात मात्र चकवा

मुंबई, नवी मुंबईत पावसाच्या तुरळक सरी; विदर्भाला यलो अलर्ट, कोकणात मात्र चकवा


Maharashtra Weather Updates: पावसाळी सहलींचे बेत आखणाऱ्या अनेकांचाच या पावसानं हिरमोड केला. जुलै महिन्याच्या शेवटी हा मोसमी पाऊस जो सुट्टीवर गेला तो ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातही परतला नाही. पण, आता मात्र हे चित्र बदलणार आहेय कारण, तब्बल 15 दिवसांच्या मोठ्या सुट्टीनंतर पाऊस पुन्हा सक्रिय होताना दिसत आहे. सध्याच्या गतीला पाऊस धीम्या गतीनं राज्याच्या काही भागांमध्ये सक्रिय होत असून, सध्या तो विदर्भात परतल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. 

विदर्भात परतलेला हा पाऊस चांगल्या मुक्कामासाठी आला असून, 20 ऑगस्ट आणि त्यानंतरचेही काही दिवस तो या भागात तूफान बरसणार असल्याचा इशारा दिला आहे. 

पावसाच्या धर्तीवर पुढील 24 तासांसाठी विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे. 20 ऑगस्टपर्यंत पावसाचा हा इशारा लागू असेल. दरम्यान गुरुवारी मध्यरात्रीपासून नागपुरात पाऊस सुरू झाल्यामुळं आता आठवड्याचा शेवट इथं पाऊसच करणार हे स्पष्ट होता दिसत आहे. 

हवामानाची एकंदर स्थिती 

मागील 15 दिवसांच्या विरामानंतर आता बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे पाऊस पुन्हा सक्रिय होताना दिसत आहे. यामध्ये विदर्भातील पुर्वेकडे असणाऱ्या भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागामध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शनिवारीही विदर्भात चांगल्या पावसाची शक्यता आहे. तर, 20 ऑगस्टला पश्चिम विदर्भात जिल्ह्यात पाऊस होणार आहे

जुलै महिन्यात पाऊस सरासरीहून काही प्रमाणात जास्त झाला. पण, त्यानंतर मात्र ऑगस्टमधील विश्रांतीमुळं सरासरी पावसात 12 टक्क्यांची घट झाली. परिणामी आता हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार हा पाऊस नेमका ही घट भरून काढेल का हाच प्रश्न उपस्थित होत आहे. 

 

दरम्यान पुढील 24 तासांमध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पालघर भागांमध्ये हवामान बहुतांशी ढगाळ असेल. तर, कोकणातही पाऊस काही भागांमध्ये चकवा देताना दिसेल. थोडक्यात पाऊस परतला असता तरीही त्याची विदर्भावरच कृपा आहे असं म्हणायला हरकत नाही. 

देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये हाहाकार 

हिमाचल आणि उत्तराखंडसारख्या राज्यांमध्ये पावसानं मागील काही दिवासांत मोठ्या प्रमाणात जिवीत आणि वित्तहानी केली आहे. संपूर्ण देशाचं हवामान पाहायचं झाल्यास शनिवारी पूर्व भारत आणि रविवार सोमवारी पूर्वोत्तर भारतामध्ये पावसाची हजेरी असेल. दक्षिण भारतामध्येही मेघगर्जनेसह पावसाची हजेरी पाहायला मिळेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. 





Source link

बोर्डिंग गेटवरच पायलटचा मृत्यू; नागपूर विमानतळावरील धक्कादायक प्रकार

बोर्डिंग गेटवरच पायलटचा मृत्यू; नागपूर विमानतळावरील धक्कादायक प्रकार


Nagpur-Pune Flight:  बोर्डिंग गेटवरच पायलटचा मृत्यू झाला आहे.  नागपूर विमानतळावर हा धक्कादायक प्रकार घडला आहे.  मृत वैमानिक नागपूरहुन पुण्याला इंडिगो कंपनीचे विमान घेऊन जाण्यासाठी सज्ज होते. मात्र,विमानात बोर्ड होण्यापूर्वीचं ते बोर्डिंग गेट जवळ कोसळले. रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे विमानतळावर काही काळ तणावाचे वातावरण होते. 

कॅप्टन मनोज सुब्रमनियम अस मृत पायलटचे नाव आहे.  मृत्यूचे प्राथमिक कारण कार्डियाक अरेस्ट असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र,  पोस्ट मोर्टेम नंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

काय घडलं नेमकं?

सुब्रमनियम यांनी बुधवारी त्रिवेंद्रम-पुणे-नागपूर या अशा दोन सत्रात उड्डाण केले. पहाटे 3 ते 7 या दरम्यान त्यांनी हे उड्डाण केले. त्यानंतर त्यांनी 27 तास विश्रांती घेतली. यांनतर आज ते नागपूर पुणे असे उड्डाण भरणार होते. डुयुटीवर जात असतानाच ते बोर्डिंग गेटवरच अचानक कोसळले.  विमानतळावरील ग्राउंड स्टाफच्या मदतीने  सुब्रमनियम यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. 

इंडिगो एयलाईन्सने व्यक्त केला शोक

जो वैमानिक विमान घेऊन उड्डाण करणार होता त्याचाच मृत्यू झाल्यामुळे विमानतळावर गोंधळ उडाला. अखेरीस नियोजीत वेळा पेक्षा 15 ते 20 मिनीट उशीराने या विमानाने उड्डाण केले. इंडिगो एयलाईन्सने शोक व्यक्त केला आहे. तसेच कुटुंबियांच्या दुख:त सहभागी असल्याचे सांगितले.     

आठवड्यात तीन वैमानिकांचा मृत्यू

आठवड्याभरात 3 वैमानिकांच्या आकस्मिक मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.  मृतांमध्ये दोन भारतीय वैमानिकांचा समावेश आहे. बुधवारी कतार एअरवेजच्या वरिष्ठ पायलटचाही अशाच प्रकारे मृत्यू झाला होता. वैमानिक दिल्लीहून दोहाला  उड्डाण करत असताना विमानातच त्यांची प्रकृती अचानक बिघडली. यानंतर त्यांचा मृत्यू झाला. मात्र, वैद्यकीय आणीबाणीनंतर विमान दुबईकडे वळवण्यात आले.

विमान हवेत असतानाच पायलटचा मृत्यू

विमान हवेत उड्डाण करत असतानाच वैमानिकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. LATAM एअरलाइन्सच्या विमानाने उड्डाण केल्यानंतर  कॅप्टन Ivan Andaur यांचा मृत्यू झाला. विमान हवेत उड्डाण करत असतानाच वैमानिकाची प्रकृती बिघडली.  यानंतर विमानाचं तात्काळ पनामा स्थानकावर लँडिंग करण्यात आलं.





Source link

कल्याणमध्ये थरारक घटना, आईसमोरच 25 वर्षीय तरुणाचा 11 वर्षाच्या मुलीवर जीवघेणा हल्ला

कल्याणमध्ये थरारक घटना, आईसमोरच 25 वर्षीय तरुणाचा 11 वर्षाच्या मुलीवर जीवघेणा हल्ला



कल्याणमध्ये अत्यंत थरारक घटना घडली आहे. एका 25 वर्षीय तरुणाने 11 वर्षाच्या मुलीवर चाकूने हल्ला केला आहे. 



Source link

सगळं काही सांगायचं नसतं; अजित पवार यांच्या सोबतच्या गुप्त बैठकीबाबत शरद पवार यांचे मोठे वक्तव्य

सगळं काही सांगायचं नसतं; अजित पवार यांच्या सोबतच्या गुप्त बैठकीबाबत शरद पवार यांचे मोठे वक्तव्य



भाजपबरोबर जाणार नाही, शरद पवारांची स्पष्टोक्ती. अजित पवारांबरोबरच्या बैठकीत राजकीय चर्चा नाही असे देखील शरद पवार म्हणाले. पवारांचा दावा, देश मोदींसाठी अनुकूल नाही अस भाकित देखील पवारांनी केले.   



Source link

आमच्यावर शरद पवारांचा आशीर्वाद; अजित पवार गटातील बड्या नेत्याच्या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ

आमच्यावर शरद पवारांचा आशीर्वाद; अजित पवार गटातील बड्या नेत्याच्या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ


sharad pawar and ajit pawar : शरद पवार आणि अतित पवार असे राष्ट्रावदीचे दोन गड पडले आहेत. अजित पवार यांच्या गट शिंदे फडणवीस सरकारसोबत सत्तेत सहभागी झाला आहे. तर, शरद पवार यांचा एक गट महाविकास आदघाडीसोबत विरोधात आहे. असे असताना राष्ट्रवादीत नाट्यमय घडामोडी घडत आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांच्या पुण्यातील गुप्त भेटीनंतर दोन्ही गटाच्या नेत्यांकडून करण्यात येत असलेल्या वक्तव्यांमुळे  राजकारणात खळबळ उडाली आहे. 

आमच्यावर  शरद पवारांचा आशीर्वाद आहे असं विधान अजित पवार गटाचे बडे नेते असलेल्या प्रफुल्ल पटेल यांनी केले आहे. तर, राष्ट्रवादीत फूट पडली नाही. सर्वजणं पवारांसाठीच काम करत असल्याच्या वक्तव्य शरद पवार गटासोबत असलेले राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केले आहे. राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांच्या या वक्तव्यामुंळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

 2 जुलै 2023 रोजी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला.  अजित पवार यांचा मोठा गट शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाला. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली आहे. शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट राष्ट्रवादीत पडले आहेत. 

शरद पवार बरोबर आले नाहीत तरी ठाकरे गट आणि काँग्रेस एकत्र राहणार

शरद पवार बरोबर आले नाहीत तरी ठाकरे गट आणि काँग्रेस एकत्र राहण्याचा विचार करतंय.  शरद पवार आणि अजित पवार भेटींवर ठाकरे गट आणि काँग्रेस दोघांनीही नाराजी व्यक्त केलीय. पवारांच्या या भेटींमुळे संभ्रमावस्था आहे. एकीकडे इंडियाची बैठक मुंबईत होत असताना दुसरीकडे शरद पवारांच्या अजित पवारांशी गाठीभेटी होत असल्यानं महाविकास आघाडीमध्ये नाराजी आहे. त्यामुळे  शरद पवार गटानं सोबत राहण्याबाबत वेगळी भूमिका घेतली तरी ठाकरे गट आणि काँग्रेस एकत्र राहण्याचा विचार करत असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात राजकीय टोलेबाजी जोरदार सुरू झालीय. 

पुतण्याने काकांना भेटण्यात गैर काय ? अजित पवारांचा सवाल

पवार काका पुतण्याच्या भेटींवर काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केलीय. या भेटी हा चिंतेचा विषय आहे. लपून होणा-या भेटी योग्य नाहीत अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलीय. तर पुतण्याने काकांना भेटण्यात गैर काय असा सवाल अजित पवारांनी केलाय. मी लपून फिरणारा माणूस नाही असंही ते म्हणाले. 

महाविकास आघाडीत कुठलाही संभ्रम नाही

महाविकास आघाडीमध्ये अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर संभ्रम आहे, अनेक नेते नाराजी व्यक्त करतायत. अशातच विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. महाविकास आघाडीत कुठलाही संभ्रम नसल्याचं त्यांनी म्हटलंय.  





Source link

Good News! महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत;7 तासांत कोल्हापुरात पोहोचणार

Good News! महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत;7 तासांत कोल्हापुरात पोहोचणार


Vande Bharat Express Kolhapur: महाराष्ट्राला आणखी एका वंदे भारत एक्स्प्रेसचे (Vande Bharat Express) गिफ्ट मिळणार आहे. राज्याला पाचवी वंदे भारत लवकरच मिळणार असून मुंबई ते कोल्हापूर (Mumbai-Kolhapur) या मार्गावर ती धावणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून या प्रस्तावित रेल्वेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळं मुंबई ते कोल्हापूर अंतर कमी होणार आहे. 

कोल्हापूरला जाण्यासाठी मुंबई मार्गावर अवघी एकच गाडी आहे. त्यामुळं गर्दीतून या गाडीतून प्रवास करावा लागतो. त्याचबरोबर वेटिंग लिस्टही असते. अशे असतानाच काही दिवसांपूर्वी कोकण रेल्वेला जोडणाऱ्या कोल्हापूर-वैभववाडी मार्गासाठी गती घेतल्याचे समोर आले होते. त्यानंतर कोल्हापुरकरांना आता वंदे भारत एक्स्प्रेसचे गिफ्ट मिळणार आहे. मात्र, प्रवाशांना वंदे भारतसाठी काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. मात्र असे असले तरी वेगवान आणि आरामदायी प्रवास कोल्हापुरकरांना लाभणार आहे. 

मुंबई-कोल्हापूर वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन मुंबई-कोल्हापूर दरम्यान  दादर, ठाणे, कल्याण, पुणे, सातारा आणि मिरज जंक्शन येथे थांबेल. तर मुंबईहून कोल्हापूरला जाण्यासाठी फक्त 7 तास लागणार आहेत. वंदे भारत एक्स्प्रेसमुळं शहरांतील प्रवासाचा वेळ 4 ते 5 तासांनी कमी होणार आहे. करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापूर बारा महिने पर्यटकांनी बहरुन जाते. त्यामुळं भाविकांसाठी वंदे भारत एक्स्प्रेस ही मोठी पर्वणी ठरणार आहे. वंदे भारत एक्स्प्रेसमुळं मिरज, सांगलीतील प्रवाशांचीही सोय होणार आहे.

मुंबई-कोल्हापूर वंदे भारत एक्स्प्रेस कधी सुरु होणार हे मात्र अद्याप निश्चित नाहीये.रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक अडचणींचं कारण देत या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस मार्च 2024 नंतर धावू शकते असं म्हटलं आहे. या मार्गावरील तांत्रिक अडचणी, रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण, पुणे मिरज मार्ग दुहेरी करण्याची काम मार्च 2024 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. सध्या मिरज- पुणे मार्गाचं दुहेरीकरण आणि विद्युतीकरण करण्याचं काम सुरु आहे. कोल्हापूर आणि मिरज दरम्यानचा मार्ग एकेरी आहे, जेव्हा आमची कामं पूर्ण होतील, त्यावेळी वंदे भारत ट्रेन सुरु करणं शक्य होईल, अशी भूमिका विभागीय वाणिज्यिक व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे यांनी अलीकडेच मांडली होती





Source link

YouTube
Instagram
WhatsApp