भाजपकडून मनसेला युतीची ऑफर ! सत्तेत सहभागी होणार? राज ठाकरे यांचे सूचक वक्तव्य

भाजपकडून मनसेला युतीची ऑफर ! सत्तेत सहभागी होणार? राज ठाकरे यांचे सूचक वक्तव्य



भाजपनं मनसेला युतीची ऑफर दिल्याची चर्चा आहे. मनसे पदाधिकारी बैठकीत संभाव्य युतीवर चर्चा झाल्याची माहिती  सूत्रांकडून मिळाली आहे. 



Source link

‘एक उत्तम नमुना बघायला मिळाला’; कळवा रुग्णालय घटनेवरुन संतापले शरद पवार

‘एक उत्तम नमुना बघायला मिळाला’; कळवा रुग्णालय घटनेवरुन संतापले शरद पवार



Sharad Pawar : कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणाची दखल घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे.



Source link

अमित देशमुख यांनी जाहीर केला मोठा निर्णय; धनंजय मुंडे यांच्या जागेवर दावा करणार

अमित देशमुख यांनी जाहीर केला मोठा निर्णय; धनंजय मुंडे यांच्या जागेवर दावा करणार



ज्यांच्यासोबत आघाडी करून निवडणूक लढवीत होता, तेच दुसरीकडे गेले. आता स्वबळावर लढण्याशिवाय पर्याय नाही..बीडचे प्रभारी अमित देशमुखांनी दिला स्वबळाचा नारा दिला आहे. 



Source link

राज्यात कधी परतणार जोरदार पाऊस? जाणून घ्या अपडेट

राज्यात कधी परतणार जोरदार पाऊस? जाणून घ्या अपडेट


Maharashtra Rain: जुलै महिन्याच्या शेवटाला जोरदार बॅटिंग करुन गेलेला पाऊस ऑगस्ट महिन्यात गायब झालेला दिसतोय. राज्यात अनेक ठिकाणी तुरळक पाऊस पडतोय. पण पावसाळा सुरु असताना जोरदार पावसाच्या सरी कधी पाहायला मिळणार? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर ही अपडेट तुमच्यासाठी आहे. हवामान खात्याने यासंदर्भात महत्वाची अपडेट दिली आहे. 

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढच्या आठवड्यात देखील पावसाची स्थिती अशीच राहण्याची शक्यता आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये तुरळक प्रमाणात पाऊस पाहायला मिळू शकतो. पण जोरदार पावसाची वाट पाहणाऱ्यांना 18 ऑगस्टपर्यंत वाट पाहायला लाहू शकते.

राज्यात 18 ते 24 ऑगस्ट दरम्यान पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या आठवड्यात राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यातील विविध जिल्ह्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. यानंतर अनेक जिल्ह्यांतही विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा कोसळायला सुरुवात करेल.

25 ते 31 ऑगस्ट दरम्यान पुन्हा एकदा राज्यातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. या आठवड्यात विदर्भ आणि कोकणात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. येथे पावसाचे जोरदार पुनरागम होण्याची शक्यता आहे.असे असले तरीही मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सरासरी इतका किंवा त्यापेक्षा पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. 

दरम्यान 13 ते 17 ऑगस्ट या कालावधीत महाराष्ट्रात मोठा पाऊस पडणार नाही. मध्य महाराष्ट्रासहित पश्चिम आणि दक्षिण भारतात मोठ्या पावसाच्या शक्यतेचे प्रमाण कमी असणार आहे.

जुन, जुलैमध्ये पडलेल्या पावसामुळे शहरात पाणी पुरवठा करणारे अनेक ठिकाणचे तलाव भरले आहेत. पण पाऊस सतत पडत राहणे आवश्यक आहे. शहरातील नागरिकांवर पावसाचा थेट परिणाम होत नसला तरी शेतकऱ्यांना पिकासाठी पावसावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे कमी पावसाचा फटका खरीप हंगामातील पिकांना बसू शकतो. लाखो शेतकऱ्यांची शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. पाऊस गायब झाल्यास त्यांच्या उत्पादनात घट येऊ शकते अशी भीती आता व्यक्त करण्यात येत आहे. 





Source link

Maharashtra Rain: तहानलेल्या मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी! राज्याच्या ‘या’ भागात मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Rain: तहानलेल्या मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी! राज्याच्या ‘या’ भागात मुसळधार पावसाचा इशारा


Maharashtra Rain Update: राज्यामध्ये दोन आठवड्यांपूर्वी पावसाने हाहाःकार माजवला होता. यवतमाळ, धुळे, कोल्हापूर, रायगड, मुंबई या भागात मोठा पाऊस झाला. राज्यातील अनेक गावांना पुराच्या पाण्याचा तडाखा बसला होता. हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार येत्या आठवड्यात पावसाचं पुनरागमन होणार आहे. त्यामुळे आता मराठवाड्यासह इतर भागातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचं वातावरण दिसत आहे.

कोणत्या भागात पाऊस?

आज दिलेल्या अंदाजानुसार 18  ते 24 ऑगस्टदरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांवर वरुणराजाची कृपा होऊ शकते. तर 25 ते 31 ऑगस्टदरम्यान कोकण, विदर्भ तर महाराष्ट्राबाहेर मध्य प्रदेश, ओडिसा, छत्तीसगड या भागांमध्ये मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

आणखी वाचा – क्षणात बदलतंय राज्यातील हवामान; आता कोणत्या भागात मुसळधार?

पुढील सात दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्रासहीत पश्चिम आणि दक्षिण भारतात पाऊस बरसणार आहे. मराठवाडा भागामध्ये पावसाचे प्रमाण सध्या अत्यल्प आहे. शेतकरी हवालदील झालेले असून पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. तरीही पुढील सात दिवसांमध्ये हवामान विभागाने वर्तवलेल्या पावसाची शक्यता अत्यल्प आहे. त्यामुळे पिकांचं काय होणार? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे.

दरम्यान, राज्याच्या काही भागांतील पावसाची विश्रांती मात्र संपलेली दिसत नाही. मुंबई, नवी मुंबईसह मध्य महाराष्ट्र आणि कोकणाच्या काही भागातही पावसानं उघडीप दिल्याचं पाहायला मिळालं. विदर्भाच्या नागपूर, अमरावती, बुलढाणा, अकोल्यासह इतर काही भागांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी असेल. तर, मराठवाड्याची तहानही हा पाऊस भागवेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. संभाजीनगरपासून नांदेडपर्यंत चांगला पाऊस होण्याची शक्यता आयएमडीनं वर्तवली आहे.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp