Ganesh Chaturthi 2025 : गणेशोत्सव काळातील बोर्डाच्या परीक्षांबाबत शासनाचा मोठा निर्णय

Ganesh Chaturthi 2025 : गणेशोत्सव काळातील बोर्डाच्या परीक्षांबाबत शासनाचा मोठा निर्णय


Dakshata Thasale

दक्षता ठसाळे-घोसाळकर या ‘झी 24 तास डिजिटल’मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. ‘प्रहार’ आणि ‘लोकमत’ या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि ‘टीव्ही 9’ आणि ‘न्यूज एक्सप्रेस मराठी’ या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. ‘India.com मराठी’ या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर ‘महाराष्ट्र टाईम्स’ च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर ‘झी 24 तास डिजीटल’मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे. 

…Read More





Source link

29000 KM चे खराब रस्ते तरी द्यावा लागतोय टोल; महाराष्ट्रातील खराब रस्त्यांचा आकडा तर थक्क करणारा

29000 KM चे खराब रस्ते तरी द्यावा लागतोय टोल; महाराष्ट्रातील खराब रस्त्यांचा आकडा तर थक्क करणारा



Potholes In Highway: 5 वर्षात राष्ट्रीय महामार्गावर 80 हजार जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ही आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. 



Source link

महाराष्ट्रातील सर्वांत श्रीमंत सिद्धिविनायक मंदिर कुणी आणि का बांधले? 225 वर्षांपूर्वीचा इतिहास जाणून थक्क व्हाल

महाराष्ट्रातील सर्वांत श्रीमंत सिद्धिविनायक मंदिर कुणी आणि का बांधले? 225 वर्षांपूर्वीचा इतिहास जाणून थक्क व्हाल


Siddhivinayak Temple Mumbai : महाराष्ट्रात सध्या गणेशोत्सवाची धूम पहायला मिळत आहे. अनेक जण गणेशोत्सवात आवर्जून सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी जातात. भाविकांची रीघ लागली आहे. जगभर प्रसिद्ध असलेलं मुंबईचे सिद्धिविनायक मंदिर हे भारतातील सर्वांत श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे.  भारतातील विविध राज्यातीलच नाही तर जगभरातील भक्त सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी येतात. सिद्धिविनायक मंदिराचा 225 वर्षांपूर्वीचा इतिहास जाणून थक्क व्हाल. महाराष्ट्रातील सर्वांत श्रीमंत सिद्धिविनायक मंदिर कुणी आणि का बांधले? जाणून घेऊया. 

असा आहे सिद्धिविनायक मंदिराचा इतिहास

225 वर्षांपूर्वी सिद्धिविनायक मंदिर बांधल्याच्या नोंदी सापडतात. देऊबाई पाटील  नावाच्या महिलेने  सिद्धिविनायक मंदिर बांधल्याचे सांगितले जाते. माटुंगा परिसरात राहणाऱ्या देऊबाई पाटील या सधन घरातील महिला होत्या. देऊबाई पाटील यांना मूल होत नव्हते. त्यांच्या घरी सिद्धिविनायक गणपतीचे छायाचित्र होते. त्या दररोज मनोभावे या तसबीरीची पूजा करायच्या. मूल झाल्यास मी सिद्धिविनायकाचे मंदिर बांधने असा नवस त्यांनी केला. त्यांची इच्छा पूर्ण झाली आणि त्यांना मूल झाले.  

मूल झाल्यानंतर त्यांनी आपला नवस पूर्ण केला. सन 1801 मध्ये त्यांनी सिद्धिविनायक गणपतीचे मंदिर बांधले. याचा सर्व खर्च पाटील कुटुंबानेच केला. मूळातील सिद्धिविनायकाचे मंदिर हे खूप लहान होते. सुरुवातीला विटांचा वापर करुन हे  घुमटाकार रचना असलेले या मंदिराचे बांधण्यात आले  होते. जीर्णोद्धार करून या मंदिराला भव्य स्वरुप देण्यात आले.

असे जगप्रसिद्ध झाले  सिद्धिविनायक मंदिर

सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी आलेली कोणतीही महिलांना पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद मिळावा अशी देऊबाई पाटील  यांची इच्छा होती. अनेक महिला नवस पूर्ण झाल्याचे सांगतात. सिद्धिविनायकाच्या  दर्शनाने मनातील इच्छा पूर्ण असे भाविक सांगतात. यामुळेच फक्त भरातातूनच नाही तर जगभरातील भक्त सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी येतात. सिद्धिविनायक मंदिराचे आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे इथे कोणताच भेदभाव केला जात नाही. या मंदिराची द्वारे सर्वांसाठी खुली असतात. कोणत्याही जाती, धर्म, पंथाच्या व्यक्तीला मंदिरात प्रवेश दिला जातो.

मुंबईचे सिद्धिविनायक मंदिर हे भारतातच नाही तर जगात प्रसिद्ध आहे. सर्व जाती धर्माचे सर्वसामान्य नागरिक ते अगदी लोकप्रिय सेलिब्रेटीं बाप्पाच्या दर्शनासाठी येतात. भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांच्या यादीत महाराष्ट्रातील दोन मंदिरांना स्थान मिळाले आहे. यापैकी एक मंदिर हे मुंबईचे सिद्धिविनायक मंदिर आहे. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टकडे 160 किलो सोने आहे. मंदिराचा गाभारा हा 3.7 किलो सोन्याने मढवलेला आहे. देणगी आणि प्रसादातून मंदिराला वर्षाला सुमारे 125 कोटींपेक्षा जास्त रुपये मिळते. या मंदिराचे व्यवस्थापन करणारे विश्वस्त मंडळही देशातील श्रीमंत विश्वस्त मंडळाच्या यादीत समाविष्ट आहे.  मंदिराला दान स्वरुपात मिळालेली देणगी सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या माध्यमातुन अनेक लोकोपयोगी, समाजपयोगी वापरली जाते. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या माध्यमातुन वैद्यकिय, शैक्षणिक तसेच गरजूंनाआर्थिक मदत केली जाते. राज्यात संकटकाळी सिद्धिविनायक ट्रस्ट सामान्यांच्या मदतीला धावून जातो. सिद्धिविनायक मंदिराकडून करण्यात आलेल्या मदतीची अनेक उदाहरणे पाहिली आहेत. 

(Disclaimer –  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. )

FAQ

1 सिद्धिविनायक मंदिर कुठे आहे?

सिद्धिविनायक मंदिर मुंबईतील प्रभादेवी परिसरात (पूर्वी माटुंगा परिसरात) आहे.

2 सिद्धिविनायक मंदिर कोणी आणि कधी बांधले?

सिद्धिविनायक मंदिर 1801 मध्ये देऊबाई पाटील नावाच्या महिलेन बांधले. त्यांना मूल होत नसल्याने त्यांनी सिद्धिविनायकाचा नवस केला होता, आणि मूल झाल्यावर त्यांनी हा नवस पूर्ण करून मंदिर बांधले.

3 सिद्धिविनायक मंदिराचा इतिहास काय आहे?

225 वर्षांपूर्वी (1801 मध्ये) देऊबाई पाटील यांनी सिद्धिविनायक मंदिराची स्थापना केली. सुरुवातीला हे मंदिर लहान आणि विटांनी बांधलेले घुमटाकार रचनेचे होते. नंतर जीर्णोद्धार करून मंदिराला भव्य स्वरूप देण्यात आले.

 





Source link

एकनाथ शिंदेंच्या खात्यावर मुख्यमंत्री फडणवीस नाराज? अजित पवार म्हणतात,'या बातम्या…'

एकनाथ शिंदेंच्या खात्यावर मुख्यमंत्री फडणवीस नाराज? अजित पवार म्हणतात,'या बातम्या…'


CM Upset On PWD Officers: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली.केंद्राचा निधी मार्च पूर्वी वापरायला हवा.जेव्हा पंतप्रधान स्वतः आढावा घेतात.तेव्हा मुख्यमंत्री म्हणून मी आणि नगरविकास मंत्री म्हणून शिंदे आम्हाला तोंड द्यावे लागते. त्यामुळे प्रकल्पाची कामे लवकर पूर्ण करा, असे मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

यावर ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही प्रतिक्रिया आली आहे. अशा प्रकारचा अपहार जर नगरविकास मंत्री करत असेल याचा अर्थ केंद्र व राज्य यांचे भ्रष्टाचारात संगनमत आहे, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केलीय. एकनाथ शिंदे हे नगर विकास मंत्री म्हणून पूर्णपणे अपयशी आहेत.देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना बडतर्फ केलं पाहिजे त्यांना तो अधिकार आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या नगरविकासाबाबत जनतेला विश्वासात घेऊन नगर विकास खात्यात कसा भ्रष्टाचार झालेला आहे हे त्यांनी सांगायला हवे, असे राऊत म्हणाले. पन्नास वर्षांपूर्वीचा भ्रष्टाचार काढतात असे मुख्यमंत्र्यांना वाटते मात्र तुमच्या नाकासमोर भ्रष्टाचार सुरू आहे तो काढा नगर विकास मंत्रीला बडतर्फ करा आणि महाराष्ट्र समोर नवा पायंडा पाडा, असेही ते पुढे म्हणाले. 

तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडूनदेखील यावर प्रतिक्रिया आली आहे.  मुख्यमंत्र्यांनी एका विभागावर नाराजी व्यक्त केली. त्याच स्वगत पण त्याच करणार काय? असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारला. तसेच संबंधितांवर कारवाई केली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. 

मुख्यमंत्र्यांनी नगरविकासच्या अधिकाऱ्यांना झापणं आणि त्यावर संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांची टीका या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगरविकास खात्याबाबतच्या बातम्या धादांत खोट्या असल्याचे सांगितले. त्यांनी या आरोपांचे खंडन करताना स्पष्ट केले की, खात्याविषयी पसरवले जाणारे दावे तथ्यहीन आहेत. त्यांनी सरकारच्या एकजुटीवर भर देत या बातम्या निराधार असल्याचे ठासून सांगितले. 

FAQ

प्रश्न: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांवर नाराजी का व्यक्त केली?

उत्तर: मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्र सरकारचा निधी मार्चपूर्वी वापरण्याबाबत नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः प्रकल्पांचा आढावा घेतात, त्यामुळे मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे प्रकल्पांची कामे लवकर पूर्ण करण्याचे आणि केंद्राचा निधी वेळेवर वापरण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

प्रश्न: संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणावर काय प्रतिक्रिया दिली?

उत्तर: शिवसेना (ठाकरे गट) चे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना अपयशी ठरवले आणि त्यांना बडतर्फ करण्याची मागणी केली. त्यांनी म्हटले की, नगरविकास खात्यात भ्रष्टाचार सुरू असून, मुख्यमंत्री फडणवीस यांनी जनतेला विश्वासात घेऊन सांगावे आणि शिंदे यांना हटवावे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, नाराजी व्यक्त केल्यानंतर कारवाई करावी, अन्यथा ती केवळ स्वगत राहील.

प्रश्न: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या बातम्यांवर काय म्हटले?

उत्तर: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगरविकास खात्याबाबतच्या बातम्या धादांत खोट्या असल्याचे सांगितले. त्यांनी या बातम्यांवर प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले की, नगरविकास विभागातील घडामोडींबाबत प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या तथ्यहीन आहेत आणि त्यांचे खंडन केले.





Source link

महाराष्ट्रातील सर्वात मोठा तब्बल 24 तासांचा ट्रॅफिक जाम; 25 किलोमीटर पर्यंत वाहने जागच्या जागी थांबली

महाराष्ट्रातील सर्वात मोठा तब्बल 24 तासांचा ट्रॅफिक जाम; 25 किलोमीटर पर्यंत वाहने जागच्या जागी थांबली



पुणे – इंदोर मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक मुळे येवला शहरातून नांदगाव मार्गे वळवली. 24 तासाहून अधिक काळ महामार्ग ठप्प होता. 
 



Source link

Raj Thackeray Audio Clip: 'तुम्ही मला सांगा आता ज्या विधानसभेच्या…'; बैठकीतला 'तो' खळबळजनक ऑडिओ ऐकाच

Raj Thackeray Audio Clip: 'तुम्ही मला सांगा आता ज्या विधानसभेच्या…'; बैठकीतला 'तो' खळबळजनक ऑडिओ ऐकाच


Raj Thackeray Audio Clip Viral: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी शनिवारी पुण्यातील कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनी उपस्थित केलेला ‘मत चोरी’चा मुद्दा योग्य असल्याचं म्हटलं आहे. राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भ देत कार्यकर्त्यांना मतदारयादीकडे लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे. राज ठाकरेंनी आपण यापूर्वीच हा मत चोरीचा मुद्दा मांडला होता असंही कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सांगितलं.

राज ठाकरे त्या ऑडिओ क्लिपमध्ये काय म्हणाले? वाचा संपूर्ण भाषण

राज ठाकरेंनी पुण्यातील या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना केलेल्या भाषणाची ऑडिओ क्लिप समोर आली आहे. राज ठाकरेंनी नेमकं काय म्हटलं आहे? या ऑडिओ क्लिपमध्ये काय आहे वाचा राज ठाकरेंचं हे छोटेखाणी भाषण जसच्या तसं…

“या मतदानामध्ये गडबड आहे हे मी केव्हापासून बोलतोय, बरोबर? या सगळ्या गोष्टींसाठी मी शरद पवारांना भेटलो, सोनिया गांधींना भेटलो, ममता बॅनर्जींना भेटलो. इथे महाराष्ट्रामध्ये सगळेजण माझ्याबरोबर आले आणि आमची पत्रकार परिषदही झाली. आयत्या वेळेला कच खाल्ली सगळ्यांनी. मी त्याचवेळेला सांगत होतो लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाका, त्याची जागतिक बातमी होईल. आता ते राहुल गांधींनी हे सगळं प्रकरण परत बाहेर काढलं. मी तेव्हापासून सांगतोय, आपल्याला मतदान होत नाही असं तुम्ही समजू नका. मतांमध्ये गडबड आहे. आपली मतं चोरली जातात. त्यामुळे तुम्हाला सतत पराभवाला सामोरं जावं लागत आहे. या मतांची चोरी करत करत हे सगळे सत्तेवरती आहेत.

तुम्ही मला सांगा आता ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या, भाजपाने 132, शिंदे 56, अजित पवार 42 जागा जिंकले. एकूण 232 च्या आसापास जागा जिंकल्या. एवढं संपूर्ण बहुमत मिळूनही संपूर्ण महाराष्ट्रात एवढा सन्नाटा पसरला होता. कुठेही विजयाचा जल्लोष का नव्हता? याचं कारण जे विजयी झाले त्यांना पटत नव्हतं. पचत नव्हतं. जे पराभूत झाले त्यांनाही पटत नव्हतं. कारण तो सगळा मतांचा गोंधळ होता. त्या मतांच्या गोंधळामुळे 2014 पासून सत्ता राबवल्या गेल्या आहेत.

निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद बघितली असेल तुम्ही. त्यांनी राहुल गांधींना शपथपत्र लिहून द्यायला सांगितलं. केंद्रात विरोधी पक्षाचे नेते कोण आहेत राहुल गांधी! त्याचवेळी त्या ठाकुरांनी, अनुराग ठाकुरांनी सहा मतदारसंघाचं काढलं. तो तर सत्ताधारी पक्षाचा आहे. म्हणजे निवडणूक आयोगाने काय वागलं पाहिजे, अरे विरोधी पक्ष पण बोलतोय आणि सत्ताधारी पक्ष पण बोलतोय. मग या सगळ्यांची चौकशी व्हायला पाहिजे होती. मात्र हे सगळं प्रकरण दाबलं जात आहे. याचं कारण गेल्या 10-12 वर्षांचा सगळा खेळ उघडा पडेल. यांना जर तुम्हाला निवडणुकीत उघडं पाडायचं असेल जर तुम्हाला निवडून यायचं असेल तर तुम्हाला प्रत्येकाला मतदार यादीवर काम केल्याशिवाय गत्यंतर नाही. तोपर्यंत विजय हातामध्ये येणार नाही.”

राज ठाकरेंच्या या आरोपांवर आता सत्ताधारी काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

FAQ

राज ठाकरे यांनी पुण्यातील बैठकीत काय मुद्दा उपस्थित केला?
राज ठाकरे यांनी पुण्यातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत निवडणुकीत मत चोरी होत असल्याचा आरोप केला. त्यांनी राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या ‘मत चोरी’च्या मुद्द्याला पाठिंबा देत मतदार यादीकडे लक्ष देण्याचा सल्ला कार्यकर्त्यांना दिला.

राज ठाकरे यांनी आपल्या ऑडिओ क्लिपमध्ये काय म्हटलं?
राज ठाकरे यांनी सांगितलं की, मतदान प्रक्रियेत गडबड आहे आणि मते चोरली जातात, ज्यामुळे मनसेला पराभव पत्करावा लागतो. त्यांनी 2014 पासून मतांच्या गोंधळामुळे सत्ताधारी सत्ता राबवत असल्याचा दावा केला. तसेच, निवडणूक आयोगाने या प्रकरणाची चौकशी न करता ते दाबण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका केली.

राज ठाकरे यांनी कोणत्या नेत्यांशी यापूर्वी मत चोरीबाबत चर्चा केली होती?
राज ठाकरे यांनी शरद पवार, सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी यांच्याशी मत चोरीच्या मुद्द्यावर चर्चा केली होती. त्यांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा सल्ला दिला होता, पण विरोधी पक्षांनी आयत्या वेळी माघार घेतली.

2024 च्या विधानसभा निवडणुकीबाबत राज ठाकरे यांनी काय म्हटलं?
राज ठाकरे यांनी सांगितलं की, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 132, शिंदे गटाने 56 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने 42 जागा जिंकल्या, म्हणजेच एकूण 232 जागा मिळाल्या. तरीही महाराष्ट्रात विजयाचा जल्लोष नव्हता आणि सन्नाटा होता, कारण मतांचा गोंधळ झाला होता.

निवडणूक आयोगावर राज ठाकरे यांनी कोणती टीका केली?
राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर मत चोरीच्या आरोपांची चौकशी न केल्याचा आणि प्रकरण दाबण्याचा आरोप केला. त्यांनी सांगितलं की, राहुल गांधी आणि सत्ताधारी पक्षाचे अनुराग ठाकुर दोघेही मत चोरीबाबत बोलत असताना आयोगाने कारवाई करायला हवी होती.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp