'थर्ड मुंबई'साठी थेट दावोसमधून गुंतवणूक; CM फडणवीसांच्या पुढाकारानं रायगडमधील 'या' भागाच्या विकासाला आणखी वेग

'थर्ड मुंबई'साठी थेट दावोसमधून गुंतवणूक; CM फडणवीसांच्या पुढाकारानं रायगडमधील 'या' भागाच्या विकासाला आणखी वेग



Devendra Fadnavis Davos 2026 : कोणत्या कंपन्यांनी केलीय गुंतवणूक? काय आहे या कंपन्यांची इच्छा, कसं असेल विकासाचं स्वरुप आणि कोणाला होणार याचा फायदा? जाणून घ्या मुख्यमंत्र्यांची उपस्थिती असणाऱ्या वर्ल्ड इकोनॉमिक फोरममधील महत्त्वाची बातमी… 
 



Source link

कल्याणच्या राजकारणात उलथापालथ, ठाकरे-शिंदेंचे जिल्हाप्रमुख एकमेकांना भेटले; काय घडलंय नेमकं?

कल्याणच्या राजकारणात उलथापालथ, ठाकरे-शिंदेंचे जिल्हाप्रमुख एकमेकांना भेटले; काय घडलंय नेमकं?


Kalyan Politics: महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर राज्यात सत्ता स्थापनेसाठी जोरदार तयारी सुरू झालीय. कल्याण-डोंबिवली महापालिकेत (केडीएमसी) बहुमत मिळवण्यासाठी भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांच्यात तीव्र स्पर्धा दिसतेय. येथे एकूण 62 नगरसेवकांचा बहुमताचा आकडा गाठणे आवश्यक आहे. शिंदे गटाकडे 53, तर भाजपाकडे 50 नगरसेवक आहेत. ठाकरे गटाकडे 11 आणि मनसेकडे 5 नगरसेवक निवडून आले आहेत. या स्थितीत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांना आपल्याकडे ओढण्यासाठी दोन्ही पक्षांकडून प्रयत्न होत असल्याचे दिसते. यामुळे राजकीय वातावरण तापले असून सत्ता कुणाच्या हाती जाईल? याबाबत उत्सुकता वाढलीय. दरम्यानच्या काळात काय घडलंय? जाणून घेऊया. 

Add Zee News as a Preferred Source

राजकीय गोंधळ वाढला 

केडीएमसीमध्ये सत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिंदे शिवसेना यांच्याकडून ठाकरे गट व मनसेच्या नगरसेवकांना फोडण्याचे आरोप होत आहेत. या प्रयत्नांमुळे ठाकरे गटाचे नऊ नगरसेवक अचानक अज्ञात ठिकाणी गेल्याची बातमी समोर आली आहे. सत्ता स्थापनेसाठी आम्हाला सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आल्याचे एका नगरसेवकाने सांगितले. यामुळे राजकीय गोंधळ वाढला असून, नगरसेवकांची पळापळ सुरू झाली आहे. हे सर्वजण सुरक्षित असल्याचे सांगितले जात असले तरी, विरोधकांकडून संपर्क होत असल्याच्या अफवा पसरल्या आहेत. अशा स्थितीत, महापालिकेत स्थिरता कशी येईल, याबाबत शंका उपस्थित होत आहे.

ठाकरे गटाचे दोन नगरसेवक मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे संपर्काबाहेर असल्याच्या चर्चा सुरू होत्या. सुरुवातीला ते शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचे बोलले जात होते. मात्र, नंतर शिंदे गटाकडून स्पष्ट करण्यात आले की, हे दोघे ठाकरे यांच्याच संपर्कात आहेत. यामुळे राजकीय ट्विस्ट निर्माण झाला आहे. या दोघांवर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठांकडून आले असून, पुढील काही तासांत निर्णय होईल, असे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शरद पाटील म्हणाले. 

राजकीय वर्तुळात चर्चा 

शिवसेना शिंदे गटाचे संपर्कप्रमुख महेश गायकवाड यांनी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शरद पाटील यांची भेट घेतली. ही भेट आशीर्वाद घेण्यासाठी आणि कौटुंबिक असल्याचे दोघांनी स्पष्ट केले. गायकवाड म्हणाले, ठाकरे गटाचे नॉट रिचेबल नगरसेवक ठाकरेंच्याच संपर्कात आहेत. मात्र शरद पाटील यांनी या भेटीला कौटुंबिक म्हटले आणि नगरसेवकांवर कारवाईचा उल्लेख केला. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. 

पक्षांतर्गत शिस्तीचा मुद्दा 

केडीएमसीमध्ये सत्ता कुणाकडे जाईल, याबाबत अनिश्चितता आहे. शिंदे गट आणि भाजप यांच्यात वर्चस्वाची लढाई असली तरी, ठाकरे गटाच्या नगरसेवकांच्या हालचालींमुळे तणाव वाढलाय. नॉट रिचेबल नगरसेवकांवर कारवाई होणार असल्याने पक्षांतर्गत शिस्तीचा मुद्दा पुढे आलाय. यामुळे महापौर निवडीसाठीचे प्रयत्न अधिक जोरदार होत आहेत. राजकीय नेते सतर्क असून, पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





Source link

सत्तास्थापनेसाठी नवी समीकरणं? इस्लाम पार्टीची, शिवसेना, एमआयएमला साद, हिंदुत्ववादी शिवसेना इस्लाम पार्टीला पाठिंबा देणार?

सत्तास्थापनेसाठी नवी समीकरणं? इस्लाम पार्टीची, शिवसेना, एमआयएमला साद, हिंदुत्ववादी शिवसेना इस्लाम पार्टीला पाठिंबा देणार?



महापालिकांचे निकाल लागताच आता सत्तास्थापन करण्याच्या घडामोडींना वेग आलाय. मालेगावात इस्लाम पार्टीनं सर्वाधिक जागा जिंकून सर्वांना धक्का दिलाय.. 35 जागा जिंकलेल्या इस्लाम पार्टीला बहुमताचा जादुई आकडा गाठण्यासाठी इतर पक्षांच्या पाठिंब्याची गरज लागणार आहे.



Source link

'आम्हाला कोणत्याही पक्षाची…', एकनाथ शिंदेंकडून मुंबईच्या महापौर पदासंदर्भात मोठं विधान, 'आम्ही BJP ला…'

'आम्हाला कोणत्याही पक्षाची…', एकनाथ शिंदेंकडून मुंबईच्या महापौर पदासंदर्भात मोठं विधान, 'आम्ही BJP ला…'


Ekanth Shinde on Mayor of Mumbai: मुंबई महापालिकेचा निकाल लागल्यानंतर आता, मुंबईचा महापौर कोण होणार? याचे सर्वांना वेध लागले आहेत. महापौरपदासाठी भाजपा उद्धव ठाकरेंसोबत पडद्यामागून चर्चा करत असल्याचे दावे केले जात आहेत. एकनाथ शिंदेंना शह देण्यासाठी भाजपा मुंबईत रणनिती आखत असल्याची चर्चा आहे. दरम्यान शिवसेना आणि भाजपा मुंबई महानगरपालिकेत महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढले असून  मुंबईत महायुतीचा महापौर होईल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर यासह महायुती म्हणून जिथे जिथे एकत्र निवडणूक लढलो त्याठिकाणी महायुतीचाच महापौर बनवण्यात येईल असंही त्यांनी सांगितले. 

Add Zee News as a Preferred Source

मुंबईमध्ये महानगर निवडणूकध्ये कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने, आणि शिवसेनेने आपले नगरसेवक पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवल्याने याबाबत अनेक तर्क वितर्क लावण्यात येत होते. मात्र या सर्व शंकाकुशंकांना पूर्णविराम देत मुंबईत महायुतीचाच महापौर होईल असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. मुंबईकर नागरिकांनी मोठ्या विश्वासाने महायुती म्हणून सेना – भाजपला मतदान केले असून त्यांच्या मतांशी प्रतारणा करून कोणताही वेगळा निर्णय शिवसेना घेणार नाही. नागरिकांनी याबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असंही ते म्हणाले. 

यासोबतच ज्या ज्या मनपामध्ये शिवसेना भाजप हे महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढले आहेत तिथेही महायुतीचाच महापौर बसविण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात अन्य काही राजकीय समीकरणे तयार होत असल्याबद्दल सुरू असलेल्या चर्चांमध्ये अजिबात तथ्य नसून मुंबईत शिवसेना भाजप रिपाइं महायुतीचा महापौर होईल असे त्यांनी सांगितलं.

“आम्ही बहुमताचा आदर करणार असून, विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. मुंबईत सध्या अफवा, अपप्रचार सुरु असून त्याला मी उत्तर देताना इतकंच सांगतो की, महायुतीला बहुमत दिलं असून महायुतीच महापौर होईल. ठाणे, कल्याण डोंबिंवली, उल्हासनगर तसंच राज्यातील इतर शहरात जिथे एकत्र लढलो आणि काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढलो. काही महापालिका सोडल्या तर महायुतीची एकत्र सत्ता स्थापन करणार आहोत. लोकांनी विकासाला स्विकारलं आहे. भावनिक मुद्द्यांनाही लोकांनाही नाकारलं आहे. त्यामुळे मुंबईकरांचा आदर करण्याचं काम महायुती करणार आहे,” असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

“विरोधकच चर्चा पसरवत आहेत. हारल्यानंतरही टांग उपर अशी स्थिती आहे. खोट्या अफवा पसरवणं, आरोप करणं हेच त्यांचं काम आहे. आम्हाला कोणत्याही पक्षाची आवश्यकता नाही. शिवसेना आणि भाजपा अनेक ठिकाणी बहुमतात आहोत. त्यामुळे नगरसेवक पळण्याची गरज नाही. मुंबईत महायुतीचाच महापौर होईल,” असं त्यांना ठामपणे सांगितलं आहे. 

“बार्गेनिंग करणं, महापौरपदाबद्दल कोणताही वाद, संभ्रम नाही. मुख्यमंत्री आता दावोसला आहेत, आल्यावर चर्चा होईल. चर्चेनंतर समन्वयाने निर्णय घेतला जाईल. आम्ही कोणताही दावा केलेला नाही. सत्ता आणि खुर्ची नाही तर विकास हेच आमचं ध्येय आहे. मुंबईला काय देणार, मुंबईचा विकास कसा करणार हे ध्येय आहे. सर्व अफवा आहेत त्याकडे लक्ष दिलं जाऊ नये,” असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. 

“नवीन नगरसेवक निवडून आले, त्यांचं वर्कशॉप झालं. कसं काम करायचं, आदर्श वॉर्ड यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आलं आहे. उद्या गट स्थापन झाल्यानंतर आपल्या वॉर्डात जातील. आमच्या नगरसेवकरांवर अविश्वास दाखवण्याची गरज नाही. उलट जे अफवा पसरवत आहेत त्यांनी आपल्या नगरसेवकांची चिंता करावी,” असा टोला त्यांनी लगावला आहे. 





Source link

पुण्यातून साताऱ्याला जाताना 'S' आकाराचे वळण असलेला डेंजर घाट लागणार नाही! 45 मिनिटांचा धोकादायक प्रवास फक्त 10 मिनिटांत

पुण्यातून साताऱ्याला जाताना 'S' आकाराचे वळण असलेला डेंजर घाट लागणार नाही! 45 मिनिटांचा धोकादायक प्रवास फक्त 10 मिनिटांत



पुणे ते सातारा प्रवास आता अधिक सुरक्षित आणि जलद होणार आहे. पुण्यातून साताऱ्याला जाताना खंबाटकी घाट लागणार नाही. नवी बोगदा बांधण्यात आला आहे. यामुळे 45 मिनिटांचा धोकादायक प्रवास फक्त 10 मिनिटांत होणार आहे. 



Source link

'अजित पवार, भाजप, शिंदेंकडे मोठ्या प्रमाणात हरामाचा पैसा; त्याचा खळखळाट असा घडला की, सगळ्यांचीच वस्त्रं…'

'अजित पवार, भाजप, शिंदेंकडे मोठ्या प्रमाणात हरामाचा पैसा; त्याचा खळखळाट असा घडला की, सगळ्यांचीच वस्त्रं…'


Maharashtra Politics Crrupt Money: उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी सत्तेतील तिन्ही पक्षांकडे हरामाचा पैसा असल्याचा टोला लगावला आहे. ‘सामना’मधील ‘रोखठोक’ या सदरामधून राऊत यांनी हा टोला लगावला आहे. “महापालिका निवडणुकीत अजित पवार यांनी भाजपचे पुरते वस्त्रहरण केले. भाजपच्या भ्रष्टाचाराच्या व लुटमारीच्या फाईल्स आपल्याकडे आहेत हा बॉम्ब टाकून त्यांनी खळबळ उडवली,” असं राऊत म्हणालेत.

Add Zee News as a Preferred Source

1999 मध्ये 100 कोटी म्हणजे आजचे दोनेक हजार कोटी

“भाजपने त्यांचे सरकार (1999) असताना 100 कोटींचा सिंचन घोटाळा केला व हे 100 कोटी ‘पार्टी फंड’ म्हणून वळवले. या व्यवहारात 10 कोटी लाच म्हणून अधिकाऱ्यांना दिले. पुरंदर जलसिंचन योजनेत हा घोटाळा झाला. योजनेची किंमत 330 कोटींपर्यंत वाढवली. ही वाढवलेली किंमत होती. 100 कोटी रुपये वाढवून फाईल तयार केली. 1999 मध्ये 100 कोटी म्हणजे आजचे दोनेक हजार कोटी. भाजपने सिंचन घोटाळा करून हे पैसे घेतले व अजित पवार यांनी भाजपचा सिंचन घोटाळा उघड केला. ही फाईल आपल्या ताब्यात असल्याचा स्फोट अजित पवार यांनी आता केला. गणेश नाईक यांच्या शब्दांत सांगायचे तर हा हरामाचा पैसा आहे,” असं राऊत म्हणालेत.

पंतप्रधान मोदींचा व मुख्यमंत्री फडणवीस यांचा मुखवटा फाडला

“अजित पवार, भाजप आणि शिंदे यांच्याकडे मोठ्या प्रमाणात हरामाचा पैसा आहे. हरामाच्या पैशांवर हे तिघे एकमेकांवर हल्ले करीत आहेत. तरीही तिघे एकाच सरकारमध्ये नांदत आहेत. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर हल्ला केला व मुख्यमंत्र्यांनी प्रतिहल्ला केला. “भाजपने माझ्यावर 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप केला, पण आज मी त्यांच्या सरकारमध्ये आहे!” असे सांगून अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींचा व मुख्यमंत्री फडणवीस यांचा मुखवटा फाडला. शिंदे यांचा 40 हजार कोटींचा भ्रष्टाचार आपण कसा रोखला, हे मुख्यमंत्री फडणवीस खुलेपणाने सांगतात,” असा टोमणा राऊतांनी लगावला आहे.

खरे राजकारण पुढेच घडणार

“भ्रष्टाचाराच्या चिखलात बरबटलेला निवडणूक आयोग म्हणून ही महानगरपालिका निवडणूक लक्षात राहील. त्या चिखलात त्यांनी मुंबईलाही बुडवले. हरामाच्या पैशांचा खळखळाट असा घडला की, सगळ्यांचीच वस्त्रं वाहून गेली. मराठी माणूस, मुंबईच्या रक्षणासाठी ‘ठाकरे बंधूं’नी झुंज दिली. हा अस्मितेच्या लढय़ाचा इतिहास नव्याने लिहिला जाईल. महापालिका निवडणुका संपल्या, निकाल लागले. खरे राजकारण पुढेच घडणार आहे,” असं सूचक विधान राऊतांनी केलं आहे.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp